खंड षष्ठम -



बुद्ध व त्यांचे समकालीन - बुद्ध व त्यांचे समर्थक -
१) राजा बिंबिसार - धम्मप्रमुख, आधार, भक्त. दान देणाऱ्यास उत्साहीत - उद्युक्त व आनंदित करणे. हितमत. वेळूवन - दान.
२)अनाथपिंडिक - जेतवन दान - श्रावस्ती. तथागत कपिलवस्तीहून श्रावस्तीसया आले आहेत. न्यायाचा विजय - सर्वांश कल्याणकारक न्याय हा ऐंशी शिष्यांपैकी प्रमुख होता.
३) भिष्वग्वर जीवक - आम्रवन दान - राजगृह.
४) आम्रपाली - वैशाली नगरी. गणिका - वेश्या लिच्छवि व आम्रपाली यांची चकमक निमंत्रणाबाबतीत. आम्रवन दान. वैशाली.
५) विशाखा - श्रावस्ती - धनिक महिला - तत्कालीन उपासक व्यवस्थापिका

त्याकाळी स्त्रीची नग्नता ही वेश्येच्यादृष्टीने किळसवाणी आणि अपवित्र अशी समजूत होती. त्या म्हणायच्या 'तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय फायदा?'

प्रसन्न - आनंद, शांती - सुखतृप्ती, हृदय  शांतमृग्ंधी - नैतिक सामर्थ्य, समाधान व प्रसन्न.

मनोविकार गुणविकासास कुंठित करून टाकतात. आयुष्यभर चिवरे, वस्त्रे, औषधी, विचारशीलता, भोजन, सुश्रुषा - सेवक, वर्षाकाळ, वर्षाकाळात - दान.

बुद्धांचे विरोधक -

अंधश्रद्धा व ग्रंथप्रामाण्याला कडाडून टीका - उपदेश (मुद्दा क्रमांक तीन)

मान्यता का देऊ नये तर ग्रंथप्रामाण्य तर्क प्रमाणे अनुमानप्रामाण्य, बाह्यस्वरूपप्रामाण्य, स्वमताअनुकूलप्रामाण्य, न्यायप्रामाण्य, व्यक्तीप्रामाण्य, म्हणून ते स्वीकारू नका. (स्वीकार अस स्वीकार)

स्वतः सर्व घटना निरीक्षून, विद्वानी अनुभवीकडून ग्राह्य करून घेणे. त्यामुळे हानी व अपायकारक गोष्टींचा त्याग श्रेष्ठ.

मन - वचन - कृत्य या तिन्ही गोष्टीत लोभ नसावा.

बुद्धांवर होणारे आरोप -
१) अंधश्रद्धा

२) भूल - फसवणुक
३) परोपजीवी
४) सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप
५) जैन तीर्थक व प्राणघाताचा आरोप
६) सुंदरीची हत्या आरोप
७) गर्भवती चिंचा 
८) शीलप्रसार व दुःख निर्मितीबाबत टीका
९) निराशाजनक तत्त्वज्ञान
१०) विनाशवादी
११) उच्छेदवादी
१२) अनैतिकतेच आरोप
१३) आत्मा आणि पुनर्जन्म
१४) भुलवाभुलवी - थोतांड

एकनाला ब्राह्मण - मगध देश - दक्षिणगिरी प्रांत. तथागत या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यावेळी त्या प्रदेशावर कृषी भारद्वाजराजा राज्य करीत असे.

श्रद्धा हे बीज. तपस्या ही वर्षा. प्रज्ञा हे जू आणि नांगर. पापभीरूता हा दंड. विचार हा जू बांधण्याची दोरी. दक्षता हा नांगरपाळ आणि पराणी.

वचन व कर्म या दक्षता व भोजनात संयम  निरुपयोगी गवतात शेती व अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत खपत राहतो. प्रयत्न हे बैल. शांतीच्या मार्गाने अमृताची आनंदाचे पीक. माझ्या धम्म जीवनात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही.

जैन तीर्थकांनी ही घटना घडवून आणली जेणेकरून तथागतांची नामुस्की होऊन जैनांना प्रभावी होऊन समाजात राहता यावं. ('धर्माला धम्माची गरज' ही कथा या समाजावरून लिहिलेली आहे पा. क्र. 391)

देवदत्त हा बुद्धांचा चुलत भाऊ. बुद्धाविषयी घृणा त्याच्या मनात होती. दुर्गंधी केवळ पदार्थांचीच नसते वाणी, विचारांची असते. जेव्हा विचारांची दुर्गंधी आपण ओळखू, समजू शकत नाही तेव्हा पदार्थांची ही दुर्गंधी आपणास समजत नाही. (भंगी व चतुर्थश्रेणी महापालिकेतील कर्मचारी - कर्म - वर्ग - विवेक) देवदत्ताने तथागतांवर प्राण घातक हल्ले केले. यशोधराच्या महाली रात्री अप रात्री गेला व तिला कलंकित करण्याचे षडयंत्र रचले.
१) दगड मिरगावला - गृध्रकूट प्रर्वत.
२) अजातशत्रूच्या सैनिकास - घात करायला पाठविले .
३) नलगिरी या पिसाळ नरघातक हत्तीला पाठवले - राजगृह. या तिन्ही घटनेवरून तथागतांनी देवदत्ताला उपदेश केला आणि कोशल देश सोडून तो प्रसेनजिताकडे मगध या देशी गेला

थुन गावात (कोशल देश) ब्राह्मण स्त्रीने तथागतांना पाणी दिले म्हणून तिला ठेचून लाथात-बुक्क्यांनी ठार केले.

ब्राह्मण -
१)  ब्रह्मसदृश्य
२) देव सदृश्य
३) बंधन युक्त
४) बंधनभंजक
५) जातीभ्रष्ट
असे ब्राह्मणांचे प्रकार स्वभावावरून आहेत जाती आहेत. त्याचबरोबर त्याकाळी अंत्यज, व्याध, वेळू - कारागीर, रथागार आदिवासी इ. इतर जाती आहेत.

बुद्धाच्या धम्माचे टीकाकार -

संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार. सद्धमाचा जलाशय सर्वांना मुक्त प्रवेशित आहे. अटी शक्य नाही. धम्म सर्वांना पडताळून पाहता येतो. मर्यादित लोकवर्गापुरते धम्माचे दरवाजे खुले नाहीत. स्वाभाविक गुणवत्तेसाठी (षडविकार नष्ट) व्रते निवडली होती. स्वतःची ओळख व अध:पत्तनापासून मुक्ती. नैतिक अधिष्ठान धम्मात आहे. मानव जातीचे हित धम्मात आहे. जो दंडनीय आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अहिंसा समर्थक, हिंसेचे निंदक.

दुःख हे निराशा जनक आहे. गरीबी, कर्ज, उधारी, तगादा लावणे, मारपीट, बंधनात पाडणे ही सर्व ईहलोकीय स्वच्छंदी माणसाची दुःखे आहेत. बुद्धांची दुःख कल्पनाही भौतिक होती स्वरूप भौतिक अभौतिकीमुळे मानसिक स्वरूपाचे दुःख होते. म्हणून बुद्धाचो दुःख कल्पनाही सुद्धा भौतिक आणि मानसिक अशा प्रकारची होती.

भौतिक गोष्टीची आसक्ती दुःख निर्माण करते. दुःखाचा मुळार्थ कपिलाने सांगितलेला आहे. अशांतता - क्षोभ म्हणजे दुःख हे कपिल असे सांगतो. परंतु सामाजिक व आर्थिक कारणाने लवकरच तो 'यातना व खेद' असा मुळार्थात बदलल्या गेला.

जगात गरिबी आणि कर्ज फार दुःखद गोष्टी आहेत. ऋणको आणि धनको यामुळे या संकल्पना पुढे आल्या.

अशाश्वतता हे निराशेचे कारण. सत्य कितीही अप्रिय असले तरी कथन केलेच पाहिजे. जे जे मिश्रित स्वरूपाचे तेथे अशाश्वत आहे. आणि जे जे मिश्रित नाही अशा स्वरूपाचे शाश्वत ते म्हणजे एकतत्वी असे आहे.

जर जीवन अल्पजीवी असेल तर अल्पजीवी असणारच. त्यासाठी कोणी निराश होण्याचे कारण नाही. मृत्यू अपरिहार्य होता हे जाणून कोणी त्याची पर्वा करीत नाही. अशाश्वतता ही निराशा जनक असेल तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी नसताना सुद्धा खरी मानली गेली हे होय. अशाश्वतता ही निराशा जनक नाही. शाश्वतता ही निराक्षजनक. शाश्वतता खरी नाही. द्वेत - अद्वेत्व येथे आहे.

तुझा सहवास हा अल्पकाळ असेल तर निराश होण्याचे कारण नाही.

१) प्रथम - आर्य सत्य जगात दुःख आहे. दुःखाचा उल्लेख होताच बौद्ध तत्त्वज्ञानावर हा आरोप होतो की, तत्त्वज्ञान निराशा जनक आहे. कार्लमार्क्सच्या सिद्धांतात कोणी निराशा जनक तत्व आहे असे म्हणत नाही.
२) आर्य सत्य द्वितीय - दुःखाचा नाश केला पाहिजे. दुःखाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यासाठी त्यांना दुःखाची अस्तित्वे सांगावे लागले ते असे  - जन्म दुःखद, वृद्धत्व दुःखद, मृत्यू दुःखद.

धम्म निराशावादी नाही. कारण तो उत्सुकतत्व घेऊन आहे दुःखाचा समूळ नाशकारण. आणि ते नाश करण्याचे पर्याय - उपाय धम्म शकतो. आत्मा नाही. पण पुनर्जन्म आहे. जसे की,  आंब्याची कोय. कोयीतून आंब्याचा वृक्षनिर्मिती. आंब्याच्या वृक्षाला आंब्याचीच फळे येतात. हा आंब्याचा पुनर्जन्म आहे. दुःखाला अस्तित्व आहे आणि अखेरही असते.

बुद्धांचे मित्र आणि चाहते -

१) धनंजनी ब्राह्मणी - भारद्वाजाची पत्नी. राजगृह वेळूवन परिसर, कलंदकनिवास - विहार

सुखप्रद जीवनासाठी क्रोधाची हत्या करावी. मूळ विषारी व परिणीती संतापात प्राणघातकी माधुर्य आहे. 

भविष्यकाळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून क्रोधाची हिंसा करावी.

२) विशाखा - अंगदेश भद्दीयनगरीत जन्म. धनंजय सुमना या माता - पित्यांची ती मुलगी होती. सेल नावाचा ब्राह्मण हा तिचा आजा होता. तिला मिगारमाता असेही संबोधले जाते. विवाहित - विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्यांची स्थिती असते. तशी ती होती. त्यांना विद्रूप राहून चालत नाही. मालमत्ता खपत नाही. त्याकाळी पत्र व्यवहार होत होता.

निगंठांची नग्नता - ते नग्न राहत.

३) मल्लिकाराणी - श्रावस्ती, जेतवनविहार - शून्यमनस्क, निर्विकार, अप्रयोजित - अवस्था. आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात नव्हे ते दुःख, शोक, वेदना, व्यथा, कष्ट चित्तअस्थिर अशा प्रकारची अवस्था देतात.

भग्ग देश - तथागत भेसकलावनातील सुसुमार पर्वतावरील मृगवनात विहार करत होते. पद्मनाभक विहार - प्रासाद, बिछायती अंथरलेली होती. अनुपम, सत्यान्वेषण प्रक्रिया तिथे करण्यात आली.
४) पद्मनामक राजपुत्राशी भेट
५) केनिया - आपण्ण या गावी सेल नावाचा ब्राह्मण राही. केनिया हा सेलचा शिष्य होता.

६) राजा प्रसेनजित - कोशलनरेश
७) बिंबिसार राजा - मगधनरेश

प्रसेनजिता या देहात असे काय आहे वैशिष्ट्य की, 'जे आपण इतक्या प्रगाढ मानवतेने ह्या देहास भावपूर्ण वंदन करीत आहात?'

संग्राहक - विश्वनाथ साठे, पुणे

Comments

Popular posts from this blog