★★★जंत्रीतलं ग्यान★★★
[भाग-एक]

हं तर बार्दाना म्हंजे क्काय? असा प्रश्न पडला आसल तुम्हालं.
बार्दाना म्हंजे प्रयोगाचं सामानसुमान. नाना वस्तूचीजांनी भरलेलं साहित्य. सुईपसून त्त नाड्यापर्यंत अन सोनलईपसून लोखंडपर्यंत, रबरापसून त्त चिनीमातीच्या खापरापर्यंत, पलास्टिकच्या वस्तूपसून त्त जर्मलच्या चीजांचं सामानसुमान. बिघाडबाघाडीचं अन उखळापाखळीचं साहित्य. तोडफोडीचं अन जोडाजाडीचं सामानसुमान हैं त्यात. कित्ती क्काय क्काय सांगू तुम्हालं?

घरात उजेडाचं ठिकाण ते मही प्रयोगशाळाच. उजेड नस्ला की बार्दान्यातली आग्या मव्हळाचं मेन गाळून तयार केलेली घरेलू मेनबत्ती पेटवाय्ची त्या उजेडात प्रयोगाचं बस्तान. ह्या प्रयोगाचं बस्तान बसलं की, ना भूक लागत ना तहान. ना कोन्ती चिंता ना वखवख. ना वेदनेच्या जानीवा. कैकक्काळ मांडी घालून प्रयोग जोडतजाडत बसलं की, पायपोट्रीच्या शिरादोरा पिळून निंघ्तात, त्या शिरेतून लव निघून तारं गरम होतात. पन प्रयोगावरचं ध्यान हटत नाही.

काल सहज बा म्हणले, या पाईपची बासरी करता येईल. मजबूत हैं.
म्या म्हणलो,"कोन्त्या?"
या तुह्या बार्दान्यातल्या पाईपाची. बा बोट बार्दान्याकडं फिरवत म्हणले.

क्रमशः-
विश्वनाथ साठे[9921056462]

Comments

Popular posts from this blog