"नाट्यचित्रकारी: डॉ. श्रीराम लागू (मास्तर) म्हणजेच बाप्पू!"

"मराठी पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना जास्तीचा एक विषय म्हणून नाट्यशास्त्र हा विषय घेतला होता. नाट्यशास्त्रच्या पहिल्या वर्षाला असतांना नाटकं वाचत होतो. विजय तेंडुलकर यांचे नाटक मेंदू हुसळून काढायचा. अशा काळात नाटक पाहणे, ती समजून घेणे, नाटक वाचन, नाटकातल्या संहिता, पात्र, विषय, आशय, नाटकाचा देह आणि नाटकाचा रूपबंध ह्या सगळ्या बाबतीत नाटक जाणून घेणे यासाठी पाहिजे त्या गोष्टी मी करत होतो.

नाटक पाहण्यासाठी अन समजून घेण्यासाठी दर संध्याकाळी रंगमंच धुंडाळणे, आज शहरात कुठे कार्यक्रम आहे का? याची माहिती प्रत्येक पेपरच्या कानेकोपरेकप्प्यात पाहणे, शोधणे, वाचणे संध्याकाळी असलेल्या नाटकाला आवर्जून जाणे हा दिनक्रम असायचा. नाटकाच्या दोन वर्षांमध्ये अनेक मंडळीची कलाकारांची आणि नाटक जाणून घेणाऱ्यांची मैत्री ही झाली.काही दिगग्ज कलाकारांची भेट झाली. त्यादिवशी ही मैत्री अनोखी होती तब्बल 13 मिनिटे बाप्पूशी चर्चा करत होतो.

मी म्हणलो की,
"मला तुमचा मास्तर असलेला चित्रपट खूप आवडला. आणि त्याहीपेक्षा मास्तर चित्रपटातला तुमचा अभिनय."
आणि ते खर्ग हसत बोलले,
" तो अभिनय नव्हता. ते जगणं होतं. त्या काळातलं ते जीवन होतं.जगलो कॅमेराने अभिनय टिपला. दुसरं काय?"

एका अभिनेत्याचं त्याच्या अभिनयाप्रति असलेलं नातं ते जगण्यात किती रुतलेलं आहे. हे त्यावेळेस बापूनी लहानश्या शब्दांत सांगितलं. नाट्यशास्त्रात येऊन मला जास्त काही समजत नव्हतं पण साहित्य वाचल्यामुळे, साहित्याच्या संज्ञा-संकल्पना समजून घेतल्यामुळे या दोन ओळीच्या मागचं तत्व काळजाला भिडलं.

कार्यक्रमासाठी बापू नेमके आले होते त्यामुळे ते बाहेर व्हरांड्यात उभे होते. समोरच कामगार चळवळीचे आणि श्रमिकांचा दलितांचा-शोषीत जनांचा आवाज असणारे बाबा आढाव हे देखील तिथे उपस्थित होते.समोर उभे होते बाबांच्या जवळ नेहमी एक पिशवी असते. यामध्ये पिवळ्या चाफ्याची फुलं. ते काढून बाबांनी बापूंच्या हातावर ठेवली. "आणि आले का स्नेहीसूर्य!"असे म्हणाले

एकमेकांचे काळजीवाहू असलेले बाबा आढाव आणि बापूंच्यात बरीच चर्चा झाली.ते मी सगळं उभा राहून पाहत होतो. एका व्यक्तीस अनेकांशी असलेले संबंध नातेसंबंध, औदार्यसंबंध, त्याहीपेक्षा जगण्याच्या तत्त्वसंबंध किती तत्त्वांशी निर्माण झालेले असतात, ते मी मी संशोधक दृष्टीने पाहत होतो.

मी बाप्पूचा हात धरला आणि बापूला 'नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटच्या सभागृहांमध्ये' घेऊन जाण्यासाठी निघालो.

आणि त्यांना मी घेऊन बापूंना घेऊन मी आत गेलो. बापू आता बरेच थकले होते.त्यांना आणि पायऱ्या चढणं थोडं कठीण जात होतं. बापूंचा हातात घेऊन मी बापूना पायऱ्या चढून आत नेलं.आणि खुर्चीवर बसवलं.

बापू म्हणतात,
" तू बस! नको हात धरू ! चालू शकतो अजूनही! राहूदे, बस तिथे बाजूला!
"अरे ती आली का?"
"अहो कुठे आहेत तुम्ही?"
या बापूंच्या सोबत असलेल्या त्यांच्या अर्धांगिनी. बाप्पूचा खूप जीव. या वयातील ही काळजी.

त्या दिवशी कार्यक्रमासाठी ते दोघे आले होते. आणि हा कार्यक्रम होता "हमीद दलवाई" यांच्या जीवनावर आधारित निर्माण केलेली पहिलीच माहितीपटाची चित्रफित दाखवण्याचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये "दलवाईंचे काम आणि आयुष्य या दोन्ही गोष्टी लपलेल्या असल्याकारणामुळे या गोष्टी जाणून घेऊ"
यामुळे मी या कार्यक्रमाला गेलो होतो. त्याच कार्यक्रमाच्या दिवशी "नसरुद्दीन शहा" या मोठ्या दिग्गज कलाकाराची सुद्धा नजरभेट झाली. हा खूप मोलाचा आनंद होता. काही खूप यापेक्षा मोलाचं म्हणजे "पिंजरा" चित्रपटांमध्ये मुख्य नायकाची भूमिका केलेला जो कलाकार होता त्या कलाकारांची भेट म्हणून आयुष्यात खूप मोठं आनंदाचे पर्व माझ्यासाठी होतं.

तेव्हा मी आठवी- नववीत असताना पिंजरा हा चित्रपट पाहिला होता.आणि एक कलाकार म्हणून,
"त्या भूमिका निभावणं, आणि त्या केवळ चित्रपट आकृत्या नाहीयेत ते समाजाचं वास्तव आहे!"
हेच सांगणं म्हणजेच बापूंची नायक-नायिका मध्ये असणारी भूमिका, नायिकांमध्ये क्रांतीपर्व सुरुवात करणारा विचार आणि रंगभूमी गाजवणारा एक तत्त्वसिद्धांत.

बापू म्हणजे रंगभूमीवरचा असा चित्रकार की, ज्याने रंगाच्या छटा तर निर्माण केल्या आहेत नाट्याच्या अविष्कारामधून मात्र त्याच बरोबर दोन रंगांमध्ये- रंगा रंगांमध्ये आणि रंगाच्या वैविध्यामध्ये लपलेला विचार आपल्या अभिनयातून प्रतवारी करत रसिकांच्या दृष्टिपटलावर ठेवलेला आहे. म्हणून बापूंचा अभिनय हा सर्वसामान्य काळजाच्या अंतरंगाचा अभिनय आहे असं मला स्पष्ट नमूद करणं नेमकं समजू लागतं त्या काळातली ही भेट. म्हणजे ही काळजाची भेट. बापू आज तुम्ही इथे नाहीत रंगभूमीवरचं हे एक पर्व आपल्या जाण्यामुळे स्तब्ध होतंय हेच अतीव दुःख!"

-विश्वनाथ साठे[9921056462]
@VISHWANATHSATHEBLOG.COM

Comments

Popular posts from this blog