"कश्मीरी युवक मुख्य प्रवाहात आल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल"
उप महानिरीक्षक बिरेंद्रकुमार टोप्पो ( सीआरपीएफ )
केंद्रीय सुरक्षा बल गृह मंत्रालय आणि युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरात नेहरू युवा केंद्र पुणे तर्फे काश्मिरी युवा आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचा भाग म्हणून आज दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी तळेगाव येथील सीआरपीएफ कॅम्प पश्चिम विभागाचे महासंचालक माननीय संजय लाटकर व उपमहानिरीक्षक माननीय वीरेंद्रकुमार टोप्पो यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मिरी युवकांनी भेट दिली. भेटीदरम्यान मनोरंजनासाठी राष्ट्रीय एकता, सांप्रदायिक सद्भाव, देशभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात जम्मू काश्मीर राज्यातील अनंतनाग, कुपवाडा,बारामुल्ला,बडगाम, श्रीनगर, पुलवामा या जिल्ह्यातून 130 युवक-युवती सहभागी झाले होते.यात सांस्कृतिक कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जम्मू काश्मीर खोऱ्यातील तरुणांचे विविध लष्करी व निमलष्करी धोरण व जवानांबरोबर असलेले नाते वृद्धिंगत व्हावे, तसेच त्यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि कलेची ओळख करून देऊन त्यांच्याशी एकरूप करणे आणि मुख्य प्रवाहात आणि असा आहे.
कार्यक्रमादरम्यान त्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये मिळून देण्यासाठी नेहरू युवा केंद्र पुणे विशेष प्रयत्न असते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात सीआरपीएफ पुणे केंद्राचे उपमहानिरीक्षक माननीय बिरेंद्रकुमार टोप्पो यांनी असे म्हटले की, "काश्मीरमधील आपल्या सेवेत व गतकालीन आठवणीने जिद्द, चिकाटी, कौशल्य याचे विशेष गुण लाभलेले आयुष्य मी कश्मीरला जगलो आहे. काश्मीरमध्ये विविध उपलब्ध संधीचा त्यावेळेस त्यांनी केला त्याबरोबर त्यांनी समाजामध्ये आणि काही समाजविघातक शक्तींकडून पसरणारे समजुतीवर विश्वास न ठेवता विकासाच्या प्रवाहातून येण्याचे आवाहन केले." तसेच त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा विकासाचे माध्यम म्हणून त्याचा सरकारांना उपयोग करावा असा सल्ला दिला. आपल्या भाषणाने त्यांनी काश्मीरमध्ये शांतता टिकवून ठेवण्यात काश्मीर आवश्यकता स्पष्ट केली. नेहरू युवा केंद्र राज्य संचालक ज्योती मोहिते मॅडम यांनी मनोगतात काश्मीर आणि भागातील भारतातील समस्या समजवण्यासाठी "वतन को जानों" या अभियानाचे महत्त्व विषद केले. तसेच युवक आणि एकूणच समाज घडणीसाठी नेहरू युवा केंद्र संघटन तर्फे निलांबरी कलाकेंद्र बहादरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लावणी आदिवासी नृत्य या सारख्या लोककला यांमधील अनुभवांना जवानांच्या तसेच शाळकरी मुलांच्या विविध घटकांना सांधले.महेश सोनवणे, सातारा दर्शन सोलापूरकर, सोलापूर सागर रोकडे पिंपरी-चिंचवड, योगिनी चोरडिया, सांगली तर जम्मू-काश्मीरचे युवक कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
देशाच्या संरक्षणासाठी असलेली सीआरपीएफची भूमिका तळेगाव केलेले आणि त्यांचे भव्य स्वागत जम्मू-काश्मीर प्रतीक असलेले प्रेम जाणून बघितल्यावर काश्मीर लोकांची मने भरून गेली व त्यांनी सीआरपीएफचे विशेष आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे आणि ज्योती मोहिते मॅडम, सीआरपीएफ पुणे केंद्राचे मानद केंद्र-राज्य उपसंचालक शरद साळुंखे, सीआरपीएफ संजीव कुमार उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मा. यशवंत मानखेडकर, रोटरी क्लब जिल्हा युवा कार्यकारिणी सदस्य रसिका कुलकर्णी तसेच राज्य व जिल्हा पातळीवर विविध अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले आहे.
- विश्वनाथ साठे[9921056462]

Comments
Post a Comment