★★★आडूश्या बाहेरचं उघडं भोंगळं जग ★★★
"आमची माणसाचीच जात आहे. आम्ही जनावर नाहीत.... रस्त्यावर सडूनपडून मरणाऱ्या जनावरावानी आम्ही मेलो तरी बेवारस म्हणून केव्हांच्या केव्हा मग घेऊन जातील.उचलून घेऊन जातील अन यंत्रात डागून जाळून टाकले जाईल.दीडशे-दोनशे मजले असलेल्या उभ्या इमारतींच्या मानवी जगातले...आम्ही बेवारस....."
बरबाद्या कंजारीयात शहरी वास्तवाचे आणि झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व दारिद्र्याचे दर्शन घडते. जगण्याच्या उमेदीने केलेल्या बंडखोरीचे हे चित्रण आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातून वाचलं गेलं आहे.परंतु तरीही आजपर्यंत समाजिक,राजकीय,आर्थिक विचारवंताने, बुद्धिवाद्यांनी आणि प्रगतीवरच्या "पुढे" गेलेल्यांनी वंचित, दुबळ्या घटकाकांकडे किती पाहिले? याची समीक्षा व्हायला पाहिजे.कारण गरीब,व्यसनी,व्यभिचारी, चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या,गुंड,मवाली,उपेक्षित,भटक्या माणसांचे जगणे,त्यांचा जीवनसंघर्ष म्हणजे असं चित्र सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यासमोर खेळत असते.तीही माणसं असतात.जीवन असतं त्यांनाही आणि काळजाच्या भावनेला त्यांचेही काळज ठाव घेत असते. म्हणून फुटपाथ हे एक जग आहे हे सांगण्याचे काम अण्णाभाऊंनी साहित्यातून केलं आहे.हे आपण कधी समजणार आहोत?
भारतीय राज्यघटनेनुसार,प्रत्येक नागरिकाला घर असण्याचा अधिकार आहे.तरीही देशातील घरांची आणि बेघरांची घोर दुबळ्या स्थिती आहेत.घटनेच्या कलम 21 नुसार घर हा प्रत्येक माणसाचा मुलभूत अधिकार मानला गेला आहे.तसेच प्रत्येकाला पुरेशी जागा आणि स्वच्छ पाणी,वातावरण वाहतूक व्यवस्था आदींची उपलब्धता असावी असे म्हटले आहे.
देशातील घरांच्या स्थितीबाबत संसंदीय समितीने अलीकडेच तयार केलेल्या अहवालातून बेघरांचे सत्य बाहेर आले आहे. गरिबांसाठी तयार करण्यात येणारे घर रिकामे पडून असून असे चित्र देशात कमी जास्त प्रमाणात सर्वत्र आहे. मात्र,त्याचा मोठा फटका राज्यांतील विशेषत: बिहार,झारखंड,आसाम,बंगाल, उत्तर प्रदेशमधून स्थलांतरित लोकांना येतो.समितीच्या मते,निवासी घरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारी कर्जात सुलभता आणूनही परवडणाऱ्या घरप्रकल्पांतील सुमारे 25 टक्के घर रिकामी आहेत. यासंदर्भात संबंधित मंत्रालयाने गांभीर्याने पावले उचलावीत,अशी शिफारसही समितीने केली आहे.स्थानिकांचे तर भयंकर प्रश्न आहेत.
ते...म्हणतात,"माणूस म्हणून जी व्यवस्था दाखला मागते.तो दाखला पण आमच्या जवळ नाही.या व्यवस्थेचे आमच्याजवळ काहीही नाही.राशन कार्ड,जन्माचा,जातीचा,शिक्षणाचा,पोलीस पाटील उत्पन्नाचा रहिवासीचा दाखला नाही ना अधिवासाचा दाखला....ना वयाचा ना आधार कार्डचा.....पॅन कार्ड नाही मतदान कार्ड नाही.... पासपोर्ट....ना व्हिसा..... बेवारस आम्हीं....."
" तुमच्या भरधाव गाडीच्या वेगाने बसणाऱ्या धुळीच्या अन तुम्ही लाथेने लाथाळून पुढे जात तापल्या फुटपाथच्या जगाचे अभिमानी आम्ही माणसं. आम्हाला तुमच्यासारख्या चार भिंती चार आडोसे ना छाया ना छत....नाही टाइल्स फरशी ....डोक्यावरचा भार डोक्यावरचा आभाळ मोकळं चाकळं.....आभाळ हेच आमचे छत आहे.आणि रस्त्याच्या कडेची ही फूटपाथ आमची धरती आहे. कधी कधी त्त भरधाव वेगाने चिरडल्या जातो पाल्यापाचोळ्या अन कुत्र्यासारखे मांजरासारखे....पण का? किती दिवस? कशासाठी?
"आम्हाला जगण्याचा अधिकारच का आहे!" कोणी निर्माण केली ही व्यवस्था.की याच धरतीवरले लोक का माणसाने शेकडो मजल्यांच्या इमारती मध्ये काचांमध्ये,एसीमध्ये आनंदात,तृप्ततेत, ऐश्वर्यारामात आणि सुखाच्या गादीवर लोळायचं ? आम्ही आहोतच या फुटपाथवर माणसाने भरलेल्या,पावसाने भिजलेल्या,धुळीनं बरबटलेल्या दगडाखोगडानं उप्टरलेल्या.... गाडीच्या चाकाखाली उघडउघड मेलेल्या कुत्र्यामांजरांच्या सडलेल्या फुटपाथवर...."
"या देशातल्या राज्यकर्त्यांनी सुद्धा आमच्या कड नजर फिरवू नये? ते ध्यानावर असतील तेव्हा न? असो पाहणार्याला दिसतं....पाहून डोळे झाक करणाऱ्याला काय दिसणार? जातात रोजच्यारोज तिथून हजारो वाहणं...करोडो माणसं आणि कित्येक अगणित सुखात लोळणारे जीव....आमच्या वनव्याचं सोडाच ती सुखात आहे.आम्हाला याचा आनंद वाटत नाही का ..? आमच्याकडचा काळजाचा तुकडा आजुन इतका बेचिराख झालेला नाही की, त्यांच्या सुखाचं सुख तोडून आमच्या फूटपाथवरल्या लोकांना मिळावं."
"पहाट झाली की किलकील फूटपाथ.....सूर्याची बिंबं गिळत ऊन उतरत जातं कोऱ्या पोटात....आणि भुकेची ही होऊन आतडे सोडतात वास करपट... धुरपट....आमचे पोट दुखतं फुटपाथवरच..... आमची गर्भार बाई बाळांतीन होती फुटपाथवरच.... आमचं तान्हुलं पाय आपटत फुटपाथवरच.... आमची भाकरीची वाट फुटपाथवर.... आमची भाकरीची दुरडी इथंच....आला नवा दिस आमचा सारा हा मोकळा घर संसार या फुटपाथवरच.... सारे अस्तित्व जीना मरणा और आमचं तत्त्वज्ञ.... आमचं राज्य... फूटपाथ ....आमचा धर्म फूटपाथ .....आमचं न्यू वर्जन....आमच्या संघर्षचा जन्म....शेपूट....पातुर होतो तो फूटपाथवरच अन आमच्या लढाईचा शेवट फूटपाथ...."
सन1997 ला सर्वोच्च न्यायालयाने काही बाबी स्पष्ट केल्या होत्या. परवडणाऱ्या घरांची निर्मिती करावी आणि ती घरे गरिबांना उपलब्ध करून द्यावी,असे म्हटले आहे.त्याही अगोदर म्हणजे 1988 मध्ये भारत सरकारने नॅशनल हॅबिटाट अॅन्ड हाऊसिंग पॉलिसी तयार केली होती.त्यात नागरिकांच्या राहणीमानाचे भीषण वास्तव सांगण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर पाच दशकांनंतरही बहुतांश नागरिक हे जनावराच्या गोठ्यापेक्षा वाईट स्थितीत राहतात, असे म्हटले होते.अशा स्थितीत देशात निवासी क्षेत्रात क्रांतीची गरज बोलून दाखविली.त्याही पुढं जाऊन वास्तव पाहून म्हणावं लागतं की,हे माणसं कुत्र्यासारखे जगत आहेत. जणू भटकी कुत्री.भाकरीची भ्रांत.जगण्याची भ्रांत. अस्तित्वाची भ्रांत.मरण्याची भ्रांत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जैथ जैसे थे....गरीबी, बेघरांचे प्रश्न यांसाठी सर्वोच्च न्यायालय रात्रभर कधी काम करणार असा प्रश्न सामान्यांतून उपस्थित झाला.यावरून पुन्हा एकदा ही गोष्ट समोर आली आहे की, लोकशाहीत सर्व लोक समान असतात.पण काही लोक अधिक समान असतात. अर्थात,याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा घटनात्मक होता. संविधानातील अधिकारांच्या विभाजनाचा मुद्दा लक्षात घेऊन न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. बऱ्याच वेळा केंद्र नि राज्य अधिकारक्षेत्र यावरून कित्तेक जिणं उध्वस्त होतात.ते अधिकाराची लढाई बढाई चढवत बसतात...लोकशाहीत.
"आमचे दुःख सुख इतर फुटपाथवरच जन्म घेतं.....वाढतं.... आणि शेवटच्या घटिकाही मोजतं..... आमचे सणासुद,आमची दिवाळी-दसरा.... आमचं खाणं-पिणं....आमचं असणं....आमचं नसणं "चारभिंती वाल्यांनो गाडीच्या काचा खाली करून आम्हाला इभ्रत विचारता? "
"तुम्हाला तरी चार भिंती आहेत.....काचेचे तावदान..... आहेत...इभ्रत कोठे इकल्या कुठे खरीदल्या जाते.... त्याच्या बाजारपेठाही येथेच आहेत... उघड झालेल्या. आम्हाला तर इभ्रत नाही. आम्हाला चार भिंती नाहीत. आम्हाला लाज आलीस तर आम्ही आभाळाकडे पाहतो अरे हो....नाही आम्हाला शरम नाही......"
केंद्र शासनाने ग्रामीण भागातील गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास घरकूल योजना लागू केली आहे. मात्र, 2022 सालापर्यंत बेघर कुटुंबांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या 2016-17 या आर्थिक वर्षात 1155 घरकुले उभारण्याचे उद्दिष्ट होते. त्यानंतर 2017-18 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 497 घरकूल उभारण्याचे उद्दीष्ट आहे.यात खुला वर्ग आणि अनुसूचित जाती-जमाती,भटक्या जमाती लाभार्थींचे उद्दिष्ट आहे.रमाई आवास योजनेमुळे प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी लाभार्थी मिळणे दुरापास्त झाले.2022 सालापर्यंत प्रत्येकासाठी घर देण्याची घोषणा केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि राज्यासह देशात घरकूल उभारण्याबाबत वेगळी परिस्थिती आहे.परंतु सिंधुदुर्गात घरकूल उभारणीसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मागासवर्गींयांसाठी शासनाने रमाई आवास योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 95 टक्के घरे पूर्ण झाली.परंतु या उद्दिष्टामध्ये भटकी कमी उत्पन्न गटातील इतर व अन्य घरकूल घेण्यास शासनाच्या अटी,नियम व निकषांमुळे ग्रामीण जनतेमध्ये शासनाच्या या उद्दिष्टांबाबत कमालीची नाराजी आहे.
एककीडे शासन गरिबांसाठी योजना राबविते आणि त्यातच वाढती महागाई,जीएसटीचा परिणाम आणि प्रतीक्षा यादीतही कमतरता यामुळे गरीब कुटुंब शेतकर्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.सध्या शहरांमध्ये असणाऱ्या बेघरांचे काय हा प्रश्न उरणारच आहे.त्यादृष्टीने सर्वोच्च न्यायालयानेही सरकारला बेघरांसाठी थंडीच्या दिवसात निवासाची सोय करण्यास बजावले आहे.त्यानुसार अनेक शहरात सरकारने तात्पुरते निवारे बांधण्यात आले आहेत. परंतु ही झाली हंगामी स्थिती आणि न्यायालयाने आदेश दिल्यावर सरकार व्यवस्था करते हे चुकीचे आहे. देशात कुणीही बेघर असता कामा नये, असे ठरवून सरकारची पावले पडली पाहिजेत.बेघरांना छत्राचा आसरा दिल्याशिवाय हा देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहू शकणार नाही. एकीकडे अब्जावधी रुपयांचे महाल उभे राहताना दुसरीकडे कोट्यवधी लोक बेघर राहत असतील तर ती आपल्या देशासाठी लाजिरवाणी बाब ठरेल.
गेल्या काही वर्षात घरांच्या जागांचे भाव प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्य माणूस,गरीब,शहरी भागात घर बांधायचे स्वप्नही पाहू शकत नाही.शहरी भागात साधी एक खोलीची सदनिकाही विकत घ्यायची झाल्यास तीन चार लाख रुपये लागतात.याशिवाय नोंदणी आणि अन्य खर्च साधारणत: 50 हजारांच्या आसपास येतो.हे एवढे पैसे सामान्य माणूस घरासाठी खर्च करू शकत नाही.कर्ज काढून घर विकत घेणेही वाढत्या व्याजामुळे अशक्य झाले आहे.सरकारी योजना अयशस्वी ठरल्या आहेत. अशा स्थितीत बेघरांची समस्या अधिकच बिकट आणि गंभीर होत चालली आहे.ती सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून संयुक्तपणे गांभिर्याने विचार करायला हवा.लिहिणारे हात किमान विचार करून लिहीत आहेत.वास्तवाला समोर ठेवत आहेत.
#वंचितांच्या दिवाळीचे काळज मांडतांना...                             

Comments

Popular posts from this blog