तारीख तीन. तर सांगायचं झालं. झोपायला जाण्यापूर्वी सुशील म्हणाला उद्या सकाळीच प्रशिक्षण आवाराच्या बाहेर फिरायला जायचं.
बरं जाऊ. सकाळी पाच साडे पाचला उठवतो.
हो. करा फोन.

अन तो गेला. सुशील बोरीवलीचा.त्याची पहिली भेट बारामतीला नेहरू युवा केंद्र तालुका युवा स्वयंसेवक प्रशिक्षणात झाली होती. जिवलग होऊन बसला.प्रेमळ स्वभाव आजही आहे तसाच आहे.

साडे पाच वाजले असतील.उठलो. शुशीलला कॉल केला.तो तयारी करत होता.मी फ्रेश होऊन निघालो. तो हीआला. चालत चालत आम्ही तीन किमी गेलो.

सातपूर हा परिसर कामगार वस्तीचा परिसर. नाशिक शहर आता कामगार वसाहतीच्या लपेटात आलंय. नवा आयाम नासिकात उभा राहतोय. कामगार घाम घालून पळतोय, राबतोय, त्याला सकाळ दिसत नाही ना दुपार... ना त्याला सायंकाळ समजत ना रात्र. सगळ्या काळात त्याच्या पाळ्या असतात. तो सायकलवर येतो. स्कुती, मोटरसायकल येतो. कुणी रिक्षात सवरीवर तर कुणी पैसे नाहीत म्हणून पायीच प्रवासात.

रंगाने रापलेले कातलेले चेहरे रस्त्याने सकाळी सकाळी नजरेत पडत होते. काही परपरांतीय होते. काही नाशिक शहराला लागून असलेल्या खेड्यापाड्यात राहणारी मंडळी. गावकुसाच्या खुना त्यांच्या चेऱ्यावर अन वागण्यावर झळकत होत्या. कुणाच्या सायकलीला भाकर बांधलेली तर कुणाच्या हातात टिफिनचा स्टीलडबा.

थंडीचे दिवस असल्याने कुणी कानटापरी बांधलेली, सूटर करकच्च बांधलेलं. मफलर अवळलेली. असं सगळं हे कामगारांच्या जीवनाचं अस्तित्व नजरेत भरते होतं.

आम्ही प्रशिक्षणाला आलो होतो. समाजपरिवर्तन आणि प्रबोधन, स्त्री समस्यांवर रोज समजून घेत होतो.

आज पहिल्या सत्रात कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अन्याय व लैंगिक शोषणाच्या प्रतिबंधक कायद्याच्या विषयावर माहिती मिळाली. स्त्री प्रहन आणि तारादूत अशी आजची विषय समीक्षा. महिलांचा आदर आणि सामाजिक समता, कामगार हक्क अधिकार आणि जाणीवजागृती याबाबतीत नव्याने ऐकायला मिळालं.

दुसऱ्या सत्रात मानवी हक्काधिकर या विषयावर परिसंवाद झाला. मानवाचा इतिहास ते आजच्या मानवी जीवनातील हक्क आणि अधिकारांच्या विविध बाजू, पैलू पाहण्यात आले, समजून घेतले. नव्या युगातीलया नव्या संज्ञा, संकल्पना, जाणिवा कळत होत्या. अन हे वयच असतं की या काळात ह्या बाबी समजून घेऊन परिवर्तनाची कूस समजली पाहिजे. कववल तारादूत प्रशिक्षण आहे म्हणजन नाही तर भारतीय नागरिक म्हणजन ह्या बाबी मी समजून घेणं किती गरजेचं आहे हे कळून आलं.

आपले जीवन हे हक्क आणि अधिकारांची कृत्ये यांनी व्यापलेला भाग असतो. पण मग ह्या भागाचं आयुष्यमान हे सौन्दर्यपूर्ण होण्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय व एकता यांची बांधिलकी जपली पाहिजे हेही उमगत होतं.

तिसरे सत्र हे भाषिक संवाद आणि कौशल्ये विकास ह्या विषयावर होते. आपल्या आयुष्यात आपल्याजवळ विविध कला कौशल्ये असतात. मात्र त्याचा वापर जीवन मानवी कल्याणार्थ होण्यासाठी असावा असं एक रचनावादावर आधारित शिंद्धांतन हाती गवसत होत्र.
या परिसंवादात खूप हसायला, शिकायला, अन मुक्त व्यक्त व्हायला मिळाला.

सारथी प्रकल्प हा आराखडा आणि प्रहसकीय व्यवस्था आज चौथ्या सत्रात घेण्यात आला. तारादूत कसा असावा, त्याची कामे काय , नियोजन करणे, त्याचं आंतरिक बाह्य सादर्य याविषयी आणि आपल्या जगण्यासष्टमयीभाव डावभर मिळत होता.

सायंकाळी जेवण होण्यापूर्वी बाहेर सातपूर गावात गेलो. मित्र मारुती अन मी पाणीपुरी खाल्ली, पेरू घेऊन खाल्ले.सायंकाळी जेवण केलं. फॉर्म सबमिट केले. फायलिंग केलं.


कधी झोपलो कळलं नाही उद्याची गोष्ट उद्या सांगेन

Comments

Popular posts from this blog