कालचं घडलेलं
काल दुपारी भर उन्हातच तालुक्यालं गेलो. लै दिवसांत तालुक्यालं जाणं झालं. तालुक्याचं नाव लोणार. जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं तिसऱ्या क्रमांकावर असणारं लोणार सरोवर. सरोवर तालुकाच्या ठिकाणी. लोणारच्या आमच्या कवी मित्रांनी आम्हांला बातमीवजा माहिती दिली. कच्चीच होती खरं तर ती माहिती. स्वतः पडताळून पाहिल्या-अनुभवल्या-जाणल्ल्याखेरीज खरं काय असतं तरी?
"उल्कापातामुळे निर्मित जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे* पाणी अचानक गुलाबी,लालसर रंगाचे झाले आहे. त्यामुळे हा संशोधन आणि कुतूहलाचा विषय झाला आहे. कवी असल्यानं ते असे बोलले, "पण या रंगाने लोणार सरोवराचे अनोखे सौंदर्यही बघायला मिळत आहे. या तुम्ही भेटता तर येईल. बोलू चर्चा करू!"
आम्ही म्हणलो, "ठीक हाये येतो!"

घरी आलो तर विचार करत होतो. ही तर सामान्यात सामान्य गोष्ट आहे, खगोलीय घटना आहे.
लोणार सरोवरातील पाणी #गुलाबी_होण्याची_कारणे
सरोवरात असलेले खारट पाणी यामुळे पाण्यातील शेवाळ 1)ऊन्हाळ्यात वाढलेल्या तापमान, (ऊष्णतापमान)
2)सुर्यप्रकाशाची भरपुर ऊपलब्धता
3) पावसाळी पाण्याचा अभाव
या तीन कारणामुळे शेवाळ आपल्या प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मध्ये
बिटा कँरोटीन नावाचे रंगद्रव्य तयार करते त्या रंगद्रव्यामुळे पाण्याचा रंग गुलाबी झाला आहे.
या ऊष्ण तापमानामुळे शेवाळा मध्ये होणाऱ्या नेहमीची प्रक्रिया आहेत यामध्ये घाबरण्यासारखे नसते.पाणी अपायकारक नाही . .
▪️बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणी हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे गुलाबी झाल्याचा अहवाल पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे. या अहवालाचा तपशील 'लोकमत'ला प्राप्त झाला आहे.
🟢 हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवाला खारे व आम्लयुक्त पाणी फार आवडते. अशा गुणधर्माचे पाणी मिळाल्यानंतर त्यांची झपाट्याने वाढ होते.
▪️यावर्षी उष्णतेमुळेपाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. परिणामी, खारेपणा व आम्ल नेहमीच्या तुलनेत अधिक वाढले.
▪️त्यातून हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवाला पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या झपाट्याने वाढली.
▪️हे सूक्ष्मजीव तीव्र सूर्यकिरणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बेटा कॅरोटीन हे गुलाबी रंगद्रव्य मोठ्या प्रमाणात निर्माण करतात. त्यामुळे लोणार सरोवरातील हिरव्या पाण्याचा रंग अचानक बदलून गुलाबी झाला, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
▪️फ्लेमिंगो पक्षी गेल्यावर्षी लोणार सरोवरात आले होते.
▪️हे सूक्ष्मजीव फ्लेमिंगो पक्ष्यांच्या पंखांमध्ये जिवंत राहू शकतात.
▪️त्यांच्या माध्यमातून या सूक्ष्मजीवांचा लोणार सरोवरामध्ये प्रवेश झाला असावा, असे गृहितक अहवालात मांडण्यात आले आहे.
▪️इराणमधील सरोवरही झाले होते गुलाबी या सूक्ष्मजीवांमुळे इराण येथील उमरिया सरोवरातील पाणीही
गुलाबी झाले होते, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.
🛑 आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सदर अहवाल दिला आहे.
-विश्वनाथ साठे 9921056462

Comments
Post a Comment