★★★जंत्रीतलं ग्यान★★★
[भाग-चार]


बासरी वाजवायची लहानपनापसून आवड हैं. आत्ता सिकायलं बासरी हाती घेतली ती पन स्वतः बनव्लेली. बासरी शिकू लाग्लो त्त कळ्तंय की, आय्कायलं जित्कं गोड वाटतंय तित्कं हे वाद्य सोप्पं नाही. आधी 'दमधीरसास' राखून ठेवाव. फुक अन बोटानं बासरीच्या दाबऱ्या काठोकाठ बंद कराव या दोन खुब्या आल्या पाह्यजे. ही खुबी आली की, फुक एकसारखी ठेवत ज्यो सूर वाजव्ला जातोय, त्योच सूर ढंगानं वाजवत ठेवनं त्याच्याहून आव्घड काम हाये हे समजाय्लं लाग्लं. फुक पिच धरून ठेवणं अन दाबऱ्या काठोकाठ बंद करुन ठेवणं जमलं की खरोखाट अप्ली बासरी तंतोतंत बसली की नाही हे समजतं ?

निशिदीन रियाज केलं की, हे सगळं उमगून येत राह्यतं. कधी कधी त्त फुक अन दाबऱ्या यातलं आंतर, सूर, व्येग, लै कळली की, नांद झुळुकेसारखा लईत तग धरून बहरतो.

बासरीची ठेवन कशी हैं यावर बासरीचा बाज ठरत आस्तो. बासरीच्या लांबीरुंद्या ह्या सुरात सुरावळ वळवीत राह्यतात. बासरीची आखंड गोलाई गोडवा आनत कानालं तित्कीच काळजालं पल्हाळधुंद करते.

काळजातून इच्यार येतात. बासरी होटावर धर्ली की,
"फुंक मारताना बासरीच्या मुखरीवर होट कुठं ठेवाय्चे?"
"फु़क कशी माराय्ची अन किती जोरानं मारायची?"
"दाबऱ्या अन काठोकाठ बोट ठेवाय्ची रीतभात जमली पाह्यजे."
कैकदा प्रश्न उत्तर सापडवत जातात. प्रश्नात पडलं पाह्यजे. उत्तर आस्तातच न.

क्रमशः-
विश्वनाथ साठे[9921056462]

Comments

Popular posts from this blog