"त्याहिचा गजानन-गन्पती-गण
हाये ध्यास आंम्चा प्रबोधन जण...!"

 कडक्डून डसू ***माझ्या स्नेहीजनो......***
"पहाटव्याखालच्या झिलाव्यात उठून अंघोळ करून तयार झालो.अन कमवा आणि शिका योजनेसाठी वसतिगृहातून बाहेर पडलो. तोच भ्रमणध्वनीवर माय बोलू लागली.....
"इसू कसा ह्ये माय तू??? तुलं म्हंन्लं व्हतं की,घरी ये.लाह्यनी भहीन येईल.पव्ती पुनव करून जासील.घास दो घास पोटात जाईल....पण कुठं आयक्तु तू....तुही मयाच तुटली शहरानं जगून..…..!"
माय धडधड बोलत व्हती.अन काळजालं घरं पडत व्हते.म्या नुसतं हूं.. हूं..हूं.. करत पाय पुढं वढंत व्हतो.मंग बा बोलले...
त्या दोघा जीवालं ..."ह्यो इसू शहरात राहून काय तरी शिकतोय....बड्या लोकाइत उठ बस करतोय...अन काय तर चांगलं लिव्हतोय.....ह्येच अप्रूप हाय.....!"
भ्रमणध्वनी बंद झाला.रोज ह्याच येळलं बोलणं होतं.बोलतो बदलत्या काळात येळ मिळल तसं. कधी कधी पत्रही पोच होतं त्यांचं...नवीन उत्तरही जातात घराकडं.मायेनं. रोजचा दिनक्रम उरकण्यासाठी धावपळ सारी....
नंतर थोडं पळत कमवा आणि शिकाच्या इमारतीकडे जाऊन सकाळची परेड झाली.गटाने कामावर हजर झालो.तो भ्रमणध्वनी खनानु लागला.पहिला फोन सुदान मधून अम्युलिअस चा होता.....सारं फाडफाड इंग्रजी बोलत होता.....कळायचं ते कळलं....नंतर बोलला की, हार्डीक शूबेच्या.....
मलं इतकं हसू नि अप्रूप वाटत होतं की,चार पाच महिन्यांची विद्यापीठातील दोस्ती नि परभाषा शिकण्याची गरज....नवं काहीतरी देऊन जात होती....त्यो सुदान मधून ही मैत्रीची नाळ तोडू शकला नाही...ह्यो काळजात आनंदाचा क्षण भरीव करत होता.त्याचे शुभेच्छांचा वर्षाव करणारे दोन मेल आले.इथं चार महिन्यात अम्युलिअसलं जेव्हढं मराठी भाषेचं आकलन शिकविता येईल तितकं शिकविलं.कसा बसा बोबडे बोल बोलत होता....शिक्षणांनातर त्याचा व्हिजा संपुष्टात येऊन तो जाणार तो गेला.पण त्याची मैत्री ही आठवण ठेऊन गेला.
आठ वाजेपातूर गवतगुळी कापली.काही क्षणाची विश्रांतीसाठी नियोजित वेळात भ्रमणध्वनी बघतो त वीस बावीस जणांनी आठवण केलेली.पुन्हा आवाज घुमू लागला.सर्वांशी बोलणं झालं.हा स्नेहीभाव होता.दक्षिण आफ्रिकेतून टाटा मोटर्सचे स्नेही बोलू लागले.शुभेच्छा दिल्या.....त्याचवेळी आंतरजालावर भरपूर संदेशांचा पाऊस पडत होता.त्यात जी.बी.ए. कंपनी मित्र व साहेब,टाटा कंपनीतील मित्र मंडळी,डी.एड.चे बरीच संपर्कात राहिलेली मितृत्वता व विशेषतः शिक्षकवृंद,संगीत क्षेत्रातले दिगग्ज स्नेही,साहित्यातील कवी,लेखक,समीक्षक,वाचक व प्रकाशन,प्रकाशन संस्था यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
लहानपानातील मित्र अजूनही विसरले नाहीत.दहावी,बारावी,ग्रॅज्युएशनचे,प्रशिक्षण शिबिरातील मित्र,शिक्षक,पत्रकारितेतील,टीव्ही रिपोर्टिंग, पोलिसी संरक्षण यंत्रणेतील मित्र,फेसबुक,व्हाट्सप,ट्विटर,मेल,इन्स्टाग्राम वरील फॉलोअर्स,ब्लॉगचे वाचक,टीकाकार, स्नेही,चर्चासहकारी,पुस्तक वाचन चळवळ पुणे मित्रमंडळ,व वाचक वर्ग व गटसमुह वैचारिक भेद व टीकास्त्र करणारे मित्र, सी,आर,पी,एफ,जवान आणि कमंडन्ट साहेब,फिल्म व रेडिओ,नेहरू युवा केन्द्र संघटन युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार-पुणे-मुंबई,गोवा,दिल्ली व हरियाणा,रिसर्च टीम,गायन क्षेत्रातील परमप्रिय व्यक्ती,पथनाट्य ग्रुपचे सदस्य कार्यकर्ते,शाहिरी व पोवाडे कलाकार मंडळी,ललीतकला केंद्रातील मित्रत्व लाभलेले सर्व मित्र,परिवार,सर्व स्नेहीजन आणि विद्यापीठातील,झारखंड व छत्तीसगड,नाशिक मधील आदिवासी विभागातील प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी,बुलडण्यातील समाजकल्याण विभाग अधिकारी व मित्र परिवार,लोणार ओळखीचे सर्व बंधू व शारा गावचे लंगूटीमित्र,गुजरातचे पाव्हने,डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण व प्रशिक्षण संस्था बार्टी-पुणे अधिकारी व मित्र परिवार,टाटा इन्स्टिट्यूट व सोशल सायन्स..... आग्ऱ्याचं मित्र संघटन,मराठी विभागातील,कमवा आणि शिका योजनातील मित्र,अनेक चळवळीतील मित्र मैत्रिणी व काळजातील प्रिय व्यक्तींनी या आठवणीला कोरत हा दिवस आनंददायी केला.
दुपारी विभागात तास झाले.तासाच्या वेळीही खूप भ्रमणध्वनीवर आठवणी झाल्या.नेहरू युवा केंद्राच्या वतीने कार्यक्रम पार पडला.संध्याकाळच्या वेळी वसतिगृहात जेवण झाले.त्याचवेळी डी.एड.चे सर पुण्यात येउन गेल्याचे कळले.खंत वाटली.भेटू शकलो नाही.मराठी विभागाच्या मित्रांनी माझ्या पश्चातच केक आणून छत्रपती उद्यानात कार्यक्रम ठरविला.बोलवून घेऊन केक कापनी झाली.मोठा आनंद डी, एड,नंतर कोणीतरी वाढदिवस साजरा करत होतं..... लहानपणी हे असं काही नव्हतं....
म्या म्हणलो, "एरर काय गड्या हे मलं पटत नाही....कश्याला खर्च ह्यो....."
मित्र बोलू लागले....."काय नाय साठे सर...."
"पुनःयंदा हाव का हामी तुमच्या सोबत...."
".....असा क्षण पुनश्च नसतो विश्वनाथ....."
म्या बोललो ,
"नको हे....पण पोरं कुठं आय्कतात्...काय.... आनंद होता....भरात....."
असो एक आठवण सांगतो......
" इसुबानं घरच्या पत्त्यावर पत्र पाठवलं हाय....."
बा म्हणले....
"त्यो इसरला नाही अजून मलं....."
अजून महत्वाचं रात्री काही काळजातील व्यक्तींनी दीड वाजता संदेश करून ठेवला...तो सकाळच्या वेळी आठला वाचला.....बरं वाटलं.....काही महिन्यांपूर्वीपासून स्नेहार्द्रतेत बोलणं कमीच झालं...संवाद बंद ...."
"मन कुढतात हो अश्याने....."
"मनाला वाहत्या पाण्यासारखं ठेवलं की निर्मळ राह्यतं".... बा म्हणतात...
सो "वेळ मिळेल तसं बोलू ब्वॉ....."
"मही त ह्ये अशी गरबड चालू अस्तित् मंग....
असो अश्यात गावाकडून समीक्षेसाठी काही नवीन पुस्तकं आलीत....त्यावर लिहायचं..वाचन चालू आहे....पळ पळ रोजची....विभाग,मराठी ....नवं नियोजन...ग्रेट भेट.....अस्तित्व....बिमार....प्रेस व्हिजिट.....गायन....नवी कादंबरी.....तीन लिहून झालेल्या कथा...व गीत....कविता.....अजून न संपलेली.....बरंच आहे......
या सर्व रगड्यात आपण मला आपल्या जीवनातील मौल्यवाण असा अमूल्य वेळ देऊन प्रेरणा,शुभेच्छा...आठवणी... स्नेहार्द्र भेटी.....व काळजतोड शब्द दिले...शतशः ऋणात राहू इच्छितो....आपलं प्रेम...स्नेह....मया...... मार्गदर्शन...... टीका.....टिकास्त्रेच्या खुणा....'काळीजफोड विखार...."......अपुल्की.....लोभ.....आणि खूप काही या दिवशी विश्वात सामावलेले आहे.......ते टिकत राहून मानवतेचया कल्याणार्थ संघर्षवत राहण्यासाठी हा दिवस कायम आठवणीत राहील.....
आपणा सर्व मान्यवर.....जेष्ठ.....मित्र.....प्रिय व्यक्ती.......मार्गदर्शन -मार्गदर्शक....व चळवळीचे कार्यकर्ते यांचं.......साहित्यक्षेत्र....शिजशन ....युवा व क्रीडा मंत्रालय...भारत सरकार....नेहरू युवा केंद्र......संगीत.....कला....ललीतकला...गायन....नाते ....तुम्ही सर्वांनी मिळून हा दिवस अनमोल केला आहे....याची धन्यवाद देऊन परतफेड नकोच.....
या सर्वांचा विश्वा स्नेहार्द्रतेत काळजकोर शब्दतो...
"विश्वा सत्य विसर न हो.......!"
न गेला

**इथलं वास्तवि सत्य*** "जगण्यासाठी जर भाकरीचीच गरज असेल तर त्या भाकरीपेक्षाही कधीही इभ्रत मोठी आहे.महान अशी आहे.मोलाची आहे. स्वाभिमानाची तलवार अशी भाकरी अन लाचरीच्या दगडावर मारून झिजवू नका. स्त्रियांची इभ्रत ही हातातल्या बांगड्यासारखी. कचकन तडकणारी.तिला सावरावं.तितकं मनगटाला पीळ येतो.समाजाने स्त्रीची आब्रू जपली पाहिजे.त्यांना मानाचं जीवन जगणं देण्यासाठी कटुन मेलं तरी मरण स्वीकारलं पाहिजे.धर्मांधवृत्तीने नि जातीपातीच्या खेळीने समाजाला चौकडात उभं केलं आहे.आणि अर्थ-विचार-शिक्षण-एकात्मतेच्या अभावाने माणूस पूर्णतः खंगून गेलेला आहे.वैचारिक गुलामीने नि बुद्धीने नग्न झालेला समाज वास्तवातल्या इखारी उन्हांनं भाजत आहे. पुरुषार्थाने आत्तापर्यंत स्त्रीला भाक्री कोर्ड्याशापुरतं चौंकटीत खुटवून ठेवलं आहे. त्यांना दिशाहीन विश्व दिलं आहे.कामवासनेची भूक भागविणारी वस्तू म्हणून तिला व्यवहारात स्थान दिल्या गेलं आहे नि ते आजपातूर कायम तस्सचं आहे.वास्तवात समाजात चाललेल्या घटनांवरून हे सत्य नाकारता येत नाही की, आज स्त्री ही सुरक्षित जिणं जगत आहे. "माणूस्की निवांत नि सुखांत आहे का?"असा सवाल इथे येतो..मनुष्य प्राणी जाचाच्या जळात उभा आहे.त्यातल्या त्यात स्त्री तर बाप-भाऊ-पती-दीर-सासरा-समाज या रुढीने ब्रूसटलेल्या परिघाच्या केंद्रक्त ती मल्लूल होऊन बसली आहे.फक्त स्त्री नाही तर एक मानवजातीच तीत अडकली आहे.स्त्री ही त्यातील तळातली बाब.हे परिवर्तन आज मह्यापासून-तुमच्यापासून झालं तरच सत्य वास्तव.नाही तरी व्यवस्थेशाहीच्या टोळम्हशी आपली नाकं रगडून जात आहेच पुढं.त्यांना स्वाभिमानाच्या अब्रूदार वाधीनं चोपून काढणे एकून आपल्या हातात आहे.ती वाधी अशी गहाण ठेवून चालणार नाही!"

Comments

Popular posts from this blog