लिहिलं पाहिजे असं मत
आणि हे काय उलट आता तुझं?
काय?ना...लिहावं वाटत नाही सद्या काहीच
तेच विचारते न मग... वाचकांना लेखकाचे काही एक समजत नाही ना.
मला तूझे विचार ऐकायचे असतात ना पण तू कूठे सांगतोस
ब्लॉग वाचला मी तो, "पांढरे सोन्याचा"
अच्छा!
तू कोण्या विचारात आहेत?
कोणत्या नाही!
तुझं काय चालू आहे?
अं हं!
का लिहीत नाही?
काळ समजून घेतोय.
बरं अजून? पण असं का करतो? ऐकशील तुझे लिखाण फार चांगले आहे बंद नको करू न तू ते!
असं काहीही म्हणू नकोस.
का?
अजून खूप काळ जायचा बाकी आहे...काळ जाऊ दिला पाहिजेत!
सांग ना काय झाले?
काळ सगळं व्यक्त होतो...समजलं पाहिजे फक्त.
हं...बोल
इतकं पण छान नाही गं लिहीत. तू का असं काहीही म्हणतेस.
हो का...मी काय खोटे बोलले का मग?
नाही ग असं म्हणत नाही मी.
का गं असं का...तुला त्रासदायक होतं?
मी तूझे लिखाण वाचले ना तू खूप मनापासून लिहतो
अच्छा...
हम्म...
होते पठार अवस्था.
मग रे?
काळ जाऊ देणं आणि त्याचा प्रवाह समीक्षण करणं.
बंर हे जास्त नाही समजत मला!
हम्म...
तू च सांग मला.
ऐक...!
हम...सांग...
काळ जातो तसा त्याचा वर्तमान असतो, गतकाळ निर्माण होतो, त्याची स्वतःची एक भूमिका असते त्या त्या काळावर
काळ त्या त्या काळावर बोलत असतो,काहीतरी व्यक्त होत असतो फक्त त्यामुळे निर्माण होणाऱ्या, झालेल्या धारणा, समजुती, गैरसमज, मानसिकता, स्व व ईतरेत्तर बदल, सामाजिक , वैचारिक, मानसिक, भावनिक, शास्त्रीय अशा काही बनल्या जातात
त्या त्या काळावर जितक्या पक्क्या असतात तितक्याच त्या ढासळणाऱ्या असतात, काळ गेला की त्यात काही उलथापालथ होते, काही ढासळत जातात, काही मजबूत बनत चालतात, हे असं होणं एक नैसर्गिक चक्राची गती असते.
प्रवाह असे तयार होतात काही बंद पडत काही वघळतात, काही प्रवाह विस्कळीत होतात
प्रवाह समजला की काळ व गती समजते
किंवा काळ समजला की गती आणि प्रवाह, दिशा,वेगाची तीव्रता आणि धारणा समजू लागतात
त्या तुटत जातात जशा त्या निगरगट्ट होत जातात
हम
यामागे एक मानसिक प्रक्रिया असते
भावनेने जे ढासळणाऱ्या अवस्थेत असतात तेप्रवाह बरोबर वाहतात
जसे त्या दिवशी ति मुलगी रडत होती...
प्रवाहात वाहने योग्य नाहीच, पण प्रवाह जाणण्यासाठी हे काही काळ वाहनं गरजेचं असत, समजतं
काळावर थांबणं म्हणजे संपून जाणे नव्हे
ही एक पठारावस्था असते जशी गाडी उतराला असते तर अजून बळाने वेगात होते आणि चढ लागला की मंदावते, पठार असलं की सगळं संतुलित
काळ पठारअवस्था निर्माण करतो
तो वाहू देत नाही तर संतुलित ठेवत चालतो
हम
पण संतुलित होणं हे किती काळ असावं हे स्वनिर्भर असतं, काळ त्यामुळेच तर समजला पाहिजे, हा काळ गेला की तो विचारही नष्ट वा त्यातली तीव्रता कमी होत जाते,
काळाची प्रवाहसमीक्षा बघ अशी असते
खूप हे,,,typ ला हात दुःखात पडतो, दुखतो
बंर
तू अशा अवस्थेतून मग लवकर बाहेर पड
तूला झोपायचे असेल ना
या अवस्था निर्माण व्हायला कोणती कारण असतात रे असं विचारायला हवं तू?
बोल
विचार होते पण
पण काय?
तू नाही सांगत मला ना
सांगत असतो रे...
किती विचार ते पण तू खूप नाही सांगत
हम्म...
बोलणे टाकतो मग
नाही
वाटले म्हणून बोलले
तू मला इतकं जाणतेस?
हे कसं शक्य आहे?
कार्यकारणभाव सांग न?
योगायोग ़असेल
हे नाहीय तुल म्हणायचं
ओय...बोल न
हो ना
हे नहीं असं
हे कित्ती खरंय ?
नाही माहिती
तूच सांग ना?
-विश्वनाथ साठे 9921056462
Comments
Post a Comment