प्रिय
,
तुझ्या शब्दांची ची वाट बघणारा विश्वा खूप आनंदी वाटला.मी त्याच्याकडे बघत होतो.तो कार्यक्रम सोंडुन बाहेर आला.तर कित्ती आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडत होता की सांगणे कठीण. असो तुझा आवाज त्याने ऐकला .तो म्हणे की तुझ्यासारखाच तुझा आवाज आहे.तू जितकी सुंदर या शब्दांची ओळ ओलांडत जाते तितकीच तुझ्या मधुर आवाजातली गोड ओल ती ओसंडत जाते.असं तो काहीतरी म्हणत होता.आणि खूप हसरा चेहरा त्याचा झाला होता.तुझा प्रत्येक छायाचित्रांचा संग्रह त्याने केला आहे.तुला रोज बघत असतो तो.काल मराठमोळं तुझं दिसणं त्याला खुप भावलं. असो.दिवसातून बऱ्याच वेळा त्याच्या ओठावर तुझं नाव असतं. तो सतत मानसी मानसी असं म्हणत असतो.आता तू म्हणशील की तो वेडा झालाय काय?तर तशी लक्षण काही सापडली नाही ब्वॉ मला.तू अजून पुढे जाऊन म्हणशील की प्रेम करू लागलाय तो.तर मी म्हणेन की त्याच्यासाठी प्रेम हा अडीच अक्षरी शब्द सुद्धा अपुऱ्या अर्थाने तू संबोधत असशील तर पूर्णांश तो प्रेमच्याही पल्ल्याड तुला स्मरतो.तुला आठवतो. तुझे बोलणे त्याला काय जादू करून गेलेत माहिती नाही.पण तो हल्ली जगतांना खूप बेधुंद अशा स्वरूपात जिवंत आहे.त्याच्या जगण्यातील आनंद नि मन निखळ झऱ्यासारखं झालं आहे.तो निखळ प्रेमातीत झऱ्यासारखा सतत तुझ्या आठवणीत वाहत राहतो.त्यादिवशी म्हणे तो दुसऱ्या दिवशी जेवला.तो फक्त बोलला,
"घास खायला मन करत नाही..!
आणि बरंच काही.तू काही टोचून वा रागात बोललीस काय असा माझा सौम्य प्रश्न आहे?नंतर मी त्याला समजून सांगितलं कि मानसी तुला कित्ती बोलली की जेवून घे!कोणासाठी म्हणली ती चल तू जेवून घे!तेव्हा तो जेवला.आणि वाटेने जाता वेळी तो म्हणे इस्पितळाला जायचे आहे.त्यावेळी त्याला वैद्यांनी सांगितलं की ज्याने तुला जेवायचं सांगितलं आहे त्याचे एक मनातून ऐक.त्याला साखरपान दिली.मी त्याला फळफळाव आणून दिलं. आता तो खूप चांगला आहे.तुझी सतत काळजी करत असतो.आणि त्याला वाटलं तू खूप नाराज आहे त्यावर.तू खूप रागावते.हा राग करू नको म्हणावं!असं तो बोलला.मला माहिती आहे की तो लैय संवेदनशील आहे.त्याला घाव लागतील ते फक्त शब्दांचे.म्हणून तो म्हणतो की,
"मरण माझे घावाने नाही
शब्दां सारे मृत्यू पाही.....!"
असं तो काहीतरी बोलतो.मला जास्त कळत नाही.मी आपलं त्याचं मन व्यक्त केलं या पत्रातून.बाकी तू समजदार आहेस.तू त्याला नवसंजीवनी दिलीय.त्याला अजून लिहितं केलंय. तुझे बोलण्यातील सहवास त्याला स्पस्ट व्यक्त होत जाण्याला कारणीभूत आहेत.तू नाही बोलली की तो काळवंडतो. मनातून चरकतो.त्याचं काळीज चिरल्यासारखा तो कधीकधी व्यक्त होतो.आणि मग तो भयंकर काळजीत वाटतो.तू बोलली नाहीस की दिवसभर तो ग्रासून जातो .मन त्याचं रमत नाही.तू तर त्याला प्रेम हा केवळ शब्द लावून त्याला शब्दापुरतें मर्यादित करीत आहे काय?असं मनातून तो व्यक्ततो.तुझ्या असण्याने त्याचे जगणे अजूनच सुंदर व विलोभनीय झाले आहे.लैय औदर्यपूर्वक तो तुला काळजाची मानतो.प्रेमाच्या चौकटीत त्याला जीवन जगता आले कधीच नाही. तू कोणती तुझ्या स्वभावाची चौकट त्याला पुढे केली नि तो तिथे थांबला.मला हे माहित नाही.त्याचं ते प्रेम आहे का?असं त्याला विचारून घेतलं तर तो बोलला.की त्याहीपलीकडे.......!
तुझाच स्नेही
विश्वनाथ साठे

...........................................................................................
पत्र.....
........
तसं रोजच लिहतो काहीतरी.... तुझ्या आठवणीत.. मला तुझ्याशी बोलायचं असतं खूप काही....नेमक्या त्याचं वेळी तू जवळ नसतीस....मग हे असं उतरवतं जायचं.... जमेल तसं........
सगळं ओझं उतरलं की खूप हलकं वाटतं....एकदम फ्रेश.....
............ खरं सांगू..
आतापर्यंत तुझ्या पर्यंत जे पोहचलं नाही किंवा कुठेतरी अडखळलं ,ते व्यक्त करायला शब्दच आधार देतात ... म्हणूनच हे पत्र.... अगदी थोडक्यात..,.
...... आयुष्यात काही प्रसंग असे येतात की कितीही सावरायचं म्हटलं तरी पडायलाचं होतं.... उभं रहायच्या प्रयत्नात पुन्हा पुन्हा कोसळतो....आणि या धडपडीतच स्वतःला नि परत तुलाच शोधत राहवं लागतं... कितीतरी काळ...
अश्या वेळी यातून बाहेर पडण्याचा नवीन मार्ग मिळालाय मला... मुद्दाम तुझी आठवण काढायची, तुझ्याशी अप्रत्यक्ष बोलत राहायचं, तुझ्यासोबत जगलेल्या क्षणात हरवून जायचं....... फक्त चांगलं नि चांगलचं....उदात्त ,व्यापक,निस्वार्थी......
.... मग तुझ्या माझ्या प्रीतीची खरी जाणीव तिथं होते...आणि ते हसू बनून चेह-यावर उमटतं...अगदी तुझ्यासारखचं...अल्लद,अलवार,असीम.......
........ हे पत्र वाचून तू हसशील,म्हणशील 'वेडं'...आणि परत तूही काढशील माझी आठवण.....
मनाच्या कप्प्यात दडलेली पण काहीशी दूर गेलेली.....
.....मग नकळत तू ही लिहशील एक पत्र...
....ते पोहचेलच मला.....
....,..... जे असेल फक्त.....
विश्वह्रदयापासून विश्वह्रदयाकडे......

....................................................................................................
Comments
Post a Comment