|
आसवांचा विद्रोह
तुझ्या पेरणीच्या चाळयातून तूच पेरलेल्या बीया मातीत तोंड खूपसून थोडया विसावतात आणी... मातीशीच विद्रोह करून मातीचे पोट फाडून उन वा-याशी झुंजत आभाळ डोक्यावर मिरवतात...!! आणि तू..... तुझ्या मानेवर सुरी फिरवणा-या तुझ्या मारेक-यांसमोर निपचित जगत आलास कोणतंही बंड न करता.!! आता... मातीवर सांडणा-या तुझ्या आसवांनी ..... धुळीतून उठून विद्रोह केलाच पाहिजे; तुझ्या पेरलेल्या बियांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून. अरविंद भामरे ----- कवितेवरील विश्लेषण------ दुखर झाल्या वेदनांचे हे मुखर झालेले शब्द "आसवांचा विद्रोह"या कवितेतून कवी अतिशय ताकदीने मांडतो.त्या शब्दाच्या भावनेपोटी शिलक्त्तीची कंम्पुकता आढळत नाही.हि सर्जनशीलतेशी जुळून घेणारी पेशीय ओढ असावी कि शास्वती देत राहते सत्यासवे जाणिवांच्या ओल्या जखमांची."तुझ्या पेरणीच्या चाळ्यातून...."असे जेव्हा शब्द फुटतात भावनेशी तेव्हा नवोनमशालींन तत्वाने नवा सिद्धांत पुढील टप्यात असावा असे वाटते.प्रगल्भ विचारसरणी लाभलेला कवी जिवंत जाणिवा व्यक्तत असतो .तीच बव्हंशी चळवळ या शब्दाच्यात सापडते."मातीसच करतात विद्रोह..! हि ओळ कवितेला नवी विचाराच्या संकल्पनेची धार आणून देते.आणि कविता आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक,नैतिक हास्य सर्व मानव्व्यापीत पातळीला चाटून जाते. खरे पाहता कवितेतून हा विवेकवादाच्या खाचऱ्या फोडून अस्तित्वाचा लेखाजोखा मार्मिक लेखनशैलीने कवी घेत राहतो.. वर्गीय दुःखाची झालर अतिशय तळमळीने व चोंखंदळपणे यातून अभिव्यक्त होत राहते. खऱ्या जिवंत लेखणीची काही हीच बावनकसोट असते कि ती किती उन्हावाऱ्यापावसावे खंबीर भूमिका घेत असते. "धुळीतून उठून विद्रोह केलाच पाहिजे....!"हे जीवनाचे सार आहे .कारक असे की रस्त्यावरील जग्ने तर कुत्रेही जगतात,मात्र माणूस माणसासारखा निर्भिस्त जीवन हे सत्य व नेक नियमांच्या कंगोऱ्यावर जगला पाहिजे हा वास्तववाद यातून व्यक्त ओत राहतो. नव्या उमेदीचा शोध येथे बघितला गेला आहे.हे कवितेचे विजयीत्व आहे .असे मला तरी वाटते। जास्त लिहीत नाही कारण-तुमचे शब्द पुढील दर्जा जोपुन आहेतच मुळात..... |
"गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!" गावाकडून बातमी कळली, अन क्षणार्धात डोक्यात विचार तरळले की, "गाव इतकं कसं बेईमान व्हईल?" "पंचक्रोशीतील जगणारांच्या जाणिवांचा अन माणुसकीचा खात्मा झाला क्काय?" "निदान गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!" "गावातल्या बुजुर्ग लोकांना तरी कळवळा यायलं पाह्यजे होती." "का गावाला हे सगळं माहिती नव्हतं?" "गावातलाच माणूस होता नं त्यो का परका होता?" पंचक्रोशीतील जनतेच्या आडल्यानडल्या वक्ताला उपेगी पडणारा माणूस होता ब्वॉ त्यो. वरीसभर कामात जुपलेला. पेरणीपसून तर विकणीपर्यंत उपेगी पडणारा हरहुन्नरी कारागीर होता त्यो. तरबेजी कास्तकार. मापगुण्याला प्यारा असणारा अन - "सगळं काम नीट व्यवस्थित झालं पाह्यजे ब्वॉ!" असं म्हणणारा त्यो सुतार होता. दोरीसुतात काम उभं करणारा मिस्त्री होता त्यो. ...
Comments
Post a Comment