"आमच्याकडील लेखक, कवी, विचारवंत व समाजसुधारक फक्त पुरस्कार घेण्यात आणि बहुमानांनाच चिटकून आहे......!"

"काळ कोणताही असो कालचा,उद्याचा कि येणारा व्यवस्था कितीही क्रूर असो इख पाजणारी असो का खून करणारी, किंवा सदेह वैकुंठास घालणारी असो तिला न घाबरता प्रतिभावान प्रतिभेचा अविष्कार हा जिवंत जाणिवेचा व सत्याच्या बाजूने झुकलेला असावा.कारण सत्य कधीही झुकू शकत नाही.असत्याची कुरघोडी सत्य उलथून लावण्याची जोम अंगी बनवून असते हे अनुभवाने व प्रतिभेने कवी,लेखक,त्त्वविचारवंत व समाजसुधारकांनी विसरू नयेत.या जाणिवेसह प्रखरपणे धूर्त व अविचारांच्या विरोधात गेलं पाहिजे.मानवतेसाठी लढलं पाहिजे.जातिवंत विचाराची खंबीर भूमिका मांडली पाहिजेत.हि खऱ्या साहित्य व साहित्यिक निर्मितीची बावणकसोट सत्य पडताळणी असते.
कारण स्वतःची भाषा ही एखाद्या समूहाची खरी ओळख असते तेव्हा ती दडपण्याचा व त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होत असतो हे भारतवर्ष इतिहास न विसणारे सत्य बाळगून आहे.शब्द हीच खरी त्या समूहाची ओळख असते.समाजाची प्राण असते.ती व्यक्तता असते.आणि लोकशाहीत दलित,कष्टकरी,शेतकरी,श्रमिक,मजूर,पीडित व शोषित केवळ निःशब्द असल्याने अन्यायाचा डोंगर पोखरत बसतात.तो घाव सहन करत असतात.त्यांचा आवाज हि खऱ्या अभिव्यक्तीचा अविष्कार असतो.तेच खरे स्वातंत्र्य असते.आज पुरोगामी विचार मांडणेच जर देशद्रोह ठरू लागले तर खऱ्या स्वातंत्र्याची व्याख्या काय करावी..? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ती गळचेपी का ठरू नये?हि वास्तविकता लाथाळली पाहिजे.
सद्याच्या लोकशाही व्यवस्थेत हात पसरत असलेला दहशतवाद,अतिरेकी राष्ट्रवाद,धर्मांध सत्ताने लाच खात असलेला हिंसक सत्ताबाह्य धोरणाचा अतत्वविचार, शिक्षण क्षेत्राचे होणारे खेळखंडोबाचे भगवे राजकारण,उच्चस्तरावरील विद्यार्थी व प्राध्यापकी वर्गाची मनमानी व्यवस्थेतून होणारी मुस्कटदाबी,आणि यातून निर्माण होणारा त्या व्यवस्थेच्या विरोधातील  जाज्वल्य विद्रोह आणि शिक्षणाचा कलता अपरिपोष ,प्रसार माध्यमांची हेकेखोर विचारप्रवृत्ती आणि भांडवली विचारसरणी,व संविधानाने सर्वसामान्यांना दिलेला लोकशाहीचा आचार- विचार-वचनाच्या अभंगत्वाचा दर्जा हा आता भंग होतो आहे काय? अस सवाल नागासारखा फणा काढून उभा आहे.याची जाणीव आजच्या विचारवंतांना, कवीला , लेखकाला व समाजसुधार विचारसरणीच्या वर्गाला असणे काळाच्या दृष्टीने उचित व परिवर्तनवाद मांडणारे सत्य ठरत आहे.गरज आहे.
भारतात प्राचीन कालखंडापासून प्रतिभावंत व जिवंत जाणिवांच्या विचारसरणीला पोषक असा विचार म्हणजे कि, विचारांना विचार च मारू शकतात,शरीरांना संपवून केवळ माती होत असते.अशा त्त्वप्रणालीने वैकसिक पठडीचा वैचारिक अंगाने झालेला परिवर्तनाचा भाग हा अतुलनीय आहे.रशिया,फ्रान्स, अमेरिका व भारतातीलही इति इतिहास पारखून-पडताळून घेतला तर खरे शब्दानेच क्रांती झाली आहे.लोकप्रबोधन व कलेच्या अविष्कारातून निर्भयपणे झालेली अभिव्यक्तता हि निखळ परिवर्तनाची दिशा व दशा ठरवीत असते.आणि समाजप्रबोधनाच्या चळवळीची ती साधन संपत्ती असते हे लक्षात घेतले पहिजे.
खरे पाहता विचारांचा खात्मा हा विचारांच्या शस्त्रानेच झालेला आहे.आज मात्र वास्तव तसे उरले आहे हे सत्य सांगणे नकारवादी आहे.ती वस्तुस्थितीचा भागच नाही.विचारांचा विरोध आज गोळी,बंदूक, सुरे,जंबे व तलवारी आणि तालिबानी शस्त्रास्त्रे,विध्वंसक जाणिवेने घेतला आहे.मानवतेला हि कलंक लावणारी भूमिका आहे.हि चिंता जे स्वातंत्र्याची व त्यावर विश्वास ठेवणाऱ्या श्रद्धा व मूल्यांना बाळगणाऱ्यांची अस्तित्ववादी ठरणारी बाब आहे.आपण ज्या परिसरात जगतो,राहतो त्या ठिकाणची अस्थिरता, अस्वस्थता आपण लेखणीच्या माध्यमातून निर्भीड व वास्तवाच्या दृष्टीकोणातून मांडली पाहिजेत.आज असे लिखाण नवोदित लेखनकार करतांना दिसून येत नाहीत.जे लेखक, कवी वा समाजसुधारक,तत्ववेत्ते हे अविरत विचारमग्न व अस्वस्थ असतात ते जिवंत जाणीवा जन्मास घालतात.ते खरे वास्तवाचे निरपेक्ष इतिहासकार असतात.याउलट जिथे अस्वस्थता हि केवळ सोंगी चादर अंगावर घेऊन उभी आहे तिथे जाणिवांच्या व प्रतिभेच्या विचारांची उत्पत्ती होईलच असे नाही.सत्य ते कि ज्या लेखण्या केव्हाही जिवंत असतात....!"



...............................................
























Comments

Popular posts from this blog