खंड अष्टम -
त्यांचे व्यक्तिमत्व -
देहाकृती - आकर्षक, उंच, सुदृढ, अजानबाहू व सिंहगती, वृषभनेत्र व सुवर्णक्रांती, रुंद छाती, भुवया, कपाळ, डोळे, तोंड.
देह - हात, पाय व त्यांची गती विलोभनीय. खेळून ठेवणारी. तेज, सामर्थ्य, सर्वोत्तम सौंदर्याचा प्रभाव इतरांवर.
त्यांच्याबद्दल प्रेम व आदर, भक्ती, स्नेहार्द, श्रवणास उत्सुक वाणी - मधुर, गंभीर, आकर्षक, कल्पनात्मक, सुस्पष्ट, आश्वासनपूरक.
रूप - पूज्य, हृदयकारुण्य भावना, हेलावून टाकत. मने इच्छेप्रमाणे वळवत. सत्यमुक्तीच्या मार्गाची खात्री. त्यांचे भाषण ऐकणाऱ्या गुलामांना स्वतंत्र असल्याची सत्य शब्दांनी जाणीव होई.
स्वर - आश्चर्यचकित व हर्षभरीत, डाकू अंगुलीमाल व आळवीचा नरमांसभक्षक यांची दीक्षा त्यांचेशिवाय कुणास जमली नसती. राजा प्रसेनजित व मल्लिका राणी यांचे एका शब्दात सख्य करून देणे कुणाला जमले असते?
त्यांची मानवता - करुणा महाकारूणिकता
मनुष्याजवळ असावे असे समर्थ, विनम्र, संतुष्ट, इंद्रियनिग्रही, विवेकी, सुज्ञ, मंगल, कुशल, निरामय, जागृत, सद्गुनी, ज्ञानी, शत्रूप्रेमी, इ. गुण त्यांच्या अंगी होते.
उद्धट, कुटुंब आसक्ती नको. द्वेषी, फसवा, दुष्ट, अनिष्ट असू नये. मोही, इंद्रियसुखी नको. अश्रूसिंचित, दुःखी असता कामा नये. आपल्या शत्रूवरही प्रेम करा.
विशाखेचे आणि किसा गौतमीचे सांत्वन. सर्पदंश झालेला मुलगा कडेवर घेऊन वेड्यासारखी ती फिरे. मोहरी घेऊन ये जिथल्या घरात कोणी मृत्यू पावले नाही.
सर्व नश्वर आहे. हा सृष्टी नियम आहे. तुम्हास मातापिता नाही. तुम्ही जर एकमेकांची सेवा केली नाही. तर दुसरे कोण करणार?
या घाणेरड्या देहात काय आहे पाहण्यासारखे? जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही. महानामास उपदेश -
बंधूधम्म आणि संघभाव श्रद्धेचा ठेव. धम्माला अबाधित ठेवणाऱ्या शीलावर श्रद्धा राख.
मातापिता, पुत्र - इंद्रियसुख दृष्टी, चित्त, उच्चसत्वाची विरक्ती, ध्यानस्थ, लोभ, हाव.
जीवमुक्ती, सत्वाचा त्याग, आसवांपासून विरक्त - श्रावक होणे.
श्रद्धा सर्वोच्च धन. धम्माच्या यथार्थ आचरणाने सुखप्राप्ती. सत्याची चव स्वादिष्ट. प्रज्ञा पूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ.
माणूस श्रद्धेद्वारे पूर (पुनर्जन्म) पार करू शकतो. दक्षतेने भवसागर पार करू शकतो. प्रयत्नाने दुःखावर विजय मिळू शकतो.
प्रज्ञाने शुद्ध होतो. तो मानव निर्वाणप्राप्तीस धम्मश्रद्धा व आज्ञापालन, दक्ष, तत्पर मनुष्यास ज्ञान प्राप्ती होते. उचितकार्य दृष्टी, जागृताला धनप्राप्ती. दानाला नेतृत्व मिळते.
सत्य, सदाचार, सहनशीलता, औदार्य त्याला मृत्तोत्तर पच्छाताप ताप होत नाही.
समता व समाज व्यवहाराचे वर्तन -
१) दिवसातून एकदाच अण्णा क्षण
२) तीनच्यावरी शिवरे नाही
३) खाजगी मालमत्ता नको विचार प्रजापती गौतमी हीच मावशी दाई व दत्तक घेणारी होती. तिच्याकडूनही चिवर वा वस्त्रे तथागतांनी स्वीकारले नाही.
त्यांची आवड नावड -
१) दारिद्र्य नापसंत होते.
२) संग्रहक वृत्ती नापसंत होती
३) सौंदर्याची आवड
तृष्णा -
१) तृष्णेमुळे लोभ व त्यामुळे काम व लालसा निर्माण होतात.
२) लालसा व कामामुळे स्वामित्वाचा लोभ व त्यामुळे त्यावर पहारा ठेवणे आवश्यक. ३) मालमत्तेवर पहारा ठेवताना अनेक दुष्ट प्रसंग निर्माण होतात. जसे - मारामारी, जखम, संघर्ष, निंदा, भांडण, असत्य हा प्रतित्यसमुत्पादाचा नियम आहे.
४) सर्व तृष्णा समुच्चयाने निपटून उपटून त्यांची लालसा न धरता उलट त्या त्याग व नाश.
५) परित्याग म्हणजे बुद्धत्व.
६) तृष्णेमुळे आसक्ती आणि दास्यत्व निर्माण होते.
सौंदर्य -
सौंदर्याच्या सहवासात रहावे. अनुदित सद्धम्माचा उदय व उदित अधम्माचा लोभ करण्यास समर्थ अशा सौंदर्याच्या सहवासाइतके दुसरे कारण नाही.
सग्यासोयऱ्यांचा अभाव ही शुल्लक गोष्ट. पण विद्वत्तेचा अभाव ही फार हानिकारक बाब आहे. धनवृद्धी शुल्लक गोष्ट. परंतु ज्ञानवृद्धी फार हिताची संपूर्ण गोष्ट आहे.
त्याग, विराम, विराग व परिणीती म्हणजे आत्मसमर्पण.
जे प्राणी नाशवंत, मर्त्य, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त त्यांच्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते. सौंदर्याशी मित्र, सहवासी, निकट, परिचित - आर्य अष्टांगिकमार्ग - मुक्तीचा विकास.
उपसंहार -
अडीच हजार वर्षांपूर्वी जन्म. पूर्वी तमोयुग ज्ञानाचे.
संग्राहक - विश्वनाथ साठे, पुणे
***समाप्त***
***समाप्त***

Comments
Post a Comment