कला आणि कलाकार
कलेचं बीज त्या कलेच्या उगमात आहे.केलेल्या प्रामाणिक प्रयत्नात आणि सत्याच्या शोधात कलेला वैश्विक आणि वैशिष्ट्य पूर्ण स्वरूप बहाल होतं.
जगण्याच्या उर्मीत जीव जगत आला. बदलत गेला. परिवलनपरिवर्तनाच्या दिशा त्याने पाहिल्या. कधी भुकेच्या मागेपुढे पळत तर कधी भीतीच्या छपराखाली आकंठ बुडालेला जीव.
एका भूगोलातून दुसऱ्या भूगोलत होणारं स्थलांतराचा हा काळ म्हणावा तसा संक्रमानाचा काळ.नाना प्रकारची संक्रमण आजच्या काळात या स्थलांतरामुळे घडून येत आहेत.
मिसिसिपी- कॅलिफोर्निया स्थलांतर असो की अरबीयांचे - तुर्कीयांचे असो बांग्लादेशी-अफगाणी- पाकिस्तानीयांचे स्थलांतर असो ते जमिनीच्या नसलेल्या सीमा तोडून होत आहे. हे सीमांचे तोडणे म्हणजे राजकीय धरणांचे तोडणे आहे. सांस्कृतिक-धार्मिक-आर्थिक-नैतिक-भावनिक-मानसिक हितसंबंधांच्या सीमा तोडत होणारं हे स्थलांतर या काळपटलावर उरात वैशिष्ट्ये घेऊन आहे.
गेल्या काही वर्षांतील गोष्ट. आम्ही एका संघात काम करत होतो.विद्यापीठाच्या आयुष्यात आम्ही नवी फुलं उमलले होतो. नाना गावागावातील,जिल्ह्यातील वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी असणाऱ्याचा आमचा संघ विद्यापीठ आवारात वावरत होता.
गाव, आपली माणसं, नातेवाईक, सांभाळ करणारे सगळे सगळे सोडून आम्ही विद्यापीठात शिकायला होतो. विद्यापिठात आमचे नातेवाईक स्नेही झाले.विद्यापीठ म्हणजे एक जग. जगावेगळं जग. इथली मैत्री जिवाभावाची. नात्याच्या पुढची. रक्ताच्याही नात्याच्या गोडीची.
जगायचं म्हणलं की भाकरतुकडा आलाच. भाकरत तुकड्यास काहीतरी काम धंदा आलाच. इथं विद्यापीठात आम्ही तर सगळं सोडून शिक्षणाच्या मागे लागलेलो. इथं मुद्दाम अनेकार्थ बोलत आहे.हे केवळ माझ्या एकट्यापुरतं मर्यादेत नाही.सगळ्यांचं जगणं आहे.मी माझंच का सांगू?
ते म्हणतात,
Ryart creation......
Fially become 'India Book of Records' holder....
आयुष्यातील एक खुप मोठी achievement,,,,,,,
String art ने मला दिलेली माझी एक अभिमानस्पद ओळख,,,
कधी शिक्षक, कधी इंजीनियर, कधी स्पर्धक आणि शेवटी आता कलाकार,,, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक भूमिका बजावताना नक्कीच खुप छानही वाटल.. प्रत्येक भूमिका बजावताना आपला 100%देण्याचा नक्कीच प्रयत्न केला,,, काही भूमिका फ़सल्या तर काहिंनी एक ओळख दिली,,,,, कुणास ठाऊक अजुन एखादी भूमिका बाकी असावी😊
खुप खुप धन्यवाद आणि आभार,,,, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला साथ देणाऱ्या आणि माझी साथ सोडणाऱ्या त्या सगळ्या माझ्या जीवलगांना,,,,,,,,,,,,,,,,, अजुन प्रवास बाकी आहे,,,,,,,आता कुठे फक्त सुरुवात केलिय,,,,,,
सुरुवातीला पहिले india book of recordस मिळाले तेव्हा वाटल बस खुप काही कमवले, त्यानंतर Asia book of records मिळवले, आता वाटल होत झाल खुप जास्त मिळाले
पण परत अशीच एक संधी मिळेल आणि त्या संधिचे मी सोने करेन हे माहिती नव्हतं,
अशीच एक संधी रंगसमर्थ llp नी दिली,
विशेषत: मी आयुष्यभर ऋणी असणार Ganesh Kenjale II सरांचे, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला संधी दिली,
सोबतच पुणे आर्ट फेस्टिवल ची सम्पूर्ण team ज्यांनी माझे records पूर्ण करण्यास खुप मोठी मदत केली,
Mr. सागर sir, रुद्रा sir ज्यांनी पाउलो पाउली साथ दिली,,,
Pramod Kale you are also very big role sir..
विधि you are one of the best person
देवा my brother who always with me,,,,, आपण सर्वांच्या मदतीनेच मी हे करु शकलो,,,,
आयुष्यातील एक सगळ्यात अविस्मरणीय वर्षाची शेवट,,,,,,
दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार 2019 चा विशेष सन्मान आज राहुल ला मिळाला. राहुलने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याची आठ गुणिले चार फुट आकाराची कलाकृती 42810 खिळे व रंगीत धागे वापरुन बनवली.सहा महिने रोज सात तास वेळ देऊन अत्यंत उत्तम कलाकृती बनवली. राहुल हा आपल्या का कामाशी अत्यंत प्रामाणिक तितकाच तो शांत स्वभावाचा आहे.
पुणे विद्यापीठाच्या कमवा शिका योजनेतील दोनशेहून अधिक मुला-मुलींना राहुलने ही कला मोफत शिकवली. पण आज दुर्दैवाने तो एकटाच ही कला जोपासतो.
राहुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कमवा शिका योजनेत असताना बनवलेल्या 150 हून अधिक कलाकृती एनएसएस च्या ऑफिसमध्ये बंदिस्त आहेत.
पण श्रेय देताना तो कोणालाच विसरला नाही.
-बाबुराव इजगुडे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळयाची Ryart creation द्वारा खिळयापासुन प्रतिमा बनविणारे माननीय राहुल ठाकरे यांना दादा कोंडके समाजभुषण पुरस्कार मिळाला..हार्दिक अभिनंदन...समवेत विश्वा व बाबु सर
-किरण जिम्मी
संपादन- विश्वनाथ साठे 9921056462
Comments
Post a Comment