★★★जंत्रीतलं ग्यान★★★
[भाग-तीन]
पाय्पाचा तुकडा हातात हाय. आता या पाय्पाची बासरी तयार कराय्ची हाय. बासरी वाजाय्लं गोड अन सुरात निपजाय्ची आसल त्त मुखरी आधी कोरून घ्याव लाग्ती.
जिथून होट काठावर थांबून स्वासाची हाल्कीच फुक लाव्तात. ही फुक दमदार अन वाहती आस्ती. म्हून सूर आचळ अन काठोकाठ भर्लेला ऐकू यतो. पहिल्या सुरेबिना मुखरी कोरून घेतली की, आरंकळी, मधले बोट, अन चाफेकळी हे तीन डाव्व्या हाताच्या अन तसेच उज्व्या हाताच्या दाबऱ्या कोराव लाग्तात. आधी मुखरी काहून कोराव? तुम्ही सगळे सहजगत्या प्रश्नाच्या जंज्वाळात पडसाल, की ही मुखरी, दाबऱ्या, त्याचे येगयेगळे नावं कस्सेक्काय हायेत?

हेप्पा सोप्पं हैं...जिथं तोंड थांबून होटानं फुक पहिल्या कोराळीत फुकली ते ठिकाण, ते तोंडाकडंचं पहिलं सिद्र्र म्हंजे मुखरी.

अन जिथं डाव्व्या उज्व्या हाताचे तीन तीन बोटं अंगठा अन करंगळू सोडून कोराळीवर काठोकाठ दाबलेले आस्तात ती सगळी कोराळीची ठिकाणं म्हंजे दाबऱ्या.

मुखरीलंं मुखरंध्र पन म्हंतात.

ह्या दाबऱ्यांना शास्त्रीय संगीतात नावं हैतं. कोन्ही त्यालं
"धैवत, निषाद आणि षड्ज, रिषभ, गंधार आणि मध्यमा" म्हंतात त्त कोन्ही "रे, ग, म, प, ध, नि," अन मुखरीला सा आस्सं म्हंतात त्त कोन्ही "आचळ, नितळ, सपळ" म्हंतात. ज्यालं जे सोप्पं वाट्टतंय ते त्याहिनं म्हणाव ब्वॉ आपुन क्काय सांगाव बरं शाह्यन्यावानी?

क्रमशः-
विश्वनाथ साठे[9921056462]

Comments

Popular posts from this blog