***कथासमीक्षण***
प्रस्तुत
"धडा"या कथेचा कथात्मा हा केवळ वरवर घडलेल्या मुलाला मारण्याची,शिक्षा
करण्याची पद्धती आणि शिक्षकांना अपमानास्पद वागणूक मिळण्याची लहानसहान घटना वाटली
असली तरी त्याच्या मुळाशी एक सखोल दृष्टिकोन रुजला आहे.या थोड्याश्या घटनेतून
कथेचा आकार,पोत, घटनेच्या रूपरेषा
ह्यांना अल्प प्रमाण जरी आले असेल तरी हे सर्वसामान्यांच्या जीवनात घडतं असेच वाचक
समजतील.असे असले तरी ह्या कथेच्या अंतरंगात जाणिवा ठासून भरल्या आहेत. त्या
सामाजिक,शैक्षणिक,नीती,आचारविचार तसेच विवेकाच्या चौकटीला जोखून जाणाऱ्या अश्या आहेत.खरे पाहता
शैक्षणिक व्यवस्था आणि शिक्षक यांची आज वास्तवातली स्थितीगती ही पाहिजे त्या योग्य
बाजूने स्थितप्रवाही आहे असे म्हणजे वास्तवाला आणि समाजमनाला बगल देने ठरेल.हेच
तत्व घेऊन लेखक कथानकाची सुरुवात च एक विवेकशून्य अवस्थेकडे जाणाऱ्या चेतनांनी
करतात.त्यातील पात्र तसे बोलू लागते.सोनीची आजी ही अर्वाच्च शिवांची लाखोंळी ज्ञानदान
करणाऱ्या शिक्षकाला वाहतांना शिक्षण व संस्कृतीपासून वंचीत असलेला घटक व त्याची
मानसिक अवस्था या संवादविधानातून सूक्ष्मरित्या लेखक करू पाहतात. हे लेकाकाचे
कौशल्य व सचोटी कथेला न्याय्यरुप द्यायला लावते.
एकीकडे सामाजिक व्यवस्था आपले पाय पसरून आहे.सामाजिक प्रस्थ असणारी विचारसरणी शिक्षण व्यवस्थेतील कर्मचार्यांशी आणि अधिकाऱ्यांशी एक टोकाच्याभूमिकेत घेऊन सुनावते आहे आणि दुसरीकडे आपली चरितार्थ ,शिक्षणाचा आजमितीचा परिणाम चांगला व्हावा म्हणून नव्यानं शिक्षण घेऊन आलेले आधुनिक विचारसरणीचे पाईक व त्यांच्यावर वरडोई झालेले शासकीय नियम,कारभाराचा अतिरिक्त बोजा या दोन्ही पाळूवर शिक्ष भरडले जात आहेत.हे शिक्षणक्षेत्रातील आजचं वास्तव आहे.
वयाने मुलं मोठी होतात.मात्र त्यांना धड नावही वाचता येत नाही.पाढे म्हणायला,पाठ करायला होत नाही.ही दुर्दशा म्हणजे उद्याच्या अधोगतीची विचित्रता या कथेच्या पार्श्वभूमीवर अभ्यासायला मिळते.याला कारणीभूत असलेले सरकारी धोरणे व "करतंय त्याला जास्त काम"या युक्तीने शिक्षणव्यवस्थेचे सरकार हे शिक्षकांच्या माणगुटीवरील पिवळं हळकुंड होऊन बसले आहे.ते नाव परिवर्तनाच्या रुचण्याने फुटत नाही ना त्याचा रंगही जात नाही.तर त्याच भूभागावर सामजिक मानसिकता ही डामडौलाची अशी आहे."शिकून कुठं मॅडम होनार हाय..."असे म्हणणारी सोनीची आजी ही केवळ आजी राहत नाही तर ती एक सामाजिक अवस्थेची प्रतिनिधी होऊन आपले सामाजिक बाह्यअंतः आवरण उघडपणे दर्शवित राहते.इथे विकासाच्या वाटेला आड बसणारा अधोगतीचा सामाजिक अडसरभाग लेखक उपस्थित करतात.ही बाजू ते जाणूनबुजून झाकत नाहीत तर ते बिनदिक्कत बोट ठेवत वाचकांना कळतात.इथे खरा प्रबोधनाचा शाहू ,फुले,आंबेडकरी विचार झळकायला लागतो.
नवी पिढी नवे रस्ते तयार करणारी असावी.जुन्या मळवाटा ह्या कुणाच्या तरी मालकीच्या व अधिसत्तेने बनविलेल्या असतात.त्यातून नव्या पिढीने जाणे म्हणजे स्वयंशोधनाला टाळणे.आणि जुना रस्ता नाकारण्याचे काम कथेतला "खरात" नामक नवशिक्षित शिक्षक करत आहे.तो परिवर्तनाच्या वारूसारखा आहे.प्रसंगी चुकाही घडतात.हे तो विसरतो आहे.नवशिक्याचं असं असतं. पण यातूनच त्यांना "धडा" मिळतो.शासकीय धोरण व अति कामाचा भार वाहून पोष्टाचीही कामे करणारा शिक्षक व्यवस्थेला नोकर वाटतो आहे.हा काळ आहे.की जे व्यवस्था समजून घेत नाही.शिक्षक हे वर्गापूरते मर्यादित संम्प्रेरक नसतात तर ते कैक पिढ्या घडवतात.युंगांतराचा तो परिवर्तनीय केंद्रबिंदू असतो.मुळात हेच सत्य समाज,सरकारी ध्येयधोरणे,व्यवस्था,शिक्षण क्षेत्रातील अधिसत्ता समजून उमजून घेत नाही.म्हणून शिकवण्यापेक्षा इतर कामे करणारा घरगड्यासारखा शिक्षकांचा अवतार आज दिसायला लागतो आहे.हे सामजिक उन्नतीच्या दृष्टीने फार घातक अश्या परिणामाचे शोकात्म रूप आहे.आणि हेच रूप कथेतून लेखक दाखवीत राहतात.लिखाणातील हे रूपकात्मक वैशिष्ट्ये लेखकाच्या अंगीभूत सामजिक जाणिवांचा स्तर उकळून देत राहते.
शिक्षकांची वर्गवाटनी, पूरक तास विभागणी,बोर्डाच्या नावाखाली फेरमांडणी व पळवापळवी अश्या स्वरूपाची रीत शिक्षण व्यवस्थेने अंगी रुजविली आहे.यातून प्रत्यक्ष काम व उमेद असणाऱ्या श्रममूल्य असणाऱ्या शिक्षक,कर्मचारी,अधिकारी यांच्याच पायावर दगड पडल्यासारखी स्थिती होते.हे या कथेतील चित्रण एक वेगळ्या धाटणीची बाजू घेत लेखक वाचकांसमोर ठेवतात.प्रसंगी शिक्षकावर अधिकार गाजविणारे व अधिकाराने मोठे असलेले अधिसत्ता असणारे राज्यकर्ते हे शिक्षकांना पिळून घेतात.उलट कधी कधी अपमानास्पद वागणूक व नमती बाजू घायला भाग पडतात. चूक नसतांना पदरी नकारात्मक बाजू ऐकूण घ्यायला लावतात.ही अबला शिक्षकांची मानसिकता आजची नाही तर याला काळखंडाचा इतिहास पाठोपाठ उभा आहे.तो पूर्वीच्या काळात धर्मसत्तेने राज्यसत्तेला मुठीत ठेलेला हाय.तर पुढे धर्मसत्तेतील सांप्रदायिक विचारसरणीच्या राजकीय पिलावळीने वेठीला ठेवलेला आहे.वास्तविक धर्म आणि राजकीय परिप्रेक्ष यांची मीमांसा ही अध्ययन अध्यापन व मूल्याधिष्टीत समाजनिर्मिती च्या उद्दिष्टासाठीची सहसंबंध तत्त्वावर असावी.की जी आजतागायत दिसत नाही.भारतीय शिक्षण व्यवस्थेने स्वीकारलेली नाही.ती राजकीय अधिसत्ता किंवा अधिसत्ताक राजकीय प्रबल्यासाठी दूर नेऊन ठेवली आहे.हीच मेख या कथेच्या वस्तूबीजात सूक्ष्मपणे जाणवते आहे.

;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
Comments
Post a Comment