तारीख दोन. सकाळीच उठून सी बी एसला आलो.तिथून रिक्क्षाने 25 रुपयांत सातपूर एम आय दि सी ला पोचलो, थँडी अजून हळू हळू शरीराला चरत होती असं वातावरण नव्हतं.

कागदपत्रे झेरॉक्स करून प्रशिक्षिण स्थळी पोचलो. दोन मित्र म्हणत तू झेरॉक्स केले का ?
नाही म्हणलो.
मग ते झरॉक्स च्या दुकानावर घेऊन गेले.त्यांच्या संवादाने ते मित्रच झाले. मला कळत होते की संवाद हा मैतृत्वाचा सेतू असतो. नेमकं हे कळण्याचं वय होत.ते जगतोय.

त्या मैत्रीतल्या एकाचं नाव इरफान शेख अन दुसऱ्याचं नाव होतं मारुती. दोघे अजिजीने बोलत होते. भूक लागली म्हणून नश्याला वडा खाल्ला.

अजून काही यायचे बाकी होते. काई येत होते. काही पोचले होते. रात्रीच्या जगरणाने काही ढेपळलेल्या चेहऱ्याने वावरत होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हे तारादूत जमले होते.

हो तुम्हांला सांगायचं च राहून गेलं. हे तारादूत म्हणजे काय आहे तर?
बरं पण इतक्या लवकर कसं सांगू?
थोडा तरी इचार करायला नको का?
असा एक इचार मनातल्या मनात सुरू असतो तोच दुसरा विचार म्हणतो सांगून टाक. का ठेवतो. लगेच एक मध्यस्थी करणारा विचार येतो. रोज काही तरी सांगत जा. सांगशील सगळं एकंदरीत.

दुपारचे जेवण करून आलो. आज जेवणात हिरव्या मिरचीचा थेसा होता. शंभर त्यात कुटून टाकलेला घमघम वासाचा थेसा. मला घरची आठवण झाली. बा आठवला. माय आठवली.तीने पाट्यावर वाटलेली चटणीची चव आठवली.

आज आमची नोंद झाली तारादूत म्हणून. कॅनरा बँकेचं खातं उघडण्यात आलं. नव्या तंत्रांचा वापर करून स्वयंचलित यंत्रणेने खाते उघडून झाले. मोबाईलवरच खातं उघडू शकतो हे प्रक्रियेने कळले.हे आज नव्याने शिकत होतो.

इव्हन कित्येक मित्र जाहले होते. नांदेड , वसीम, मुंबई, हिंगोली, लातूर, बुलडाणा, नागपूर, सातारा, कैक जिल्हयातील मुलं आपली भाषा घेऊन बोलत होते. माझी एक भाषा होती. काळजाचे शब्द बोलत होतो मित्र अन त्यांचं असंन काळजात साठवित होतो.


सायंकाळी बाबाचा संपर्क झाला. आज त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता असं ते म्हणत. गोळी खाल्ली बरं वाटलं म्हणले. जीवशाऱ्यात गेलेला अजून आला. मन कसं हो क्षणात इथल्या तिथे जातं. मी नाशिक शहरातील बी एस इन एल प्रशिक्षण केंद्रातील आवारात होतो. बा गावात होते. महं मन गावाच्या कडेने हिंडू लागलं. मया ओली असते. कडेने ओलावते. असो.
जगणं हेच.

आज उशिरा जेवण झालं सायंकाळी. वर्ण भात चपती.अन सधानाचा ढेकर देत खोलीकडे आलो.
बी झिरो टू खोली. 10 बाय 12 ची. दोन पलंग. गाडी। एक उशी, पंखा, एक टेबल अन फर्डळ, बरं होतं हे. अशीच अस्तित्व असतात का? मोजकी? सीमित? बांधीव?
काळजी म्हणत होतं,
नाही!

आज रात्रीला झोपतांना काही तरी सांगणार आहे तुम्हांला. ऐकणार का तुम्ही?

Comments

Popular posts from this blog