समकालीन साहित्य चळवळी आणि समाजिक बांधिलकी
-विश्वनाथ साठे{९९२१०५६४६२}
संज्ञापन वृत्तपत्रविद्या पदविका,
सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ,पुणे.
आपण सर्व सत्यशोधक आणि पारखजागृत जनमानवसमूह आहोत. अशा परिप्रेक्षात विचार
करायला गेलो तर मानवी अस्तित्वाच्या आणि मानवी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चळवळीशी आपले नाते कुणी म्हणेल की, “रक्ताचे नाते आहे का ?” तर केवळ रक्ताचे नातेच
सामजिक बांधिलकीची चळवळ परिवर्तनाच्या वाटेवर नेऊ शकतात का ?” हा उलटपक्षी प्रश्न
विचारावासा वाटतो. बांधिलकी हा शब्द इथे वेळ यार्थीही
घेणे गरजेचे आहे. कारण आपल्या चळवळी ह्या काळाच्या नियोजीतीकरणाअभावी फसल्या
गेलेल्या आहेत. चळवळीत
काळाचे योग्य व परिमार्ग्दर्शक नियोजनच सापडत नाही. बव्हंशी चळवळी ह्या
नियोजीतीकरणे अशा असाव्यात. चळवळीत ध्येय असतात. जातीय निवाड्याच्याकाळी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चळवळीचे केंद्रस्थानी चळवळ डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या दूरदृष्टी, विवेकीज्ञान, मानवी प्रगतीचे उद्दिष्टे
आणि ध्येय, मूलभूत विचार प्रसरणशील असे होते. माणूस म्हणजे प्रगतीचा धागा असतो. शोषित करणाऱ्या विचारांना समाजिक बांधिलकी संपवित
असते हे बाबासाहेबांना माहिती होते. माणसाचे नाते माणसांपासून तोडण्याची जाणीव मूल्यवादी धर्मप्रेरणा संबधित आहे. कारण जगाच्या पाठीवर कोणताही धर्म हा वर्चस्ववादी तत्वाने विचार
करत पुढे आलेला तत्वज्ञानाचा एक मूळभाग आहे. त्याही अगोदरच्या काळात ही वैचारिक मर्मभूमी आपल्याला म. फुले यांच्या तत्कालीन साहित्य - सामाजिक बांधिलकीच्या चळवळीतून मांडलेली
दिसते. तसेच बाबांसाहेबांच्या विचारांचा आकार संविधानाचं प्रेरिरात होऊन अभ्यासायला मिळतो.
डावा-उजवा झगडा गेली तीन हजार पाचशे वर्ष जुना आहे. हा चळवळीचा
इतिहास आणि विचार शैलीप्रकार त्याची निर्मिती का झाली ? माणसाला
शूद्र उपभोग्य वस्तू म्हणून का गणल्या गेले. या विचारांना संदर्भ जोडणारा विचार आपण केला पाहिजेत. इथे उजवी चळवळ पकड घेत राहिलेली आहे. टी हरेकदा नवा चेहरा पुढे आणत आहे. आपल्या चळवळी उगवतात. चेहरा
काढतात, आणि वाहत बसतात. असतात दबत.
अमानवी चळवळ अडीच हजार वर्षे सलग चालूच आहे. तिला कोणी ब्राह्मणी चळवळ म्हणतात असे एका हे संबोधन भारतीय बॉस संस्थेने केले आहे. भारतीय
हे सहिष्णू आहेत. त्यातही बहुसंख्येने सहिष्णू असणारी विचारधारा पेरणारे भारतात राहत आहेत. आहेत मात्र त्यार्थी असहिष्णुत सहिष्णुतांवर राज करत आले हे येथील एक सत्य आहे.
महामानव आपला आवाज आहे. चळवळी चळवळीमध्ये एक येताना ही एक वाक्यता नाही.
फुटीरतावादी विचार आहे. एक विचार मात्र कुठे सापडत नाही.
म्हणून आपल्या चळवळीत फुटत
असतात. आपलं आपणच लक्तरे सोडायची नसतात. पण फोडली पाहिजे. हा
विचार स्वतःच्या काही फटी सोडत पुढे आला आहे. आणि अहितवादी विचार त्यात पाचर ठोकून दुफळी करत आलेला आहे. लोकशाहीचे भांडवली लाभार्थी याचा फायदा घेत आहेत. ते
चेहरा लपून घुसतात आणि ते उजवा, डावा, बहुजनवादी म्हणूनही वार्ता वापरतात.
तेव्हा आपल्या जवळ फक्त धर्माच्या धर्माच्या नावाने कोंडमारी झालेली आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याकाळात म्हणतात.
विचारांचा कोंडमारा आहे हे आपण आजच्या नव्या परीस्थित समजले पाहिजेत. आजच्या नव्या युगाचा हा
कोंडमारा नव्या चेहऱ्यांचा बांधिलकी घेऊन आलेला आहे.
म्हणून बांधिलकीशी आपलं काय नाते सांगायला आले पाहिजेत की, परिस्थितीत कणखर असले पाहिजेत. सर्वांनी ऐक्य असले पाहिजेत. अनेक विचार असले पाहिजेत.
विविधांगी विचार केला पाहिजे. दुहेरीपणा त्यात असता कामा नये. लोभापायी संघ करून चळवळीचे तेज तेज उडालेले आहे.
आपल्या चळवळीची हीच तर घोटीगोची आहे. ते विचारफटीत आहे. डाव्या चळवळीत आहे ते उजवे चेहरे संघाची संघप्रणाली आणू पाहत आहेत. चळवळ जेव्हा अशी वळण घेते तेव्हा करतात तेव्हा ते खरे म्हणजे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, फुले तुकाराम महाराज, शाहू, कबीर, अण्णाभाऊ साठे हे व्यवहारवादी मुल्त्त्वाचा जीवन्पातालीवे विचार करणारे
विचारवंत वास्तवात विचारातून समोर असतात. मेदूत होणारे समाजाविषयीचे द्वेषविष आहे ते जळून गेले पाहिजेत. चळवळीत संशयीपणा येता कामा नये. या
चळवळीतल्या खंबीर नेत्यांनी कधीही संशयीपणा एकमेकांच्या विचारांविषयी घेतलेला नाही. उलट
खरे, सत्य आणि पारदर्शकपणे विचार करणारे हे आंबेडकरवाद,
कट्टरपणा घेऊन जगत आलेले आहेत. म्हणून नव्या युगाचा आपण स्वतः
आंबेडकर व्हायला पाहिजेत. तो
विचार केला पाहिजेत तसा जगाला पाहिजेत. आपल्या आजच्या आपण काळाचे तथागत झाले पाहिजे. बुद्धांनी अशी सवलत दिलेली
आहे की, तुम्ही बुद्ध होऊ शकता. फक्त ती प्रयत्न केले
पाहिजेत. आपण आपल्या आजच्या काळातले बाबासाहेब का नाहीत ? फुले का नाहीत ? तुकाराम का नाहीत ? आजच्या काळातला मी
कबीर का होऊ शकत नाही ? हे चळवळींनी समजून घेतलं पाहिजे. दलित
हा शब्द आता जायला हवा. माणूस म्हणून विचारले गेले पाहिजेत.
डाव्यांच्या फटी या अशा शब्दांच्या संबोधनात निर्माण होत आहेत. या
फटी दिसल्या पाहिजेत. शब्दामागे राजकारण असतं. धर्मकारणास्तव अर्थकारण
असते. आणि ही कारणे समजली म्हणजे शब्दाच्या मागे असलेली सांस्कृतिक
वर्चस्ववादी भूमिका आपल्याला नाकारता येते.
संघ स्थापनेपासून त्यांची रणनीती ही सांस्कृतिक चळवळीचा चेहरा घेत राजकारणात शिरकाव करत आलेली आहे. आणि त्यातून बहुजनांचा पाडाव करत ही संघाची रणनीती पुढे उभी ठाकलेली आहे. आपल्याला शत्रू समजून लढता आले पाहिजेत. अशी बाजू काय आहे ? त्याचे रणांगण कोणते आहे? आणि ते कोणते चाल घेऊन येत आहेत ? हे समजणे म्हणजे, “समकालीन प्रबळ शक्ती हीच दुबळ्यांची शत्रुत्वता करणारी असते शोषण करणारी असते!” हे समजणे म्हणजेच, सर्व हालचालींवर नियंत्रण करणं होय. वर केल्या गेलेला सर्व विचार हा अंतर्गत फाटाफुटीचे राजकारण कारणीभूत आहे. हे आजच्या साहित्यविचार प्रवाहाला समजणे गरजेचे आहे. तसेच नियंत्रित करण्याचे अस्तित्व उमगले पाहिजे. पण काही केल्या हा विरोध जात नाहीत पण नियंत्रण करणारा त्यास विविध पद्धतीने तोडता येत येऊ शकते. सामाजिक चळवळी आजकाल नष्ट होऊ लागल्या आहेत. साहित्य चळवळीचे काय होत असेल ? हे तर त्याहीपेक्षा भयंकर वास्तव आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. आजची स्त्रीवादी चळवळ, ग्रामीण, दलित चळवळ तपासून घेतल्या पाहिजेत. राजकारण, धर्म, अर्थनीती, सांस्कृतिक, शैक्षणिक यामध्ये अनाहूतपणे फिरला जाणारा विचार आपल्याला समजून घेता आला पाहिजे, तो वेगळ्या वर्गीकरणात करता आला पाहिजेत. गटागटात उल्लेख करता आला पाहिजे. आणि हा उल्लेख करताना तो निपक्षपातीपणे, निरपेक्षपणे करत राहिले पाहिजे हीच आपली जबाबदारी आहे. त्यासाठी बदल घेतल्या गेले पाहिजेत. बदलले पाहिजेत. परिवर्तनाची चळवळ उभी केली पाहिजे. असा विचार आपण घेऊन चळवळीची बांधणी करू शकतो. अशी मागणी चळवळ करत असते. आणि जिथे हे मुजोरपण आहे तिथे समता टिकणार नाही. असे बुद्ध, फुले, आणि त्या अर्थी कट्टरविचार घेऊन जगणारे चळवळीतील प्रणेते सांगत आले, तसे जगत आले होते. सत्यशोधन हे चळवळीचे माहेर आहे. स्त्री, शूद्र, शूद्रातिशूद्र, ह्यांच्यापासून चळवळ दुरावलेली आहे. नंतर शूद्र गायब झालेले आहेत. नंतर साहित्य चळवळीपासून दूर होत उजवा विचार त्यावर गरम करत आहेत. स्त्रीवाद दूर जातांना दिसतो आहे. आज मितीला प्रतिभा, प्रतिमा, संकल्पना, संबोध यामागचे राजकारण उभे राहत आहे. माणूस माणसाला जीव घेण्याच्या वृत्तीने वागवत आहे. आणि ती वृत्ती वाढत आहे. वर्णव्यवस्थेची गुंतागुंत व मानसशास्त्र तसेच जीवशास्त्र म्हणजेच बीजबियाणे तपासली गेल्यावर चळवळीचे अस्तित्व आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या बघता येईल. दहशतीचे राजकारण आजच्या वातावरणात पिकले आहे. धडपडला जाणारा विचार सावरता आला पाहिजे. चळवळी तपासून घेऊन नव्या काळात नव्या विचारांनी पेरता आल्या पाहिजेत. चळवळीतील स्त्री ही खंबीर लिहिणारी आणि विचार करणारी म्हणजेच मुक्त असली पाहिजे. तिने विरोधाभासाला सामोरे जाण्याची शक्तीही विचारात घेतली गेली पाहिजेत. अभिव्यक्तीचे राजकारण थांबून सामुदायिक सांप्रदायिक आणि सांस्कृतिक उलथापालथ समजली पाहिजेत. आदिवासी स्त्री, त्यांचा मुक्तपणा त्यांची विचारशक्ती चळवळीत सामील होत गेली पाहिजेत. चळवळीचा उद्देश सर्वसामान्यांना समान व स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि जीवनाची ऐक्यता मिळत राहावी ही असली पाहिजेत. स्त्रीप्रश्न इथे बऱ्याच वेळा जातीयवाद, गट समूह आणि त्यांचा वाद असे चित्र दाखवले गेलेले आहे. हे चित्र बदलले गेले पाहिजे. ते बदलत जावो आणि साहित्य संस्कृतीचा हा विचार आपण लिहीणाऱ्या लोकांनी साहित्याच्या प्रवाहात ठेवला पाहिजेत. सामाजिक साहित्याच्या निर्मितीवेळेची गती ही या काळावर स्थिरावल्या गेलीली आहे. ती गतिमान झाली पाहिजेत.
संघ स्थापनेपासून त्यांची रणनीती ही सांस्कृतिक चळवळीचा चेहरा घेत राजकारणात शिरकाव करत आलेली आहे. आणि त्यातून बहुजनांचा पाडाव करत ही संघाची रणनीती पुढे उभी ठाकलेली आहे. आपल्याला शत्रू समजून लढता आले पाहिजेत. अशी बाजू काय आहे ? त्याचे रणांगण कोणते आहे? आणि ते कोणते चाल घेऊन येत आहेत ? हे समजणे म्हणजे, “समकालीन प्रबळ शक्ती हीच दुबळ्यांची शत्रुत्वता करणारी असते शोषण करणारी असते!” हे समजणे म्हणजेच, सर्व हालचालींवर नियंत्रण करणं होय. वर केल्या गेलेला सर्व विचार हा अंतर्गत फाटाफुटीचे राजकारण कारणीभूत आहे. हे आजच्या साहित्यविचार प्रवाहाला समजणे गरजेचे आहे. तसेच नियंत्रित करण्याचे अस्तित्व उमगले पाहिजे. पण काही केल्या हा विरोध जात नाहीत पण नियंत्रण करणारा त्यास विविध पद्धतीने तोडता येत येऊ शकते. सामाजिक चळवळी आजकाल नष्ट होऊ लागल्या आहेत. साहित्य चळवळीचे काय होत असेल ? हे तर त्याहीपेक्षा भयंकर वास्तव आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. आजची स्त्रीवादी चळवळ, ग्रामीण, दलित चळवळ तपासून घेतल्या पाहिजेत. राजकारण, धर्म, अर्थनीती, सांस्कृतिक, शैक्षणिक यामध्ये अनाहूतपणे फिरला जाणारा विचार आपल्याला समजून घेता आला पाहिजे, तो वेगळ्या वर्गीकरणात करता आला पाहिजेत. गटागटात उल्लेख करता आला पाहिजे. आणि हा उल्लेख करताना तो निपक्षपातीपणे, निरपेक्षपणे करत राहिले पाहिजे हीच आपली जबाबदारी आहे. त्यासाठी बदल घेतल्या गेले पाहिजेत. बदलले पाहिजेत. परिवर्तनाची चळवळ उभी केली पाहिजे. असा विचार आपण घेऊन चळवळीची बांधणी करू शकतो. अशी मागणी चळवळ करत असते. आणि जिथे हे मुजोरपण आहे तिथे समता टिकणार नाही. असे बुद्ध, फुले, आणि त्या अर्थी कट्टरविचार घेऊन जगणारे चळवळीतील प्रणेते सांगत आले, तसे जगत आले होते. सत्यशोधन हे चळवळीचे माहेर आहे. स्त्री, शूद्र, शूद्रातिशूद्र, ह्यांच्यापासून चळवळ दुरावलेली आहे. नंतर शूद्र गायब झालेले आहेत. नंतर साहित्य चळवळीपासून दूर होत उजवा विचार त्यावर गरम करत आहेत. स्त्रीवाद दूर जातांना दिसतो आहे. आज मितीला प्रतिभा, प्रतिमा, संकल्पना, संबोध यामागचे राजकारण उभे राहत आहे. माणूस माणसाला जीव घेण्याच्या वृत्तीने वागवत आहे. आणि ती वृत्ती वाढत आहे. वर्णव्यवस्थेची गुंतागुंत व मानसशास्त्र तसेच जीवशास्त्र म्हणजेच बीजबियाणे तपासली गेल्यावर चळवळीचे अस्तित्व आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या बघता येईल. दहशतीचे राजकारण आजच्या वातावरणात पिकले आहे. धडपडला जाणारा विचार सावरता आला पाहिजे. चळवळी तपासून घेऊन नव्या काळात नव्या विचारांनी पेरता आल्या पाहिजेत. चळवळीतील स्त्री ही खंबीर लिहिणारी आणि विचार करणारी म्हणजेच मुक्त असली पाहिजे. तिने विरोधाभासाला सामोरे जाण्याची शक्तीही विचारात घेतली गेली पाहिजेत. अभिव्यक्तीचे राजकारण थांबून सामुदायिक सांप्रदायिक आणि सांस्कृतिक उलथापालथ समजली पाहिजेत. आदिवासी स्त्री, त्यांचा मुक्तपणा त्यांची विचारशक्ती चळवळीत सामील होत गेली पाहिजेत. चळवळीचा उद्देश सर्वसामान्यांना समान व स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि जीवनाची ऐक्यता मिळत राहावी ही असली पाहिजेत. स्त्रीप्रश्न इथे बऱ्याच वेळा जातीयवाद, गट समूह आणि त्यांचा वाद असे चित्र दाखवले गेलेले आहे. हे चित्र बदलले गेले पाहिजे. ते बदलत जावो आणि साहित्य संस्कृतीचा हा विचार आपण लिहीणाऱ्या लोकांनी साहित्याच्या प्रवाहात ठेवला पाहिजेत. सामाजिक साहित्याच्या निर्मितीवेळेची गती ही या काळावर स्थिरावल्या गेलीली आहे. ती गतिमान झाली पाहिजेत.
विचारतत्त्वांनी आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि ऐक्य सर्वसामान्यांसाठी पुढे नेली पाहिजेत. वैचारिक मनाची निर्मिती ही सांस्कृतिक - सामाजिक
अविष्काराची वृत्ती आणि साहित्य मानवामानवातील बंधुता, समतेच्या आधारे झाली पाहिजे. भारतीय विचारतत्वाने सामाजिक - धार्मिक
निरपेक्षता बाळगावी. हेच तर चळवळी साहित्य सांगत आल्या आहे. संवेदनशीलता ही निरपेक्ष असली
पाहिजे. पुन्हा एकाच पक्षाची
भूमिका त्याने घेता कामा नये. म्हणजेच पक्षीय वर्गीकरणाची समीक्षा करता आली पाहिजे. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक साहित्यापर्यंत हा निरपेक्ष
विचार दिसत नाही. तो धर्मात बुडालेला आहे. संत साहित्याने जो
धर्माच्या अंगाने केलेला अभ्यास होता. तो मध्ययुगीन अभ्यास संवेदनशीलतेचा अभ्यास पुढे धर्माच्या अधीन झालेला आहे. १९२० नंतर साहित्य हे जीवन आणि बदलत्या
परिवर्तन बुद्धिप्रामाण्यवादाचे चित्रण करते आहे. असे एक चित्र आपल्याला दिसून येते. समकालीन साहित्याचा हा स्वभाव
आहे. मध्ययुगीन व प्राचीन साहित्यात हा बुद्धिप्रामाण्यवाद दिसत
नाही. की
जोतिराव फुले यांनी लिहिलेल्या साहित्यात प्रेरित म्हणून पुढे
आपल्याला दिसून येतो आहे. १९६०
नंतर जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
प्रेरणेतून चळवळीची ध्येय धोरण पुढे आली आणि समकालीन समाजाच्या स्वभावाचा ठाव
घेण्यात आला. त्यातून जे साहित्य लिहिले जाऊ लागले म्हणजे समाजाच्या परिप्रेक्षात वास्तव घडत होतं तेच
साहित्यात उमटत होतं. आणि ते गरजेचं होतं. जो समाज साहित्याने अंतरंग दाखवू लागला त्या समाजाच्या पोरागातीच्या खीळदेखील काढू
लागला. परिवर्तनवादी चळवळीच्याने, लिहिण्याच्या माध्यमातून,
अभिव्यक्त होण्याच्या माध्यमातून समाजात वास्तव आणि माणूसचेहरा समाजासमोर आणण्याचे काम सुरू केलं होतं. त्याधी हा चेहरा जातीआड, धर्माड,
वर्णव्यवस्थेच्या आड होता. तळागळात
गुलामीच्या प्राबल्य भूमिका आहे आणि ही भूमिका नष्ट करण्यासाठी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रेरणा परिवर्तनवादी चळवळीने पुढे आणलेला आहे.
म्हणून त्या उच्चभ्रू साहित्यिकांना नाडल्या जाणाऱ्या विचारांना परिवर्तनवादी साहित्य आणि परिवर्तनवादी साहित्याने मोडलेल्या प्रस्थापित साहित्यजाणिवा परिवर्तनवादी साहित्याने खंबीरपणे
मांडल्या आहेत. त्या काळात स्वाभिमान
माणसाला माणूस म्हणून जगवत होता. त्यात १९५६ चे धर्मांतर आणि पुढे म्हणजे त्या अगोदरची पार्श्वभूमी ही
संविधान महत्त्वाचे वाटू लागते आहे. हे महत्त्वाचे पाऊल होते. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी परिवर्तनवादी साहित्य,
ग्रामीण साहित्य, चळवळ उभी करण्याचा विचार पेरला. आणि टी परिवर्तनवादी चळवळ सुरूच राहिली. पुढे शेतकरी चळवळ उभी राहिली. दुष्काळ चळवळी उभ्या राहिल्या. यामध्ये
शेळके, भोसले, कोतापल्ले हे आधीचे साहित्यिक आपल्याला लिहिताना दिसून येतात. याच दशक काळात माणूस जगाचा पोशिंदा शेतकरी मजूर आहे.
त्याला जगता आलं पाहिजे. त्याला जगू दिले पाहिजे. तो जगला पाहिजे म्हणून जे
साहित्य लिहिले गेले त्यात
प्रामुख्याने अण्णाभाऊ यांची लेखणी अग्रणी होती. पुढे शेतकरी संघर्षाच्या अनुषंगाने साहित्य विचार आलेला आहे. शेतकरी जाणिवांच्या अनुषंगाने आहे ते साहित्य एक
चळवळच होती. १९७५
मध्ये स्त्रीवादी साहित्य, १९८० मध्ये आदिवासी साहित्य याचा विचार होणे. असे लिहिले जाणे हे त्या त्या काळात
अगत्याचे होते. काळ साहित्याच्या
विचाराची मागणी करत असतो. १९७० नंतर बांधिलकीचा शब्द रुजवात होतांना आपल्याला दिसू लागलेला आहे.
यावेळी साहित्यात बांधिलकी आणि समभाव निर्माण झालेली अवस्था आहे. वैचारिक वादविवाद निर्माण होऊन प्रस्थापित आणि परिवर्तनवादी साहित्यात जो
बदल घडत होता तोइतर कलाक्षेत्रात मानव परिवर्तन आणि त्यांची दिसून
येणारी आप्सीय बांधिलकी प्रस्थापित साहित्य दिसत नव्हती. तर ती
परिवर्तनवादी साहित्यात दिसत होती. ती
शेतकऱ्यांचे साहित्यात दिसत होती. म्हणूनच बांधिलकीच्या संदर्भाचे संकेत अर्थ
लक्षात घेताना काळाच्या समीक्षेची समीक्षा आणि साहित्याची
समीक्षा होईल असा विचार करणे गरजेचे वाटते. ज्यांचा आवाज दाबल्या गेला आहे अश्या जीवनजाणिवांना
आवाज देणे, लिहिते करणे,
स्वाभिमानाने जगण्यास सिद्ध करणे ही बांधिलकी नाहीतर अजून काय आहे ? ती प्रस्थापित साहित्याने अजूनही अंगी बनवून घेतल्याचे दिसून येत
नाही.
भारतीय राज्यघटना इथे रुजू झाल्यापासून अजूनही मानवी मूल्यांची रुजवणूक जगण्या - वागण्यात
आली नाही. आणि ती जगण्यात नसताना साहित्य पूर्णांशाने दिसून येईलच हे
कशावरून ? हत्या झालेल्यांची स्थितीही परिवर्तनवादी सत्य व सर्वार्थ
मानवतावादी विचार करणे ही होती. की जो विचार इतर शक्तींना पटला नव्हता, रुचला
नव्हता, आवडला नव्हता त्यांना मानवी मूल्यांची अस्तित्वता काळजात असेलच
हे कशावरून ? त्यांची भूमिका हि फोडाफोडीची राहिली आहे. परिवर्तनवादी
चळवळी नेस्तनाबूत कशा होतील हेच विचार त्या विचारसरणीने केला आहे. साहित्य हा समाज प्रगत असण्याचा सर्वात मोठा नमुना असतो. साहित्यातून अन्याय, अत्याचार आणि हिंसेचे
समर्थन होत असेल तर त्याविषयी आपल्याला थरथर
वाटते. हे भय काढून सत्य ते सत्य
लिहिले गेले पाहिजे. आणि भीती आपण सकारात्मकरीत्या काढून त्या समर्थनाविषयी विरोध केलाच पाहिजे. म्हणून मुक्तिबोध एका ठिकाणी असे म्हणतात की, “पार्टनर
आहे तुमची भूमिका काय आहे ? कोणती भूमिका आहे ?” तुमची भूमिका लक्षात घेणे म्हणजे समकालीन साहित्याच्या
जाणिवांची भूमिका लक्षात घेणार आहे अशी भूमिका घेतली पाहिजेत.
म्हणजे काय तर बांधिलकी - समकालीन चळवळ आणि बहुजनांच्या जीवनजाणिवांना वाव देत त्यांना प्रबल
करत निर्माण झालेले प्रश्न सोडवताना साहित्याच्या
आपल्या जाणिवा निर्माण करणे गरजेचे आहे. आपण हा विचार केला पाहिजे की, निर्णयण घेणे गरजेचे आहे. निर्णयाच्या भूमिका बजावत राहणे म्हणजे बांधिलकी
नाही का ? सामान्यांच्या मुक्त श्वास यांचा विचार साहित्यात उच्चारला गेला पाहिजेत. ही बांधिलकी साहित्यिक
आणि समाजाविषयी राखून ठेवली पाहिजे.
“आम्ही आमक्या जातीचे आहोत,” “आम्ही या धर्माचे आहोत,” “आमचा ही पोटजात आहे.” हे जाती वास्तव व स्व जन्म जातीच्या कोंडवाड्यातद्या सांगणारे विधान कितपत योग्य होतं ? कितपत योग्य आहे जातीय विधान की माझा जन्म जातीत झाला. “शब्दानीच पेटतात घरेदारे...” असे ज्यावेळेस वामन निंबाळकर म्हणायला लागतात त्या वेळेस प्रस्थापित साहित्यातील वर्चस्ववादी सौंदर्यवाद वैचारमैथुन करत असतो. तिथे औदार्य भूमिका घेणे लेखन करणाऱ्याचे काम आहे. दुसरे महायुद्ध झाले. त्यात जॉन पॉल म्हणाला की, कोणताही माणूस पक्षपाती असतो. निपक्षपाती नसतो. कुठल्यातरी एका पक्षाचा तो पक्षकार असतो. समकालीन साहित्य चळवळी संपुष्टात आल्या आहेत त्या काय निरपेक्ष होत होत्या काय ? असा सवाल इथे उभा राहतो. ज्या चळवळी आहेत त्याच दिसत नाहीत. त्यांचा विचार पुढे येत नाही. विचारांचा अहंकार होत असेल तर एक प्रमाण विचार आणि एक संवादीपण येणार नाही. गरज असेल तर चळवळ जगते नसेल तर मरते. जवळ येऊन जेवणापूरतं येणं आणि जाणं, चळवळीत चित्र पहायला घेऊन जाणं यात भान राखले पाहिजेत. पुण्यात मोठ्या प्रमाणात खवय्ये खानावळी आहेत. केवळ जेवणासाठीच आहेत. मात्र ती लोक एकत्र येतात. जेवताना एकत्र येऊन विचार करतात. हे सर्व आपण समजून घेतलं पाहिजे. १९४६ ते १९८६ काळात मराठी ग्रामीण साहित्य फुलले आहे. माडगूळकर, ते भास्कर चंदनशिवेपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करणारे लिखाण आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात लावणारी कादंबरी नाही. पुढे बाबुराव भोसले यांनी पहिली कादंबरी लिहिली. “हाल्या हाल्या दुधू दे” १९८५, आणि त्यानंतर लिखाणाला नवी धार येत त्या प्रश्नांवर नजर टाकणारे साहित्यिक १९८५ ते २०१५ या कालखंडात ५० पेक्षा जास्त कादंबऱ्या शेतकरी जीवनावर लिहिते झाले आहेत. लेखक - वाचक शरण होतो. शरणप्रिय का होतात लिहिणारे विचार ? बाबुराव मुसळे यांच्या मुलाखती मध्ये शेतकरी आत्महत्या हे सत्य का कादंबरीतून लपवल्या गेले आहे ? त्या कादंबरीत लेखक काय म्हणतो, तर १९८६ मध्ये आत्महत्या नव्हत्या. ही भूमिका का घेतली असेल ? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मराठी साहित्यामध्ये आणि समकालीन साहित्य भूमिकेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामध्ये हा प्रश्न करणे गरजेचे आहे ही सर्वक्षेत्रेषु काळाची गरज बनत चालली आहे. त्यावर लिहिले – बोलले गेले पाहिजे.
“आम्ही आमक्या जातीचे आहोत,” “आम्ही या धर्माचे आहोत,” “आमचा ही पोटजात आहे.” हे जाती वास्तव व स्व जन्म जातीच्या कोंडवाड्यातद्या सांगणारे विधान कितपत योग्य होतं ? कितपत योग्य आहे जातीय विधान की माझा जन्म जातीत झाला. “शब्दानीच पेटतात घरेदारे...” असे ज्यावेळेस वामन निंबाळकर म्हणायला लागतात त्या वेळेस प्रस्थापित साहित्यातील वर्चस्ववादी सौंदर्यवाद वैचारमैथुन करत असतो. तिथे औदार्य भूमिका घेणे लेखन करणाऱ्याचे काम आहे. दुसरे महायुद्ध झाले. त्यात जॉन पॉल म्हणाला की, कोणताही माणूस पक्षपाती असतो. निपक्षपाती नसतो. कुठल्यातरी एका पक्षाचा तो पक्षकार असतो. समकालीन साहित्य चळवळी संपुष्टात आल्या आहेत त्या काय निरपेक्ष होत होत्या काय ? असा सवाल इथे उभा राहतो. ज्या चळवळी आहेत त्याच दिसत नाहीत. त्यांचा विचार पुढे येत नाही. विचारांचा अहंकार होत असेल तर एक प्रमाण विचार आणि एक संवादीपण येणार नाही. गरज असेल तर चळवळ जगते नसेल तर मरते. जवळ येऊन जेवणापूरतं येणं आणि जाणं, चळवळीत चित्र पहायला घेऊन जाणं यात भान राखले पाहिजेत. पुण्यात मोठ्या प्रमाणात खवय्ये खानावळी आहेत. केवळ जेवणासाठीच आहेत. मात्र ती लोक एकत्र येतात. जेवताना एकत्र येऊन विचार करतात. हे सर्व आपण समजून घेतलं पाहिजे. १९४६ ते १९८६ काळात मराठी ग्रामीण साहित्य फुलले आहे. माडगूळकर, ते भास्कर चंदनशिवेपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करणारे लिखाण आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात लावणारी कादंबरी नाही. पुढे बाबुराव भोसले यांनी पहिली कादंबरी लिहिली. “हाल्या हाल्या दुधू दे” १९८५, आणि त्यानंतर लिखाणाला नवी धार येत त्या प्रश्नांवर नजर टाकणारे साहित्यिक १९८५ ते २०१५ या कालखंडात ५० पेक्षा जास्त कादंबऱ्या शेतकरी जीवनावर लिहिते झाले आहेत. लेखक - वाचक शरण होतो. शरणप्रिय का होतात लिहिणारे विचार ? बाबुराव मुसळे यांच्या मुलाखती मध्ये शेतकरी आत्महत्या हे सत्य का कादंबरीतून लपवल्या गेले आहे ? त्या कादंबरीत लेखक काय म्हणतो, तर १९८६ मध्ये आत्महत्या नव्हत्या. ही भूमिका का घेतली असेल ? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. मराठी साहित्यामध्ये आणि समकालीन साहित्य भूमिकेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामध्ये हा प्रश्न करणे गरजेचे आहे ही सर्वक्षेत्रेषु काळाची गरज बनत चालली आहे. त्यावर लिहिले – बोलले गेले पाहिजे.
परिवर्तनवादी
काळाची समीक्षा ठरवणे अवघड
झालेल्या अवस्थेचा हा काल आहे. त्यासाठी
चळवळी व इतर घडामोडी समजल्या गेल्या पाहिजेत. १९९१ नंतर साहित्य
आणि सामाजिक चळवळ पोकळ होत गेली.
राजधर्म, सत्ता, धर्म, संस्कृतीधर्म त्रिकोण
समजून घेऊन नवे आयाम सर्व विशेष गती विसरणे म्हणजेच चळवळीची फुटीरतावादी विचार घेऊन
चळवळी पुढे पाय टाकत होत्या. या स्थित्यंतराचे सर्व आयाम समजले पाहिजे. जे पुढे गेलेले विचार आहेत ते
श्वेतीशी आणि शेतमजुरांशी संबधित प्रश्नांना वाव देणारे आहेत. आजच्या ग्रामीण
जीवनात कामगारांची अवस्था काय आहे ? हे वास्तव कळले पाहिजे. त्या परिप्रेक्षात
स्त्रीवर्ग कसा जगतो आहे ? याचेही भान
सामाजिक आणि साहित्यिक चळवळीला असले पाहिजे. शेतीच्या
स्वयंपूर्ण विचारप्रक्रियेवर लादले गेलेले विचार पुढे धर्मांध राजकारणी आक्रमणाने बलिष्ट झाल्याचे धर्म आणि प्रस्थापित साहित्य यातून अनुभवायला
मिळते. विरोध करण्याच्या आधीच चळवळी दबावगटांनी दाबून टाकल्याचे एक चित्र
आपल्याला दिसते. ते म्हणजे १९८९ मध्ये मुंबईला कामगारी चळवळी, पश्चिम बंगाल चीमनलाल
कामगार चळवळ, आणि त्या
ठिकाणी झालेल्या दंगली, हिंसाचारी वृत्ती, साखळी
बॉम्बस्फोट अशा वातावरणात लिहिणारी मनं हादरलेले होते. हे वातावरण चळवळी पाडत होते. ऐक्यताभाव लिहिणाऱ्या विचारात दिसत नव्हता.
व्यक्तिगत अहंकार, भूमिका, शहरी विचार व फुटीचा अंदाज यामुळेच अवेळी पडलेल्या चळवळीचा पाडाव आपण समीक्षाकृत करताना
अपयश घेतले का ? हा एक
प्रश्न आपल्या समजून घेत दोन्ही पक्षाकडून संमेलने व विचारपीठ बदलणे,
बदलणारे लिहिते, हे भूमिका सोडत होती का ? त्यार्थी चळवळी बोलत होत्या का हे पाहणे गरजेचे आहे. म्हणूनच जे दबाव आणणारे आहे त्या विरोधात बोलले
पाहिजेत. उदाहरणार्थ –सामाजिक दंगली आहे. पुण्याची दंगल आहे. उनाची
दंगल आहे. गोहत्या आणि सामाजिक बदलते मानसशास्त्र , गुजरात दंगल
आहे.डमडमच्या सैन्य भरती
प्रक्रियेत रद्द केलेल्या ठरावाला वाचा फोडण्याचे साहस आहे का कुणाकडे ? एफटीआय
मध्ये झालेला प्रशासनाचा हस्तक्षेपी आक्षेप असेल किंवा तिथल्या विद्यार्थ्यांची गळचेपी होतांना दिसत आहे. उत्तरेत आणि सकल भारतभरात एक अंकुशाची भूमिका राजकारण आणि प्रशासन घेतांना
दिसत आहे. मोर्चे, जमाव आणि आंदोलनावर बंदी आणण्याची कामे सुरु आहेत. काय
अन्यायाविरुद्ध बोलणे हेदेखील गुंग आजच्या वास्तवात ठरत आहे ? १९७० ते १९८०
च्या दशकात साहित्याची राजकीय
भूमिका याविषयी पुढेही चळवळीची दिशा खाऊजाने म्हणजे
राजकीय भूमिकेच्या उद्देशाने खाऊन टाकल्या गेलेली आहे. संमिलीकारण,
अमिश्बाजी, लोभी आणि स्वार्थीपणा अशाने साहित्यविचार व लेखक असे समीकरण झाले आहे. चळवळी येथे या कारणाने दबल्या जातात की, त्यांची मुस्कटदाबी होतेय, लिहिणाऱ्यांचे खुण होतात,हत्या दडपशाही वाढविली जाते आहे. जल्लोषाचे वातावरणामुळे लिहिणारे हात थोडे कुजबुज करतात, थरथर करतात तेव्हाच त्यांना दाबून ठेवल्या जाते मग ते भावनिक, मानसिक,
आर्थिक आणि नैतिक, सांस्कृतिक धोरणाच्या पडद्याआड झाकून ठेवल्या जाते. मागेपुढे बघता वैचारिक भूमिकेतून लिहावं की
नाही ? अशी एक मानसिक प्रक्रिया करून घेतल्यामुळे साहित्यात नव्या पिढीने वैचारिक भूमिका घेणे अवाश्यक आहे. त्या भूमिका निर्माण केल्या गेल्या पाहिजेत.चळवळ आणि इतर दडपशाहीच्या वातावरणाचे विश्लेव्षण करून समकालीन
वैचारिक भूमिकांची वर्गवारी करता त्यांचे विश्लेषीकृत टिप्पणशास्त्र करणे महत्वाचे
वाटते. मीमांसा करणारा भाव आपण निर्माण केला पाहिजे. भीमा
कोरेगाव दंगलीनंतर कबीर कलामंचच्या कार्यकर्त्यांनी गाणी लिहिली आणि या
गाण्यावर पुणेरी पोलिसांच्या
यंत्रणेचची नजर आहे. काय
लिहावं ? कस लिहावं ? हे पोलिस यंत्रणा ठरणार असेल तर चळवळींचा गळेघोट होतो आहे ? काय असा सवाल उभा राहणार नाही का ? असा
सवाल उभा राहिला पाहिजे. आपण काय काय खावं ? काय ठेवावं ? काय असावं ? काय करावं ? आपल्यावर या ससेमिऱ्याच्या भूमिका आपले अस्तित्व काय आहे ? आपण स्वतंत्र आहोत का? असा सवाल उभा करतात.
स्वतंत्र काश्मीरपासून
केरळपर्यंत जे प्रश्न आहेत ते या प्रश्नांना समजून घेऊन आपल्या लिहिणार्यांच्या
भूमिका स्पष्टपणे असणे गरजेचे आहे. यासाठी भूमिका घेणे गरजेचे आहे.
म्हणून आनंद तेलतुंबडे
यांच्यावर होणारा आरोप, दबाव आजच्या साहित्यात हा विचार तितक्या
प्रकर्षाने येतो आहे का ? हे तपासले गेले पाहिजेत. पाकिस्तानला होणारा चीनचा
पाठिंबा कोणतीच मिडिया समीक्षेने मांडत नाही. यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत
काय ? सिरीयायी जनतेला होणाऱ्या अन्याय आत्याचारावर येथील मिडिया बोट ठेवत नाही
सिरीया देश जगात अस्तित्वात नाही काय ? काश्मीरच्या युवकाल लखनऊच्या भरलेल्या
रस्त्यांवर बेशालाक झोडपल्या जाते हे मानवी आणि संविधानिक अधिकाराच्या विरुद्ध
वर्तन आहे असे का वाटत नाही ? इतका हिंसाचार कोठून पैदा झाला माणसाच्या काळजात
? वेनेझुयाला देशातील नागरिकांच्या भुकेचा
प्रश्न कोणत्याच मराठी साहित्याच्या भाषेने गुंढाळलाही नाही. मराठी वैश्विक भाषेचे
अस्तित्व असेच राहणार आहे काय ? मसाला उत्पादक केरळातील मिरीगिरी गावचा शेतकरी आणि
तेथील राजकीय वातावरण यांचा संघर्ष सामाजिक बांधिलकी म्हणून कोणी का मांडत नाही ?
आत्महत्या करणाऱ्या शेतकर्यांचे प्रमाण जास्त असेल परंतु हेही जाणून घेतल पाहिजे
की, केवळ महाराष्ट्र आणि विदर्भातच फासी घेणारे शेतकरी आहेत का ? बाकीच्या
राज्यातील मजूर, कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या भुकेचा आणि आणि जीवनमरणाचा प्रसंग
आपण कसा हाताळत आहोत ? त्या प्रश्नाला मराठी साहित्यविचारात स्थान देतो आहोत काय ?
मुजफ्फरनगरच्या अन्यायाविरुद्ध वोळू पाहणाऱ्या युवकांवर झालेल्या हल्ल्याची वार्ता
समाजिक बांधिलकी म्हणून साहित्याने मराठीला दिली आहे का ? हे पाहण्याची आज गरज
आहे. पुलवामा आणि सर्जिकल स्ट्राईक च्या संदर्भात
या दोन्ही हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांची भूमिका आणि त्यांची
भाषा, विश्लेषणाचे मानसशास्त्र यांचा सखोल अभ्यास सामाजिक बांधलकी म्हणून
साहित्याने केला आहे का ? ऑष्ट्रेलियातील बालकांवर लैगिक अत्याचार करणाऱ्या
कॉर्डीनल पेल या न्याधीशाला तब्बल बावीस वर्षानंतर सहा वार्षांची शिक्षा होते आहे
? न्यायप्रक्रिया आणि मानवी हक्कअधिकार जागतिक पातळीवर धोक्यात आहेत काय ? हेही
समजून घेतले पाहिजेत. कारण की मागच्याच काही महिन्यात जमालांची हत्या करण्यात आलेली
आहे ती हत्या मानवी हक्काधिकारांच्या संदर्भात मोठी घटना आहे. साहित्य समाज घडामोडीपासून किती दूर आहे आज समजलं पाहिजे. ह्या दूरी आपल्याला काढता आल्या पाहिजे. वास्तवाचं समाज भान आपल्याला कळाले पाहिजे. केवळ सरकारवर विरोध दर्शवला म्हणजे त्याबाबतीत भूमिका केली असे योग्य नाही.साहित्य हे समाजात होणाऱ्या
उल्थापाल्थीपासून लांब राहिलं तर साहित्यविचार हा कुंठीत होईल. केवळ हीच
एक नाही आपल्या पुढे नसरुद्दीन शहावर शिव्या
खाण्याची वेळ येते हे वर्चस्ववादी वृत्तीचे लक्षण समजून घेऊन साहित्याचे लिखाण करतावेळी आपली भूमिका बजावली गेली पाहिजे.
जातीवरून उठणारे मोर्चे, चळवळी आणि विरोधाचे सूर आपल्या साहित्य चळवळीने निरपेक्षपणे आणि
आणि उथळपणे यातला भेद समजून घेवून
लिखाण तत्व घेतले पाहिजे. समजून घेऊन विवेकाने लिहिले गेले पाहिजेत.
विचारस्वातंत्र्य जपून ठेवून सहित्यविचार हा लिखाणात आला पाहिजेत. सर्व क्षेत्रावर असलेली धर्मांध शक्ती विभ्रमिकृत झाली पाहिजे. तिथे नितळ विचार
टाकता आला पाहिजे. हजारो वर्षाचा धर्माचा साहित्यावरील पगडा असा विवेकाने चिरता
येईल. यासाठी एक विवेकसत्य भूमिका घेत
समीक्षा केली पाहिजे. जेएनयु
पासून प्रत्येक विद्यापीठापर्यंत देशद्रोही,
देशभक्ती व पक्ष आंदोलने, मोर्चे, चळवळी समजून लिहितांना काही ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. शेअर खरेदी प्रकरणावर कोणी बोलतांना एकू
येत नाही. चित्रकार हुसेनची हत्या यावर कोणी लिहिताना दिसून
येत नाही.
मित्रांनो, “आजचं वर्तमान निषेधार्थ आहेच...पण याला पर्याय उभा करून दिला पाहिजे.
सामान्य माणसाच्या काळजापर्यंत हे वास्तव विखारसत्य भिडले पाहिजे. या
प्रति प्रतिकार भावना सर्वसामान्यांच्या प्रति उभी राहिली पाहिजे.
सामान्य माणूस जेव्हा उभा राहतो तेव्हा परिवर्तनाकडे वाटचाल होत असते.आपल्याला समान्य मौस उभा करायचा आहे. आणि
त्याचा काना ताठ ठेवत त्याला वाकू न देता स्वाभिमाने जगायला लावायचे आहे. आजच्या गर्भात हा सूर्य उगवतो आहे. खरंच हि सकारात्मक बाब आहे. सामानांच्या प्रति
लेखकाने लिहिले गेले पाहिजेत याची जबाबदारी आणि जीवाची जोखीम ही केली पाहिजे. कारण;
जागतिकीकरणामुळे प्रश्न बदलले आणि चळ्वळीचा मृत्यु
झाला. १९९० नंतर सकळ वर्चस्ववृत्तीचा समज चळवळीशीला शिथील करत गेला आहे. चळवळी
जेव्हा स्थितीत होत गेल्या. त्या अनुषंगाने साहित्य चळवळ आणि समाज प्रगतीही खंडित झालेली आपल्याला
इतिहासातून पाहायला मिळते. हे आपण उघड्या डोळ्याने तपासून घेत नव्या समाज
व्यवस्थेची मांडणी साहित्याच्या परिप्रेक्षातून घातली पाहिजेत. काळानुसार आणि
परिस्थितीनुसार परिवर्तने होत गेलेली आहेत.
जेव्हा साहित्य चळवळ उभी राहते तेव्हा वारकरी संप्रदाय मधला तुकाराम परिवर्तनवादी साहित्य मांडताना दिसतो. त्यानंतर नामदेव ते उत्तरेत कबीर आणि त्याच पार्श्वभूमीवर जना, मिराही आपली लेखणी
तितक्याच प्रकर्षाने चळवळीला अर्पित करते. पुढे फुले, डॉ. आंबेडकर, अण्णाभाऊ साठे
नामदेव ढसाळ, कामगार चळवळीतील सुर्वे, ग्रामसाहित्य आणि त्यांच्या हालचाली सढळ हाताने हाताळणारे शंकर पाटील, कॉ. शरद पाटील अशी मंडळीची ज्यावेळेस साहित्यिकांची आणि
सामाजिक, वैचारिक अंगे त्यादृष्टीने चळवळीत आज उभी राहतील तेव्हा चळवळी पुन्हा जिवंत होऊ शकतील.
त्याकाळी सामाजिक चळवळीच्या बरोबर तत्कालीन विचार चळवळीतले प्रश्न आणि जागतिकीकरणाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी समजायला लागतात. वेल्फेअर टेटस स्टेट त्या काळातली एक कोटी होती. अर्थकारणाने स्टेट टिकत नाही.
खाजगीकरण – उदारीकरण - जागतिकीकरण आलं त्यामुळे वेल्फेअर स्टेटची
संकल्पना जन्म घेऊ पाहत होती ती जगू शकत नव्हती. प्रत्येकाचा
स्वार्थ आणि समाजस्वास्थ वेगवेगळ्या संकल्पना समोर घेऊन येत होत्या.
बाजारपेठेची व्यवस्था आणि त्याची नीती समजून समीक्षा करता
आली म्हणजे काळ समजू लागतो. काळाच्य मर्यादाही समजू लागतात.कार्यकारणभाव कळून येतो
आणि परिप्रेक्षाचे विश्लेषण करता येते. संपादक,
विद्वान लेखक आणि गगनाला भिडलेल्या वस्तू, वस्तूचे लिखाण,
व्यक्त होणारे तत्व, विकत घेतल्या जाणाऱ्या
मुल्यधारणा यांची एक बाजारपेठ जगात सुरु आहे. पिकलेले विकायाला आणि खपवायला काही
काळ जावा लागतो. त्याची मिजास वाढते. खरे तर आज तसे घडून येतांना दिसत नही. त्वरित
बाजारपेठी केंद्रीकरणाने विकायची आणि खरेदीची सोय या व्यवस्थेत भरभक्कम आहे. आज आपण भूमिका घेतली नाही तर केवळ चर्चा होत राहील आणि काळ निसटून जाईल. आज गुलामी
अवस्था आणि त्याची विचारप्रक्रिया अतिशय सूक्ष्म आणि तंत्रज्ञानाने गुंतागुंतीची
झालेली आहे. प्रत्येकाच्या साहित्यविचारामध्ये प्रत्येक गोष्ट विक्री झालेली आहे. त्यात संविधानातील मानवी मूल्यांचे तत्व
किती प्रमाणात आहे ? हे तपासण्याची सोय करणे समीक्षेला आजच्या बदलत्या काळात
गरजेची बाब झालेली आहे. लेखक हे विकल्या जात आहेत. बाजारात
पाऊल ठेवणार नाही असे म्हणणारे आज कमी आहेत का ?
बदलत्या परिस्थितीत नवा विचार घेऊन भारतीय राज्यघटनेच्या अंगी असलेली मानवी
मूल्यांची संबंधित भूमिका घेणे ती वठवित राहणे आणि भूमिका घेत वैश्वविवेक निर्माण करत राहणं आज गरजेचे आहे. ती बांधिलकी आहे.
बांधिलकी कशासाठी आहे ? कोणासाठी आहे ? बांधिलकी सहित्याची आणि समाजाचीही आहे कारण साहित्य हा जसा समाज
अंतर्मनाचा चेहरा असते तसेच समाजची हा साहित्याचा मोहरा असतो. म्हणून बांधिलकी कुणाशी कुणी ठेवावी ?
म्हणजेच काय तर मानवी मूल्यांना जपणाऱ्या बहुजनतेवर अन्याय
अत्याचार होतो आहे अशा सामान्यांची स्वातंत्र्य, समता,
बंधुता, एकता आणि सामाजिक न्यायाच्या
सलोख्याने भूमिका घेऊन लिखाण तत्वातून साहित्याच्या पार्श्वभूमीवर बांधिलकी ठेवली
पाहिजेत. कारण की, व्यवहारवादी मूल्य कल्पना आजच्या काळामध्ये बदलत
आहेत. आणि या संकल्पना बदलत असतांना आपण सामाजिक, सांस्कृतिक,
राजधार्मिक, राजकीय आणि नैतिक अर्थकारण आपल्याला समजले गेले पाहिजेत.
त्यामागचं राजकारण आपल्याला समजले गेले पाहिजेत.
जागतिकीकरणाचे परिणाम -
परिमाण संबोध धार्मिक अधिकरण्याकडे होत
आहे. धार्मिक अधिकरणाने जात, धर्म, पंथ, गटतट पडत आहेत. तसेचया फुटीर विचाराने
चळवळीला फुटपट्टी पडतात. चळवळीकडे ऐक्यता राहत नसून त्या फुटतआहे. तोडत
गेलेले गट हे बाकीचे गटागटात मोडले जातात.
गटागटात विभागले जातात. त्यांचे साहित्य, त्यांचे विचार त्यांच्या भूमिका त्या सुद्धा
गटातटात होऊ लागतात. संघर्ष करून ते एकमेकांमध्ये सममूल्य सहभावना रुजुवू शकतीलच असे नाही. म्हणूनच
मग होत राहते ह्या छपन्न इंच छातीला अंबानीच्या किल्ल्या लागतात. आणि दिल्ली दरवाजा
उघडून ते पसार होत्तात घटनेची मूल्य पायदळी तुडवत.
जागतिकीकरणामध्ये राजकारण,
धर्मकारण आणि ज्यावेळेस राजकीय तत्वाचा पाया घेतला होता त्यावेळेस परिवर्तनाचा वारू त्याना लंगडा करणे गरजेचे होते ते आज
आपण पाहत आहोत. सोसत आहोत. १९९० नंतरचा
व्यापारी धोरणाचा आढावा
आजचे साहित्य किती प्रमाणात घेते आहे याची मुल्यामापणे समीक्षेने केली जावीत. साहित्य आणि समाजविचार लक्षात घेऊन लिखाण केले पाहिजेत. बाजारूपणाच्या
वृत्तीला कुठेतरी थांबले गेले पाहिजेत, लगाम टाकला गेला पाहिजे. म्हणून
आपल्याला काही प्रश्न पडले
गेले पाहिजेत. धार्मिक उन्माताचे करायचे काय ?
धार्मिक उन्मादाचे हे
बंड मोडायचे कसे ? मिटवले गेलेला विचार आणि
तो दडपल्या जनारां तत्वाचा गाभा
उगवून कसा आणायचा ? असा विचार ते पुढे
येण्यासाठी काय तरी लिखाणाची
भूमिका घेणे आज मानवी मूल्य आणि साहित्य बांधिलकीस पूरक आहे का ? जातीय वाद का उपसले जात आहेत ? कशासाठी या जाती उन्नत केल्या जात आहे ? मूळ प्रश्न आणि त्याची समीक्षा ही धर्माच्या आड
असलेल्या जातीत आहेत. बुद्ध, कबीर, तुकाराम, फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांनी त्या
त्या काळात जातीवर प्रहार करत प्रश्न मांडले आहेत.
त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या लिखाणातून त्याच्या तत्त्वातून,
त्यांच्या दोह्यातून, त्यांच्या साहित्याच्या प्रत्येक मुल्यासंस्कारातून हे प्रश्न मांडत त्यांनी पर्याय ठेवले आहेत. हे आयाम आपल्या आजच्या साहित्यिकाला, नव्या लेखकाला समजले
पाहिजे. आजच्या प्रश्नांवर उपाय काय आहे? ह्याची समीक्षा करता आली पाहिजेत. जातीवितुष्ट आणि द्वेश्वृत्ती नष्ट झाली म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असलेली भेदभावदृष्टी नष्ट झाली पाहिजे. संविधानिक मूल्यांचा संस्कार आपल्या वापरामध्ये यायला
पाहिजेत. आपल्या जगण्यामध्ये टो विचार घेता आला
पाहिजेत. तो अंगीकारल्या गेला पाहिजेत. भारतीय राज्यघटनेने समजून सांगून दिलेली, लिहून
दिलेली ही तत्त्व आहे जी तत्त्व आपण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये अनुभवली पाहिजेत. तसे वागले पाहिजे, ती तत्वे जगली पाहिजेत.
सामान्यांच्या प्रेरणा चळवळीशी उद्बोधन करण्याची शैली आपण ठेवली गेली पाहिजेत. सत्ता, धर्म,
जातीच्या एकाच गर्भात आहेत. त्या फोडल्या पाहिजेत. म्हणून आपल्याला जाती मोडण्यासाठी लालसा, धर्म
आणि त्याला नाकारला जाणारा
विचार करता गेला पाहिजे. कारण धर्म हा केव्हाच भक्ताला मालक होऊ
देत नाही तो दासच ठेवत आहे, असतो. तेव्हाच जाती
मोडण्यासाठी आपल्याला भेदभावाच्या पलीकडे जाऊन मानवी एक रूप, तिचे
संदर्भ आपल्याला माहिती
असायला हवेत. मानवतेच्या आपल्या भूमिका माहिती करून घेणे गरजेचे आहे.
सार्वभौम भारतीय विषमतेची विषवल्ली ही मुळात
मानसिकतेत आहे. ती मानसिकतेतून अभिसरण प्रक्रियेत भेदल्या गेली आहे. जिवाणू - विषाणू आणि रासायनिक शारीरअभिकरणापर्यंत ती गेली आहे. या विषमतेचे जीवाणू आणि विषाणू मानसिकतेच्या मागे हजारो वर्ष आपली भेदाची भूमिका ठाण मांडत आलेले आहेत. अनुवंशाने जो जातीधर्म विषमतेचा
विचार मानवी मनाच्या, मानवी जगण्याच्या अस्तित्वात होता तो पुढे प्रगमित झालेला आहे. भेदाच्या दृष्टी ठेवून हाडकांपासून तो पर्यंत डीएनए पर्यंत रुजला आहे. म्हणून नव्या
मूल्यांची येथे पेरणी केली पाहिजे. जंतुविरहित ठेवण्याची भूमिका आज वैज्ञानिक
दृष्टिकोणाने साहित्यामध्ये घेणे गरजेचे आहे. लिखाण
तत्वांमध्ये घेणे गरजेचे आहे. विचार बनतो, लेखक,
प्रकाशक, साहित्य आणि आजचा मीडिया यांनी. हे
वास्तव समजून बहुजनाप्रती परिवर्तनाची भूमिका घेतली पाहिजेत. की, ज्या
ठिकाणी अन्याय अत्याचार झालेला आहे, ज्या ठिकाणी दडपशाहीच्या भूमिकेने
आवाज दाबला गेल्या लोकांचा विचार
मांडण्याची शैली विवेकाने आपण अंगीकारली पाहिजे.
साहित्य, बुद्धी, मन, हृदय त्याला
विचार करायला लावतो. भावनेवर आव्हान आणि मानसिकतेत बदल घडवणारे विचारलेखणे झाली पाहिजेत. पूर्वी झालेल्या चुकांची ओझ आणि
त्यांचा वारसा पुढे घेऊन जाऊ नये. तर तिथेच टाकून द्यावे. त्यात
दुरुस्त्या कराव्या आणि दूरगामी आव्हान पेलून धरले पाहिजेत. शेतकरी साहित्यिकांनी ही आव्हानं घेतले पाहिजेत. साहित्यिकांनी लिखाणावेळी त्यांची मानसिकता निरपेक्षपणे
भूमिकेत नेली पाहिजे. पूर्वग्रहदूषित न राहता निरपेक्षपणे न्याय, समता,
बंधुता आणि एकतेला आपण खेचून
घेतले गेले पाहिजे.
स्वतंत्र बुद्धी, विवेक, विज्ञान आणि मानवतेची साधने लिखणात ठेवळ्या गेली पाहिजेत. योग्य ते उपाय आणि निर्णयन घेणे सोयीस्कर होईल यासाठी पदोपदी बंडखोरी आणि रोषदेखील त्या त्या काळात लेखकाने पत्करला पाहिजे. मनाची
मशागत स्वतंत्र करायची असेल तर स्वतःचा विचार स्वतः केला
पाहिजेत. उदात्त भावना, उच्च विचार व शुद्ध तत्त्वांनी सत्व आचार-विचार
मनानेसमृद्ध केले गेले पाहिजे. हा प्रवास प्रगतीपदाचा
आहे. प्रगतीकारक आहे. सुखर आहे. कारण हा विचार सामाजिक मानसिकतेत सुद्धा उतरत असतो. शांती, विश्वास आणि प्रगतीच्या पर्यायावर अवलंबून असलेले जे विचार
आहेत हे विचार लेखनाच्या अंगातून साहित्यिक आणि साहित्यामधून मांडले पाहिजे.
त्यासाठी सोयीस्कर दूरदृष्टी, सुसंस्कार, केवळ
आपल्याजवळच नव्हे तर सबंध मानवजातीच्या विकासासाठी घडणारे नेतृत्व लिखाणातून घडवले
जावो... ते घडवले गेले पाहिजे ही दूरदृष्टी साहित्याला आणि समाजात वावरतांना असली पाहिजेत. निडर नेतृत्त्व हवे असेल तर नौटंकीची गरज नाही. आपले तत्व मांडणारी साहित्याची भूमिका असली पाहिजेत. ती भूमिका सामान्यांच्या परिप्रेक्षाजवळ गेली पाहिजेत. सामान्यातील सामान्य प्रश्न हे सामान्यांच्या
डोक्यामध्ये जावे असा विचार घेऊन लिखाणाद्वारे मांडणार आहोत त्यावेळी साहित्यामध्ये देखील बदल घडणार आहेत हे निश्चित. कारण की, समाज हे साहित्य आणि साहित्य हे समाजाच्या एका मापदंडाचे दर्शन घडवणारे तत्त्व आहे.
प्रारंभीपासून साहित्यात जातीबंधन आणि धर्माच्या अधीन गेलेला विचार त्याठिकाणी मांडला गेला आहे.
म्हणून साहित्यामुळे समाजात परिवर्तन होण्यासाठी दीर्घ कालावधी लागत होता. हा काळ मोठा होत गेलेला आहे.
लिहिणाऱ्यां हातांची मानसिक,
वैचारिक, आर्थिक, नैतिक आणि
सांस्कृतिक गुलामगिरीतून सुटका झाली पाहिजे. आज
बऱ्याच लिखाण करणाऱ्या लेखकांच्या तत्त्वावर अशी भर दिली जाते की,
तुम्ही लिहिलं पाहिजेत. विचार तुम्ही चळवळीसाठी लिहिले पाहिजेत. आणि
तुम्ही चळवळीसाठीच लिहिते
झाले पाहिजे. असे नियम लिहिणाऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे
नाहीत का ? अशी विचारसरणी नव्या
लिखाणाच्या लोकांवर बोट ठेवून टाकली जात आहे. दबावाने टाकली जात आहे. म्हणून साहित्यिकाने आपली उद्दिष्टे, मुल्ये, मापदंड, मानवी भूमिका व विचाराचा स्वतंत्रपणे नवा अंगीकार केला पाहिजे.कुणाच्या बंधनात न राहता नवा आयाम टाकला
पाहिजे. मुक्त असणारा विकार शोधून घेतला पाहिजे. कारण की,
सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, धार्मिक आणि नैतिक
क्रांती घडविण्यासाठी तरुणांनी सजग राहण्याची आवड आज घेणे गरजेचे आहे. ते
केले जात आहे का ? असा एक विचार आजच्या
काळाच्या परिप्रेक्षात आपण केला पाहिजे. मार्क्स पाहिजे पण तो १९
व्या शतकाचे ओझे घेणारा नसावा. आम्हाला एकवीससाव्या शतकामध्ये असणारा मार्क्स पाहिजे आहे. त्यात
फुले असतील, त्यात आंबेडकर असतील, त्यात अण्णाभाऊ साठे
असतील, असे विविधांगी विचार करणारे असतील. असा मार्क्सवादी तत्वाचा नवा
तत्ववादमार्ग हवा आहे. मार्क्सवाद
आपल्याला एकविसाव्या शतकामध्ये नव्याने गरजेचाच आहे. त्यासाठी आपण आपल्या समस्यांना आपल्या विचारांचे उत्तर
शोधले पाहिजेत. आपण इतरांना विचारतो की, मला यावर आता समूपाय सांगा. पण हे योग्य नाही. आपले प्रश्न त्यावेळेस ते त्यांच्या परिस्थितीतून सापडलेली उत्तर
देत असतात. आम्हाला आमच्या विचारातून व परिस्थितीतून येणारे उत्तर स्वतः
शोधले पाहिजेत. म्हणजे आपण वैचारिक गुलामगिरी नष्ट करू पाहतो आहे. अशी
भूमिका आपण घेतली पाहिजे.
समीक्षण करताना जागतिक प्रश्नांचेही चोखंदळपणे आपल्या
देशातल्या प्रश्नांना विश्लेषण लावत जागतिक उलाढालींचे व प्रश्नांची हे चोखंदळपणे चिरफाडयुक्त विवेचन केले
गेले पाहिजेत.
कॉर्पोरेटशाही आणि
जागतिकीकरणाने मक्तेदारी भांडवली विचार गेल्या काही दशकात भक्कमपणे फणा काढून उभा आहे. भांडवली
वृत्तीचा अभ्यास करतांना आपण स्वतंत्र
विचार करायला घेतला पाहिजे. ही भांडवलीवृत्ती आर्थिक साम्राज्यशाही प्रस्तुत करत असतांना सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक,
राजनीतिक ढवळाढवळ करत आहे. शोषणाचा नवा मार्ग निर्माण करीत आहे. आणि
हे शोषण आपल्याला काळाच्या ओघात जागृत होऊन समजलं पाहिजे. कॉर्पोरेटशाहीची नियंत्रितता आता
लोकशाही देशांवर आहे.
हुकमी नियंत्रित सत्ता लोकशाही देशांवर आहे. सर्व
जगात बेरोजगारी आहे. अमेरिकेत बेरोजगारांचा उठाव होऊ नये म्हणून बेरोजगार भत्ता दिला जातो. कहरच तिथे उठाव घडून येऊ शकत नाही. न्युयोर्क ला ९९ विरुद्ध १ असा संघर्ष आहे.
रोबोटिक्स, स्वयंचलित यंत्रामुळे बेरोजगारी वाढिली आहे असे म्हणतो त्याचवेळी आपण प्रजनन
टक्केवारीही पाहिली पाहिजे. लोकासंखेचा वाटा बेरोजगारीला कसा जन्म
घालतो हेदेखील पाहिले जावे. एका दिवशी शकडो कामगा लागणार होते तिथे दोन व्यक्ती काम करतात. ही तंत्रज्ञानाने उघड केलेले
सत्य आहे. ही समस्या केवळ इथे भारतात नाही. तर सबंध तरूणवर्गाच्या भोवती
चित्कारलेली आहे. ती भयंकर उग्र होत
जाणारी बेरोजगारीची अवस्था आहे. आजचा मार्क्सवाद हा भरडला जातोय बेरोजगारीचे
पायाखाली. पर्याय, उपाय
सुचवला पाहिजे. नवी घडी घातली गेली पाहिजेत.
म्हणून आपल्या साहित्यिक तत्त्वाला काही भूमिका घेणे गरजेचे आहे. वास्तवाचे वैशिष्ट्ये पाहायला गेलं तर एक संविधान विरुद्ध विचार करणारी ही
राजवट आहे असे सत्य दिसून येते. अलिप्तपणे
हुकूमशाहीच्या समोर लाचारपणे उभी करणारी राजवट आहे. समाजवादाशी दोन हात करणारी
ही राजवट धर्मनिरपेक्ष ऐवजी धर्मांध वृत्ती अधिकार दृष्टीने जनतेवर उभा करणारी ही
राजवट आहे. ही राजवट बेश्लाख समर्थक हे अंधाधुंद हुकमी अधिकार लादणारी अनुयायी घडविणारी आहे. शिक्षण देणारी नाही त्याचबरोबर उलट हातभार व मदतही
देणारी नाही. टीकाकारांच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी ही
राजवट आहे. सभा, समुदाय, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे. आहे ही राजवट म्हणजे राज्यघटना मान्य
करत नाही. तर अशी राजवट राज्य करतांना आपण कसा विचार
करून लिहिले पाहिजे ? हे समजून घेणे म्हणजेच साहित्यिकांनी आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवर
भूमिका घेणे होय. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि सामाजिक ऐक्य अधिकारांमध्ये समाजाची, मानवाची निर्मिती, मानव
समाजाची निर्मिती होत असते. १९४९ रोजी संविधानाने दिलेल्या जबाबदारी आज देखील आपण पूर्ण करू शकत नाही ही शोकांतिका आहे. त्या जबाबदारीची जाणीव
ठेवून लिहीत नाहीत. अशी भूमिका आहे व्यवस्था बदलायला कमी पडते. शिवाय आपले अशाने प्रश्न सुटणार नाही. जे
व्यवस्थित हातमिळवणी करतात ते व्यवस्थेशी जुळून निसटतात व आपले मूळ विसरतात. आणि
हे मूळ विसरतांना मूळ उखडून
टाकायची शक्ती घेत असतात. चळवळीची ऐक्यता भंग करतात.
आजची राजवट ही व्यापारी मूल्यांशी व्यवस्था ठेवणारी आहे. हेच ते विसरून जातात. मानवी मूल्य रुजवनुक
थांबत आहे. ही राजवट सांस्कृतिक, धार्मिक,
आर्थिक, नैतिक, सांपत्तिक आणि आकडेवारीचा हिशोब करणारी आहे. फुटीरतावादी ही व्यवस्था अधिकरण करणारी आहे हेच मुळात विसरून जातात. आहे गेल्या साडेचार वर्षात सामाजिक मूल्य रुजू होत नाही. तर
व्यापारी व्यापारी मूल्यांची रुजवणूक होते आहे.
म्हणून बेरोजगारी मिटावी म्हणून वडापाव तळा म्हणणारे विधान होणे सहाजिकच
आहे. साहित्याच्या
बांधिलकी समजताना साहित्यप्रवाह आणि विचारप्रवाहाच्या कोट्या ह्या समाजप्रबोधनपर असल्या पाहिजे. सर्वसामान्यांच्या
मनामध्ये परिवर्तनासाठीचे प्रश्न निर्माण होणे, तरुणांचे प्रबोधन होणे
गरजेचे असतांना आजचे साहित्य तसे भरपूर लिखाण करू शकते आहे का ? असा एक प्रश्न आपल्याला आज पडला पाहिजे.
व्यवस्था बदलायला क्रांतिकारी विचार मांडताना तसे वागलेही पाहिजेत.
तेराव्या शतकात नामदेवांनी, “ज्ञान हे प्रबोधनासाठी ना प्रवचनासाठी नाही तर
सामाजिक क्रांती करण्यासाठी आहे!” असे वैचारिक तत्व ठेवले आहे. याच मार्गाने नेणारे हे तत्त्वज्ञान १३ व्या शतकामध्ये नामदेवांनी सांगितले होते. १७ व्या शतकामध्ये तुकोबारायांनी, “शब्दाची
आमचे धन... शब्दाची आमचे रत्न... शब्दाची आमचे शस्त्र आम्ही करू...” का
मांडले. कारण त्यावेळेस त्या स्थितीला त्यांनी चोख प्रतिउत्तर
दिलेले आहे. आज चंगळवादी दृष्टीने लिखाणाची गती काय ठेवली आहे आहे तपासून
पाहिले पाहिजे. सामाजिक आणि साहित्यिक मुल्ये बाजारू ठरवली जात आहेत का ? आमची आजची आव्हान स्वीकारून शब्दांचा उपयोग हा सामाजिक क्रांतीचा पाया
उभारण्यासाठी निर्माण केला जात आहेत का ? असाही एक आपल्याला पडताळा घ्यावा लागणार आहे. संविधानानुसार समाज समतेला, बंधू
तेला, मानवतेला, एक तत्त्वाला आणि सामाजिक न्यायला प्रेरित
होणारा विचार घेऊन जगत आहे का ? असा समाज आपल्याला उभा करणे आज गरजेचे आहे.
मानवधर्म म्हणजे माणुसकी उभी करायची आहे. तरी आपल्याला या
संविधानाच्या तत्वज्ञानाने, संविधानाचे विचार आपल्या सर्वांना करणे आज गरजेचे वाटते आहे. आणि म्हणूनच आपल्याला जो या काळाच्या
पार्श्वभूमीवर विचार करायला लावणाऱ्या या समकालीन साहित्य चळवळीचा आणि बांधिलकी
अभ्यास आज आपण करणे गरजेचे तो अभ्यास लिहिणारे हात आज समकालीन साहित्य आणि बांधिलकीचा
विचार करून लिहीत आहेत हे सत्य आपल्यासमोर ठेवत आहे...!”
Comments
Post a Comment