TACE A AVOIDED REFERENCES 


विवेकवादी विचारसरणीबद्दल असे सांगता येईल की, माणसाला उपजत बुद्धी असते. कुतूहल असते.निरीक्षणाची आवड असते. त्यातून अनुभव मिळतो. त्यावर तर्क बुद्धीने विचार करून ज्ञान मिळते. ते ज्ञानेंद्रियांद्वारेच मिळू शकते. अतीन्द्रियज्ञान, दृष्टान्त, साक्षात्कार या गोष्टी विवेकवादात बसत नाहीत. आपले डोळे आणि मन उघडे ठेवावे. श्रद्धा आणि भावना यात वाहून जाऊ नये. निरीक्षण करावे. तर्क बुद्धीने विचार करावा. मगच सत्यासत्यता ठरवावी. वैज्ञानिकांचे निष्कर्ष ग्राह्य मानावेत, कारण ते प्रयोगांती सिद्ध झालेले असतात.विवेकवाद हा वस्तुनिष्ठ आहे. विवेकवादी तत्त्वे कोणालाही तपासता येतात. प्रत्येक विधानामागे पुरेसा तर्क असतो. म्हणून ही तर्कशुद्ध विचारसरणी आहे. विवेकवादी विचार पूर्णतया इहलौकिक असतात.विवेकवाद परलोक मानत नाही. मरणापूर्वी जे घडते तेच अर्थपूर्ण असू शकते. मरणोत्तर जीवन नसतेच. असा हा अनुभवाधारित विचार आहे. धर्म , राष्ट्र, वंश, जात या विविध भेदांवर माणसामाणसात भिंती उभ्या करणाऱ्या भावूक कोत्या निष्ठा विवेकवादाला मान्य नाहीत.

समाजामध्ये एक खरा असंतुष्ट आणि एक आभासी असंतुष्ट वर्ग नेहमीच वावरत असतो. मग तो समाज कोणताही असो. खऱ्या असंतुष्टांच्या अडचणी खऱ्याच असतात. त्यांना नोकऱ्या नसतात. आर्थिक तंगी असते, वगैरे. त्या सोडवणं हे कोणत्याही राज्यकर्त्यांचं प्राथमिक कर्तव्य असायला हवं. त्याचवेळी या दुसऱ्या असंतुष्टांना कसं आणि किती हाताळायचं याचंही भान त्याला असणं आवश्यक असतं. हे दुसरे असंतुष्ट पोट भरल्यानंतरचे असंतुष्ट असतात. त्यांना धर्माची, भाषेची, वर्णाची अस्मिता महत्त्वाची वाटत असते. सर्व भौतिक गरजा भागलेल्या आणि बौद्धिक गरजांची जाणीवच नाही, असा हा वर्ग. हा वर्ग धर्म आदी अस्मितांचे खेळ करीत असतो. तो संकुचित असतो. आणि आपल्या भूमिकेला किती सैद्धान्तिक आधार आहे असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. बोलघेवडा, हाती चार पैसे असलेला आणि माध्यमकेंद्री असल्याने या वर्गाचं राजकारण्यांना ह्याच वर्गाचं आकर्षण असतं. त्यातून ते वाहत जायला लागतात. त्यांच्या तालावर चालायची एकदा का सवय लागली, की राजकारण्यांचा कार्यक्रमच या अशा संकुचितांच्या विचारांना पर्यायाने कर्मकांडांना ठाकूनठोकून बसवण्याचाच होत जातो. त्यामुळे राजकारण्यांना आपली पोळी भाजणे सोपे जाते.अशी उदाहरणं आपल्याकडे सध्या मोठ्या प्रमाणात आढळताहेत. लोकशाहीसाठी हे प्रमाण वाढणे घोकादायक आहे, हे आपण जेवढ्या लावकर जाणून घेऊ तेवढी लोकशाही परिपक्व होत जाईल. (^m^) (^j^) (मनोगते)

फ्रीडममधून
-विश्वनाथ साठे 9921056462

Comments

Popular posts from this blog