★★★कलेच्या फिरस्ती★★★
रंगाच्या माध्यमातून जिवंतपणा निर्माण करता येतो असे चित्रकारांचे चित्र आणि रंग रेषांची कुशल कला जगभरात प्रसिद्ध आहे
रंग चित्र नजरेला भिडताच ते मानवी मेंदूतील रसायनांना आकर्षित करतात कारण की निसर्गात असलेल्या रंगाची प्रतिमा रंगाच्या माध्यमातून रंग चित्रात उतरते आणि तो सजीवपणा त्या चित्राला बहाल होतो तो जिवंतपणा चित्रकाराच्या मेंदूतून कुंचल्याच्या सफाईदार फेरफटक्यात ऊन रेषांच्या आकृती मधून आणि रंगाच्या छटा सावलीतून निर्माण होतो
महाराष्ट्रामध्ये कलेच्या बाबतीत विदर्भ उपेक्षितच ठेवला गेला आहे संगीत नृत्य नाट्य चित्र शिल्प गायन आधी कलेत विदर्भातले एक दिग्गज कलाकार अजूनही दगडा आड लपल्या सारखे आहेत मात्र त्यांना संधीची समानता येशील आणि आपुलकीची हाक मिळाली तर ते जगाच्या पाठीवर आपली कला दर्शवू शकतात एवढी त्यांच्यात आपली स्वतःची एक अशी उभी आहे
चित्रकलेच्या बाबतीत जवा रंग रेषा आकार आकृती प्रतिमा आणि बिंदूचा विचार करता विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरामध्ये दोन कुशल दिग्गज रंग चित्रकार आहेत राठोड सर आणि गायकवाड सर ही दोन नावं
मा जगन्नाथ राठोड सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर राठोड सर श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय लोणार या ठिकाणी चित्रकलेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांची खाती महाराष्ट्रभर पसरलेली आहेत नुकतेच काही वर्षांपूर्वी त्यांनी निर्माण केलेले संत सेवालाल महाराज यांची रंगछबी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या नियमानुसार शासकीय स्वरूपात महाराष्ट्रभर प्रकाशित झाली आहे. मी लहानपणी लोणारला मायच्या मांघं लागून बाजाराला जायचो तेव्हा विविध दुकानं त्यावर असलेल्या पाट्या, चित्र, अक्षरं, चित्रकला, रंगचित्र, तैलचित्र न्याहळायचो. कैकदा बोटाला दगडाच्या ठेसा लागल्या. कारण हे सगळं पाहतांना अपसूक नजर वर असायची अन खाली दगडं पायाला ठेचकाळत. अशी एक गोडडूख आठवण. राठोड सरांचं रंगचित्रांचं एक दुकान भाऊंच्या श्री टॉकीजच्या मागे लागूनच होतं.*(१) तिथं नाना पटेकरांचा ऑइलतैलरंगातील चित्र राठोड सरांनी पेंट केलेलं. हे कैक दिवस नजरेत असायचं. लोणार सोडून आज कैक दिवस झाली पण ही चित्र नजरेतून सुटत नाही. असं म्हणण्यापेक्षा त्या कलाकारांची कला मेंदूच्या ठस्यातून निघता निघत नाही. ही प्रयोगप्रेक्षक म्हणून माझी हार असावी किंवा प्रयोगदर्शक म्हणून चित्रकलाकारांची विजय.
दुसरी एक गोष्ट लोणार शहरात अजून एक दुसरे दुकान ते म्हणजे माया स्क्रीन्स*(२) यांच्या दुकानाच्या होर्डिंगवर छानसा जुन्या नटीचा रंगाने तयार केलेला एक फोटो होता हा कोणी तयार केला असावा? फोटोतील इतकी सुंदर नटी त्या रंगाच्या माध्यमातून कशी तयार केली असेल? असा सवाल मनात तयार होत होता. नंतर नंतर असे कळले की ही नटी प्रिंटिंग प्रेसमधून छापून होर्डिंगवर लावलेली नसून ती चित्रकाराने कुंचल्याच्या माध्यमातून रंगाने निर्माण केलेली आहे हा दृष्टी चा प्रेम आहे की कलाकारांचा हातखंडा आहे हे आपण सगळे जण ठरवूया परंतु चित्रांमध्ये जिवंतपणा अन्न आणणे आणि जिवंतपणा च्या खुणा रंग रेषा आकृती छोटा खूपच छोटा कलाकारांची एक वेगळीच किमया असते, मा.गायकवाड या किमया चे कर्तबगार गायकवाड यांनी विविध पेंटिंग्स रंग काम आणि तेल चित्र ऑइल पेंटिंग केलेले आहेत त्यापैकी सर्वात उत्कृष्ट अशी त्यांची रंगाची छटा असलेली प्रतिमा म्हणजे लहुजी राघोजी साळवे अर्थात वस्ताद लहुजी साळवे यांची प्रतिमा लहुजी यांची प्रतिमा महाराष्ट्रभर प्रकाशित गायकवाड यांचे एक वेगळेच रस्ता आहे गायकवाड यांचा हातखंडा रंगरेषा आणि आकारांच्या मध्ये जितका निपुण आहे तितकाच तो चेहऱ्यांच्या ठेवणी मध्ये चेहऱ्यावरील भावनांमध्ये चेहर्यावरील रेशन च्या माध्यमातून अर्थांच्या छटा निर्माण करण्यामध्ये आहे त्या दिवशी सहज लोणार ला गेलो फिरत असताना माया स्क्रीन स्थलांतरित झालेलं होर्डिंग दिसलं पुतळाबाई शाळेजवळ आता गायकवाड असतात त्यांचं माया स्क्रीनिंग आता काचेचे सुद्धा काम करत काचेच्या कामाच्या मधून त्यांनी विविध फ्रेम्स घरातील शोभेच्या वस्तू काचेची दर्पण आरसे नवारसे आणि विविध यंत्र तयार केली आहे त्यांनी या महिन्यांमध्ये गौरीगवळ्याच्या पाठीमागे प्रकाश फिरता प्रकाश दर्शवणारी कला आणि त्याचे यंत्र बनवला आहे आणि हे यंत्र अगदी किफायतशीर किमतीमध्ये नागरिकांना मिळू शकेल
महाराष्ट्रातील जागतिकीकरण समजलं तर अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या मांग म्हणजेच मातंग समाजातील जनतेला उपेक्षितच राजकारण पदरी प्राप्त झाले आहे मातंगाचा इतिहास महान आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे मातंग महाऋषी महा ऋषी यांचे योगदान तुझ्या प्रमाणावर आहे मातंग महाऋषींनी महाराष्ट्राच्या वैचारिक भूमीमध्ये एक वेगळ्या प्रकारची विचारसरणी ठेवलेली आहे असे असताना सुद्धा इतिहासातून सुद्धा मातंग महाऋषींना डावलल्या गेलेले आहे परंतु ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील एक ओळओवी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे "चंद्रमे जे अलांच्छन मार्तण्ड जे तापहीन ते सदा सज्जन सोयरे होतु" *(३) या ओळीतलं मार्तंड हा शब्द मांग म्हणजे मातंग या जातीची उल्लेखित आहे ज्ञानोबाराय यांनी ज्या मार्तंड महाऋषी च्या आश्रमामध्ये राहून ज्ञानाची प्राप्ती, जगण्याच्या पद्धतीची रीतभात आणि वैश्विक मानवतेची जाण शिकली*(४) त्या मार्तंड महाऋषींच्या उपकाराची फेड त्यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या पसायदानाचा प्रस्तावना मध्ये उल्लेख करून पांग फेडण्याचा ची रीत आपल्या जनतेच्या पदरात ठेवली आहे हे आपण विसरता कामा नये मातंग महाऋषी चा इतिहास महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पुणे जिल्ह्यातील संगम वाडी औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाला जीवनाचे तत्त्वज्ञान आणि गुरुत्व प्राप्त करून देणारे, पनाळीचे चक्र करून शिक्षा देणारे संदिपान महाऋषी*(५) उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश मधील मांगमदींगा कर्नाटक केरळ आसाम बंगाल बिहार ओरिसा अशा सगळ्या राज्यांमध्ये मांग जातीचा इतिहास रुजलेला आहे दडलेला आहे त्याला शोधण्याचं काम त्याला उखडून काढण्याचं काम नव्या संशोधकाच्या अभ्यासात असणार आहे हा इतिहास इसवी सन पूर्व तथागत कालीन आहे तथागताच्या राजवटीत असणारे राज्यकर्ते*(६) हे मांग जातीतील होते मांग जातीचा इतिहास हा राजवंशाचा इतिहास आहे आणि तो विसरता कामा नये
गायकवाड यांची कला नेहमी तलक कुशल आणि नवनवीन यंत्र तयार करणे करण्याची मात्र या कलेला लोणार शहरात पाहिजे तसा दस्तूर मिळाला नाही काही काळाच्या मागे जाऊन पाहिले तर लोणार शहरभर मोगल सत्तेचा असलेला प्रभाव आणि येथील स्थापत्यकला*(७) याचा समुच्चयपणे लोणार परिसरातील सर्व जनतेच्या मानसिकतेत आणि मानगुटीवर आहे त्याचप्रमाणे तेथील कलाकारांवर सुद्धा आहे म्हणजे लोणार येथील विविध रंगाच्या कला आपण ज्यावेळे रंग्कामांत भरपूर रुची होती, व त्याच्या महालांच्या भिंती आखीव कलाकृतींनी सजवलेल्या असायच्या. त्या छटा पाहतो त्यावेळेस त्या रंगातील जुन्या राजवटीच्या प्रभावाचा आलेख*(८) या ठिकाणी पाहायला मिळतो अभ्यासाला मिळतो
लोणार या शहराच्या ठिकाणी असलेले हे दोन दिग्गज कलाकार यांचा अभ्यास करू जाता या दोघांनाही महाराष्ट्रभर पाहिजे तितकी ख्याती मिळालेली नाही तसेच पाहिजे तितकं अर्थकारण झालेलं नाही आणि पाहिजे तितकी कलाकारी ची मागमूस म्हणजेच प्रसिद्धी या दोन्ही कलाकारांना मिळालेली नाही हे आज सत्य आणि तितकच परखडपणे सांगू इच्छितो विदर्भ आहे म्हणून हे कलाकार वंचित राहतात का? असाही एक प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला इथं उपस्थित उपस्थित करू इच्छितो विदर्भातील सगळ्या कलाकारांना मग ते रंग रेषा आकार नृत्य नाट्य संगीत गायन वादन अशा सर्व कलाकारांना उपेक्षेची जाणीव आहे त्यांना माहिती आहे आपण कलाकार असून सुद्धा आपल्याला जी प्रसिद्धी आणि कलेला जे नाव रूप मिळत असतं त्या त्या काळामध्ये ते मिळत नाही हे कलाकार जरी सुद्धा प्रसिद्धी मिळत नसली तरी सुद्धा ते आपली कला निपून कुशल आणि प्रामाणिक पणे जिवंत ठेवत राहतात त्याचं हे उदाहरण म्हणजे राठोड सर आणि गायकवाड सर
संदर्भ -
१) राठोड आर्टस् - लोणार, जिल्हा - बुलढाणा, महाराष्ट्र
२) माया स्क्रीन्स - लोणार, जिल्हा - बुलढाणा, महाराष्ट्र
३) पसायदान - ज्ञानेश्वर माऊलीकृत, क्र.११ वी ओवी
४) ज्ञानेश्वरी/ भावार्थदीपिका - संवादक - ज्ञानेश्वर
माऊली, टिप्पणकार- सच्चिदानंद
५) श्रीमदभागवत - गुरूस्तवन, (ऋषींवल सांदीपान
महिमा)
६) सर्वोत्तम भूमिपुत्र - गोतम - - आ. ह. साळुंखे
७) मोगल साम्राज्य इन आउरटाईम कार्यक्रमात बीबीसी
रेडिओ ४ वरील चर्चा
८) Brown, Percy, Indian Architecture,
(Islamic Period), Bombay, 1964.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
#लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सव...
★क्रांतिसूर्य लहुजी(वस्ताद) राघोजी साळवे(राऊत)★
जन्म १४ नोव्हेंबर १७९४-पेठ,पुरंदर गड,पुणे
मृत्यू :१७ फेब्रुवारी १८८१-संगमपूर,पुणे
क्रांतिसूर्य लहुजी (वस्ताद) राघोजी साळवे यांचा जन्म पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी झाला.त्यांना लहुजीबुवा मांग असे उल्लेखले जात होते.लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत.हे घराणे शिकरखान्याच्या प्रमुख पदावर होते.त्यामुळे शिवाजीने आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्या सोपविल्या होत्या.त्यांच्या जीवाशी खेळण्याच्या कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले.१२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवें यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला.राघोजी साळवे या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले.१७नोव्हेंबर१८१७ला पुणे हे ब्रिटिशांनी काबीज केले. पेशव्यांचा पराभव झाला.पुढे इ.स. १८१८मध्ये भगवा झेंडा शनिवारवाड्यावरून काढून तेथे इंग्रजांनी युनियन जॅक फडकवला.या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली.स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले.भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांचे थडगे उभारले.ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला.पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले दांडपट्टा चालविणे,किल्ल्यावर पाठीच्या साहाय्याने चढणे,तलवार चालविणे,कट्यार,जम्ब्या खुपसने,भालाफेक करणे,घोड्यावरून रपेट व शिकारीचे मुंडके फोडणे,गल्लोरीने शत्रूवर निशाण साधने,एका दगडाने दोन बाजूच्या शत्रूला घायाळ करणे,दोरखंडाने भिंती,गड,कोट,किल्ले,भुयार आणि मढ्या चढणे.विहिरी,खंदक,खोलयुक्त भुयार,दर्या, भुईमार्ग उतरून चढाई करणे,हिंस्त्र प्राण्यांच्या शिकारीचे कसब शिकून ते या युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८२२ मध्ये रास्ता पेठ,पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध आखाडा म्हणजे कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले.या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले.यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक,वासुदेव बळवंत फडके,महात्मा जोतिबा फुले,गोपाळ गणेश आगरकर,चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे,क्रांतिवीर नाना दरबारे,रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे,नाना मोरोजी,क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर,क्रांतिवीर नाना छत्रे,उमाजी नाईक,स्वतः महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकायला येऊ लागले.म्हणून लहुजींना वस्ताद असेही उल्लेखित केल्या जाते.महार मांग हे तर या रक्ताचे संघशील तत्व होय.ते या सर्वनिपुन कलेत वरील शिष्यांचे गुरू होते.आखड्याजवळच त्यांनी एक विहीर खोदली.आणि ती विहीर सर्वांसाठी खुली केली.सर्व जाती धर्माचे जन तिथे पाणी प्राशन करू लागले.ही एक समाज एकजुटीची क्रांती होती.या कार्याने महात्मा फुले प्रेरित झाले.१८४७चाही अगोदरपासून महात्मा फुले या आखाड्यात जात होते.लहुजींना ते गुरू मानत होते.पुढे
महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडे वाड्यात सुरू केली हा काळ जातीय मक्तेदारवर्गाने फुलेंवर आणि सावित्रीबाईंवर गु-घाण फेकण्याचा हा काळ होता.जीवे मारण्याच्या धमक्या-मारेकरी आणि प्रत्यक्ष दगडांचे घाव टाकण्याचा हा काळ होता.या काळात सावित्रीबाई फुले ह्या निर्धास्तपणे शाळेत ये-जा करायच्या कारण त्यांना लहुजी वस्ताद साळवे यांची अगरक्षकांची जबाबदारी होती.महात्मा फुलेंना अंगरक्षक म्हणून पुढे लहुजी कैकदा त्यांच्यासोबत होते.१८४८ह्या वर्षात खूप क्रांतिकारक बदल समाजात झाला.ज्या धर्माने मुलींना,बहुजनांना,अस्पृश्यांना आणि दलितांना शिकायला,शिक्षण घेण्याला बंधन लादली होती.ती बंधने झुगारून फुले दाम्पत्याने पहिली भारतातील शाळा निर्माण केली.आणि त्यांनी या पिळलेल्या, पिचलेल्या,दळल्या गेल्या समाजाला,गुलाम म्हजून वागवल्या वर्गास शिकवायला सुरुवात केली.प्रथमच लहहुजींच्या आखाड्यात ही शाळा भरू लागली.*(१) अस्पृश्यता आणि स्त्री शिक्षण यावर करार झाला समाजहितासाठी.१८५१मध्ये ज्या दोन शाळा होत्या त्यात लहुजींच्या आखाड्यात काम करणारे दोन शिष्य होते.एक पाढे पाठ करून घेणारा-गणू शिवजी तर दुसरा धुराजी आप्पाजी हा बाराखडी घ्यायचा.ब्रिटिश शिक्षण खात्याने अस्पृश्यता शिक्षणाच्या कार्यासाठी महात्मा फुलेंचा सत्कार केला.तेव्हा लहुजी वस्ताद त्या कार्यक्रमात हजर होते.कारण याचवर्षी 'कम्युनिस्ट मैनीफेस्टो' जाहीर झाला होता.१२जून १८५३पर्यंत कैक शाळा सुरू झाल्या.कारण लहुजी स्वतः अशिक्षित होते परंतु ते मांग-महारवाड्यात जाऊन गोरगरिबांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी विनवणी करू लागले.जमवू लागले.या कामात राणोजी महार त्यांना मदत करी."शिकले तर संघर्ष कळेल.गुलाम म्हणून किती दिवस जगायचं?बाप गुलामीत मेला,पोरांनो तुम्ही तरी जग मुक्त बघा."१०सप्टेंबर१८५३ 'द सोसायटी फॉर प्रोमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार-मांग इटीसी' या संस्थेची स्थापना करण्यात आली.त्यात लहुजींच्या कार्याची महत्वाची पावती मिळते.कारण लहुजींचे मोठे बंधू शिवजी साळवे यांची मुलगी 'मुक्ता' लहुजींची पुतणी या शाळेत शिकायला म्हणून पहिली विद्यार्थी होती.मुक्ताने शिकलेल्या ज्ञानातून "मांगामहारांचे दुःखाश्रु"*(२) हा संशोधन असणारा अहवाल निबंध लिहिला.आणि ब्रिटिश सरकारकडे तो फुलेंनी इंग्लंडमध्ये राणीकडे पाठविला.या संशोधन अहवाल निबंधाला अनुसरून पुढील ब्रिटिश धोरण अस्पृतेविषयी ठरू लागले.आणि मुक्ता यातुन अजरामर झाली.कोवळ्या वयातील मुलीने अस्पृतेविषयी लिहिणे म्हणजे एक क्रांति होती.कारण हा काळ मुलींना घरात बसून स्वयंपाक,भांडीकुंडी, दळणभर्डन,आणि रांगोळ्या काढणे नाही तर बाळूते धुवायला लावणारा होता.घराच्या उंबऱ्यावर्ती पाऊल न ठेवू देणाऱ्या व्यवस्थेचा होता.मुली ह्या चुलीपुरत्या होत्या.स्त्री ही वासना भोगण्याची बाहुली होती.पण लहुजींना व फुले दाम्पत्याने ते सर्व रुढीप्रिय वास्तव अमान्य होतं.ते स्त्री,शूद्राती शूद्र राजकारण त्यांनी एकजुटीने झुगारून दिलं.तो काळ कट्टरपंथी होता.
१८२६पासून हा इंग्रज लढा सुरू होता.पुढे इंग्रज-रामोशी यांच्या बंडात लहुजींनी बंडाचे नैतृत्व करण्यासाठी उमाजीला नायक केलं.उमाजी नाईक हे त्या बंडाचे खलितेदार*(३) झाले.१८५७ च्या उठवत कैक शिष्य लहुजींनी पाठविले.शस्त्रसाठा व खानावळीची मदत केली.बहादूर शिष्य त्यांनी तयार करून पाठवून दिले.
१८५८ हा काळ पुन्हा रणसंग्रामात निपजणारा आहे.त्याकाळात लहुजींच्या आखाड्यात पिळदार देहयष्टी असणारे तरुण तडफदार पैलवान गडी तयार होऊ लागले.ते एक क्रांतिकारी विद्यापीठ होते.या रणसंग्रामात लहुजींच्या शिष्यांनी फार शिस्त व करारी भूमिका घेतली होती.आजन्म अविवाहित असणे हे लहुजींच्या ध्येयवादी दृष्टीचे लक्षण.म्हणून त्यांना 'सशस्त्र आद्यक्रांतिकारक जनक' 'सशस्त्र क्रांतीचे पहिले गुरू' म्हणतात.
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला.७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.*(४) लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला.अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे)*(५) येथे आहे.इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.
"एकोणिसावे शतक प्रस्थापित धर्माला आव्हान देऊन नव्या जाणिवा पेरण्याचे होते.पण समाजाच्या जडणघडणीसाठी पायाभूत ठरलेल्या महापुरुषांचा लिखित इतिहासच आपल्याकडे उपलब्ध नाही.त्यामुळे लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याची आज समाजाला फारशी माहिती नाही.लहुजींचे चरित्र लिहिले गेले पाहिजे. त्यासाठी लहुजींच्या गावी पुरंदर भागात पायपीट करावी लागेल.तेथील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधून लहुजींच्या आठवणी मिळवाव्या लागतील.हे अवघड काम आहे, पण ते करायला हवे.’’
टीप-दरवर्षी १८ नोव्हेंबर लहुजी जयंती साजरी होते.या दुर्लक्षित वास्तवाकडे(स्मारक) ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून पाहणे गरजेचे आहे.
संदर्भ -
१) जोतिचरित्र - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री
जोशी( १९०१-१९९४) नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
२) मांगामहारांचे दुःखाश्रु - मुक्ता साळवे,(१९५३ -
१९५४)
३) "स्वातंत्र्यसैनिक विसरला" - हेब्बर, प्राजक्ता (७ एप्रिल
२०१३). इंडियन एक्सप्रेस . 29 एप्रिल 2020 रोजी
पुनर्प्राप्त .
४) Majumdar, R. C. Ed. British Paramountcy
and ndian Renaissance, Part I, Bombay,
1971
५) स्थळ - लहुजी वस्ताद साळवे - स्मृतिस्थल,
संगमवाडी, पुणे
-संशोधक विद्यार्थी-
-विश्वनाथ साठे(9921056462)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
Comments
Post a Comment