★★★इथल्या धर्माला धम्माची गरज.....★★★

भाग-चार[अंतिम]

"मद्यशामियान्याच्या तोंडावरच राजधर्मी वस्त्र नसलेले दोन व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत एकमेकांशी वार्तालाप करू लागले होतें.दोघांच्याही हातात राजेसरी मुद्रे होतें.ते मंद दिव्यांच्या लालसर लखोटीत लकाकत होतें.ही मुद्रे केवळ धर्मशाशन करणारांना बहाल केल्या जाते हे आम्हां दोघांनाही ज्ञात होतें.दोघे मोठमोठ्याने आवाज चढावून बोलले,
"राजधर्म आम्हीं पाळीला आहें...मोहरा आम्हांस तीन हिस्से असाव्यात....!"
"आम्हीं ते प्रेत गोरींत दाबून सारा भ्रम नष्ट केला आहें तेव्हा मला हिस्से तीन राखू ठरवा.."
"किंतु...त्या स्त्रीचा खून आम्हीं घडवून आणला आहें..हे जिकरीचे काम तुम्हांकडून घडले नसते...तुमची दराज आम्हां ठावेंती...?"
"परंतु भूमका का वर्ज्यदर्जा होतें??
तुम्हां ते जमले नसते...अंगावर आळ बसिला असता.त्या तथागतांना गोवलें हेंचि मोठे कर्म समजून तीन हिस्से आम्हीं राखू ठेविला..नाही तर....!"
"आणि त्याने त्या दुसऱ्याची नरडी दाबण्याचा निष्फल यत्न केला."
"अनुयायी अवाक् झाले.सर्व बुद्धांच्या स्मितमुखाकडे पाहू लागले.बुद्ध एकही शब्दांची उच्चारणा करणार नव्हते.ते ऐकू लागले.निर्विकार नि विवेकशील नजरेने त्या गुप्तहेरांकडे ते पाहत होते."
आगळे सरांनी हात उलटा फिरवून टेबलावर ठेवत प्रश्न केला....
"मंग.. पुढं काय महाराज्यांनो...आहे का ठाऊक..?
इथे काय नीती आणि सत्याचा सहसंबंध..."
साहित्य आणि नितिनियमांची सांगड कशी घालणार?
सत्य आणि साहित्य काय सांगू पाहते आहे?
काय,,, काय...इथे समवाय काय साधला आहे?"
सरांनी दोन्ही हाताची कुडबुडी करत फिरवली.एक हाताची मूठ तर हनुवटीजवळ नेत विस्मयादी नजरेने सर्वांना न्याहाळले.अंजली काहीतरी लिहीत होती.सरांनी तिच्याकडे हात दाखवला...
"हे बघा...!" 
"लिहून घ्याच्या गोष्टी आहेत का ह्या.???
"आचरणाच्या बाबी आहेतनं...!"
आणि ती लिखाणातून सावरली.बाजूच्या बाकड्यावर बसलेला बाळू त्यो पण पेनाचं टोकन बंद करत पुढचं ऐकू लागला.
"दोघांची झटाझोंबी चालू लागली.हमरीतुमरी झाली.आणि दोघे एकमेकांची त्या दिवशी केलेल्या कृत्याची उजळणी करू लागले."
"इथे धर्म टिकवायचा असेल तर त्या तथागतांना हाकलून देणे हें जिकरीचे होते ते काम ह्या खुनाच्या अाळाने यथार्थ स्त्रीअंत केल्या आपल्या कर्माने झाले आहे."
"बुद्ध तत्वज्ञान पाय पसरत आहें हेंहीं ठावेंती आम्हां....म्हणून आम्हीं काय गोर भरण्यास कसूर ठेविली..???"
गुप्तहेर बोलला,
"हे...महाज्ञाता तथागता...त्यांची कुबुद्धि समजोनी आम्हीं त्यास कैद केले आहे.राजमोहरा हडप केल्या आहेत.खुणेकरी पकडले आहेत.आणि धम्माचे विडंबननाश रोखण्याचा मुंगींयत्न केला आहें.आम्हांला क्षमायाचना करून उद्बोधित करावे....!"
आणि सर बोलायचे क्षणभर थांबले...
आणि म्हणाले,
"काय बोलले असतील तथागत गौतम बुद्ध...?"
"आजच्या काळातला धर्म आणि धम्म काय सहसंबंध,विरोधसंघर्ष,समवायसंगर काय सांगू शकाल?"
"आजची राजकीय प्रणाली कोणत्या तत्वांवर हुकूमती करत आहे.?"
"गणराज्य संकल्पना अस्तित्वात आहे का?"
"बुद्धांना अभिप्रेत असणारा धम्म आज कोणत्या अवस्थेत आहे?"
"मानसिकता काय आहे समाजाची?"
"धर्म नीती,सत्य,आणि तत्व बाळगून आहे काय?"
"अधर्माने राजसत्ता कशी हस्तगत केली आहे?"
"मानवजनांचे शारीर,मानसिक,नैतिक,भावनिक,आर्थिक शोषण कधी थांबणार?"
"मानवमुक्तीला बहाल झालेला धम्म धर्माला केव्हा कळणार?"
"आजच्या काळात धर्माला धम्माची गरज आहे हे उमगणार की नाही?"
सारे विद्यार्थी विचारात बुडाले तसा म्या पण इचार करत होतो....
                     "वास्तविक धर्म आणि राजकीय परिप्रेक्ष यांची मीमांसा ही अध्ययन अध्यापन व मूल्याधिष्टीत समाजनिर्मिती च्या उद्दिष्टासाठीची सहसंबंध तत्त्वावर असावी.की जी आजतागायत दिसत नाही.भारतीय शिक्षण व्यवस्थेने स्वीकारलेली नाही.ती राजकीय अधिसत्ता किंवा अधिसत्ताक राजकीय प्रबल्यासाठी दूर नेऊन ठेवली आहे.
           अधर्माच्या आचरणाने आज सामाजिक मानसशास्त्र आज विकलांग होत आहे.सर्वसामान्य जनतेच्या ब्रेनवॉशिंग करणाऱ्या जणू बाजारपेठा उभ्या राहिल्या आहेत.या धर्तीवर सामाजिक मानशास्त्रांचा निधर्मीवृत्तीने अभ्यास करणारा वर्ग दिसत नाही.आज तोल गेलेला समाज असमतोलपनर जिणे जगत आहे.मात्र विचारांती सामाजिक परिस्थितीचे मीमांसक घडत नाहीत.व्यक्तीला एकट्याचे नियंत्रण असू शकते मात्र जमावाला नियंत्रण नाही.धर्मात आणि धम्मात गणजनांचा  भरणा असतो.समूह असतो.विवेक व सामाजिक सुव्यवस्था हरवत चाललेल्या मानवी समूहाचे विश्लेषक आज तोंड बांधून बसलेल्या अवस्थेत आहेत.समूहमनाचा,मानसशास्त्राचा विचार कुणीच करत नाही.कोणत्याही मीमांसकाला आजच्या वास्तवात समूहाला विवेकाची मानसशास्त्रीय बैठक देण्याचा आज अभ्यास होत नाही.हिंसक आणि रक्तपात घडवून आणणाऱ्या विचारसरणीला चोपविता येणारे मानसशास्त्र आज उपलब्ध नाही ही खेदजनक बाब आहे.चळवळींनी हे सत्य समजलं पाहिजे. धर्म,राजकारण,अर्थ,नीती,शिक्षण,आणि खास करून विकृत अधर्माने ग्रासल्या गेल्या चळवळींच्या मुशीतुन हे जहर ओतले जात असतांना सामाजिक मानवी मनाचा भपका होत आहे.आणि यातूनच दंगली,हिंसाचार,रक्तपात आणि संघर्ष पेटल्या जात राहतो आहे.धर्मांधवृत्तीने नि जातीपातीच्या खेळीने समाजाला चौकडात उभं केलं आहे.आणि अर्थ-विचार-शिक्षण-एकात्मतेच्या अभावाने माणूस पूर्णतः खंगून गेलेला आहे.वैचारिक गुलामीने नि बुद्धीने नग्न झालेला समाज वास्तवातल्या इखारी उन्हांनं भाजत आहे.मग स्वत:ला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दु:खी करा,अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वत:ला दु:खी करा.अथवा स्वत:ला आणि दुसऱ्यालाही दु:खी करा,अशा तऱ्हेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्हि विश्वास ठेवाल काय?
त्यावर श्रद्धा ठेवाल काय?
व्यक्तिला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येये आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते,त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते,ती जो समाज समुहात विभागलेला असतो,त्यात साधता येत नाही. समुहाप्रमाणे आदर्श आणि ध्येये भिन्न असली की,समाजातील व्यक्तिचे विचार भरकटतात, आणि समाजव्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची द्दष्टी सुसंगत राहु शकत नाही.ती विकृत होते. दुसरे असे की समुहव्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही.
समुहव्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात.जे मालक असतात ते मालकच राहतात अाणि जे दास्यात जन्मास येतात ते दासच राहतात.धनी ते धनीच राहतात. कामगार ते कामगारच राहतात.अधिकारसंपन्न ते अधिकारसंपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात.धर्माचे भक्त ते भक्तच राहतात.दास म्हणून जगतात.धम्मात असे नहीं.तिथे सकळ मानवमुक्तीला स्थानठराव आहे.याचा अर्थ असा होईल की,अशा धर्मव्यवस्थेत स्वातंत्र्यााचा लाभ काही थोड्यांनाच होतो.बहुसंख्यकांना मात्र त्यापासुन वंचित रहावे लागते.यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनविणे.बंधुता.म्हणजे काय?
बंधुता म्हणजे मानवामानवातील भ्रात्रुभाव...
म्हणजेच नीति.म्हणुनच तथागत बुद्धांनी हे शिकविले,
"धम्म म्हणजे नीति आणि नीती म्हणजे धम्म.धम्म पवित्र आहे तशीच नीतीही पवित्र.         
               सामाजिक स्थिरता टिकविण्यासाठी समता आणि जागृती निर्माण व्हायला पाहिजे.त्यासाठी जातीय राजकारण आणि धर्मांध नीतीला नेस्तनाबूत करून एक प्रवाह तयार करवा लागेल.ही प्रक्रिया थोर विचारवंतांनी दिलेल्या मार्गाने यशस्वी होईल.जेव्हा गटागटात विभागलेले बळ एकत्र येतील तेव्हाच या अमानुष व्यवस्थेचा डोलारा पाडल्या जाईल.येणाऱ्या पिढ्या सुरक्षीत राहतील.आज हे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे.समाज सजग राहिला पाहिजे.
प्रज्ञा-शील-करुणेचा अंगीकार करणे करणे आणि समता,स्वातंत्र्य,न्याय व बंधुतेचा पुरस्कार करणे हेच मुळात बेबंधशाहीला न पटणारे वास्तव समजले पाहिजे.नीतीचे धर्मात स्थान कोणते?
वस्तूत: धर्मात नीतीला स्थान नाही.ते हल्ली दिसूनही येत नाही.धर्माचे विषय म्हणजे देव,आत्मा,स्वर्ग,नर्क,होमहवन,प्रार्थना,पूजा -कर्मकांड,विधी,समारंभ आणि यज्ञ हे होत.एका माणसाचा दुस-या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो.इथे धर्माच्या अनुसरणातच मुळात मानवी अस्तित्वाला नकार दिला आहे.यातून दूर लोटलं आहे.माणसानेच माणसाचे हक्कअधिकार तोडले आहेत.शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो.धर्म हा एक त्रिकोण आहे. "आपल्या शेजाऱ्याशी चांगूलपणे वागा.कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात." ही धर्माची विचारसरणी आहे.प्रत्येक धर्म नीती शिकवितो.परंतु निती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे.ती त्याला जोडलेला एक डबा आहे. वेळ पडेल त्या प्रमाणेच तो त्याला जोडतो किंवा त्यापासून सोडविता येतो.याज धर्मात नीती उरली आहे का?असाही सवाल फणा काढतो.धर्माच्या व व्यवहारात नितीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे.म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही.नीतीने चालणारा धर्म राजकीय अर्थाने आज कसा राजव्यवव्हार करत आहे?
आपण चिकित्सा केली पाहिजे की,धम्मात नीतीचे स्थान कोणते?
याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती.दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात देवाला स्थान नाही.त्याचे स्थान नीतीने पटकावले आहे . धम्मात प्रार्थना,तीर्थयात्रा कर्मकांड,विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही.नीती हे धम्माचे सार आहे.त्याशिवाय धम्म नाही.धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे.यातूनच नीतीचा उगम होतो.त्यासाठी देवाच्या आज्ञांची आवश्यकता नाही.मुर्तीपूजेची आवश्यकता नाही.देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे.कारण धम्म नितीचा सिध्दांत सांगतो जो विज्ञानाला आधार मानतो.पण धर्म हा या सर्वांपासुन अलिप्त राहतो,म्हणुन त्याला कशाचा अधार नाही.ययामुळेच बुद्धिप्रामाण्यवाद-विवेक नि तर्काचा स्वीकार करून अज्ञान,दारिद्र्य नि दुर्बलतेला नकार देणे ही स्वाभिमानकपणे वैचारिक चळवळींनी घेतलेली मानसिकता पुढे अस्पृश्यता,जातीभेद,चातुर्वर्ण्याला नकार देत राहिली पाहिजे.कारण आजही छुप्या रीतीने ही मानसिकता टिकून आहे.ज्यामुळे जातीय,हिंसात्मक वळण घेणाऱ्या घटना समाजात घडून येतांना दिसत असतात.धर्म याला कारणीभूत आहे.धम्मात मुळात अहिंसेचा स्वीकार आहे हे विसरून चालणार नाही.कारण भारतीय परिप्रेक्षात शिक्षण प्रसारपेक्षा धर्मप्रसार,प्रचार हा मानवी मानसिकतेला पोक्त भीतीयुक्त आदर बाळगायला लावत आहे.यामुळे सामाजिक परिवर्तनाची मेख उभी राहून भेदाभेदाच्या तत्वज्ञानाला हादरे बसू लागतील.या अधर्मविचारविरोध संघर्षाची बाजू उभी होईल.त्याचप्रमाणे या संघर्षाला धर्म,राजकारण,समाजकार,शैक्षणिक ध्येयधोरणे आणि मानसिकता आदी बाबी कारणीभूत होत्या आणि आहेत हे कुणीही नाकारू शकत नाही.म्हणून,
                             "आपण ज्या परिसरात जगतो,राहतो त्या ठिकाणची अस्थिरता,अस्वस्थता आपण लेखणीच्या माध्यमातून निर्भीड व वास्तवाच्या दृष्टीकोणातून मांडली पाहिजेत.मराठी साहित्याचा अभ्यास करणारे हे सत्य जाणून आहेत.सत्य ते कि ज्या लेखण्या केव्हाही जिवंत असतात....!"
(समाप्त)

                         -लेखक-
                 विश्वनाथ अर्जुन साठे       
-9921056462 [समाप्त] दि.03/05/2018
                     मराठी विभाग
       सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे
                          आणि
          कार्यक्रम अधिकारी-नेयुके-पुणे
          युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय-
                    भारत सरकार.

Comments

Popular posts from this blog