***प्रेस व्हिजीट***
***ठरलं
सिंहगड-गेलो पानशेत***
[टीप-लवकरच दीर्घ अनुभव शब्दबद्ध करीत आहे.लिहावा का आपली प्रतिक्रिया कळवावी....]
"क्षेत्रभेटीसाठी ज्यावेळी प्रशिक्षणार्थींना एकत्र जमवून नि जोखीम,जबाबदारीने न्यायची-आणायची नियोजने हाती येतात तेव्हा खऱ्या नि कुशल नेतृत्वाची कस लागते.एक तर......."
[क्रमशः]
त्यो धाडधुड कोसळत नव्हता.ना उघडीक करत.काल पुण्यात पावसानं बुनगाळ लावली होती.पंप लावल्या ईहीरीतलं पाणी आटल्यावर इकडं वळीत लावलेल्या चिमण्या जश्या फूरर्फुर्र करतात.तसा पाऊस पहाटव्यापासून फरफरत होता.
"ठरलं सिंहगड...!"
म्हणजे नवनियुक्त प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणाच्या नियोजनात क्षेत्रभेट निश्चित अशी काही तरतूद नव्हती.ओढूनताढून सिंहगड भेट ठरलं.आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या तारांवरची कसरत सुरू झाली.त्यातल्या त्यात उंच पदस्थ अधिकारी हे निम्नस्तर अधिकाऱ्यांशी झुंजीत बोलू लागले.साऱ्या अधिकाराचा वापर ते बोलीतून व्यक्तत होते. तासाभरात भ्रमणध्वनी खनानु लागले.कधी तिरगित तर कधी नर्माइत भाषा तोंडातून गळू लागली.सारं त्या फरफर पावसासारखं.मोठा अधिकारी लहान अधिकाऱ्यावर हुकूमत घालू लागला.पण त्याला ही भेट करवायची होती. म्हणून तो लगेच नर्माइत घेत होता.लगेच चुळबुळ होत होती.
"चला,आटपा गडावर जायचं....!"
"साठे तुम्ही तयार झालात काय?"
एक भासाड्या आवाजात गुरकला.
"होय...! अगदी पाच वाजले पासूनच सर...!"
"अहो गाडीवाल्यांनी यायला हवं होतं अजून तरी!तुम्ही त्यांना किंतु कळवले की नाही?"
"सर मी सकाळपासून भ्रमणध्वनी घेऊन फिरतो आहे.तिकडून कुठलीच प्रतिक्रिया येत नाही."
"ठीक हे बघा त्यांच्याच ऑफिसचे लोकं आलीत मी बोलतो.....तुम्ही मुलांची तयारी झाली का ते बघा नि तयार रहा.!"
"ठीक आहे सर.त्वरित."
आणि ते पाठमोरे होत नाही की लगेच वळून हॉलकडे गेलो.
लातूर,हिंगोली,अहमदनर आणि सातारा या चार जिल्ह्यातील मुले आणि मुली मिळून पंचेचाळीस नग.
"आर वाघा तेव्हढी म्हयावाली इजार आन्न.तुला जागा धरितो मंग.!"
"काय मनला.. इजार आन मनला.जा तुजं तू घेऊन ये."
बगाडे बोलला.
"आर गड्या ह्ये लातूर भागातलं पानी दिस्तंय.!"
मनातलं मन चाटून हसत पुढं गेलं.
तोच पुढं खालचा होट वाकवत वनिता आली. अन म्हणू लागली,
"ह्यां... लैइ वंगाळ बोलतुया रं तू....?तुला दावीन इंगा म कशी जिरल.....हं बोल ...बोल बोल आता का गबस्लास ...?"
"ये वने तुला काय कराईचे वं.??म्या काय बी बोलून.मर हिकडं.....!"
अन त्यो तिथून पुढं गेला तोच त्याला सुनील भेटला.अन बोलू लागला,
"काय....इरप्पा.केली का इथं पण सातरकी सुरू?? नाय म्हणलं खूप गोंधळ चाललाय...आं..."
"हा..तुमान्सी नाई समजनार नगऱ्यालं.नुसतं हिकडं तिकडं.सगळीकडं ....."
अन दिनकर ला हिंगोलीच्या संतोषन हाक मारली,
"अय दीना कुठं चाल्ला..?कंघवा दे मले भांग पाडाय्चाय.दे नं ss लवकर गधsssड्या आं ....!"
"ख्यं sss हा sss सु ss हा हा हाss फु पु....ss स.." अशी मोठी दातखिळी काढत त्यो हासू आवरु लागला.
"हे घे एकदाचा.अन पुन्हा नाद नको करू.!"
दिनकरनं खिश्यातला कंघवा काढून दिला.अन सारा गलबला शांत झाला.हॉल रिकामा वाटू लागला.आज अकरावा दिवस.इव्हन साऱ्यांच्या तोंडोळखी नि बोलचाली होऊन घे दे होत होती.पण एकेकाच्या नामानिराळ्या तऱ्हा. नानाविध भाषेलीत लकबी अन हेलकारे.जुलै पाच अन सहा या पहिल्या दोन दिवशी तर कोण काय बोलतंय? याची लकब काय?हेलकारे कुठं नि कसे घेतात बोलतांना सारं सारं ऐकून न्याहाळत होतो.
हॉल च्या मध्यात जाऊन म्या सूचना केली.....
[क्रमशः]
विश्वनाथ साठे 9921056462
दि.17/7/2017
"आपल्याला ठीक नऊ वाजता निघायचे आहे.तुमची सर्व तयारी उरकून घ्यावी.आज सिंहगड जायचे ठरले आहे."
सभागृहात आवाज घुमला. सुचनेच्या शब्दांशिवाय दुसरे बोल तिथं उमटत नव्हते.सर्वांची चेहरे खुललेली दिसू लागली. काही जणांनी एकमेकांकडे बघून स्मित हासू फुलवले.म्या सूचना देऊन वापस साहेबांकडे आलो.दरवाज्यात येत नाही तर पुन्हा गुंनगून चालू झाली होती.तोवर इकडे गाडीची नि जाण्याच्या मार्गाची नियोजने तयार झाली.तयारी झाली.निघायची वेळ निसटू लागली.पण गाडी अजून इथं पोचली नव्हती.रस्त्यातच कुठेतरी वाहनांच्या गर्दीने अडकून पडली.गाडीचालकाचा भ्रमणध्वनीवर निरोप घेतला तेव्हा तो लाकडी पूल ओलांडून गेलेला होता.पुढे तो डेक्कनजवळील संभाजी पुतळ्यापासून अजूनच पुढे कूच झाला होता.मग पुन्हा पळपळ.शिक्षक भवनापासून जे धूम ठोकली की,संभाजी पुतळा.संभाजी पुतळ्यापासून पुढे काही अंतरावर तो गाडी उभी करून होता.त्या गर्दीत शोधून पुन्हा डावीकडून वळून नदीपात्राच्या रस्त्याने गाडी शिक्षक भवनाकडे आणली.पुन्हा मुलामुलींना मोजून घेत गाडीत बसवलं.गाडीत बसतांनी हे भरमसाठ लटालोटीची जत्रा.ढुसूक्न्या मारत चारही जिल्ह्याचे मुलेमुली बसली.सोबत दुपारच्या जेवणासाठी पुऱ्या अन आल्लूची भाजी घेतली.पाण्याची सोय झाली होती.निवडक मंडळी मागून दुसऱ्या फेरीत येणार होती.उंच अधिकारी,साहेब सपशेल गाडीत ऐटात येणार होते.सारी पांगापांग झाली.हळूहळू गर्दीतून गाडी रस्ता कापू लागली.एक वळण घेऊन जोडरस्त्याला थांबली.अनेक गाड्या चौकातयेऊं थांबल्या.पुढे अलका चित्रपट मंदिर लागलं.तिथं परदेशी चित्रपट प्रदर्शित झाला होता.पण पाहणाऱ्यांची गर्दी दिसत नव्हती.फुटपाथवरील हातगाड्या, खानावळी,चुरमुऱ्याच्या गाड्या, हॉटेलातील माणसं नुकतेच कामालं लागत होते.चौकातल्या हवालदाराने शिट्टी फुकली अन गाडी धकली.गाडीनं पुन्हा आळीसारखा पोटात बाक घेतला.अन तोंड पुढं करून पळू लागली.
[क्रमशः]
विश्वनाथ साठे 9921056462
दि.17/7/2017
म्या गाडीच्या तोंडातच बसलो असल्यानं समोरचं सपस्ट दिसत होतं.दांडेकर पूल पार करून गाडीनं वेग धरला.गुलाल उधळल्यासारखा आता सारा गोंधळ उडू लागला.बोलण्याच्या ढबा एकमेका भाषेत मिसळू लागल्या.तर्हेबाज शब्दांचा लहेजा गावरान गोडी पैदा करू लागला.खट्याळ लकबी जाणवत होत्या.चारही जिल्ह्यातल्या बोलीभाषा जणू मिळून मिसळून कुठंतरी प्रवास करू लागल्या.गळ्यात गळा घालून गाणी म्हणत होत्या.बाहेरून पाऊस अधिकच फुरफुर करू लागला होता.काचेच्या खिडकीतुन थंड गारवा हुडहुडी भरत होता.पण ती हुडहुडी या तरुण युवकांना भरत नव्हती.ती आपापली मिठीगोड बोली बोलण्यात गुंग होते.तर काही विचार करत होते.
सिंहगडावर किती मस्त हिरवळ असेल.किती निसर्गरम्य वातावरण असेल.किती सुख असेल तिथं नेत्रांचं.निळं आभाळ.निळा आसमंत.रंगार फुलाने भरलेली वेलीवल्ली.नानाविध जातीची झाडं, फळं, झुडपं,डोंगरदऱ्या नि निर्झर खळाळ झरे.वढे, उगमापासून झिरपलेल्या बारीकसारीक नद्या,ओहळं अन त्या ठिकाणी ते नितळ जल प्यायला येणारे पशु पक्षी,प्राणी किती अतीव अप्रतिम नजारा असेल तो.
"तो सिंहगडावरचा कोंढाणा कसा असेल बरं....?"
साताऱ्याचा सुरनर विचार करत खिडकीतून बाहेर पाहू लागला.एक कटाक्ष टाकून मही नजर त्याच्या जवळच्याच जागेकडे गेली.अहमदनगरची सितु तिथं बसली होती.ही लैय बोलकी.बोलका स्वभाव.कोणत्याही गोष्टीवर भरभर बोलत सुटे.या अकरा दिवसातला हा नवा अनुभव.पण ती आज बोलत नव्हती.दांडेकर पूल सोडल्यापासून तर ती खूप गप्प झाल्यासारखी वाटली.ती गाडीच्या बाहेरचं न्याहाळत होती.तसे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत. कधी ती केविल बने.तर कधी धीरगंभीर.इतरांशी मनमोकळं बोलणारी आज मुग्ध झालेली सितु बाहेर न्याहाळू लागली .
मागे वळलेली मान आपसूक सितु पाहत होती त्या दिशेकडं गेली.भला मोठ्ठा पूल लागला. आमची गाडी त्याला लागूनच सेवा रस्त्याने हळूच इतर गाड्यांना मागे सारत पुढं अंग रेटू लागली.चौकातले लाल दिवे लागले.सर्व गाड्या कर्रर्ररर्करssss ब्रेक लावत थांबल्या.काही गचागच गर्दीत घुसल्या.सारे वाहनचालक आपल्या घाईघाईत नि आगळ्या धुंदीत होते.चौकातल्या एका खांब्याजवळ एक इसम कळकळाट झालेल्या सदऱ्यात उभा होता.पाठीवर तो सदरा कचोळ्यात फाटून चिंध्या झाल्या होत्या.अन खुंट खुंट दाढीमिश्या वाढलेल्या. जाड भुवया ताठ दिसत होत्या.डोस्क्यावर झिंगऱ्या झालेले केस अस्ताव्यस्त वाटत होते.कमरेची इजार मात्र कडक इस्त्रीची घडी मोडणार नाही अशी होती.त्याच्या हातात गोल काहीतरी होतं.नि तो फिरवत होता.पुढं हात करून एक बोटावर ती गोल वस्तू गरगर फिरवू लागला. दिवे उघडझाप झाले.डावीकडील वाहने उजवीजडे धावू लागली.जाडजूड चाकाची भली मोठी वाहनं घर्घर करत धुव्वा सोडत हनुमान गेरात चौक कापत निसटली.अन पुन्हा लाल दिवे लागले.पुन्हा दुसऱ्या कडेच्या वाहनांनी तारांबळ उडवली.पुन्हा चौक काही काळ शांत झाला.मही नजर त्या फिरणाऱ्या गोलाकडं नि त्या इसमाकडे टिकूनच.इव्हन त्यानं मला पाहिले.म्या त्याला पाहत नाही अश्या अविर्भावात दुसरीकडं नजर झुगारली.क्षणांचा काही काळ ओसरला.अन म्या पुन्हा त्या इसमाच्या दिशेने नजर भिरकावली.पण डोळ्याच्या खोबणीत निराशेचा साठा घेऊन नजर पुन्ह पुढच्या दिव्याकडं गेली.तेव्हा अचानक मनात इचार आला,
"अं....आसल कोण्हीतरी???
तोच चालकाच्या दरवाज्यातून आवाज आला.
"द्या हो......!लैय भूहक लागलंह.हात दुखलाय. कोण्ही या गहर्दीत थांबाह्याल तैयार नाहे....!"
ते शब्द काळजात घुसले.खिश्यात हात घालत वीसची नोट चालकाजवळ देत म्हणलं,
"हे त्यांना द्या...दिवे लागतील.....जायचंय लवकर....!"
अन जवळच्या वाहनांनी एकच गर्दी केली.हिरवा दिवा लागला.आमच्या गाडीचे इंजन चालू झाले.नि काही कळायच्या आता चौक सुटला.म्या घनघोर इचारात पडलो.
"माय झं.......!"
"कोण आसल त्ये???"
"आशे शब्द काहून उच्चारले त्यानं??"
"त्याची इजार त कडी इस्तरीची.पण सदरा फाटून चूर.हे काय?"
"यालं काय म्हणावं.?"
" अन तो गोल......आरं गोल नव्हता त्यो.......!"
म्या मनालंच प्रश्न केला.मिस्कील आश्चर्याचा धक्का बसला.
"गोल नव्हता त्यो ती पृथ्वीची प्रतिकृती होती हातात त्याच्या.....!"
त्यानं पृथ्वी हातात तोलली.पण मंग त्यानं हात दुखतोय असें का बोल ठेवले....??कैक प्रश्नांचे शिंतोडे मस्तक वल्लं करत होते.मेंदूत ते तरतरत होते.जणू तपल्या तव्यावर पाण्याचा थेंब पडावा.तद्वत......
मलं त्या हरियाणातील उच्ची हॉटेलची आठवण झाली......
[क्रमशः]
विश्वनाथ साठे 9921056462
दि.18/7/20
म्या एक घास घेतला.तोंडाजवळ नेला.अन एक खळकन आश्रू ठिबकला.कंठात एक घमासान हुंदका फुटत होता.त्याची कळ उरापोटातून उठत होती.कळत नव्हतं जीवाचं जगणं नेमकं कुठं चुकतं???काहून घोर अन कष्टप्रद जगणं देती ही सडकी व्यवस्था.??मानवतेच्या इतक्या चिंधड्या चिंधड्या करून त्यात हुकूमशाहीची लाज कशी लपवत अधिष्टती बनत जाते.???माणूसच माणसाला काहून जनावरसारखं जिणं देतोय.???कैक प्रश्न अश्शील नाग होऊन मेंदूच्या कवळ्यालं डसत होते.मेंदू हिरवा काळा पडत होता.त्या वेदना उरापोटातून निंघत होत्या.म्हणून डोळ्यातून त्यो खारट आसू या दुनियेत पडत होता.तो नजरेत ठरत नव्हता.तिथं त्याला जागाच उरली नव्हती.तो ठिबकला.दाह घेऊन एकदाचा.
"खा...नं रे...साठे!"
काय झालं??आर घे खाऊन..?"
"पुन्हा ह्यो पक्वान्नाचा चारा ताटात पडणार नाही!"
"काहीही केलं तरी...!"
"हा चोवीस प्रकारचा गोड पदार्थ पुन्हा नाही.सर्व ताटात टाकून घे.अन ते पनीरचं चीप चावून खा.."
"आमरस हाय का कुठं असा???"
अमर आंब्याच्या रसाचा लगदा झालेला वाटीभर गर्रेदार रस सूरर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करत पीत बोलू लागला.मला त्याची कीव वाटली.आंबेगाव तालुक्याचा युवा प्रमुख हा अमर.अंगानं सुळका पण डोक्यात तरबेज.हिंदी साहित्य घेऊन तो शिकत होता.नेहरू युवा केंद्राच्या तालुका युवा प्रतिनिधींच्या निवडीच्या दिवशी हा भेटला तो आजवर सोबत होता. हरियाणा आलो तेव्हाही.आम्ही दोघे मध्य जागेवर बसलो होतो.खाली पायाची धूळ फरशीवरच्या मलमल चटईला लागेल अशी भुईवर पायघड्या घातलेल्या.जेवणाची मेजवानीच अशी केलेली की,चौकमध्यात दोन तरुण लवलवत्या कमरेच्या लावणी नर्तिका कासराभर चौफेर मुरका मारतील इतका गोल वर्तुळाकार चौरंगाचा घेर.अगदीच ते वास्तव पेशवाईच्या काळात पदार्पण करत होतं. भारतभरातून काही निवडक प्रतिनिधींची निवड हरियाणा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी युवा व क्रीडा मंत्रालयाकडून झाली होती. नि प्रत्येक प्रतिनिधी आपापल्या क्षेत्रात बुद्धीची कुमक बांधून होता.पारंगत होता.ही सारी व्यवस्था महाराष्ट्रातील संस्कृतीशी मिळती जुळती असावी म्हणून तिथली सर्व मंडळी झटून कामं करत होती. तिथला सेवेकरीदेखील पेशवाईतील हुबेहूब खानावळीचा कारागीर नि हलवाई वाटत होता.चौंरगावर बसल्यावर जेव्हा हातधूळ पुसायला ती रेशमाच्या कापडाची पुशी आली तेव्हा लहानपणी बोंडीतल्या नरम वलमऊ कापसानं उपसून मातीनं मळलेले तळहात पुसलेले आठवलं.पुन्हा गरम पाणी आलं.त्याने हात खंगाळले.पुन्हा पुशी.सारं राजेसरी ठतातलं जिणं.चांदीच्या ताटात नाना पक्वान्नाचा भरीव ढीग खचत होता.टाटाजवळच गुलाबपाकळ्या सांडून ठेवल्या होत्या.सुगंधी दरवळीत अत्तर फाया वातावरणात एक स्वादिष्ट चव सोडत होता.चोवीस गोड पदार्थ गुळचट घमकारा नाकात फेकत होते.हरियाणातील अव्वल दर्जाचे दहीदुधातुपाचे कैक चीजवस्तू पदार्थ त्या ताटात रिचत होते.गव्हाच्या फलक्या चपात्या त हातात घेतला की नाही असं वाटू लागलं. मसाल्यांच्या वास घुमत होता.अन त्या पक्वान्नाच्या दरवळीत त्या लवणाऱ्या कलाकारी नाजूक कमरेला लावणीच्या शब्दावर अदाकारी झटका बसत होता.कलेचा अजोड देखणा दिखावा म्या जीवनात पहिल्यांदा पाहत होतो.जगात तेव्हढी कलानिर्मिती त्या तरुण कलाकार देहात संचारत होती.त्या कलेवर डोळे नमत होते.मन म्हणत होतं,
"जी तुमच्या कलेनं काळज जिंकलं.या कलेला तोडू नका.कलेला कलाकाराच समजू शकतो!"
पण ते शब्द काळजातच रुतले.त्या दोन तरण्या कलाकार त्या हॉटेलीत पाहुण्यांच्या मनधरणीसाठी सुपारीवर येतात.त्यातल्या एकीने शिक्षणाची शास्त्रत्ता तपासली आहे.नि "ज्या शिक्षणाचा गोरखधंदा होऊन माणसाला गुलाम बनविणाऱ्या शिक्षनापेक्षा चार पावलं अदाकारी करून स्वाभिमानाने जिणं जगणं केव्हाही आम्हांला मान्य आहे...!"
हे त्यातल्या एका नर्तिकेला जेवणानंतर विचारल्यावर सत्य कळलं.तेव्हा ते शब्द काळजातच मोलाचे झाले.
उंच अधिकारी,निम्न अधिकारी, सेवाधारी नि प्रतिनिधी कडाडून सपाटून जेवले.त्यांच्या ढेऱ्या फुग्यावानी हवेत तरंगू लागल्या. कोण्ही ढेकरं फोडू लागलं. कोण्ही कोपर कापसी लोडावर ठेऊन अंगात तिरपा हाऊन लावणीचा आनंद लुटत होता.काहींच्या डोळ्यात ते मदभरी तारुण्य नसनसत होतं.तर काही त्या कलेला जगातील अद्वितीय मोल देत सारं गुणरंग न्याहाळत होते.तो नजराणा त्यांना अनमोल कलेचा नमुना वाटत होता.
कशीबसी अडीच चपाती नि काही नवीन पदार्थाची चव घेत हात धुतला. आमरसाची एक वाटी घोट घोट संपवली.अन त्या तोंड घोळून स्वाद टिकून ठेवणाऱ्या पानपुड्याकडे वळलो.त्यातली सोपं चुटकीसरशी उचलली नि तोंडात टाकली.अन गपक्कन प्रवासातली नाना शहरं,पुलं,इमारती, लोकं,व्यवहार,व्यवस्थेशाही,पिळवणूक, मक्तेदारीयुक्त मुलतत्वे,पैश्याच्या जोरावर उभं राहणारं क्षणिक सुख डोळ्याच्या पटलावर चित्रपट तयार करत होतं.वास्तवचित्रपट.पण त्याच वास्तवात चौचौपदरी पुलाखाली भुकेच्या आकांतानं कैक्काळ ताटगाळत उभी राहणारी लोकं डोळ्याच्या आर्त बिंदूतून सुटत नव्हती. त्यांच्या कलोहलाची तिडीक मेंदूत तेजाब सांडत होती.याच धर्तीवर कामगार वस्तीतील लोकं पोटासाठी रात्रंदिन मरमर कारखान्यात रक्तासहीत घाम ओकतात.तिथं हातंबोटं चरचर कापल्याने रक्तसांड होते.शरीरसुखासाठी जिवंत देहाची फुटक्या अाण्यावर बोली होते. श्रीमंतांच्या नि काचात जगणाऱ्याच्या इभ्रती वाचविण्यासाठी गरीब,असहाय आणि दरिंद्री कायेला आपली हाडामासाची कलेवरं न दमता पैसेवाल्या छातीखाली हलवावी लागतात.हे विखारी वास्तव म्या इसरू शकत नव्हतो. शाऱ्यातले काही लोकं औसेला भिकेप्रमाणे मांघून खातात.त्या लहानपणासूनच्या काळजातील बोचणीला उरात घेऊन आलेलो इथं पुण्यात-पुणे स्टेशनच्या आवारात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापुढील पुलाखालच्या,शिरपूर-धुळेच्या आग्रा रस्त्याच्या कडेला पालं उभारून जिणं कंठणारे, नागपूरच्या बस्थानकाजवळचे,मुंबईच्या माटुंगा परिसरातील भुकेसाठी पळपळ करणारे मजूर,कष्टकरी काळजं,दिल्लीच्या विमानतळाच्या बाहेरच्या भिंतीजवळ जिथं पोलिसांची अधिकारयुक्त भीती संपते तिथं भिकेला हात पुढं करणारे हातं नि भुसावळ-मनमाड-इंदौर-व्हिटीच्या आवारात बसलेल्या गरीबाकडं पाहून ती सल अजून रक्ताळते.अन मग उरातून एक दाह निंघतो.होरपळणाऱ्या आगीसारखा.या वास्तवातील जग त्या ठिबकणाऱ्या अश्रूला कारणीभूत होतं.पण त्याच चित्रपटाची ते पक्वान्न,ती लावणी,त्या लावणीवर ताल धरणारे पैंजण,तो नाद,ती अद्वितीय कला सारं सारं क्षणिक होतं.शास्वत नव्हतं.टिकावदार नव्हतं.जगात सर्वत्र तसं नव्हतं.ते पैश्याच्या किमतीत न बसणारं सुख जगात सर्वत्र नव्हतं.जिथं सत्ता,संपत्ती, अधिष्टती हुकूमशाही नि वर्चस्ववादी विचारसरणी पिकते तिथं हे जन्म घेतं.हे सत्य म्हया काळजाच्या कप्प्यातून जात नव्हतं.
इव्हन त्या धावत्या युगाच्या तंत्रज्ञान झोताकडे म्हनं विकासी नीतीने नेणाऱ्या भारताच्या मुखीयालाही....
"त्यो कोण असावा नि त्यानं पृथ्वी हातात घेऊन हात दुखतोय म्हणून का बोंबलावं याच उत्तर सापडत नव्हतं.....!"
"त्यो मुलुख धुंडत होता....अन हे सारं इथंच घडत होतं.....!"
कैक विचारांच्या तलवारीचे सपके खात उत्तरांची चिळकांडी डोस्क्यातून फुटत होती....."र्रर्रर्रर्रर्रर्र त्यो माणूस हाय....त्यांलं भूक लागती.... त्यालंपन जीव हाय रे विश्वनाथा...!"
करररर बीरेक लागला.गपक्कन म्या भानावर आलो.अन पुढचं भयंकर दृश्य पाहत होतो.
[क्रमशः]
विश्वनाथ साठे 9921056462
दि.17/7/2017
नांदेड सिटी परिसराच्या उचभ्रू वस्तीतल्या रस्त्यावर काही लोकं घाईगरबडीत रस्ता तुडवत चालले होते.रापलेले चेहरे होते.काळेठिक्कर.भट्टीत ईट भाजून निंघते तसे.काही पुढं गेले होते.खांद्यावर रुमाल, पायात जाडजूड जोडे.अन काहीजणांच्या जवळ कुदळी,पाण्यानं भरलेल्या शिशा होत्या. सिमिटानं भुर्के झालेले पाय उचलत ते पुढं आले होते.नि काही त्यांना गाठत होते.चार दोन स्त्रीया,दोन मुलं,एक मुलगी त्या मागे राहिलेल्या कबिल्यात होते.दोघीच्या डोस्क्यावर टोपले होते.त्यात खोरे,कुदळी नि पालवात बांधलेल्या भाकरी अन कोर्ड्याशाचे डब्बे होते.लगबग करत त्या पुढंच्या मंडळीला पकडत होत्या.पण मधेच हिरवे दिवे लागले की,त्या दुचमटायच्या, गलबलून जायच्या,मागे-पुढं करत रस्त्यावर यायच्या नि पुन्हा पावलं दोन चार पावलं मागे सरायच्या.पुढची मंडळी पुढं सरकत होती.नि ह्यो कबिला मागे अडकला होता.कामावर वेळात पोचलं पाहिजे.म्हणून त्या घाईत होत्या. पोरं कावरीबावरी होत होती.पुढं गेलेले मागे वळून पाहत खुणावत होते.जणू म्हणत होते,
"आरं यानं लवकर.तिकडं कंत्राटदार आपल्या नावानं शिवा घालत आसंल.....!"
अन त्यातल्या एकीनं धिटाईन चार पाच पावलाचं अंतर कापलं.मागची उरलेले पुढं सरकले.क्षणात काही कळायच्या आत मोठी आर्त किंकाळी फुटली....ई ssss....आंssss....
सारी पळापळ रस्त्यावर. एकच गर्दी ठोस लागली........ठोस लागली. ज्यो त्यो तिकडं भरधाव पळू लागला.त्या स्त्रीच्या डोस्क्यावरचं टोपलं लांब रस्त्याकडेला जाऊन पडलं.ती अंगाला झटके होती.रक्ताच्या थारोळ्यात जीवाचं आकांत करत होती. डोस्क्यालं भरपूर टक्कर लागली.गाडीची अन डांबरी रस्त्याचीही.एकच धावपळ.आर्त किंकाळ्या.पोरांचा गळा उपटून हंबरडा.पुढं गेलेली मंडळींचं पळत आली.
"काय झालं...?काय झालं....?" म्हणून सारा एकच दांगडू.सारं सारं ते दृश्य क्षणाक्षणांच्या कात्रीने सरकत कापत होतं.धर्तीच्या पोटावर तिथं भयंकर घटना घडत होती.पांढरी शुभ्र चारचाकी गाडी भरधाव वेगात येऊन पुढं निंघून जोरात धक्का देऊन गेली.कोण्हीच तिथं थांबलं नाही.
इकडं वाहतूक खोळंम्बत होती.आवाज वाढत होता.अन त्या स्त्रीचा कमी कमी होत होता.अगदी कंठात हुंदका आडकावा तसा.पुढच्या काचेतून हे सारं दिसत होतं. हळूहळू रुग्णवाहिकेचा आवाज मोठा होत गेला.तसा कमी कमी होत गेला.चिखलात म्हशी रोहकाव्या तशी काही काळ वाहतूक थांबली. पुन्हा सारं होतं तसं झालं.गाड्या पळू लागल्या. आवाज वाढू लागले.इतर दुसऱ्या कामगारांची पळापळ सुरू झाली.संध्याकाळच्या भाकरीची चिंता त्यांचं काळज चिरत होती.ते भाकरीसाठी पोटाच्या पुढं पळत होते.अन दारिद्री भूक पाठ सोडत नव्हती.एक संघर्ष होत होता.माणूस भूक,इतभर पोट,सुख,संपत्ती,संसार,चूल,अन "उद्याचा दिवस कसा....?"या घनघोर संघर्षात जिणं जगत होता.ते आजचं वास्तव समोर आss वासून उभं होतं.
सहलीची गाडी हळूहळू अंतर कापत सिंहगडाकडे पळू लागली.गाडीतले ते चारही जिल्ह्यातले मुलं मुली हळाळून गेले.सितु ते बाहेरचं भयंकर दृश्य निरखून आज बोलत नव्हती.पण तिच्या मनात कैक भावभावनाचे सल अन प्रश्नांचे काटे टोचत होते.ती चरकली होती.काही मुली,मुलं जिल्हा सोडून पहिल्यांदाच शहरात आली होती.त्यांचं या शहराशी पाहिजे तितकं नातं अजून जुळलं नव्हतं.जंगलात हरणासारखं लांडग्यांच्या तावडीतून पळत सुटावं अशा मनाची अवस्था झालेले पोरं शहरी जीवन न्याहाळून बावचाळले होते.इरप्पा म्हणत होता,
"मान्साचं काय बी खरं न्हाई ...कवा मरान यील सांगता येत न्हाई.....!"
वनी मुकाट चेहरा करून त्याच्याकडं पाहत होती.सुनील खिडकीतून बाहेर डोकावू लागला होता.
तेव्हड्यात बगाडे म्हणला,
"कआय खरं नाव....मनला....??
"आरं असचंय इथे.... ज्याचं जळतं त्यालचं कळतंय....!"
अन त्यो बोलायचा थांबला.पुढचे शब्द त्याला रेटेना.सारी गाडी शांत झाली.
गाडी मंद गतीने रस्त्यावरचे खड्डे चुकवत पुढं पळत होती.सिंहगडाचा पायथा अजून लांबच होता.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Comments
Post a Comment