★★★चला काही माहिती घेऊ महत्वाची★★★


★अनुसुचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती★


योजनेचा प्रकार -राज्य
योजनेचा उदेृश-अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक परीस्थीतीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमूळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणुन परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमा करिता प्रवेश मिळाला आहे, अशा 50 (पी.एच.डी.-24 व पदव्युत्तर -26) विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.

योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नावअनु. जाती

योजनेच्या प्रमुख अटी -विद्यार्थी अनु. जाती/नवबौध्द घटकातील असावा, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहवासी असावा
, विद्यार्थ्याचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 6.00 लाखापेक्षा जास्त नसावे , पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 50 % गूण व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पदवीमध्ये किमान 55 % गूण मिळालेले असावे तसेच प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावा.

विद्यार्थ्यांने परदेशातील विद्यापिठात प्रवेश घेतलेला असावा. परदेशातील विद्यापिठ हे मान्यताप्राप्त विद्यापिठ असावे व qs world ranking मध्ये 300 च्या आत असावे. 8.पदव्युत्तर पदवीमध्ये अभ्यासक्रमासाठी पदवीला किमान 50 % गुण आवश्यक , व प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप-विद्यापिठाने प्रमाणित केलेला शिक्षण फी ची पुर्ण रक्कम व इतर खर्च मंजूर करण्यात येतो.
विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासांठी यु.एस. डॉलर 14000 तर यु.के.साठी पौंड 9000 इतका अदा करण्यात येतो.
विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यू.एस.ए. व इतर देशांसाठी यु.एस.डी. 1375 वर यु.के.साठी पौंड 1000 इतके देण्यात येतात. पुस्तके, अभ्यासदौरा इत्यादी खर्चाचा यात समावेश आहे.
विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम झाल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च तिकीट सादर केल्यानतंर मंजूर करण्यात येतो.
अर्ज करण्याची पध्दतजाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सदर शिष्यवृत्तीचा अर्ज आयुक्तालयास सादर करावा
योजनेची वर्गवारीशिक्षण
संपर्क कार्यालयाचे नावआयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय













★अनुसूचित जातीच्या 100 विदयार्थ्यांना देशातंर्गत शिष्यवृत्ती ★

योजनेचा प्रकारराज्य

योजनेचा उद्देशएकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्यास अनु. जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी याकरीता देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या अनु. जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना शा.नि. दिनांक 11.06.2003 अन्वये कार्यान्वित करण्यात आली आहे.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांवअनुसूचित जाती

योजनेच्या प्रमुख अटी

विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

विद्यार्थी पालकांचे सर्व मार्गांनी वार्षिक उत्पन्न रु. 4.50 लाख पर्यंत असावे

या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप

संस्थेचे आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क

क्रमिक पुस्तके व शैक्षणिक साहित्य यांच्या खर्चासाठी प्रतिवर्षी रु. 10,000/-

अर्ज करण्याची पध्दतविहित नमुन्यातील अर्ज भरणे (मॅन्युअली)योजनेची वर्गवारी शैक्षणिक आहे . संपर्क कार्यालयाचे नांवआयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र 

-विश्वनाथ साठे(9921056462)

Comments

Popular posts from this blog