खंड सप्तम -


भ्रमणिकांची अंतिम यात्रा - निकटवर्ती यांच्या भेटी -

श्रावस्ती येथे पंचाहत्तर वेळा तर राजगृह येथे चोवीस वेळा तथागतांनी भेटी दिल्या. धम्माचे केंद्र हे दोन ठिकाणी प्रमुख्याने होते.

कपिलवस्तू आणि वैशालीला सहा वेळा, कम्मावासधम्म चार वेळा भेटी दिल्या.

भेटीस्थाने -
उकठ्ठा, नादीका, साला, अस्सपूर, छोषिताराम, नालंदा, आपण्ण, एतुमा, आपेसाद, इच्छानंगल, चंडाल - कप्प, कुशिनारा, देवदह, पावा, अंबसण्डा, सेतव्य, अनुप्रिया, उजुत्र्त्रा ही सर्व ठिकाणे शाक्यदेश - कुरुदेश - अंगदेश म्हणजे उत्तर भारतातील लुंबिनी ते राजगृह हा अडीचशे मैल प्रवास पायी करत तथागतांनी भेटी दिल्या.

स्वभाव -

ऐकण्यास तत्पर, बुद्धिमान, विरोधी, अजान बालक, निर्विकल्प मनोवृत्ती, निर्बुद्ध, मूर्ख ,एकाग्र - पण सुचत नाही, ऐकतो. प्रगल्भज्ञानी - संपूर्ण ऐकतो, तसे करतो, समरस, स्थिरनिश्चय, धम्मविषयतज्ञ.


महाप्रजापती माता, राहुल पुत्र, पत्नी यशोधरा यांची अंतिम भेट होते ज्यावेळेस तथागत ऐंशी वर्षाचे होते आणि यशोदधरा अष्ठेहत्तर वर्षाची झाली तेव्हाची ही भेट होती. यशोधरा म्हणते, 'मीच माझे आश्रयस्थान आहे. विघातक प्रवृत्तीवर विजय मिळवलेला आहे.

पुत्रास उपदेश -

जे करायचे त्याने इतरांना, स्वतःला दुःख होणार नाही ही खबरदारी थट्टेतही खबरदारी घेणे की, खोटे न बोलणे. अपायावाचून हिताचे कर. प्रेमळ मैत्री कर. द्वेषभावना नष्ट कर. करुणा कर. पिडा नष्ट होऊ दे. परम संहितोसंतोष कर -पराड़मुखता नष्ट होईल. संयमीत शांत वृत्ती ठेव - विकारवश नष्ट होतील. देह भ्रष्टचिंतन कर - विसंगती नष्ट होतील, विकार जातील. नश्वरतेचा विचार कर - अहंकार करून गळून पडेल.

सारिपुत्तास उपदेश  -

श्रावस्ती - जेतवन.
१) प्रिय तुला बरे वाटेल ते कर.
२) संग्रह वृत्ती लवलेश नको.
३) उत्साही व कष्टाळू
४) पापाची घृणा
५) क्षमाशीलतेत पृथ्वीसमान
६) अक्रोधी
७) अविकारवश
८) करुणा
९) बंधुभाव
१०) प्रीती

महामोग्गलान व सारिपुत्त हे दोघे धम्माचे सेनापती होत. दोघांचाही मृत्यू झाला. बुद्धशत्रूनियुक्त मारेकरीने महामोग्गलान यांचा घात केला. सारिपुत्त यांचे निसर्गवत निर्वाण झाले. ह्या दोघांच्या निधनानंतर तथागत श्रावस्तीतून निघाले.

वैशालीचा निरोप - अंतिम प्रवासावेळी बुद्ध राजगृह - गृध्रकूट पर्वतावर राहत असत. तेथून ते आनंदासह अंबलठ्ठिकेकडे रवाना होतात. अंबलठ्ठिकेवरून ते नालंदा येतात. तेथून मगध देशाची राजधानी पाटलीपुत्र म्हणजे (आजचा बिहार) येथे गेले. नादीके वरून ते वैशालीस गेले.

वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान. जैन धर्माचा हा दुर्ग. अवर्षणामुळे दुष्काळ व लोक मृत्युमुखी या काळी पडले. तथागत पोचतो ते विजेच्या गडगडातसह पाऊस व दुष्काळ नष्ट. पाऊस केला असे आपण म्हणू शकतो का?

ही वैशालीची माझी अखेरची दृष्टीभेट आहे.

लिच्छवींना भिक्षपात्र स्मृती म्हणून त्यांनी दिले.  पुरातननगरच्या उत्तरेस सीमेवर पावा येथे वास्तव्य.

वैशालीहून भंडाग्रामास  - हाटीग्रामास भोग - नगर - पावा असा प्रवास.

पावाचे चुंद -

आम्रवणात तथागतांशी भेट. सुकरमद्दवा व खीर दिली. या भोजनाने घोर आजार जडला. अतिसार व मरणप्राय वेदना तथागतांना होत होत्या. 'स्मृती संप्रजन्य' चा नियोग करून सर्व सहन केले. मलशुद्धी व कुशिनाराकडे रवाना.

कुशिनारा - आसनअस्थ चौथरी वस्त्रावर ते बसले. पाणी पिले. तहान भागवली. आराम केला. मी थोडी विश्रांती घेतो. म्हणून आराम झाला. कुकस्थ नदीचे पाणी - स्वच्छ, शितल, पारदर्शक. ते जास्त चालू शकले नाहीत. तिथेच थकले, थबकले. जवळच्या जलाशयातच त्यांनी तहान भागवली. थोड्यावेळाने नदीपल्याड ते पुन्हा गेले. घडी करून चौथरी वस्त्रावर पुन्हा बसले. पुढे ते मल्लांच्या शाल वनात हिरण्यवती नदीच्या तीरावर उपवनात आले. दोन शालवृक्षांच्यामध्ये बसले आणि इथे आनंदाशी ते वार्तालाप करू लागले.

महापरिनिर्वाण -

वारसाची नियुक्ती -

शाक्य कुटुंबाच्या आम्रवणात धनुर्धारी नामक शाक्य - त्यावेळी पावाचे निगंठनाथपुत्तांचे म्हणजे महावीरांचे देहावसान झाले. त्यांच्या अनुयायात पक्ष पडून वाद निर्माण झाले. ज्ञानात पारंगत नसलेले हे जैनीय चर्चावादात अडकले.  त्यांच्या निधनानंतर धर्मरक्षण्यास असमर्थ ठरले.

संघाने एकत्र येऊन एकविचार होईपर्यंत विचारविनिमय केला पाहिजे. निर्णयानंतर परिपूर्ण पालन करणे. वादाचा निर्णय बहुमतानेच व्हायला पाहिजे. वारसाची नियुक्ती हा त्यावरील उपाय नाही. धम्मासंबंधीचे वाद - विवाद कोणतही हुकूमश मिटवू शकणार नाही.

अंतिम धम्म दीक्षा -

सुभद्र नावाचा एक तरुण जो कुशिनारामध्ये राहत होता. त्याला समजले की, आज रात्रप्रहर तथागतांचे परीनिर्वाण होणार आहे. तेव्हा असे पुरुष, अहर्त, सम्यक संबुद्ध पुन्हा - पुन्हा होऊ शकत नाहीत. हा संदेह घेऊन याविषयी चर्चा - भेट घ्यावी म्हणून तो तथागतांकडे आला. आनंदास तीन वेळा सुभद्राची विनंती - दर्शन होईल का? नाही. नाही. नाही. आनंद म्हणाला. तथागतानी हा संवाद ऐकला आणि त्याला आत येण्याची सूचना केली. आनंदाला सांगून सुभद्र आत गेला.

१) निगंठनाथ पुत्र - महावीर (जैन)
२) अजय वेल्लठीपुत्र
३) पकुच (पकुध) कच्चायन
४) अजित केशकंबल
५) मख्खली गोशाल - मसनजोगी (नाथपंथ)
६) ब्राम्हण  - पूर्ण काश्यप
७) श्रमण - बौद्धधम्म

श्रमण म्हणजे स्त्रोतापन्न, सखुदागामी, अनागामी, अहर्त होय. आर्य अष्टांगिक मार्ग - धम्म सम्यक जीवन.

तथागत एकोणतीस वर्षाचे असतांना सत्य शोधण्यासाठी घराबाहेर पडले पन्नास वर्ष ते ज्ञानात होते ऐंशीव्या वर्षी त्यांचे महापरिनिर्वाण हे होत होतं.

दुसरी गोष्ट स्वीकारली असेल तर चार महिने प्रतीक्षा करावी लागेल. माणसा माणसात फरक स्वभाव भेद असतात. सुभद्र हा स्वतः तथागतांनी दीक्षा दिली तो अखेरचा श्रावक होय. त्याचवेळी दीक्षा कुशिनारा या भागात झाली.

अंतिम शब्द -

सर्व संस्कार अनित्य आहेत. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा.

शोकग्रस्त आनंद -

आता मी वृद्ध झालो आहे. वयस्क झालो आहे. माझा जीवनप्रवास आता संपत चालला आहे. माझी आयु मर्यादा मी गाठली आहे. माझी ऐंशी वर्षे आता उलटली. ज्याप्रमाणे एखादे शकट (जुने साधन) वापरून - झिजून एखादे दिवशी मोडून पडेल अशी अवस्था तथागतांच्या देहाचीही झाली आहे.

आपल्या आवडत्या व निकट वस्तू पासून अलग व्हावे लागणे, त्याचा त्याग करणे, त्यांचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच - निसर्ग नियमाप्रमाणे आहे. विषयासक्ती, मोह, स्वार्थ व अज्ञान.

निष्ठेने प्रयत्न करणे दुर्गुणांना सोडण्याचा. गृहस्थ, वाणप्रस्थ, विद्याश्रम, संन्याशाश्रमी यांना भेटण्याची वेळ निश्चित असते. बुद्धांधी भेटण्यासाठी वेळ निश्चित नसते.

कुशिनारात केशवती नावाची महासुदर्शन राज्याची राजधानी होती. ती उजाड कसली? आनंदास दिलेले दोन कामे १) चुंदाचे जेवण व त्यामुळे तथागतांचे निर्वाण कुणालाही ही खबर सांगू नये. २) कुशिनारांच्या मल्लांना जाऊन सांगणे की तथागत या वनात असून रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी त्यांचे निर्वाण होईल.

वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरी इ. सन पूर्व चारशे त्र्यांशीमध्ये तथागतांचे महानिर्वाण झाले. पाली भाषा ग्रंथ संदर्भ आला आहे.
"दिवा तपती अदिच्यो! रति अभाती चन्दिमा! सन्नद्धो खतियो तपति!  झाही तपति ब्राह्मणो!  अथ सब्बं अहोरत्ति! बुद्धो तपति तेजसा!"
अर्थ -
सूर्य केवळ दिवसा आणि चंद्र केवळ रात्री प्रकाशतो. शस्त्रास्त्रे धारण करणारा क्षत्रिय ते शस्त्रास्त्रे धारण केल्यावर तळपतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हा ब्राह्मण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवसरात्र प्रकाशित राहतो. ते म्हणजे ज्ञान. तथागत म्हणजे निसंदेह जगाचा तो प्रकाश होता. 

दुःखभाव - दुःखित, खिन्न, शोकविवल विलाप, शोकुल, विनम्र, विवश, हातबल, भावाकुल, व्याकुल, निराश.

सात दिवस तथागत तसेच होते. तेव्हा सातव्या दिवशी मल्लांनी आंघोळी करून नवी वस्त्रे घातली. ताटीला खांदा दिला. नंतर मुकुटबंधनचैत्य - पूर्व दिशा. तिथे नेण्यात आले. अग्निसंस्कार झाले. आठ प्रमुख मल्ल त्यावेळी होते. राखेचे आठ हिस्से ब्राह्मण द्रोण या वयस्कर ब्राह्मणाने करून त्याने स्वतःस रक्षापात्र घेतले.

संग्राहक- विश्वनाथ साठे, पुणे

Comments

Popular posts from this blog