तारदूताचे दिवस
भाग 24
नाशिक ते पुणे प्रवास म्हणजे हा एका भूगोलाातून दुसऱ्या भूगोलात जाण्याचा प्रवास. प्रत्येक भूगोलातली शेते, माणसं, आचारविचार, रहणसहन, संस्कृती,भाषा, पेहराव, मानसिकता, व्यवहार आणि तिथली एकमेकांप्रति असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे सगळं सगळं आपापल्या भूगोलात घडत असतं.
एक भूगोल सोडून दुसऱ्या भूगोलात जाणे म्हणजे या इतक्याच बाबीवर लक्ष केंदित करणे नाही. तर याही पलीकडे काही असते. नाशिकचा परिसर सोडून संगमनेर लागलं.प्रवास सुरूच.कोणताही असो प्रवास कुठे थांबतो?
संगमनेरवरून निघालो. संगमनेर म्हणजे हिरवी शेत असणारा प्रदेश. गोदावरी बगलेजवळून वाहू लागते. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या माथ्यातून झिरपणारी गोदामाय पुढं संगमनेर, सिन्नरच्या मातीला ओलीगच्च करत संथ गतीने वाहत राहते. संगमनेर-सिन्नरच्या कुसातले डोंगर की डोंगराच्या कुसातले संगमनेर-सिन्नर हा प्रश्न पडतो.
सिन्नरच्या थोडा अवधी पिऊन पुढे वळलं की सातपुड्याच्या रांगेतील काही डोंगर लागतात. अजस्त्र, अवाढव्य, अगदी कणखर, मजबुती उठून दिसते या डोंगराच्या सानिध्यात. एक वाट या डोंगराच्या बरगाडीला फोडून जाते.पण हा दगड ठाशीव, पक्क्या वळीवाचा दिसत नाही. भुरभुरा अन ठिसूळ आहे. मुरम्या जातीचा. ढासळणारा.
जिवंत - सजीवपणा असलेले असतात का काळावर ढासळणारे? आणि का ढासळण्याची प्रक्रिया होत असते? ढासळणे म्हणजे नक्की काय? सहज प्रश्न डोक्यात गुंतून गेले.
नाही! सहजासहजी काहीही ढासळत नाही.कारणाविन काहीही घडत नाही!
ढासळतं म्हणजे काहीतरी कुठेतरी कमकुवत होतं. निर्जीव होत जातं. आता तुम्ही म्हणाल की दगड तर निर्जीवच असतात अजून निर्जीवपणा कोणता?
पाखरं आपापल्या घराच्या दिशेने प्रवास करणारे.हो. तेही प्रवाशीच. सकाळ उठायचं अंघोळ स्नान करायचं. पंख झाडायचे अन भरारी मारायची. खायला मिळणाऱ्या ठिकाणाच्या शोधात. मुक्त जगण्याच्या कोशात उंच भरारी मारणारे पाखरं. कैक आकाराचे, प्रकाराचे, नाना रंगाचे, अंगाढंगाचे हे पाखरं. उठायचं, मुक्त उडायचं, दाणे टिपायचे अन मुक्त व्हायचं.
आता सूर्य बुडून बराच वेळ झालाय. डोळ्यात काळोख की काळोखात डोळा असं हे गणित.अंधारभुडुख जिकडे पहावं तिकडे अंधारच अंधार. मग हा अंधार केवळ डोळ्यांचा की डोळयांना न दिसणाऱ्या विश्वाचा?
काळोख पडला की काहीच दिसत नाही. नजरेच्या टप्प्यात जे सापडत तोपर्यंतच दिसतं. त्याच्यापुढे काय? अंधार अंधार अंधार....
काळ्याकुट्ट अंधारातही एक विश्व लपलेलं असतं. पण हे विश्व दिसतं केव्हा तर उजेडल्यावर. त्या अंधारातल्या युगावर प्रकाश पडल्यावर. तिमिराच्या खाचा फोडणारा उजेड.होय! उजेडात एक विश्व दिसून येतं. आणि हे अंधारात गडप झालेल्या विश्वाचं प्रतिनिधित्व करणारं विश्व असतं.
नारायणराव लागलं.उसाचा, भुईमूगाचा वास नाकात घुमू लागला.कुठूनतरी पेटीचे मंजुळ सूर काळणावर आदळले.प्रवास सुरूच होता. हवेचा पदर आता ओला होऊ लागला होता. थंडीचे झुळूक कानांनाकाला झिंबारी
आणत होते. वळीनं येणारं वारं सगळ्या शिवारावर हिवाची गोधडी आथरत होतं. शिवार थंडीनं उबत होतं.
मंचरच्या पुढे अन खेडराजगुरूनगरच्या मध्येभागी पाच सात वळणाचा घाट.पोटाशी वळून पळणारा प्रवास.जवळूनच बिलगून असणारी खोल दरी. अन दरीतून वरच्या दिशेने येणारं थंड वारं. हे फक्त हिवाळ्याच्या मौसममध्ये बरं. तुम्ही म्हणाल की, उन्हाळयात काय? पावसाळ्यात काय? तर ते ते वातावरण वेगळं वेगळं आहे. त्या त्या मौसमचं त्या त्या मौसममध्ये सांगणं बरं. आत्ता हे हिवाळ्याचं.
चाकण लागलं. चाकणच्या चौकात गर्दी भरलेली. घोंघाट मरणाचा. या गर्दीतही ते कसे काय झोपी गेले असेल? इतकी झोप कुठून आली असेल त्याला? ती स्त्री हातात हवेने भरलेले फुगे विकत होती. रस्त्याच्या मधोमध कठड्यावर उभी राहून ते भरलेले फुगे विकण्याचं काम करीत होती. तिच्या काखेत एक तान्हं बाळ शुद्ध हरवून झोपी गेलं होतं. त्याच्या अशा झोपण्याने त्याची मान लोंबकळत होती. ती लोंबकाळणारी मान सावरायचंही त्या आईला ध्यान नसावं? अन ते बाळ इतुक्या गोंधळात झोपी जावं हाच मुळात प्रश्न. गर्दीच्या लोटात निर्लेपपणे झोपणारं बाळ अन त्याची ती फुगे विकणारी आई एक वास्तवाचं गूढ!
इंद्रायणीचा काठ लागला की पुण्याचं पाणी.त्या पाण्यावर आता काळोख पसरलाय. पूर्वी नितळशार वाहणाऱ्या इंद्रायणीच्या पाण्याखालचा तळ आता अंधारात गुडूप झालाय.
अंधार आता रात कापत होता. तो घट्ट झाला होता. जणू काळ्या रंगावर कोणीतरी अजून काळ्या जाड्याभरड्या रंगाचे पट्टे मारून सगळं आभाळ, जमीन आवार-शिवार काळेगडद केलंय. परंतु हे निर्धाराने माहीत होतं की, अंधाराच्याही कुशीतही उजेडाचे लेकरू खेळत असते.

Comments
Post a Comment