***प्रेस व्हिजिट***
"सामाजिक मानसशास्त्र विकलांग होत असतांना चळवळींचे अस्तित्व....आणि हिंसात्मक दंगली....!"

सामाजिक न्याय
समतेने स्वाभिमान जिंकण्यासाठी लढायचं असेल आणि इतिहास राखून नव्या पिढ्यांचं
प्रबोधन घडवायचं असेल तर आधी एक झाले पाहिजे.विभागलेल्या तुकड्यात्मक विचारशैली
आणि चळवळींची कार्यशैली यांच्या असंबंध धोरणांमुळे आज अशी अवस्था झाली
आहे.वर्चस्ववाद आणि अधिसत्तेची हुकूमशाही जर मुळातून संपवायची असेल तर असे तुकड्या
करून जमणार नाही.खरे तर सामाजिक एकता आणि मूल्याधिष्टीत समता प्रस्थापित झाली
पाहिजे.म्हणूनच विवेकाने भिमा कोरेगाव हल्ल्याचा तीव्र निषेध.
आजच्या वास्तवाची अन्यायग्रस्त वाताहत समजून घेण्यासाठी मुळात इतिहासाची पाने चाळली पाहिजे.याची मीमांसा करतांना महत्वाचं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा आदेश शिरसावंद्य मानून दलित-शोषित-पिडीत-वंचित समाजातील लोक शिकू लागलेत.स्वातंत्र्य,समता,बंधुता शिक्षणामुळे नवी चेतना नि जागृती त्यांच्यात निर्माण झाली.समाज वाचू-लिहू लागला आणि स्वतःला व्यक्त करू लागला.यामुळे आचार-विचार-अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य या शिक्षण व विचारांनी दिलं आणि या समाजातून नव्याने शिक्षण घेऊन जागृत झालेल्या पहिल्या पिढीतील लेखक-कवींनी आपली लेखणी या शोषक व्यवस्थेच्या विरोधात उगारली.साठोत्तरी कालखंडात ही माणसं सुरुवातीला कविता आणि आत्मकथनातून व्यक्त होऊ लागली. स्वतः भोगलेलं दुःख,दारिद्र्य,उपेक्षा,शोषण,उपासमार,आणि जाणिवा याविषयी लिहू लागली.अभिव्यक्तीला नवा फुलोरा हाती लागला.आणि आतापर्यंत जे साहित्यात आलं नसलेलं जग बिनदिक्कत,लाजतबुजत कधी प्रस्थापित व्यवस्थेच्या शिव्यालाखोळ्या खात ते साहित्यव्यवहारात येऊ लागलं होतं.एका नवीनच विश्वाची-जीवनाची ओळख या साहित्यातून पहिल्यांदाच वाचकांना झाली. आणि या साहित्याला ‘दलित साहित्य’ असे नामाभिधान प्राप्त झाले.दलित-शोषित-पीडित-वंचितांच्या व्यथा,वेदना मांडणारं,त्यांचं दुःख वेशीवर टांगणारं आणि या शोषक व्यवस्थेला नग्न करणारं हे साहित्य होतं.या साहित्याची प्रेरणा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवमुक्तीचा विचार आणि भारतीय संविधान ज्या चतुःसूत्रीवर भरभक्कमपणाने उभं आहे, त्या समता-स्वातंत्र्य-न्याय-बंधुतेचा विचार राहिला आहे.इव्हन त्या वैचारिक बैठकीची मुस या साहित्याने अंगिकारली.या साहित्यविश्वात नंतर कथा,कादंबरी,नाटक हे साहित्यप्रकारही अत्यंत ताकदीने आणि वैचारिक स्तरावर हाताळले गेलेत.ललित,वैचारिक,मीमांसा आणि शैलीने विचारलेखन होत राहिलं.आणि एकाहून एक सरस अशा साहित्यकृतींनी तथाकथित मराठी साहित्यविश्व गरगरू लागले.प्रस्थापित साहित्यविश्व हादरून जाऊ लागले.दलित साहित्याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण झालं.या प्रवाहात लिहिल्या गेलेल्या कथा,कविता, कादंबरी,नाटक,आत्मकथन या साहित्यप्रकाराला ‘दलित’ हे विशेषण लावून त्याचे उदात्तीकरणही त्या काळात केले गेलेले आपणास दिसते.परिणामी हे कधी व्यवस्थेला रुचत नव्हतं तर कधी ते नवखं म्हणून ते आवडतही होतं.यामुळे साहित्यव्यवहाराबरोबरच सामाजिक,वैचारिक चळवळी उभ्या होत गेल्या.समाज एकसंघ घडू लागला.नव्या चेतना व जाणिवा-जागृतींनी डोळे उघडू लागला.ही परिवर्तनाची दिशा पूर्व होती.
वास्तव बदललेलं आहे.आज विवेक व सामाजिक जाणिव नसलेल्या कमबुद्धी जमावांनी हातात दगड घेतलेत,परंतु प्रबोधन व परिवर्तनासाठी हातात पुस्तक असले पाहिजेे हे सत्य आहे.दगड्डाच्या जोरावर मानवी जीवनातील मूल्य निर्माण करता येत नसतात.वेळ आली तर दगड घेणारी मनगटात ताकद असू द्यावी.मात्र पुढील पिढ्यांना उच्चशिक्षित करून दगडांचा बदला हक्क व अधिकाराच्या जोरावर प्रशासनातील मोक्याच्या जागा पटकावून नवी सुव्यवस्थेशाही निर्माण झाली पाहिजे.की जी सामाजिक प्रणेत्यांना ग्राह्य होती.वास्तविक दगड मारणार्यांची पोरं उद्याही गावगुंडच होत जातील.पुढील पिढी काय दगड झेलणारी आणि दगड मारणारी तयार करायची आहे...???
आज वर्तमानात संयम राखून सत्य व निष्ठेने स्वाभिमानापोटी पिढीचा विचार केला पाहिजे..!
सामाजिक मानसशास्त्र आज विकलांग होत आहे.सर्वसामान्य जनतेच्या ब्रेनवॉशिंग करणाऱ्या जणू बाजारपेठा उभ्या राहिल्या आहेत.या धर्तीवर सामाजिक मानशास्त्रांचा अभ्यास करणारा वर्ग दिसत नाही.आज तोल गेलेला समाज असमतोलपनर जिणे जगत आहे.मात्र विचारांची सामाजिक परिस्थितीचे मीमांसक घडत नाहीत.व्यक्तीला एकट्याचे नियंत्रण असू शकते मात्र जमावाला नियंत्रण नाही.विवेक व सामाजिक सुव्यवस्था हरवत चाललेल्या मानवी समूहाचे विश्लेषक आज तोंड बांधून बसलेल्या अवस्थेत आहेत.समूहमनाचा,मानसशास्त्राचा विचार कुणीच करत नाही.कोणत्याही मीमांसकाला आजच्या वास्तवात समूहाला विवेकाची मानसशास्त्रीय बैठक देण्याचा आज अभ्यास होत नाही.हिंसक आणि रक्तपात घडवून आणणाऱ्या विचारसरणीला चोपविता येणारे मानसशास्त्र आज उपलब्ध नाही ही खेदजनक बाब आहे.चळवळींनी हे सत्य समजलं पाहिजे.धर्म,राजकारण,अर्थ,नीती,शिक्षण,आणि खास करून विकृत चळवळींच्या मुशीतुन हे जहर ओतले जात असतांना सामाजिक मानवी मनाचा भपका होत आहे.आणि यातूनच दंगली,हिंसाचार,रक्तपात आणि संघर्ष पेटल्या जात राहतो आहे.
सामाजिक स्थिरता टिकविण्यासाठी समता आणि जागृती निर्माण व्हायला पाहिजे.त्यासाठी जातीय राजकारण आणि धर्मांध नीतीला नेस्तनाबूत करून एक प्रवाह तयार करवा लागेल.ही प्रक्रिया थोर विचारवंतांनी दिलेल्या मार्गाने यशस्वी होईल.जेव्हा गटागटात विभागलेले बळ एकत्र येतील तेव्हाच या अमानुष व्यवस्थेचा डोलारा पाडल्या जाईल.येणाऱ्या पिढ्या सुरक्षीत राहतील.आज हे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे.समाज सजग राहिला पाहिजे.
पुढे नव्वदोत्तर कालखंडात जी सामाजिक परिवर्तनाची हुसळण झाली ती जागतिकीकरणाच्या विळख्यात सापडली. जागतिकीकरणानंतरच्या ‘खाउजा’ धोरणात सामाजिक चळवळींची चहूबाजूंनी मुस्कटदाबी केली.नव्या अर्थनीतीमध्ये सामान्य जगण्याचे प्राधान्यक्रम बदलले.चळवळी तथाकथित एनजीओंनी गिळंकृत केल्यात.विकलांग होत गेल्या.अर्थहीन त्यांची गती होत राहिली.मानवी अधिकार आणि हक्क मागणाऱ्या प्रत्येक आंदोलनाची धार या व्यवस्थेनं बोथट करण्याचा प्रयत्न केला.आणि अन्यायाची शृंखला मात्र आजतागायत चालूच आहे.नामांतराच्या झंझावातात सामाजिक आणि राजकीय भूमिका स्पष्ट होत-होत सामजिक आणि प्रबोधनाच्या विचारांच्या मुठी आवळून रस्त्यावर उतरणारी पिढी नव्यानं व्यवस्थेला जरबी बसवीत होत्या.‘रिडल्स इन हिंदूइझम’ च्या मोर्च्यात ह्या चळवळी आणि विचारसरणी पहिल्यांदा रस्त्यावर उतरत होत्या.आंदोलनात भाग घेत होत्या.
ह्याच काळात रामाच्या नावाने रथयात्रा निघाली.बाबरी मस्जीदीचा ढाचा उध्वंस्त करण्यात आला,६ डिसेंबरलाच बाबरी मस्जिद पडण्यामागे भारतीय संविधान,आंबेडकरी समाज आणि मुस्लीमांच्या विरोधातला हा छुपा राजकीय अजेंडा होता.तोच अजेंडा आज आमच्यासमोर सनातनी दहशतीचा राजदंड घेऊन उभा आहे.हे काही आता लपून राहिलेले नाही.त्यानंतर मुंबईत झालेली ९३ ची जातीय दंगल आणि त्यासोबत झालेले बॉम्बस्फोट घडून आले.हा इतिहास महाराष्ट्र् पाहत होता.आराजकतेने पोळत होता.हजारो संसार उध्वस्त करून १६ वर्षे अविरत चाललेल्या नामांतराच्या लढ्याला १४ जानेवारी १९९४ ला पूर्णविराम मिळाला.मात्र पुढील अवघ्या तीन वर्षात रमाबाई आंबेडकर नगराचे नृशंस हत्याकांड घडले,पुढे खैरलांजीने तर गोरगरीब,दलित,आणि अन्यायग्रस्त काळजाच्या चिंध्या चिंध्या झाल्या.हृदय पिळवटून टाकेल इतके अमानुष,मनुष्यत्वाची विटंबना करणारे हे हत्याकांड होते.हे हत्याकांड म्हणजे जातवास्तवातल्या पुरुषसत्तेचे लिंगाधिष्ठीत अधिपत्य अबाधित ठेऊन समग्र दलित-बहुजन स्त्रियांवर दहशतीचा अंमल कायम ठेवण्यासाठी जातीयवाद्यांकडून केली गेलेली हिडीस नि विकृत कृती होती.ती वृत्ती विवेकहीन होती.या अमानुष घटनेचा एकमेव साक्षीदार भैय्यालाल भोतमांगे न्यायाची प्रतीक्षा करत शेवटी दुःखाच्या हलाहलातच कायम चळवळींना आणि प्रबोधनशैलीला अपराधी करून गेला.भैय्यालाल भोतमांगे गेल्यानंतर, त्यांना त्यांच्या हयातीत न्याय मिळवून देऊ शकलो नाही,ही बोचरी जाणीव आयुष्यभर चळवळीला कुरतडत राहणारी अशी आहे.ती घटना न्याय मागत आहे.म्हणून दलित-बहुजन स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार हे पर्यायाने नैतिक खच्चीकरणासाठी बहुजन अस्मितेवर केलेले हल्ले होत,अन्याय करणारे कृत्य होय.याची जाणीव कायम असली पाहिजे.अजूनही हे अन्याय-अत्याचाराचे सत्र समाजात चालूच आहे.खैरलांजीच्या हत्याकांडानंतर भगिनी मोठ्या संख्येने चळवळीत अधिक सक्रीय झालेल्याच आहेत.सुरेखा आणि प्रियंका भोतमांगेला साक्षी ठेवून येणाऱ्या काळात दलित आणि बहुजन स्त्रियांच्या सुरक्षिततेची हमी आता चळवळीतील सर्व बांधवांना घ्यावी लागणार आहे.
इतिहास पहिला तर १४ ऑक्टोबर १९५६ च्या आधीची सर्व मानसिक अवस्था नि बौद्धिक गुलामगिरी नाकारणे हे काळाने चळवळींना शिकविले.त्यामध्ये प्रज्ञा-शील-करुणेचा अंगीकार करणे करणे आणि समता,स्वातंत्र्य,न्याय व बंधुतेचा पुरस्कार करणे हेच मुळात बेबंधशाहीला न पटणारे वास्तव होते.बुद्धीप्रामाण्यवाद-विवेक नि तर्काचा स्वीकार करून अज्ञान,दारिद्र्य नि दुर्बलतेला नकार देणे ही स्वाभिमानकपणे वैचारिक चळवळींनी घेतलेली मानसिकता पुढे अस्पृश्यता,जातीभेद,चातुर्वर्ण्याला नकार देत राहिली.यामुळे सामाजिक परिवर्तनाची मेख उभी राहिली.आणि भेदाभेदाच्या तत्वज्ञानाला हादरे बसू लागले.या विचारविरोध संघर्षाची बाजू उभी होत होती.या संघर्षाला धर्म,राजकारण,समाजकार,शैक्षणिक ध्येयधोरणे आणि मानसिकता आदी बाबी कारणीभूत होत्या हे कुणीही नाकारू शकत नाही.
आज समग्र स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरणारा विचार चळवळींनी अंगीकारला पाहिजे.ब्राह्मण्यशाही,सामंतशाही नि भांडवलशाहीला नाकारून वास्तव आणि सत्यविवेकाने चळवळींना नेणेे गरजेचे आहे.त्याचबरोबर देव ही संकल्पना व धर्माचे खोटे थोतांड-कर्मकांड यांना जी प्रस्थापित व्यवस्थेत मोकळीक आहे तीच नाकारून ही विवेकशील प्रगल्भतेची ग्वाही होती.लोकशाही समाजवादाचा स्वीकार करणे हे काळाचे सत्य आहे.समाजपरिवर्तनाचे तत्वज्ञान स्वीकार करणे आणि माणसाला केंद्रीभूत ठेवून त्याच्या सर्वंकष मुक्तीचे नि कल्याणाचे तत्वज्ञान नसानसांत भिनवले पाहिजे.अखिल जगतातील जो-जो कोणी असा विचार नि आचार आत्मसात करणारा असेल तो विचार एका मानवतावादी अशा महान तत्वज्ञानापाशी येऊन थांबला पाहिजे.आणि हे आंबेडकरी तत्वज्ञान जगभरातल्या सर्वच पिडीत,शोषित,वंचित घटकासाठी मुक्तीचे महाद्वार बनले आहे.वास्तविक आज एव्हढी ताकद नि सामर्थ्य चळवळींनी पेललं पहिजे.
आता तर वास्तव हे आहे की,सामाजिक-राजकीय संघटना विखुरलेल्या अवस्थेत काम करत आहेत.त्यांची तुकडे पडत आहेत.छोट्या-मोठ्या चाळीसच्या वर राजकीय संघटना आणि पक्ष आहेत,हे सर्व राजकीय पक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिरोधार्ह मानतात.इतरही सर्वच जाती-धर्माच्या,आंबेडकरेतर समाजामध्येही एकाच घरातील ४ सदस्य चार वेगवेगळ्या दिशेला तोंड करून चार वेगवेगळ्या राजकीय पक्षात पदाधिकारी म्हणून वावरत असतात.एकत्र येण्याची ते मानसिकता हरवून बसले आहेत.तरीही चळवळ सुरू आहे.एकत्र येणे ही काळाची गरज आहे.बऱ्याचवेळा ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’च्या नावाखाली ज्याच्याकडून राजकीय लाभ मोठा त्याच्याकडे हे सर्व राजकीय पक्षातील नेते झेपावतात.हे सर्व आंबेडकरी आणि आंबेडकरेतर जाती-धर्माचे राजकीय नेते अशा मिळालेल्या संधीच्या गरम तव्यावर आपापली पोळी भाजून घेतात.की जे संघाचे वास्तव बोलकं असे आहे.तसे समाजात घडत आहे.कार्यकर्ते उपाशी राहिले तरी कुणालाही काही घेणे-देणे राहत नाही.अशी एकूण स्थिती सगळीकडेच असतांना आणि सर्वच जाती-धर्मातील लोक सर्वच राजकीय पक्षात नि संघटनांत काम करत असतांना.टीका मात्र आंबेडकरी चळवळीतील नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर केली जाते.कारण विरोधकांच्या नजरा खिळून आहेत.आंबेडकरी चळवळीतील नेत्यांवर ही टीका कुत्सितपणे,तुच्छतेने आणि छुप्या जातीय अहंकारातून होत असते.त्यामुळे आपोआपच सामाजिक चळवळींचेेही नैतिक खच्चीकरण करण्याचा त्यांचा डाव साधल्या जातो.आणि चळवळीतल्या फुटीरतावादी विचाराने कधी कधी ते घडतेही.या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींनी या मुद्द्याकडे गांभीर्याने बघण्याची नि विचार करण्याची वेळ आता आली आहे.तरुणांनी सजग राहून राजकारणात उतरण्याची ही वेळ आहे.पारदर्शक राजकारण करून जो गढुळ्पना त्यात आहे तो निवळून काढून टाकण्याचा,हा काळ आहे.काळाचा रोख विचारात घेतला पाहिजे.आज काळ असा संवेदनशील बनत चालला आहे.
मानवी समूह हा एकीकडे तंत्रज्ञानाने केलेली क्रांती,विविध होणारे बदल व विकास हातात आलेले स्मार्टफोन,ल्यापटोप, इंटरनेट,साहित्यात येणारे शैलीचे व अभिव्यक्तीसाठी व्यक्त व्हायला उपयोगी पडणारे माध्यमे,उत्तरआधुनिकतेचे वाहणारे वारे आणि दुसरीकडे विवेकवादाची कास धरणाऱ्या डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे,प्रा.कलबुर्गी यांच्या झालेल्या हत्या, पेरूमल मुरुगन यांनी जिवंतपणीच लेखकाचा जाहीर केलेला मृत्यू,रोहित वेमुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडणे,नितीन आगेची हत्या,उना येथे दलितांना केलेली अमानुष मारहाण,समाजातली वाढती असहिष्णुता,अवती-भवती फोफावलेला वृथा राष्ट्रवाद आणि वाढत चाललेला सनातनी दहशतवाद,जातीय दंगली,जाळपोळ,मारहाण,अशा नि अशाच घटनांचे व्रण पचवत मानवी समूह तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत जगत आहे.कालच घडलेली भीमा कोरेगाव दंगल यात कुव्यवस्थेशाही आपले पाय पसरवून सुव्यवस्था संपुष्टात आणत आहे.अराजक माजवीत आहे.धर्मांध विचारसरणी समाजात जातीय दंगली,हिंसात्मक वळण लावून अस्थिरता निर्माण करीत आहे.आणि माणूस विवेकशून्य होत स्वअस्तित्व हरवीत चालला आहे.हे विसरले नाही पाहिजे की,सामाजिक एकता आणि समानता लोकशाहीला भक्कम करणारी मुल्ये आहेत.सामाजिक जीवनात यामुळे सलोखा आणि सामाजिक न्याय तत्वावर एकमेकांचा एकमेकांशी जनाधार प्राप्त होत असतो.परंतु या मुल्यांची जागोजाग पायमल्ली करत त्या अनुषंगाने असलेली कायदेही धाब्यावर बसविणारी विचारसरणी सामाजिक हालचालीतच असते.ती संपत्ती आमिषे आणि गुंडशाहीच्या राजकीय खेळीने पोसल्या जाते.सामाजिक अस्थिरतेने समाज पोळून निघत आहे.यामागे अज्ञान,दारिद्र्य,भूक,हिंसकवृत्ती आदी कैक कारणे सापडतील.म्हणूनच विषमता ही रुजत जाते.म्हणूनच आज सामाजिक आरोग्य हे महारोग्यासारखे झाले आहे.
मूल्याधिष्टीत सामाजिक मानसिकता ही विकलांग होत असतांना मुल्यांची गोष्ट करायची झाल्यास शोषकांच्या युक्त्यांमधील प्रभावामुळे कधी कधी मूल्ये बाजूला पडतात.सामाजिक मूल्ये ही त्या समाजाच्या स्थिरतेच्या बळावर उभी असतात.आराजकतेने ती दुर्लक्षित होतात,पण मूल्ये मरत नाहीत.ती अस्ताला जात नाहीत.ती असतात पण ती बाजूला पडतात एवढेच घडते.बाजूला पडणे म्हणजे मृत्यू नव्हे,पण बाजूला पडलेल्या मूल्यांना विवेकामुळे शक्ती लाभते.तर्क वापरल्याने या मूल्यांना जीवनात प्रतिष्ठा प्राप्त होते.सत्याचाराची राजवट येते आणि या मूल्यांच्या विजयाच्या चौफेर शक्यता निर्माण होतात.आणि हीच जीवनमूल्ये आणि कलामूल्ये साहित्याला स्वतंत्र अस्तित्व बहाल करणारी ठरतात.ही मूल्ये मानवी कल्याणासाठी उपयुक्त असतात.
ज्ञान,विवेक,सत्याने लोकशाही व्यवस्थेची स्वतः मानवतावादातून उभारणी कराण्याची नित्तांत आवश्यकता असते.भुकेल्या व गुलामांचा लढा हा सत्तेच्या व संपत्तीच्या एकधिकारशाही मिळविलेल्या प्रस्थापितांच्या विरोधात असतो.हुकुमी व्यवस्थेच्या विरोधातील लढ्याला मुस्कटदाबी म्हणून मोर्चे,आंदोलने,उपोषणे,मिरवणूक,सभा,यावरतव्यवस्था अडमार्ग आणत असते.अश्यावेळी स्वतंत्र विवेकाच्या अंगाने व सत्याने विचार करून लढ्यासाठी झटून सामोरे गेले पाहिजे.वर्णवर्चस्ववादांच्यामुळे राजकीय,सांस्कृतिक,आर्थिक,मानसिक,
भाषिक,संघर्ष उभे राहतात.ते अस्तित्वाचे द्वोतक असतात.तळागाळातील शोषितांना यावेळी या व्यवस्था समजून घेणे गरजेचे आहे.म्हणजेच परिवर्तनाची नांदी यास्तव दुसरा मुक्तता मार्ग नसताे.याचबरोबर जुन्या-नव्या परंपरागत रितिरुढी,चाली,रिवाजांचा अभ्यास तठस्थेने आणि चिकित्सक वृत्तीने केला पाहिजे.इतिहासाचे मूळ शोधले पाहिजे.का?कश्यासाठी ?कसे व केव्हा?असा सखोल अभ्यास केला पाहिजे.ज्ञानार्जनाची सततता ही परिवर्तनाला दिशा देत असते.ती टिकून ठेवण्यात यावे.शील,स्वभाव,आणि ज्ञानाची आजतागायतता लढण्यास स्वयंपूर्ण,सिद्ध व निष्ठतेचे प्रेरितं प्राप्त करत असते.बुद्धीच्या कसोटीवर घासून मानवतेला पोषक अशी लोकशाही निर्मिती ही सुधारकी राज्यव्यवस्थेचे प्रतीक असते.ती निर्माण करणे चळवळींच्या शिरावर आले आहे.लोकशाही जनतेच्या कल्याणार्थ झटणारे व्यवस्थात्मक स्वरूप असते.धनाढयांच्या आणि गुंडगिरीच्या कचेरीत सापडणारी लोकशाही ही जनतेचे गळे कापत असते.ती कधी कधी धर्मांधवृत्तीने आपली सत्ता ते राबवित असतात.मजूर,कामगार,स्त्रीया व कष्टकरी,शोषित,पीडित वर्गाला बंधनात ठेवणारा वर्ग हा सत्ताधिकाऱ्यांच्या वलयीत बसलेल्या धनिकांचा व वर्चस्ववाद्यांनी तयार केलेल्या कायद्यांच्या सत्तेवर अधिराज्य करीत आलेला आहे.कागदी लोकशाही ही पिठाळ दुधाच्या भेसळीसारखी असत्त्यास घट्ट पकडून असते.वर्चस्ववाद्यांना वा एकाधिकारशाहीच्या हुकमी व्यवस्थेला धर्मनिरपेक्षता,समाजवाद,पारदर्शक लोकशाही,सत्तेचे लोकप्रशासन मान्य नसल्यामुळे भ्रष्टाचार,अविकसितता,गुन्हेगारी,अन्याय अत्याचाराचे पेव तिथे फुटल्याशिवाय राहत नाहीत.ज्या लोकशाहीतील एक समाज उपाशी व एक समाज लाडू खाण्यात मश्गुल असेल तर ती लोकशाही समाजवादाच्या खूप दूर गेलेला असतो.प्रत्येकाला अन्न,वस्त्र,शिक्षण,निवांत,आरोग्य व मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत आणि तो विचार हा त्या राष्ट्रनिर्मितीचा उद्देश आणि उद्दिष्ट्यातील स्वातंत्र्याच्या,बंधुतेच्या न्याय्यतेच्या दृष्टीने पुरस्कृत असावा.बेकायदेशीर राज्यव्यवस्था ही लोकशाहीला घातक अशी राज्यव्यवस्था असते.समतेशिवाय लोकशाही टिकत नाही.अन धर्मांधवृत्ती,जातीपातीव्यवस्था,धनशाही,वंश,लिंग,पंथ,अविवेकीचा विचार,ह्या बाबी अविकसिततेच्या पायाला मजबूत करून विषमता टिकविता आली आहेत.भारतीय परिप्रेक्षात तरी तरुणांनी वास्तवातील अव्यवस्थेचे लोकशाही तत्वाने धोरण अंगिकारले पाहिजे.मानवतेची हितोपासना करणारी विकसित दृष्टी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.दारिद्र्य,विध्वंसक वृत्ती,हिंस्त्रता, भांडवलशाही,आणि गुलामीतून सुटण्यासाठी प्रत्येकाने मुक्तता मार्गास गेले पाहिजे.ज्ञान मिळविले पाहिजे.शील टिकून ठेवले पाहिजे,शक्ती जोपासली पाहिजे.स्वातंत्र्य हे सत्य,न्याय्यबुद्धीने घेतले पाहिजे.कारण विचाराने स्वातंत्र्य हे वैचारिक गुलामगिरी नष्ट करीत असते.नैसर्गिकतेची होळी करणारी भांडवली व्यवस्था पार हद्दपार केली पाहिजे जी मानवतेच्या अस्तित्वास घातक व विषारी सर्पासारखी डुख धरून असते.विश्वात वैश्विकतेची कास धरून समतेच्या मानवता दृष्टीने पोषक,न्यायाधारीत एकता,बंधुता,समानता,स्वातंत्र्यात,एकात्मता यांची सखोल अशी विवेकीअंगाने उभारणी करणे आज युगांची तत्वतः गरज आहे.
काळ कोणताही असो कालचा,उद्याचा कि येणारा व्यवस्था कितीही क्रूर असो इख पाजणारी असो का खून करणारी,किंवा सदेह वैकुंठास घालणारी असो तिला न घाबरता प्रतिभावान प्रतिभेचा अविष्कार हा जिवंत जाणिवेचा व सत्याच्या बाजूने झुकलेला असावा.कारण सत्य कधीही झुकू शकत नाही.असत्याची कुरघोडी सत्य उलथून लावण्याची जोम अंगी बनवून असते हे अनुभवाने व प्रतिभेने कवी,लेखक,त्त्वविचारवंत व समाजसुधारकांनी विसरू नयेत.या जाणिवेसह प्रखरपणे धूर्त व अविचारांच्या विरोधात गेलं पाहिजे.मानवतेसाठी लढलं पाहिजे.जातिवंत विचाराची खंबीर भूमिका मांडली पाहिजेत.हि खऱ्या साहित्य व साहित्यिक निर्मितीची बावणकसोट सत्य पडताळणी असते.
कारण स्वतःची भाषा ही एखाद्या समूहाची खरी ओळख असते तेव्हा ती दडपण्याचा व त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होत असतो हे भारतवर्ष इतिहास न विसणारे सत्य बाळगून आहे.शब्द हीच खरी त्या समूहाची ओळख असते.समाजाची प्राण असते.ती व्यक्तता असते.आणि लोकशाहीत दलित,कष्टकरी,शेतकरी,श्रमिक,मजूर,पीडित व शोषित केवळ निःशब्द असल्याने अन्यायाचा डोंगर पोखरत बसतात.तो घाव सहन करत असतात.त्यांचा आवाज हि खऱ्या अभिव्यक्तीचा अविष्कार असतो.तेच खरे स्वातंत्र्य असते.आज पुरोगामी विचार मांडणेच जर देशद्रोह ठरू लागले तर खऱ्या स्वातंत्र्याची व्याख्या काय करावी..?अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ती गळचेपी का ठरू नये?हि वास्तविकता लाथाळली पाहिजे.
सद्याच्या लोकशाही व्यवस्थेत हात पसरत असलेला दहशतवाद,अतिरेकी राष्ट्रवाद,धर्मांध सत्ताने लाच खात असलेला हिंसक सत्ताबाह्य धोरणाचा अतत्वविचार,दंगली आणि शिक्षण क्षेत्राचे होणारे खेळखंडोबाचे भगवे राजकारण,उच्चस्तरावरील विद्यार्थी व प्राध्यापकी वर्गाची मनमानी व्यवस्थेतून होणारी मुस्कटदाबी,आणि यातून निर्माण होणारा त्या व्यवस्थेच्या विरोधातील जाज्वल्य विद्रोह आणि शिक्षणाचा कलता अपरिपोष,प्रसार माध्यमांची हेकेखोर विचारप्रवृत्ती आणि पायचाटू भांडवली विचारसरणी,व संविधानाने सर्वसामान्यांना दिलेला लोकशाहीचा आचार- विचार-वचनाच्या अभंगत्वाचा दर्जा हा आता भंग होतो आहे काय?असा सवाल नागासारखा फणा काढून उभा आहे.याची जाणीव आजच्या चळवळींना, विचारवंतांना,कवीला,लेखकाला व समाजसुधार विचारसरणीच्या वर्गाला असणे काळाच्या दृष्टीने उचित व परिवर्तनवाद मांडणारे सत्य ठरत आहे.ती काळाची गरज आहे.
भारतात प्राचीन कालखंडापासून प्रतिभावंत व जिवंत जाणिवांच्या विचारसरणीला पोषक असा विचार म्हणजे कि, विचारांना विचार च मारू शकतात,शरीरांना संपवून केवळ माती होत असते.अशा त्त्वप्रणालीने वैकसिक पठडीचा वैचारिक अंगाने झालेला परिवर्तनाचा भाग हा अतुलनीय आहे.रशिया,फ्रान्स, अमेरिका व भारतातीलही इति इतिहास पारखून-पडताळून घेतला तर खरे चळवळींबरोबर,विवेकाच्या शब्दानेच क्रांती झाली आहे.लोकप्रबोधन व कलेच्या अविष्कारातून निर्भयपणे झालेली अभिव्यक्तता हि निखळ परिवर्तनाची दिशा व दशा ठरवीत असते.आणि समाजप्रबोधनाच्या चळवळीची ती साधन संपत्ती असते हे लक्षात घेतले पहिजे.
खरे पाहता विचारांचा खात्मा हा विचारांच्या शस्त्रानेच झालेला आहे.आज मात्र वास्तव तसे उरले आहे हे सत्य सांगणे नकारवादी आहे.ती वस्तुस्थितीचा भागच नाही.विचारांचा विरोध आज गोळी,बंदूक,सुरे,दगडं,जंबे व तलवारी आणि तालिबानी शस्त्रास्त्रे,विध्वंसक जाणिवेने घेतला आहे.मानवतेला हि कलंक लावणारी भूमिका आहे.हि चिंता जे स्वातंत्र्याची आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या श्रद्धा व मूल्यांना बाळगणाऱ्यांची अस्तित्ववादी ठरणारी बाब आहे.आपण ज्या परिसरात जगतो,राहतो त्या ठिकाणची अस्थिरता,अस्वस्थता आपण लेखणीच्या माध्यमातून निर्भीड व वास्तवाच्या दृष्टीकोणातून मांडली पाहिजेत.आज असे लिखाण नवोदित लेखनकार करतांना दिसून येत नाहीत.जे लेखक,कवी वा समाजसुधारक,चळवळींचे तत्ववेत्ते हे अविरत विचारमग्न व अस्वस्थ असतात ते जिवंत जाणीवा जन्मास घालतात.ते खरे वास्तवाचे निरपेक्ष इतिहासकार असतात.याउलट जिथे अस्वस्थता हि केवळ सोंगी चादर अंगावर घेऊन उभी आहे तिथे जाणिवांच्या व प्रतिभेच्या विचारांची उत्पत्ती होईलच असे नाही.सत्य ते कि ज्या लेखण्या केव्हाही जिवंत असतात....!"

Comments
Post a Comment