***कालच्या बैठकीतील ज्वलंत विषय***
           ***सब दिन होत समाना***
"तोच सूर्य
तोच चंद्र...
तेच दुःख
तेच सुख...
कुना दिसे
नवा दिस....?"
सॉरी....!
मी कुणालाच शुभेच्या दिल्या नाहीत नव्या दिवसाच्या आणि खरं म्हणजे जे नवे वर्ष आपण साजरे करतो ते खऱ्या वास्तवाने भारतवर्षात साजरं होतं का.....?हा प्रश्न आहे आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना...!
पुलाखाली भीक मागणारा भारत नववर्ष साजरा करतोय हे पाहून खंत वाटते कि,एक भाऊ मऊ पुडदाची भाकर खातोय तर दुसरा भाऊ कडकडीत उपास खातोय.एक त्याच रस्त्यावरून एसीच्या वाहनाने,डोक्यावरून विमानाने आभाळात पुढं चंद्र,मंगळावर जातोय.तर दुसरा पिण्याच्या पाण्यासाठी मूलभूत हक्कासाठी,जीवन स्वाभिमानाने जगण्यासाठी एल्गार मांडत आहे.झुंजारपणे भांडत आहे.हि कलंता कुणालाच ऐकू येत नाही.जो तो डीजेच्या वरातीत नाचल्यासारखा बहिरा झालाय काय....?सद्याच्या लोकशाही व्यवस्थेत हात पसरत असलेला दहशतवाद,अतिरेकी राष्ट्रवाद,धर्मांध सत्ताने लाच खात असलेला हिंसक सत्ताबाह्य धोरणाचा अतत्वविचार, शिक्षण क्षेत्राचे होणारे खेळखंडोबाचे भगवे राजकारण,उच्चस्तरावरील विद्यार्थी व प्राध्यापकी वर्गाची मनमानी व्यवस्थेतून होणारी मुस्कटदाबी,आणि यातून निर्माण होणारा त्या व्यवस्थेच्या विरोधातील  जाज्वल्य विद्रोह आणि शिक्षणाचा कलता अपरिपोष ,प्रसार माध्यमांची हेकेखोर विचारप्रवृत्ती आणि भांडवली विचारसरणी,व संविधानाने सर्वसामान्यांना दिलेला लोकशाहीचा आचार- विचार-वचनाच्या अभंगत्वाचा दर्जा हा आता भंग होतो आहे काय?आपण ज्या परिसरात जगतो,राहतो त्या ठिकाणची अस्थिरता, अस्वस्थता आपण जर दिस्त्या डोळ्यांनी पाहूनही जर झोपल्याचे ढोंग घेत असेल तर आपला हितचिंतक वर्ग कोणता हा ज्वलंत प्रश्न प्रत्येकालाच डसला पाहिजे.दलित,कष्टकरी,शेतकरी,श्रमिक,मजूर,पीडित व शोषित हा एक माणसांचा वर्ग रोज हालाकीचं जिणं जगत आहे.स्त्रीया, मुली व लहान बालके यांच्यावर होणारे अन्यात्त्याचार,नव्या दिवशी च्या आजही सहन करत आहेत.राजकीय मंडळी,नोकरदार,भांडवलदार,आणि अधिकारी वर्ग सत्ता गाजविण्यात धुंद झाले आहेत.तेही या परिस्थितीला कवेत घेऊन बदलण्याचे ठोस पावलं उचलतातच असे दृश्य आहे का..?हा देशातला व विश्वातील बदल जर नाकारून आपण सर्व आनंदोत्सव साजरे करत असू तर नक्कीच आपण अंदाधुंदपणे अधोगतिकडे जात आहोत काय अशी शंकेची जहरी पाल काळजात इख कालविते.हीच मानवता व भारत माझा देश म्हणणारा आजचा भारत असेल तर माझा सत्यानिशी विद्रोह म्हणा तुम्ही.
जो बुद्धांनी मांडला होता,जो कबीर,तुकाराम,शिवाजींनी मांडला होता.मांडला होता डेबूजी,फुले,शाहू,भीमराव यांनीही..! इव्हन यातील कबिरांनी तर "सब दिन होत समाना...!"असाही शब्दसाखी संकेत दिला आहेच.
....................................................................


Comments

Popular posts from this blog