अर्जुनजी सखारामजी साठे
अनुसयाबाई सखाराम साठे यांचे पुत्र यांचा जीवनपट
10 एप्रिल 1957 ला अनुसया मायच्यापोटी जन्म
बालपण व पहिली ते चौथी मराठी पूर्व शाळा शाळा येथे शिक्षण
सखाराम पिराजी साठे हे बाबांचे वडील. बाबांच्या लहानपणीच ते वारल्याने मायच्यासोबत मोलमजुरी करू लागले, कष्ट करू लागले. या काळात शेळ्या वळणे, वळणं खंदने ही शेतातील कामे करू लागले. त्यामुळे शेतात थोडा वेळ मिळाला की, ते कबीराचे नामस्मरण घेत होते.
आई-वडील कबीरपंथी असल्यामुळे त्यांच्यावर कबीर तत्त्वज्ञानाचा प्रभाव झाला. सत्य, नीतिमत्ता, गोड वाणी, ही वागणूक त्यांनी आपसूकच अंगी बाळगली. बाबाच्या तरुणपणात ते मल्हारी इंगळे यांची कन्या रत्नकला यांच्याशी 1970 साली विवाह संपन्न झाले.
संसाराचा गाडा ओढत ओढता या दोन जीवांनी नाना कष्टाची कामे केली सुगीच्या दिवसात सुगी निंदणी खुरपणी वावराची वळणं तयार करणं हाय्ब्रेड खुडणे पाडणे बांधणे इत्यादी कामे केली सुरुवातीला बासरी वाजवणे शिकणे असल्याने त्यांच्या मामांनी (लक्ष्मण कांबळे) त्यांना क्लारनेट शिकण्याचे धडे दिले या काळात कलेच्या आधारावर वाराणसी - काशी बनारस सुरत जळगाव खान्देश वरणगाव पुणे मुंबई व स्थानिक ठिकाणी वादन केले पुढे गावाकडे आल्यावर असताना म्युझिकल गायक बँड संस्थेच्या माध्यमातून आंगिक कला जागृत ठेवली
सन 1997 च्या निवडणुकीतील राखीव जागेवर आमची आई रत्नकला ह्या सरपंच शारा म्हणून निवडून आल्या या काळात अनेक अडचणींशी सामना करत खंबीरपणे संघर्ष करत या दोन जीवांनी आपलं जीवन जगत राहिले अन्यायाच्या विरोधात समस्त भारतीय प्रबोधन चळवळीच्या महामानवांची जीवनशैली त्यांनी अंगिकारली होती
पंचक्रोशीत त्यांनी न्याय समता सामाजिक ऐक्य व संघर्ष घेत सरपंच पद पार पाडले 2006साली लोणार सरोवर स्थित लोणार महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कलेचे आगळेवेगळे दर्शन जनतेला घडवले महाराष्ट्र शाहीर परिषद घडवून आणताना लोणारचे शाहीर चौधरी घराण्यातील न्यायप्रिय व्यक्तिमत्त्व फक्रुद्दीन चौधरी यांच्यासोबत सर्व जिल्हाभर शाहिरी प्रबोधन केले सन 2008 2009 या कालावधीत या कार्यक्रमाची चित्रफीत दूरदर्शन व स्थानिक मीडियावर प्रसारित होऊन ते व त्यांचे कार्य जनतेकडे प्रसारित झाले आदिवासी वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली 2010 साली चौथी महाराष्ट्र खानदेश सिंहावलोकन परिषद उत्तर महाराष्ट्र धुळे बोराडी येथे शाहिरी जलसा त्यांनी तनमनधन समर्पण करीत सादर केला
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीत पुणे आकाशवाणी विद्यावाणी रेडिओवर गायन केले ते साल 2016 चे होते तेव्हा साऱ्या महाराष्ट्रभर त्यांची कला या माध्यमातून ब्रॉडकास्टिंग झाली
नांदेड धी मिळाल्याने एप्रिल 2020 आली अखेरचा सामाजिक कार्यक्रम केला या 40 ते 45 वर्षांच्या कालावधीत कबीराच्या तत्वज्ञानाचे सखोल अभ्यास करताना त्यांनी सत्संग चर्चा भजनाचे आयोजन केले ठिकठिकाणी प्रवास केला त्यांचे स्नेही सूर्यभान साठे महाराज यांचे सोबत भजनी मंडळ उभी केली

त्यांची शाहिरीलेखन गझललेखन कवितालेखन मनोगतलेखन महामानवांच्या जयंती कार्यक्रमातील वैविध्यपूर्ण व्याख्यान- गायनाचे कार्यक्रम अत्यंत प्रभावी असत ते स्वतंत्र्य गायक वादक संगीतकार या अर्थाने गीत भजनांना चाली बसवायचे ते सादर करायचे संगीत त्यांच्या जीवात्मा होता यासाठी त्यांनी विविध कलाकारांची जुगलबंदी आजमावली बक्षीस सन्मान-पुरस्कार पात्र ते आयुष्यभर जगले
जीव अमुल्य आहे तो सांभाळला गेला पाहिजे म्हणून त्यांनी शील सत्य आचरण सदाचार नीतिमत्ता त्याची जाण प्रेम आदराची भावना सत्कर्म दुसऱ्या जीवाशी लळा प्राणिमात्रांवर आपुलकीची वागणूक आयुष्यभर जपली
अन्यायाच्या विरोधात एक वेळ भाकर खाल्ली नाही तरी चालेल पण लढत राहिले पाहिजे असे ते परखडपणे व्यक्त व्हायचे कर्ज करून घेऊ नका जीव दावणीला बांधला जातो कर्ज घेत जाऊ नका व्यसन करू नका असे केवळ ते म्हणत नसत तर त्यांनी आयुष्यभर कोणत्याही व्यसनाच्या आहारी स्वतःला बांधून ठेवले नाही
चार्वाकपासून बुद्ध कबीर तुकाराम संत गाडगेबाबा यांच्या जीवन तत्वज्ञानाचा आणि त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करत ते तत्वज्ञान वैज्ञानिक विचारजीवन आणि जीवनकृती व्यतीत करत होते
कुटे महाराज यांची शेवटची मैत्री त्यांनी देहू आळंदी नाशिक त्र्यंबकेश्वर पैठण आदी धार्मिक स्थळी घालवली बाबांचे वैचारिक तत्वज्ञानिक वैज्ञानिक सत्यतापूर्ण जीवनतत्व त्यांचे वारस दत्तात्रय पंडित विश्वनाथ रेखा नंदा मीना व या सगळ्यांची माय रत्नकला खंबीरपणे तत्वांशी जगत - जपत आहेत

बाबांच्या आयुष्यातील आठवणी
1. बालपण
2. शेळ्यांकडचे जीवन
3. गावकी
4. लग्न अन घरसंसार
5. कलेच्या फिरस्ती
6. बँड पथकातील भूमिका
7. सरपंच पदाची पंचवर्षी
8. सतसंगती
9. मैतृत्व
10. कबीर तत्वज्ञानाच्या शोधात
11. तथागतांच्या संदर्भात वाचन
12. अखेरचे बोल
★★★बालपण★★★
• सखाराम आज्या चालता बोलता वारले. अन्सामायच्या आयुष्यात डोंगर कोसळला. पिल्ले अभाळासारख्या मोकळ्या जगात आले. कारण बापासारखा जीव गेल्यानं त्यांच्या जमिनीवरचं आभाळ फाटलं.
• बैलगाडी घेऊन भाऊराया आला. अन्सा चाल घरी. इथं तू हं कोण राहिलं? नवरा नाही. सासरा नाही. चाल घरी. पोरं घेऊन. जिजाबाची माय म्हणे नका तिला नेऊ. राहील इथं. न्यावं हैं का नाही. राहील पोर इथं. आम्ही गावात कर्ते हैत का नाहीत. घास खाईल सुखानं राहील. राहुद्या. आम्ही पण माणसं हावोत. तहीपासून अन्सा राहिली ती मरेपर्यंत. चार पोरं आश्रूबा, लीला, साळू, अर्जुन, शिवाजी अन एकटीधाकटी अन्सा. असा संसार सुरू झाला. कधी माहेर कधी सासर. कोंबडीवाणी पोरं पखाखाली झाकत ती जगू लागली. पण हिंमतवाण. करारी, धाडसी अन सत्याने पक्के निर्णय घेणारी.
• उन्हाचा तळपता मास सुरू होता. अन्साबाईच्या पोटात कळा उकळू लागल्या. ईदर्भाच पिवळंजरद इखावानी ऊन.
• लीला नावाची बहीण- ताप आली, वारं वावधन, आंब्याचे पाड आंबे पडले, दोघे माय लेकरं येचु लागले, भुकेच्या आकांतात हे आंबे आंमृत होतं, झोळीतली पोरगी तापेने फन्फंत होती, आंबे गोळा केले, म लीलालं सरकारी दवाखान्यात नेलं, ती थंडी वाऱ्यात तापेने फन्फंत आंब्याखालीच मेली होती, दवाखान्यात आणली तव्हा तीचं शरीर आखडलं होतं. लीला तशीच झोळीत घालून आणली, एका झोळीत आंबे होते तर दुसऱ्या झोळीत निपचित मरून पडलेली लीला. बा लहान होता. मृत्यू अन भूक बा च्या मेंदूत रुतून बसली. या उन्हाळ्यात आंब्यालं आंबेच आले नाही. मोहोर नाही. जीवाची भूक पण नाही. त्या लोणारच्या पांदीत उभ्या दोन आंब्याखाली लीलाचा झुरून झालेला मृत्यू मात्र बा च्या नजरेपुढून जात नाही. ते दोन आंबे पाहून बा लीलाचा मृत्यू अन भूक या दोन घटनेचं कोडं उलगडत होते.
• नजरेसमोर असतात तितके रस्ते. जगायला चांगली वाट करावी.
• काळूश्या- घोडीला हराळ घे, बदल्यात दोन गव्हाच्या भाकरी अन चार फोडी आंब्याच्या खाराच्या. घोडी भाऊ दा मापारी यांची. उच्ची तडांग. निंदन करू नको, पुंजाने उचलू नको फक्त हराळी घे. गधलोळी.
• एकदा मना आजीच्या नवऱ्यानं भातकं अन पपई आणली होती. पपई आणली अन भूकेच्या भरात दोघा नवराबायकोनं ते खाल्लं. साळू अन काळूश्या दरवाज्यातच बसून होते. दोन लहान जीवांना वाटत होतं. आजी आज्या हाक मारतीलच. नंतर जाऊ पपई खायला. पण अजून घरातून हाक आली नव्हती. पपई खाऊन झाल्यावर मना आजी पपयाचे टकरं फेकायला टाट घेऊन वसरीत आली. त्त पाहती तो साळू अन काळूश्या वसरीत मुकाट्याने केविलवानी तोंड करून बसलाय. मना आजीनं टकरं फेकत उरावरच दोन्ही हात मारून घेतले. अन म्हणली, आव्व माय महे लेकरं दरुज्यातच बसले न माय. अन महं मडं काहून नाही गेलं. पपईचा यॉक घास ठेवला नाही माय म्या. आज्जी म्हनी ह्ये घे चार आणे अन दुकानातून गूळ घेऊन खा माँ.काळूश्या फार स्वाभिमानी स्वभावाचा म्हणाला, मया दारी हैं तुल ध्यानात कसं राहिलं नाही? आत्ता काय देती वं गूळ? मलं नाही खायचा गूळ अन फुळ.
• चाल साळू घरी. आता नाही काही काम ऐकायचं मना आजीचं. अन तिथून दोघे घरी निघून आले. सायंकाळी होत होती. मन आजी घरी आली. अन्सामाय घरी हैं का वं? हैं न ये मना. काय म्हणते माय? आवं आज बजारचं भातकं अन पपई आणली व्हती. भुकेच्या आकांतानं आम्ही दोघांनी ती सगळी खाऊन टाकली. भातकं खाल्लं. अन दरुज्यात येऊन पाहते तर काय? साळू अन काळूश्या खैम उभाच नं. माय मव्हा जीव राहायला नाही वं. म्हणलं, हं मडं काहून नाही गेलं. पपईचा यॉक घास ठेवला नाही माय म्या. ह्ये घे चार आणे अन दुकानातून गूळ घेऊन खा माँ.काळूश्या म्हणला, म्या दारी बसलो हैं तुल ध्यानात कसं राहिलं नाही? आत्ता काय देती वं गूळ? मलं नाही खायचा गूळ अन फुळ. पाह्य महा लै जीव हैं त्याच्यात त्यानं आसं बोलावं का तूच सांग. नाही राहिलं ध्यान. आं? भरभर बोलून मनातला मळ काढून मना आजी आली तशी गेली. पण मना आजीचा खैम शब्द अन्सा मायला लागला. तीलं वेगळं वाटलं. महे पोरं खैम उभे दारात हैंत तिच्या अन तिनं घासभर भातकं देलं नाही. तुल मी बाजारातून आणत नाही का भातकं? अन्सा माय साळू अन काळूश्यालं बोलू लागली. अन्सा माय आता लै रागानं तपली होती. तिने काळूश्याच्या पाठाडात धप्पाटा घातला. तशी साळू हलू लागली. साळूला पण अन्सा माय मारू लागली. दोघांना मारून अन्सा माय घरात गेली. घरात अंधार व्हता. इकडं बाहेर दोघे ढसाढसा रडू लागले. आतून कोण रडतंय म्हणून काळूश्या शांत झाला. आवाजानं त्यो आत गेला. अन्सा माय दोरणीत उभी राहून हुंदके देत व्हती.
• पाथत मटणाचे गठुडे - लिंबादाची गॅंग, भाव मापाऱ्याच्या वावरात, उभे बैल ढोरं कापून , मटणाचे गोळे पाथत, गोरगरिबांना पोटभर घासाची सोय.
★★★लग्न घरसंसार★★★
• दातीचं वळण, हातीचं वळण, छातीचं वळण, लातीचं वळण. वळणं खोली अन मापं यावर ठरत. दाती म्हणजे नुसते दातरे सळायचे. कुठं मूठ वळणाला दात फुटला की साळला. दात गाळला की भरला. साळवट जारवट काढलं की दाती झाली म्हून तयार.दाती सगळ्यात निबरट. कुंधा, फुस्यां, डोल्या, केन्या, कुरळ्या, झेल्या, मदानी, कोरक्या गवत दातीत असतं.
• धायडे गुरुजीकडून त्यांच्या पगारीचं पुडकं आणून अन्सामायच्या अंगाखाली अथरलेल्या गोधडीखाली ठेवलं. मग मायनं ते पैसे बाबांच्या हाती दिले. म्हणी, माय अर्जुना तुलं वळखलंच नाही रे म्या. पण एक ऐक इथून पुढे तुहं चांगलं व्हईल. अन्सामाय अथुरणात खिळून होती. नजरेने दिसत नव्हतं. भीत आंधळी ती झाली होती. पायानं लुळी झाली होती. तिच्या लहाण्या लेकाकडं - अर्जुनाकडं ती होती.
• हंबर तळ्याहून काम झाल्यावर धारेवर अंघोळ. कॉन्ह्या गावचे पाव्हने लोणार धारातीर्थी पहायला आले. एक मुलगी पाहता पाहता भ्ररर खाली पडली. बाबा अंघोळ करत होते. ती मुलगी हाताने धरली. त्या मुलीचे माय बाप रडू लागले. जीव वाचवला. त्यांनी पैसे देऊ केले. पण ते बाबांनी घेतले नाही. जीव वाचवला हाच मोठा आंनद होता.
• चारण्याचे फुटाणे खावे. मग बाजार आजचा. अन्सामायला भातकं. पोराला भातकं.
• तू काहून खोऱ्यानं खंदतू? तिकास कुठंय तुह्या हाताची? साहेब बोलला.
• हंबर तळं आता पाझरू लागलं होतं. भिजका चिखोल तिकासीलं लागू लागला. तिकास भेंडाळली. खोरे टोपले वल्लयामातीनं भरूचरू लागले. आता हंबर तळं फोडायचं काम बंद होणार होतं. पुढं काय?
• सुरत गुजरात कापड मिल, विहरित पडली. बा ने विहिरीत उडी मारून हाताला धरून वर काढलं. बाजेवर विहिरीबाहेर काढली. लक्ष्मण साठे सोबत होते मास्टरचे भाऊ.
★★★ कलेच्या फिरस्ती★★★
बिलालसेठ काशीवाले
नाझर सुरत
रझाकसेठ खान्देश
हुसेन भाई वरणगाव
लख्खासेठ मुंबई
फक्रु विदर्भ
★★★मैतृत्वस्नेह★★★
• अन्सामाय
• प्रल्हादमामा
• लक्ष्मणमामा
•कोकाटेमामा
• गुप्तचर विभागातले अधिकारी काका
• वसंता
• सायबा
• श्रावणदा
• श्रावणदाचा भाऊ मास्तर
• ज्ञानेश्वर महाराज
• कुकाजी महाराज
• भांजी तात्या
• गोविंद मिस्त्री
• धायडे गुरू
• लक्ष्मण साठे
• हेमंत जोशी- लता दिदींच्या गावचे
• सका मास्तर
• सूर्यभान महाराज
• साहेबराव जाधव उकळा सुकळी
• घाळीन माय
• सारंगपुरचे पेटीवादक भगवान
• कुंगाबाय
• फक्रु
• कुटे मामा
★★★तथागतांच्या संदर्भात वाचन★★★
• झाड चळत नाही. झाडाला धरून रडावं. निगरगट्ट झाड खंबीरपणे उभं असतं. किती मजबूत आधार असतो हा. मरणमर्तूक झाली की, नातेवाईक सगळे निघून जातात. सगळे आपापल्या आयुष्याचे धनी न ते. रममाण असतात जीवनात त्यांच्या ते. त्यांनी का थांबावं? झाडं मात्र घठ्ठमिठी मारली तरी ते धाडधुड उभीच असतात. डगमगत नाहीत. खचत नाहीत. पडत नाहीत. वाकत नाहीत. मुरगळुन पडत नाहीत. आतला खंबीरपणा सोडत नाहीत. झाडांच्या दुःखाचं मूळ खोलवर रुजलेलं असतं. माणसांच्या दुःखाचं काय? म्हणजे इतर सगळे दुःखात काही दी सहभागी असतात. काळ लोटला की, सगळे एकामागून एकेक हरपून जातात जणू. दुःख राहतं का कुणासाठी थांबून? दुःख ठाण मांडून बसतं का? दुःख घर धरून बसतं का? सगळी दुःख मात्र घरांच्याच पाठीमागे लागलेली असतात. आणि म्हणून दुःख कुणाला नाही इथं? बिनदुःखाची माती द्या सापडून. जणू घरं दुःखानं सारवलेली असतात. एक सांगू, "काळ सगळं पचवतो. पण मानसं का चळतात काळावर?"
★★★बाबा लै गोष्टी सांगायचे★★★
1. न्यारळबनी
2. मुद्रुकामाय(मुंदी अन शपथ-लग्न)
3. आशा रे केशनाश्या
4. डव्हातल्या म्हशी-सौदा डव्हातला
5. घर गेले बयाचे
6. खोकड
7. भाकर अन वांगं गुरुमाय सांगं
8. समझो वा को समझा दो नहीं तो दो धक्के और दो- चिखलातला हल्या(भाऊ मापारी)
9. याद हैं तो आबाद हैं वरणा बरबाद हैं(लक्ष्यांश अन प्रगतीच्या दिशा)
10. नाही पहिला धारा धुरा निंघाला दुपारा- हिंदू मुस्लिम लग्न
11. उड जा पंछि मर जा पंछि(संसारी अन गृहस्थी तत्व)
12. मगर अन माकड(काळीज)
13. कल का हाँसुं(दो गधे और साधू)
14. धामण खोपा खाय त्याचा मळा कुठं हाय?
15. बही तो बही मेरी टेक तो रही
16. होंड्याचं काहून मी लांडयाचं धरीन(पाटील पाटलीन)
17. धनी न धोऱ्या केल्या हुशाऱ्या
18. दम हैं तो बडी चीज हैं(सूनेचं म्हातारं अन नातू)

*यावर लिखाण सुरू
-रत्नार्जुनसुत-
-विश्वनाथ अर्जुनराव साठे 9921056462

Comments
Post a Comment