★★★इथल्या धर्माला धम्माची गरज.....★★★

भाग-दोन

सर तोंडावर उजवा हात ठेवून मुखरीने हसत म्हणाले की,
"तुम्हें बहुत उत्कंठा लगी है....सुनो.."
"बुद्ध त्या विहाराच्या मध्यस्थी बसून प्रज्ञा देत होते.अनुयायी निश्चल ऐकत होते.
बुद्ध कोमल वाणीने शब्द उच्चारून गेले..."
"जे ख-याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुध्दिमुळे कधीहि सत्यापर्यंत पोहचु शकत नाहीत".
"जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणुन ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक द्दष्टी आहे.विवेक असतो.त्यांना सत्य लाभते.सतसार तिथे उन्मेशीत होतो."
डोळ्यांची उघडझाप करत आगळे सर बोलत होते.सर अधूनधून हिंदी अनुवाद मराठीतून सांगत होते.त्रिपटक,बुद्धतत्वसार,आणि जातक कथेतील बोधवाक्य सांगू लागले.काहींच्या डोक्यांउपर जाऊ लागलं.अन मंगला बसते त्या बाकड्यामागील बाकड्यावर बसलेला नागू चुळबुळ करू लागला.एकवार नीलम त्याला म्हणाली की,
"गब्बस न रे,कित्ती वानुगत वळवळ करा लाव्लाव..ऐक न जरा....!"
सर तो गोंधळ समजून नागू अन रोशनकडे मान फिरवत एकदाच पाहून बोलले,
"बरं का...नागू,,इकडे लक्ष दे...चित्रगुप्त त्यांना अशांती पसरविण्याचे अहवाल पाठवा...!"
अन आम्ही सारे हसू लागलो.सर किंचितसे हासले अन पुढच्याच क्षणी ते डोळे लावून विचार करू लागले.म्या त्या बाकड्यावर नजर झुगारली.सारा वर्ग रोषणच्या आवताराला न्याहाळू लागला.हा चित्रगुप्त म्हणजे रोशन...आगळे सरांनी तिसऱ्या सेमिस्टरपासून त्याचं नामकरण केलं होतं.त्यो जामखेड महाविद्यालयातून आलेला.त्याने सरांकडून मस्टर घेऊन विद्यार्थ्यांच्या सह्या घ्याव्या,कुणी गैरहजर असले की,त्यावर काठ मारावी,कुठे सेमिनार असले की,वेळ नियंत्रक म्हणून काम बघावं,सारा कारकुनी स्वभाव रुजवला आहे त्याने स्वतःत.सोवळ्याओवळ्यात राहणारा, कपाळी अष्टगंध,कधी नसला की लाल कुंखु लावलेला.दुटप्पी उपरणं खांद्यावर.गळ्यात तुळशीच्या तीनचार लहानमोठ्या प्रकारच्या माळी.अन कमरेला निसट्ता बेल्ट....असा आधुनिक पुराणिक-"चित्रगुप्त."
आम्ही त्याला कधी "महाराज" कधी "चित्रविचित्रमुक्त" नाही तर कधी "ब्वॉबाजी" म्हणतो.सर चित्रगुप्त म्हणाले अन रोजच्यासारखं सारे हश्या पिकवू लागले.
"शांतता,शांतता,गोंधळ.."
"बुद्ध काय म्हणाले ऐका,, पुढं,ऐका....!"
आगळे सरांनी खिडकीतून कारुण्यमय नजर फेकत शब्द केले....
"सार विवेक ही प्रणाली सत्यनीतीला बळ देत अहंकाराचा त्याग करायला निर्भर होते.जन्माचे,त्या विश्वदुःखाचे मूळ अहं,अस्मी,हूं,मध्ये लोपले आहे.त्याला  त्यागवृत्तीने लांच्छित केल्या जाते.म्हणून त्याग ही धम्माची मोठी ताकद आहे.जपली पाहिजे.आशा,ईच्छा,लोभ,काम,अर्थहव्व्यास, टाळला गेला पाहिजे...!"
अनुयायी प्रश्न करीत होते.
"तथागत...पण आम्हांला अजून पूर्णपणे यावर विजय मिळवायला काय अनुग्रह करावे लागतील.?"
"का हे दुःख भारपीडा ठेवून जीवांना लांच्छन करीत राहील...समोपाय काय होईल...?
"शिका-अनुष्याशीत अनुसरण आणि परत्वे त्याज्यबोध सांभाळ....!"
"भवतु सब्ब मंगलम....!"
म्हणून बुद्ध शांत होतात तोच दोन पहारेकरी आत विहारात घुसले.बुद्धांच्या चरणी लिन झाले.अन हकीकत सांगू लागले.

-विश्वा
क्रमशः-
1/5

Comments

Popular posts from this blog