★★लढा नामांतरातील अस्तित्वांचा★★★

"उनका आना उनके जिंदगी में आग़ाज हैं
उनका जाना उनके जिंद़गी के मौत का वजुद...!"

कॉम्रेड़ उनके जिंद़गी में क्रांती की लहुलुहानगुंज लाता हैं...

सामाजिक परिप्रेक्ष्यात काही विध्वंसक घटना घडत होत्या त्यात पोचिराम ठळकपणे दिसत होता. नामांतराच्या चळवळीत "हुंकार" देणाऱ्या पोचिरामाची आठवण होते...ती अशी

"अरे त्याधीही तू मुक्त होतास
मोकळेचाकळे आभाळ न्याहाळणारा
आपल्याच पंखावर होता विस्वास ठेवत
आपल्याच हक्काच्या स्वाभिमानी भराऱ्या मारायला
कुठल्या हिर्वळीने खेचून घेतले नाही
ना कधी सखोल जलाशयाच्या व्याकुळतेने
तृप्त होतास
मुक्त होतास.....
तुझ्याच लालसेने घेघाट्या मारल्या कैक तू
अन झाला अस्थीपिंजर हिनकुला झिजत,कुजत
पराचे पांगुळलेले लुळेपण झेलत
आता याचना,दुःख,क्लांत पोखरून बसलाय
मोडून गेलेल्या पोकळ हाडकासारखा
तू दम जिरला म्हणालास अन दम जिरला इथेच
इथेच सगळ्या विश्वाने सोडला पसारा
तू सारं जिरवलं
सारं सारं.....
अन घेतले गलितगात्र हाती
ठिपक्यासारखा काळाच्या आभाळातून पडतांना
मोकळ्या जाणिवेसह हुंकार टाकतांना.....!"

पोचिरामचा हुंकार हा नव्या पिढीला प्रेरणादायी आहे हे विसरता कामा नये.

1970 च्या दशकात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ सुरू होती. त्या काळात वेगवेगळी आंदोलने झाली. युद्ध झालं. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. राज्यात काँग्रेसची सत्ता गेली पुन्हा आली आणि गोष्टी घडल्या. याच दशकात मराठवाड्यात एक महत्त्वाचा मुद्दा धगधगत होता. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खास नातं पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मिलिंद कॉलेज यांच्यासारख्या संस्थांवर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या. आणि त्यात तरुणांचा वाटा होता. यामुळे हैदराबादवरचे अवलंबित्व कमी झालं.

1970 च्या दशकात राज्यात दलित चळवळीचे एक नवी राजकीय, शैक्षणिक, दलित समाजाला उभारणी आणणारी भूमिका घ्यायला लावणारे वातावरण
मराठवाड्याला आंबेडकरांच्या विचार व कृतीमुळे कृतज्ञता म्हणून विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिले जावे अशी मागणी या काळात जोर धरू लागली.

नामांतराचा लढा जवळपास दीड दशकात आला. आणि 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला. या वादावर पडदा पडला.

या 1974 च्या जून महिन्यात नामांतराची मागणी केली. मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाने. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पत्र लिहून मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी केली. तीन वर्षानंतर 1977 साली नामकरण करणे, सार्वजनिक रित्या मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या अशी मागणी केली.

दलित पँथरच्या या मागणीनंतर लगेच औरंगाबाद मध्ये सर्वपक्षीय विद्यार्थी आणि युवक संघटनांनी एकत्र येत एका विद्यार्थी कृती समितीची स्थापनाहीझाली. या समितीने मोर्चे काढले. कॉलेज बंद आंदोलन केली. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रकारे आपल्या मागणीसाठी त्यांनी पाठिंबा गोळा करायला सुरुवात केली. मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारिणीत सुद्धा 1977 साली नामांतराचा ठरावाला पाठिंबा देणारा प्रस्ताव एक मुखाने मान्य केले. पण या काळात इतरही काही मागण्या पुढे यायला लागल्या.

मराठवाडा विद्यापीठाला मौलाना आझाद यांचे नाव देण्याची मागणी झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव द्या अशी मागणी पुढे आली. दुसरीकडे नामांतराला विरोध करणाऱ्या लोकांचा जोर सुद्धा वाढत होता. नामांतर विरोधी विद्यार्थ्यांनी सुद्धा मोर्चे काढले. विद्यार्थी कृती समितीने महाराष्ट्र शासनाची प्रेतयात्रा सुद्धा काढली. मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नामांतराला पाठिंबा देणारे आणि नामांतराला विरोध करणारे असे आक्रमक सामाजिक वास्तव होते.

मोर्चे सभा या सगळ्याला आक्रमक होते.हे सगळं सुरू असताना इकडे मुंबईत विपरीत घडत होतं.इंदिरा काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या संयुक्त सरकारचे नेते म्हणून वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री होते. पण या सरकारमध्ये सुद्धा अनेक कुरबुरी सुरू होत्या. मराठवाड्यात आंदोलन तापत असताना मुख्यमंत्र्यांनी नामांतराच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काही नेत्यांना मराठवाड्यातला मुंबईत येण्याचा निमंत्रण दिलं. या बैठकीला गंगाधर गाडे, गोविंद्भाई श्रॉफ, प्रीतमकुमार शेगावकर, बजरंगलाल शर्मा यांच्यासारखे नेते होते.

महिना संपेपर्यंत मराठवाड्यात दोन्ही बाजूंनी जोरदार निदर्शने झाली. मोर्चे झाली. पुढच्या महिन्यात राज्यात नेतृत्वाचा शरद पवार आपल्या समर्थक आमदारांचा गट येऊन वसंतदादा सरकारमधून बाहेर पडले. वसंतदादा पाटलांच्या सरकार उण्यापुऱ्या दोन वर्षात विघटन घडल्या. मार्च महिन्यात सत्तेवर आलेल्या शरद पवार यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला. जुलै महिन्यात "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असा नामांतराचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत करून घेतला.

27 जुलै 1978 महाराष्ट्रात संमत झाला खरा पण त्यानंतर मराठवाड्याने पाहिला तो अभुतपुर्व हिंसाचार. यात या काळात मराठवाड्यात प्रतिक्रिया उमटली जातीय दंगलींच्या मालमत्तेची. जाळपोळ झाली. महिलांवर अत्याचाराच्या घटना सुद्धा घडल्या. नामांतराला विरोध हा अनेक स्तरांमध्ये होता. त्याला जातीय रंग भरत होता. नामांतराला विरोध झाला.

दलित पँथरच्या एका गटाकडून सुद्धा अरुण कांबळे यांनी निर्भेळ नामांतर झालं नाही म्हणून या ठरावाचा नामांतराचा निर्णय योग्य नाही असं मत केलं. नंतर मराठवाड्यात हा संघर्ष जवळपास दीड तीन वर्षांचा हिंसाचार घडत होता.

1990च्या दशकात या दशकाच्या सुरुवातीला शरद पवार केंद्रात पुन्हा महाराष्ट्रात आले. पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1993 खाली राज्याची सूत्र हातात घेतलेल्या पवारांनी 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार ठराव प्रत्यक्षात आणला. आठवून बघा 1978 साली पहिल्यांदा संमत झालेला हा ठराव प्रत्यक्षात यायला तब्बल सोळा वर्षांनी वेळ खर्ची गेला.

आज 14 जानेवारी हा दिवस आज सुद्धा अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात नामविस्तार दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार या संदर्भात आणखी सविस्तर व या मागील कारणांचा शोध घेत मुळात हे आंदोलन उभं राहिलं ते राजकीय, सामाजिक, जातीय, धार्मिक, संदर्भ काय होते यासाठी बाबतीत आपण दरवर्षी अभ्यासणार आहोत.

-विश्वनाथ साठे [9921056452]
टीप- लेखात काही त्रुटी, आक्षेप, दुरुस्त्या असतील तर बिनदिक्कतपणे कळवा!

Comments

Popular posts from this blog