★★★जंत्रीतलं ग्यान★★★
            [भाग-दोन]
बार्दान्यातल्या निवडक वस्तूंकडं महं ध्यान गेलं. आडवा पडलेला ढवळाबक्क पाय्पाचा तुकडा नदरत भर्ला. एखांदी चीजवस्तू नदरत पडली की, ती उपेगी येती हे कारागिरालं आक्षी ध्यानात बसतं. म्या लगेच बोललो,
"व्हईल ह्याची बासरी व्हईल हो बा!"
"कर मंग...त्यात उशीर काहून कराव.चांगला इच्यार डोस्क्यात आला की, लगेच त्यालं सत्यात उतराव.उशीर करू नाही!"बा म्हणले.
"हं...!" म्या हुंकार सोडला.
पाय्पाचा तुकडा हाती घेऊन न्याहाळलं. बाक तपासून घेतला. नदरेनंच लांबी रुंदी मोजली.पाय्पाची गोलाई टळटळ होती. गोलाईचा नांद घुमेर राह्यतो. गोलाई आवाजात वळणं आणून गोडाई साधते. पन लगेच प्रश्न पडला की,
"याचा मापगुण्या घ्याव लागल. आंतर जोखून टाकू. अन आंतर कश्यानं मोजाव?
"मापनी हैं का?"
लांबीरुंद्या हाब्कवू. फुक बसवावी लागल.
"फुक कशी ठेवाव?"
"चुच काढाव लागल. चुच तासायल निपरी हैं का?"
"ती कोन्त्या डब्यात ठेवली आसल?"
या इच्यारात एक इच्यार गवसला. पिच बसली की, नांद धुमार फुटत चालतो. सूर लईत निंघ्तो. आवाजाची बहार फुलून येते. संगीत इथं सुगंधित बनतं. तुम्ही सगळे म्हना,
"संगीत कुठं सुगंधित होतंय क्का?"
"त्याची कधी बहार आस्ते तरी क्का?"
सांगतो, सगळं सांगतो. काळ त्त जाऊद्या. काळावर सगळं सांगता येतं. काळ गेला की, सगळं पिकून येतं.

क्रमशः-
विश्वनाथ साठे[9921056462]

Comments

Popular posts from this blog