"संरक्षणाची नीती समजून घेणे काळाची गरज आहे!"

राष्ट्रांतर्गत अशांतता व राजद्रोही वा घातपाती कारवाया यांमुळे समाजव्यवस्था विस्कळीत होऊन शासनावरील नागरिकांचा विश्वास डळमळू लागतो आणि शासनाच्या स्थैर्यांवर म्हणजेच पर्यायाने राज्यकर्त्यावर नागरी संरक्षण ज्यावेळी अवलंबून असते आशा आणीबाणीच्या काळात व युद्धकाळात नागरी परिस्थितीचे वास्तव ज्ञान शासनकर्त्यास असले पाहिजे, तसेच राज्यकर्त्याचे निर्णय नागरिकांना समजले पाहिजेत. पहिल्या महायुद्धात जर्मनीने ब्रिटनवर बाँबहल्ले करून नागरिकांच्या घरापर्यंत लढाई आणली. त्यामुळे रणांगणावर लढाई केल्याने नागरी संरक्षण होते, हा भ्रम दूर झाला.

साल १९२१ ते १९२६ या काळात कामगारांनी व पोलिसांनी संप करून समाजजीवन विस्कळित केले. या घटनांपासून बोध घेऊन १९३३ साली ब्रिटनमध्ये नागरी संरक्षण व ⇨ होमगार्ड संघटना अस्तित्वात आल्या. भारतात मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रतिबंधक स्वरूपाच्या नागरी संरक्षणव्यवस्थेस चालना मिळाली. रशियात, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन सैन्याच्या हालचालींत अडथळे आणण्यासाठी रशियन नागरिकांनी गनिमी काव्याचा अवलंब केला.

जर्मनव्याप्त, नेदर्लंड्सचा भाग व फ्रान्स येथील नागरिकांनी प्रतिरोधक कारवाया करून जर्मन आक्रमकांना उसंत घेऊ दिली नाही. अठराव्या शतकापासून वेळोवेळी उद्‍भवलेल्या बाह्य आक्रमणांच्या आणि देशांतर्गत बंडाळ्यांच्या वेगवेगळ्या अनुभवांवरून आधुनिक नागरी संरक्षणव्यवस्था उत्क्रांत होत गेली. अण्वस्त्रांच्या महाविध्वंसक शक्तीमुळे आणि दीर्घकालीन किरणोत्सर्ग प्रदूषणामुळे नागरी संरक्षण हे फार गुंतागुंतीचे व खर्चिक झाले आहे.

कालच्या अणुयुगात शांतताकाळात प्रत्येक नागरिकाला वैद्यकीय प्रथमोपचाराचे शिक्षण देणे आवश्यक होते. आज विषाणू आणि किरणोत्सर्गाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे उपाय योजावे लागतील. उद्योगधंदे व नागरी वस्तीचे स्थलांतर करणे भूमिगत आणि डोंगरी आश्रयस्थाने उभारणे (चीनमध्ये सु. १२,००० किमी. लांबीच्या गुहा तयार केल्या आहेत व तेल साठविण्यासाठी भूमिगत भांडारे तयार करण्यात येत आहेत.) अणुबाँबच्या स्फोटामुळे उत्पन्न होणारा आघात, किरणोत्सर्ग, उष्णता इत्यादींपासून सुरक्षित जीवनपद्धती बहाल करणे.

कोरोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील याविषयावर चर्चा करण्यासाठी तात्काळ बैठक बोलावली आहे. कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करावी का, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. संसर्गाची सुरुवात चीनमधल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणुचा फैलाव चीनमध्यल्या इतर शहरात आणि चीनबाहेरही झालेला आहे. थायलंड, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. वुहान शहरातून आलेले लोक कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता जास्त आहे.वुहान येथील प्रयोगशाळेत लपून-छपून सुरू असलेल्या जैविक अस्त्र संशोधन आतूनच कोरणा विषाणूचा जन्म झाला असावा आणि अपघाताने तो प्रयोगशाळामधून बाहेर पडला आणि आता तो जगाला ग्रस्त करत आहे.

1990 पासून जागतिक नागरी संरक्षण हा दिवस साजरा केला जातो. International Civil Defence Organisation च्या जनरल असेम्ब्लीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. १९७२ मध्ये आंतर-सरकारी संघटना म्हणून आयसीडीओ संविधानाच्या अंमलबजावणीसाठी हा दिवस साजरा केला जातो. नागरी संरक्षण म्हणजे देशाच्या, राज्याच्या नागरिकांना हल्ल्यांपासून, मोठ्या संकटांपासून आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचावणे. देशाच्या आणि राज्याच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अर्धसैनिक दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल कार्यरत असतात.या दिवसानिमित्त दरवर्षी एक थीम ठरवलेली असते आणि यावर्षीची थीम ही - 'मुलांची सुरक्षा, आपली जबाबदारी' अशी आहे. आपणही सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता वाढवूया, स्वतःचे संरक्षण, बचाव कार्य करूया आणि संकटसमयी सवयंसेवक बनून देशाचे नागरिकत्व बजावुया!

अर्थाअर्थी "संरक्षणाची नीती समजून घेणे काळाची गरज आहे!" आजच्या काळात शस्त्र आणि त्याचा वापर व मानवी जीवनविषयक धोरणांची बाजू नागरी संरक्षित भूमिकेला न्याय ठरली पाहिजे तरच संरक्षण नीती उद्याच्या समाजासमोर ठेवता येईल. असेही काही काळ आधी सीरियामध्ये असद राजवटीविरोधात ते अल कायदाच्या असदविरोधी बंडखोर आणि अल कायदा एकत्र लढले असल्याची कबुली दिली. सीरियाने इराणसोबत संरक्षण परस्परसहकार्य करारही केला आहे आणि आपल्या प्रदेशामध्ये रशियन तळाला परवानगीही दिली आहे. आपल्या ऐक्याचे प्रदर्शन केले होते, यामुळे कदाचित हा देश अखेर आणखी एका प्रदीर्घ नागरी युद्धामध्ये खेचला जाऊ शकतो. अशा पर्श्वभूमीवर जागतिक संरक्षण संकल्पना व तिची व्याप्ती समजून घेता येईल. याचाच अर्थ व्यक्तीचे जीवन,
स्वातंत्र्य, समानता आणि सन्मानाशी संबंधित हक्क, जे घटनेद्वारे हमी आहेत किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये सामील आहेत आणि भारतातील न्यायालयांनी अंमलात आणू शकतात. व्यक्तीचे जीवन व व्यव्स्थेसंदर्भी संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी संरक्षण अतिशय मूलभूत मानले जाते. हे संरक्षण हक्क मानवी शारीर तसेच अस्तित्वाचा अंतर्निष्ठ सन्मान आणि जाणीव मानवाला बहाल करतात.

-विश्वनाथ साठे[9921056462]








Comments

Popular posts from this blog