तुझ्यामुळे लेखक लेखकामुळे तू नाहीस!


कुठेस तू? हल्ली दिसत नाही... समजत नाही.
मी का या गॅलरी बसले आहे.
अच्छा! मीही आज ओट्यावर बसलोय,,, चंद्र पाहतोय
काय सांगतोस
तू पण बोल न थोडं...
तुला तुझ्या मित्राल बोलायचं का ग?
नाही...बोल तू.
मी तुल व्यस्त तर करत नाहीय न
नाही रे मीच व्यस्त करत असते तुला बोलून बोलून
नाही ग
ना...तू मनात म्हणत असशील ही वेडी आहे
कशी?
बाकी तू ठरव न कशी ते?
अच्छा...
ठीक हैं न!
काय? मी वेडी हे का?
ना तु ' तू'आहेस म्हणून
बरं
का रे काय झालं
अं हं...
मग इतका वेळ काय विचार करत बसला होता?
असंच...
तू केव्हा झोपली?
तुला बोललं का कुणी?
नहीं ग पिल्ले
विश्वाला कोण बोलणार?
तू जास्त जागत नसतो का रे आता?
इकडे शहरात होता तेव्हा जागायचा न भरपूर.
होय. शहर असतं न ते।।।गावखेड्यात लवकर झोपी जातात न...माय म्हणते झोप...ती दूध गरम करून प्यायला देते...गावात लवकर जेवण होतात तरी आम्ही 9, वा सडे नऊ ला जेवतो
गावात तर सगळे 9 पर्यंत झोपी जातात
हो
12 आणि 1, वा 2 पर्यंत जागणं म्हणजे वेड लागल्यागत असतं
मग का रे काही वेळा इतक्या रात्री का जागत बसतो?
काय विचार करत असतो?
असे म्हणतात गावात
बरं
म्हणून दे ना तूला काय फरक पडतो
आणि अशात आजारी पडल्याने तर लवकर झोप म्हणतात तिकडे असाच जागी राहतो आणि बिमार होतो...
म्हणजे मी वेडा च आहे असं म्हणायचं तुल ओहो
हो मग खंर कळू दे ना त्यांना
वेडे व्यक्ती प्रेमळ असतात गं
तू लवकर झोपत नाही तिकडे
नाही
मला माहिती नहीं मी कित्ती प्रेमळ आहे तर
म्हणून आजारी असतो
इथे म्हणालीय तशी तू तुल काय फरक पडतो तर🤔
तूझे वाक्य आहे हे
तूच नेहमी म्हणतोस
ओहो हे फार छान शिकलीय,,हे तुझंच विधान आहे...असं म्हणणं
नाही रे तुझंच विधान आहे ते
बरं बाबा माझं बस
बंर
हे वाच न
को का मग रे
हे
हेच तुझ्या फ्रेंझला विचार न
तुल विचारतो
बाकी पण आहेत न फ्रेंझ
तू आहेस न
बाकी रे जुने फ्रेंझ तुझे
मी जस्ट आत्ताची आहे.
ओहो असं पण असतं का
फ्रेंझ हे फ्रेंझ असतात
त्यात काय जुने नवे?
मला इतकं महितिय
पण काळ असतो ना ह्या मध्ये
आणि काळ बोलतो ना
बाळ
हे तुझं आवडतं मला की तू माझंच वाक्य माझ्यावर अडविते, कुठे तरी पकडते...अशी अडवणूक कुणीतरी ग्रेट व्यक्तिमत्त्व च करू शकते हा माझा विश्वास आहे...
बरं
मला पण शिकवीत चल
ग्रेट आहेस तू
ते तु काय करतोस हल्ली?
हे विधान कुठे लावायचं हे कळलं न तुल...
तुझ्या खूप लक्ष्यस्थ असतं
किती काळ रे
आयुष्य
का गं असा सवाल?
नाही जमणार मला
हे...
का असे?
काळ बदलतो मग माणसांनी ही बदलावे लागते ना
या प्रश्नाचं उत्तर नाहीय हे
हे....
असंच बोलले रे
असं काय ज्यामुळे जमणार नाही?
कधी म्हणतो तू की, प्रश्न करत नाही आता करते तर का करते
काळ बदलला की मग मी पण बदलणार ना
प्रश्न कर ग...बिनदिक्कतपणे कर प्रश्न
करू का
हम्म
तू लग्न कधी करणार आहे
खूप वेळ झाला रे तू झोप
मध्ये मध्ये मीही प्रश्न विचारू का नंतर विचारू???कारण हे महत्त्वाचं आहे की तू काही प्रश्न का करणार आहेस?
परत विचार करतोस मग
विचार ना
का विचारलं तू हे?
तू उत्तर नाही दिले ना पण
ते दे मग सांगते
हे जाणून घेऊ देत नं
असं काय आहे या प्रश्नात*
हे सांगणार आहे स का
तू लग्न करणार आहेस न म्हणे...अजून काय महत्वाचा आहे प्रश्न हा जो तू मला प्रश्न करते आहेस?
तूझे जीवन, आयुष्य
तूझे विचारले ना मी
जाऊ दे नेहमी प्रमाणे नको सांगू
तू झोप शांत आताच बंरा झाला ना
ओय...तू कुठे काय सांगतेस...म्हणाली की का विचारला हा प्रश्न
कर आराम
तू का विचार करतेस गं... कुठेतरी भेटलेला, कोणत्या तरी शेक्शनला...
हो ते पण खंर आहे
छान प्रश्नाच्या मुंग्यांनी वारूळ उकरून ठेवलंय डोक्यात अन म्हणे कर आराम,,, ओहो
कोणते ते सांग ना रे
जे खरं आहे तेच सांगतों...
इथून पुढे नाही उकरून काढणार
सगळे सांग मग
अरे बाबा... तो खूप म्हहत्वाचा प्रश्न आहेका ग
हे असंही सुरुय न...संपेल तेव्हा संपेल जन्माला मृत्यू अटळ असतोच...आणि मृत्यू आधी जीवनाचा प्रवास...
बोल न यावर
बंर ना
तू किती काळजी करतोस माझी, नेहमी काम असू तरी बोलतो, खूप काळजी करतोस, ह्या पोटी कधी पाणी पण येते डोळ्यात
मी एक प्रश्न केला तर इतका राग
बंर ना
तूझे आयुष्य ना ठिक आहे
का रडत असते ग...माझ्या अशा असण्यानेही कुणी दुःखी असू नयेत, तू तरी बाळ
मग मला पण नको विचारत जाऊ
राग नाहीय ग...इतकं का महत्व आहे या प्रश्नाला असं स्पष्ट विचारत आहे न
तूझ्या म्हणते मी
ओहो...अच्छा माझ्याबद्दल होय...माझ्याकडे सागर आहे डोळ्यामागे भरलेला...म ओसंडु देत असतो😊
तू करणार आहेस न लग्न हा ही आनंद च...होणं...
माझा आयुष्यातील सगळे विचारून घेतले मग तूझे विचार ले तर काय झाले
एका लेखकाचं काय असतं गं?
पहिले त्या लेखकाचे लेबल काढून टाक
काही झाले की लेखक हेच उत्तर
तुह्या अशा काही खमक विधानाने मी मानवी जीवनात येऊ लागतोय की काय असं वाटतं,,, नहीं तर सदैव लेखकी जगणं
बरं...विश्वाचं म्हणून असं काय आहे ग?
लेखका मूळे तू तूला नको विसरू
तूझ्या मूळे लेखक आहे त्याच्या मूळे तू नाही
आज खूप मार्मिकपणे व्यक्त होते आहेस..
खरंय तुझं
सगळीकडे तटस्थ नको होवू रे कूठे तरी तूझा मनाचे पण ऐक
काय असते ग मनाची अवस्था?
कोणत्या कप्प्यात काय असतं?
कोणता ठाव असतो मनाचा?
तूला जास्त माहिती माझापेक्षा
कप्पे बनून संकुचित करतोस ते
पण मन तर विध्वंस पण आहे आहे उत्कर्षही...आणि दोहोंची निर्मितीउगम एकमेकांत दडला आहे मग?
विध्वंस केला तर उत्कर्षाला वाव असते आणि उत्कर्ष शिगेला गेला की विध्वंसकच सगळं! मग?
पण दोन्ही तर हवे ना रे ते महत्वाचे ना, अंधार नंतर उजेड येतेा ना पण
माझं मन काहीतरी म्हणत असते असे तुझं म्हणणं आहे ते तुल कसं समजतं... मलातरी सांग मन कसं वाचायला येतं तर?
नाही येत मला काही रे
विषय टाळू नकोस न
कोणी टाळला तूच सांग
हम्म अजून उत्तर दिलं नाहीय न तुल कोणतंच
हम
बाळ खरंच तो प्रश्न इतका मूल्यनिय आहे?
तूला तूझ्या आयुुुष्यातत काहीच मूल्यनिय नाही का
सांग ना
हम्म...तू खरंच संवादीत झालीय... अप्रतिम आणि तल्लखपणे तट उभा करूनच प्रश्नाला प्रश्न आणि तोडीस तोड देते आहे...विश्वा आज तुझी खैर नाहीय बाळ...आयुष्यात सगळं मूल्यनिय असतं... आणि तितकंच अमूल्यही
कारण ज्याला मूल्य असतं ते घटत जातंही
नष्ट होणारं असतं सगळं
जितकं शाश्वत तितकं अशाश्वत
हम
मला नकारार्थी बोलायचं नाहीय या सिद्धांतातून पण जे आहे ते तरी सांगावं लागेल न
मग रे शेवटी काय सत्य आहे
शब्दांना फेरफार केली की सिद्धांतही नकारार्थी होकारार्थी होत जातात
बंर
तू सांग न
मला जाणकार आहेस
मी नाही विषय बदलल्या
मला जाणकार आहे अस का म्हणतेस असं विचारून
तू सांग
तू सांग
तू सांगशील...तू भन्नाट अभ्यासू आहेस हे उमगले आज
नाही रे मी कूठे लेखक आहे
ओय...शालीतून आहेर करू नकोस
तूला झोपायचे नाही का रे
आज माझी झोप हरवलीय ग,,,तुला झोप आली असेल तर निवांत झोप
हो पण आयुष्य हे एक नाणे आहे एकच बाजू पाहून काही ठरवू नये। दूसरी पण पहावी बाजू मग सत्य समजते
काय असते दुसरी बाजू...समजून तरी सांग...
का रे मी काही तूला दुःखवले का
सत्यप्रत यायला मज वेडयाला काळ जाऊ द्यावा लागेल ग
स्वत शोध सापडेल
इतका नको जाऊ देवू काळ
ना...रणांगणात लै दिवसांनी कसोटीचा वार भेटलाय...तरवार अनुभवतोय
वाह...खरंय हे ही
का गं?
तू सगळेच का विचारतोस मला
तुल सगळं विचारायचं असतं म्हणून
बंर
तू म्हणतोस की तूला बाकी काही दुःख होत नाही फक्त शब्दांचे वार लागतात
मी काही असे बोलले का रे
काय
फार पूर्वी बोललो होतो न मी हे तुल
हम
इतकं कसं लक्ष्यस्थ ठेवते ग तू?
हम
माझ्या मूळे तूला नेहमी त्रास होतो ना रे
नाही ग ही तुझी प्रशंसा आहे...
हा माझा अमोघ आंनद की तुझ्यासारख्या लढवय्यासोबत रणावर आहे
कैक दिवसांपूर्वीच हे युद्ध सुरू व्हायला हवं होतं
खाचखळगे आणि माझी कमुकता मला कळली असती
मग रे
आज सुरू केलंय तर बरंय...
तुझी वैचारिक मांडणी फार उत्तम आहे...याने सिद्धांतनाला नवे आयाम येतात
मग रे
तू पाणी पी न...
मला पण पाणी प्यायचं आहे
बरं आपला संवाद संपला का?
तू ठरव न!
तू कूठे उत्तर दिले
आराम कर
अच्छा तर तू इथे होतीस.
का रे....
तुल झोप येतेय का
नाही
बोल न मी इथेच आहे
हम
या उत्तरावरून तू काय ठरवले आहेस?
काही नाही
काय ठरवणार आहेस?
पण हवे ना
काय?
उत्तर
अच्छा...
दे ना बाकी वर सग़ळावर बोल ह्या वर नको पण
मला एक प्रश्न पडतो आहे की, तू का हाच प्रश्न करते आहेस?
प्रश्न करण्याबाबतीत सवाल नाहींच्ये
पण का ब्वॉ?
मला पण तू का ़उत्तर देत नाही
मग रे
तुझं आहे लग्न आता...मग हा आनंदच आहे न...
टाळू नको ना
हे खंर
ऐक न...तुल काय ऐकायचं ते तरी सांग तसं उत्तरदेतो
आहे ना
तूझे विचार ते ना मग
ठीक हैं न!
मी २ दिवस काही बोलले नाही कळले मला माझे मन नव्हे ते शांत
आता तरी बोलशील...बोलल्याने तीव्रता कमी होते ग...नाराजीची
वाचन केले तरी समजत नव्हते
माहितीय मला...तुझं लक्ष्य नव्हतं
जागी वरून रे मला ते एक वीषय वरून रागवले
तूला शिकवून चूक केली असे म्हणतात ते
शिक्षणाबद्दल बोलले का? हा विषय होता का?
मला कधी वाटते रे खूप दूर निघून जावे
असं का म्हणतेय बाळा तू?
ऐकटी असावे कुठे तरी खूप शांतता असेल तिथे
दूर जाण्याने प्रश्न सुटत असतात का?
या वयात येतात हे विचार...शांत असावं असं वाटतं साहजिक आहे
कसलेच प्रश्न नाही उत्तर तिथे फक्त शांतता
हो गं... पण सगळे प्रश्न न निस्तारता दूर जाणं हा पर्याय नाही न
वैताग येतो रे मग सगळ्या गोष्टी च्या
प्रश्न गुंढाळत, तोडत, नष्ट करत जीवन म्हहत्वाचं आहे न
हे बघ प्रश्नपासून दूर पळणे योग्य नहीं तर प्रश्न उलगडत जाणे योग्य, ते प्रश्न सोडविणे योग्य...वैताग न येता
मग सगळे नको वाटते रे पण प्रश्न,आणि जीवन, पण
इतकं आयुष्य जगत आलीय तू खंबीरपणाचे आणि आता असा कोणता प्रश्न आहे ज्याने तू आई अण्णा यापासून दूर गोड वाटते आहे? ते तुझे जन्मदाते आहे ग
ते तुला काळावर बोलतील
बोलू देत व्यक्त होऊ देत
तुल तुझ्या आयुष्यात हे मोलाचं ठरेल की त्यांचं अनुभवांचं बोलणं
आणि हेही तूझे त्या काळातील पुढील निर्णय
हो रे पण मी पण एक व्यक्ती ना रे तिला काही भावना, मग आहे ना रे
मन आहे
हम्म..तेव्हा व्यक्ती आहेस जेव्हा आई अण्णा आहेत...
आपलं अस्तित्व त्यांच्यामुळे असतं ग
हे विसरू नकोय
हम
का तुला ह्या सगळ्यांपेक्षा दूर असायचं आहे?
शांतता हवी मनाला
हा पण...तिथेही तुला प्रश्न नसणार हे कशावरून
शांतता कुठे असते माहितीय तुला?
आपल्याच काळजात शांतता असते... ती इतरत्र वणी, राणी, पाषाणी, यात्रीक्षेत्री, तीर्थी, रौळी, मशिदी,चर्च, दर्गे, सागरी, पहाडी, डोंगर दऱ्यांवर नसते गं माझे बाळ!
माझं काही चुकतंय का रे?
नाही
काळजाच्या व्यतिरिक्त तुला जिथे शांतता सापडेल ते ठिकाण सांग मला
आणि त्या ला शांत करायचे असेल तर
जे काळीज शांत आहे त्या काळजाला भिडणं...
असं नको म्हणत जाऊस
पॉझिटिव्हन्स राहत जा
समाजाच्या दृष्टीने मी' नष्ट' म्हणजे वाया गलेली असं स्वताला म्हणवून घेणं मला आवडते
कारण,
हे वाच
विश्वा बिनदिक्कतपणे व्यक्त होतो न...तू व्यक्त होत जा...काय होतंय हे तरी सांगशील...अशी मुरझत जगू नकोस न...
काही गोष्टी ची चीड येते मग नाही पटत तर रे बोलले तर मग पटत नाही माझ्या गोष्टी
मी त्याच्या प्रेमापोटी सांगते रे माझ्या काही स्वाथ॓ नसतो
अच्छा...
मग काही मनाला लागले ना मन बैचेन होते रे मग
मग नको वाटते काही
साहजिक आहे असं होणं
अशा काळात बिनदिक्कत धीर धरून राहिलं पाहिजेत
मग कोणत्याही , कोणाला,का बरे, कशाला हे प्रश्न येतात
मग कोणासाठी

लिहायचं बाकीवै
-विश्वनाथ साठे9921056462
सोडव ना ह्या प्रश्नांचा गुंता
प्रश्न मनात येणं चांगली बाब आहे...
हम काही प्रश्न किती ही सोडवायला घेतले ना तरी सिटी नाही, आणखी गुंता वाढत जातो
पण ते प्रश्न सोडविता आले पाहिजेत न हार न मानता...सगळ्या प्रश्नांपासून दूर उभं राहणं हे उत्तर नाही त्या प्रश्नाचं
नवीन प्रश्न निर्माण होतात


संवादगम्य अंकातून

विश्वनाथ साठे-9921056462

Comments

Popular posts from this blog