उत्तराची माय
हाटेलात झिजती रोज श्रीमंतीचे पाय
गरीबाचे काय रे गड्या गरीबाचे काय?रोज इथे होती पार्ट्यांचे पेव सारे
दारू मटणाने भिजती हे देव सारे
झिंग झिंग झिंगाट गाते मॉंबची गाय
एक लेकरू उपाशी तुपाशी खाय
एक लेकरू मोकले मोकले धाय
पैश्यांची रास आज उद्या गादीवर लोळे
हावरट लोभी झाले धुंद मधाचे पोळे
एक लेकरू उपाशी दुसरं तुपाशी खाय
उंच उंच इम्रारतींना अग्निशाम्यानची भरती
झोपड्या खोपड्या ढणाढणा जळती
माणुसकीच्या गावा भेदाभेद पाळले जाय
गाडीघोड्यातून जाणाऱ्या उच्ची उच्ची अत्तरे
त्या पायदळीच्या मानवाला टोचणारे फत्तरे
विश्वा म्हणे विश्वाला दाखवा उत्तराची माय
विश्वनाथ साठे -9921056462
Comments
Post a Comment