कथा
***कल्दार रुपया***
"आर तुम्ही नव्या जगाचे गुलाम व्हता क्काय रे....?"
"ते क्काय नक्का सांगू......उद्या भेटू...."
"जरा जीवाय्लं चइन त्त द्या बाप्पहो....!"
"नुस्ते खेटे घालून राह्यल्येत त्या कारखान्यात!"
"..... हं.... हंम्म उद्या.....रैवार हाय....;
"गुर्वारीपन नव्हता तुम्ही...!"
म्या भडभड बोललो.त्यो नुस्ता ऐकून घेत होता.काय करणार गेल्या काही दिवसांपासून संवाद बंद होता.सोबत जेवण घेणं बंद होतं.संगतीनं ग्रंथालयात अभ्यास करणं,ते नाटकं,ती तालीम,ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून नव्या विषयावरचं वादविवादात भांडणं,ते संवादफेक,एकमेकांची हासफजिरू करणं,सारं सारं बंद झालं होतं.त्यो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कारखान्यात चांगल्या पगाराच्या नोकरीवर रुजू झाला होता.आठवडी त्याच्या वेळा बदलत जात होत्या.तोही पार बदलत होता.खोलीवर,
कारखान्यात,खानावळीत,ग्रंथालयात,किंवा मग कार्यालयीन कामकाजात असा दिनक्रम सुरू झाला. मित्राला विसरून चालला.
तसा त्यो उत्तर महाराष्ट्येत्तून आलेला. गोरागोमटा,बोलण्यात पटाईत,डोळ्यावर चसमा, अध्यापकीय शिक्षण होऊन,वाणिज्येतून पुढं मास्टरकीचं शिकत होता.नाटकात भलता रस,घरची गरिबी म्हणून व्यवसायी शिक्षणाकडे वळला.आई,वडील वय अन दुस्काळ पाह्यलेले.मोठा भाऊ मोठ्या कारखान्यात कायमचा लागलेला.त्यानं नवं जगण्याचं तत्वज्ञान याच्या मस्तकात घातलेलं.
"तुनं लगन करी देसू....."
"पन तुनं तुनं काम देखी लै भो....."
"हाताले काम धरी लै......"
"आसाच वायबार फिरू नको..."
"आमी तुना भानगड मा पडाव नाइत...!"
अन त्यानं पन ह्यो धस्का घेऊन काही महिन्यातच कारखाना हाती धरला.अन जीवाची परवड चालवली.धावपळ करत जिणं सुरू केलं.भेटणं बंद केलं, बोलणं,बसणं,मनभरून व्यक्त होणं सारं सारं बंद पडत होतं.अगदी काळोघात ते मैतृत्व कमीकमी भासू लागलं.म्हणून त्याला तडकाफडकीच बोललो.

"तसं नाही हो .. .!"
त्यो बोलता झाला.
"तुम्हाला नाही समजत काही..."
म्या म्हणलो,
"गुर्वारीपन नव्हता तुम्ही...स्नेही भेटाय्लं आले व्हते काळजात्ले...!"
"अमेरिकेत गणपती बसत नाहीत न.त्या दिवशी सुट्टी नव्हती.म्हणून नाही भेट झाली....!"
त्यानं खुलासा केला.
"देवाय्लं त्त लैय मानता.मंग त्त आमेरीकत गन्पती बसत नाहीत ह्यो त्त फरक कळत आसल न....??"
"अन त्यो गप झाला ...पुढं म्याच बोललो...."
अन दोन दिवसांत रैवार उगवला.सकाळचं काम बंद होतं.तो भेटला.जरा बोललो.काही काळाने नास्ता झाला.पोहे खाऊन हात धुतले.अन म्हनलो,
"म्या ठरव्लं हाय रैवारी बाहेर पडायचं.
"तुम्ही अन म्या आपुन दोघाईनं आज फिरस्ती करायची.....!"
"अहो पण कुठे फिरायचं.दिशाहीन....? काय फायदा...?"
"फाय्द्यासाठी नाही.पन; फिरू.....ठर्लं...!"
"प्रेस व्हिजिटलं जाऊ....."
"हम्म ठीक....!"
तापमापीत पारा वर चढावा तसा दिवस चढत होता.आभाळ भुर्कं विस्तारलेलं.नाना पाखरं पोटासाठी स्थलांतर करत होते.इकडून उडत तिकडं जात होते.नि मोकळं आभाळ त्याहिलं पोटाच्या कवेत तान्ह्या बाळालं घ्यावं तसं घेत होतं.मुक्त भराऱ्या मारत ते जगत होते.
"जित्त्येजीव त्ये.....त्याहीच्यावर कोन्हाचं धरबंधन म्हनावं ब्वॉ..? मुक्तपाखरं त्ये......!"
एक हवेसारखा मोकळा विचार डोक्यात तरळून गेला.म्या पुढं पाहू लाग्लो....
"आता कुठं...?"
"फिरस्तीलं कुठं दिशा आस्ते?"
"तरीही.....??"
"अं sss... जाचं रस्ता मिळलं तिकडं!"
"काहीही तुमचं...मग अस्तित्व काय???
"वाटा ह्या कव्हापन शोधाव.मळलेली वाट काय आप्ली आस्ते का??"
"कोन्हं तरी ती शोधलेली अस्ते न ..."
"मंग तुंम्च्या अस्तित्वाचं क्काय हो ब्वॉ?""
अन त्यो पाय झपाझप टाकत चालू लागला.आज मनसोक्त वाद होत होते.चर्चेला मीठसाखर येत होती.नवं कळत होतं.चव भरत होती.त्यो उगाळत होता.म्या आपलं घासत होतो.नवंजुनं होऊन कळत होतं.
वसतिगृहाच्या बाहेर पडून बराच वेळ झाला.पायानं चाल घोडदिडकी सुरू केली.शहर मांघं पडत होतं.दुमजली कुठं एकमजली घरं दिसत होती. शेवटातल्या एका किराणा दुकानातून चाकलेटी गोळ्या घेतल्या.आम्ही दोघं बोलता बोलता त्यातल्या एकेक खात होतो.बराच लांबपल्ला गाठला होता.वाहनं भरधाव वेगात मांघून येत होते.अन तितक्याच वेगात पुढचं अंतर कापून भर्रकन जात होते.दुपदरी,तिनपदरी रस्ते उगत होते तसे फुटत होते.पुलं,रस्ताबोगदे,उड्डाणपुलं,काचेच्या इमारती त्या शहराची सुखाशीनतेचं अचाट दर्शन घडवत होतं. उंचच्या उंच झाडसावल्या लांबपातूर फेकत होते.रस्त्याकडेनं मोठ्या मोठ्या जाहिरातीचे फलक लटकत होते.काही नट्यांच्या अंगाचे दर्शन घडविणारे जाहिराती फलक होते.तुंबळ सौंदर्य तिथं उघडं पडत होतं.पडद्याडून इभ्रतीच्या संस्कृतीचे बंबाळ नजराने डोळ्यांत उबत होते.हव्यासानं भाकरीपेक्षा मोलाच्या आब्रूचे लक्तरं वाऱ्यावर वाहत होते.त्या वातावरणात संस्कृतीचा सडका वास येत होता.खरं त्त त्यो अन म्या सारं सारं दिसलं ते न्याहाळत चाललो होतो.डोळे बंद करून चालणं शक्य नव्हतं.कधी खड्ड्यात पाय अडकून पडू अशी शक्यता वाढली होती. खड्डे वलांडले पाह्यजे.डोळे सारं पाहू शकतात असं आंधळ्या माणसालं सांगणं म्हनजे हत्ती समजून सांगण्यासारखं होतं.असा विचार मनाला खाऊन गेला.रस्ते बदलत होते. महानगरीय रस्त्यावरपन खड्डे लागत होते.
आता इमारती ठेंगण्या होऊन काळी,लाल,मऊ जमीन दिसू लागली.जणू जुनं शहर गडप होऊ लागलं.अन नवं कोरीव, व्यवस्थापित,रंगार शहर उभं राहतं होतं.कुठं काम बंद होतं.पन कुठंमूठं इमारतीचं नव्कोरं बांधकाम चालू होतं.सिमीटचा धुरुळा उठत होता.अन त्यानं माणसं भुरकट दिसत होते.खोरे कचाकच मालात घुसत होते.गिट्टी,वाळू, सिमीटचा माल वल्लागच.खर्रर्रर्रर्र खोरं घुसून आवाज घुमत होते.घमेल्यात सिमीटच्या मालाबरोबर घाम सांडत होता.उरातली रग निव्हून आतल्यात धगधगत होती.काही बाया नाकातोंडालं साडीच्या पदरानं,धुडक्यानं गुंडाळून घेत मुकाट कामं करत होत्या.वाळू, राडारोडा,जिकडं तिकडं पसरलेला.दगडी गिट्टी,काळंकुट्ट पाषाणी ढब्बर ढिगानं पडलेलं होतं.कोन्ही दगडी फाडी डोस्क्यावर वाहत होतं.त्याची टाळू वझ्यानं झंन्ननsss मुंग्या सोडत होती.पाठीत दन्कन गुद्दा बसावा तसा त्याच्या चेहरा कळवळत होता.दुःखाची झ्यालरझूल तिथं नटून उठली होती.ती दडत नव्हती.ती डोळ्यात भरत होती.त्या साऱ्यांचा राप्लेला चेहरा भूक-काम-पिळव्नुकीनं कळकटलेला होता.पलीकडं यंत्रानं खंदून खंदून गटाडी झालेल्या.त्यातला मल्मा उकरलेला होता.त्यामुळं खंदलेल्या खदानी आभाळाच्या दिशेत एखांद्या भयंकर मगरीनं तोंड वासून भक्ष्याची वाट पहावी तद्वत भासत होत्या.
पुढं कामगार झटत होते.त्यांच्या धमन्यातलं रक्त सळसळत होतं.घामानं डबडबलेले शरीरं रोजच्या कामानं आंबले होते. सुखाचा विराम भासत नव्हता.अंगावरचे वस्त्र वलबट चिलबट झाले होते.काही इसाव्यासाठी सावलीत थंड पानी पोटात रिचवत होते. जवळच पाण्यानं भरलेल्या हौदाकडं पाय हिसळून काढयलं कोन्ही गेले होते.त्त काही भुका लागल्यानं भाक्री खाऊन ढेकरं फोडत होते.काही उट छाप बिड्या फुकत बसलेले. नाकातोंडातून धुप्टाचा लोळच्यालोळ हवेत तिथं इरत होता.अन काळजाला काळवंडत
खो खो sss ठु ठुकsss ठो खोsss करायला लावत होता.काही विचारात बुडले होते.
"आंsssss..."
"क्काय इच्यार करत आस्तील बरं त्ये...???"
"साठे....ऐका....!"
"भाकरी खाल्ल्याशिवाय काम करता येत नाही.अन या भाकरीसाठी काम करावं लागतं."
त्यो म्हनला.त्या दोन शब्दात जीवनाचं तत्वज्ञान सांगतलं त्यानं.
"त्या दिवशी तुम्ही बोलून गेला,वाईट नाही.पण वास्तव जे आहे ते स्वीकारावं लागतं."
"हंsss...बरुब्बर हाय तुम्चं तस्स."
"पन्मंग मांन्सानं सारं जिणं च गुलाम म्हून जगाव का?? आं.....??
"स्वाभिमान हैक्का नाही काही....?"
"हां सारं करून सार करावं.... बस्स इतकेच..!"
"असो ते पहा तिकडे..."
"क्काय.???"
अन पुढं लक्ष गेलं.
वारं माती,सिमीटाचा वास पोटात घेत भरभर पळत होतं.त्याबरोबर पालापाचुळा लोळत होता.झाडं निथळत झुकत होती.बांबू शेगट्यावानी ताडताड वाढलेले. सिसव ठाम उभे.कुंभ्याचं डेरेदार झाड हिर्वीगदाड सावली पसरवत होतं.वडं,आंबे पनानं जर्गट पडलेले.घानेऱ्या जाळीदार गुताडल्या होत्या.बाभळी,चिल्हाऱ्या काटुक होत चाल्लेल्या.सागवानी खप्पर जुने पानं जमिनीवर पडून एक थर झालेला.तिथं एक सरड्या पानं चरचर करत पळत होता.त्त पलीकडून कोकीळ कंठात रुंभत होती.आज तिचा सूर गोडव्यात भरत नव्हता.मंजुळता तिथं जाणवत नव्हती.सासरी जाचानं कदरलेल्या नव्या सासुरवासीन सूनंसारखी ती कोकीळ डांखीआड कंठातल्या कंठात रुंभत होती. हादरत होती.कुढत होती.वारं पळत होतं तसा त्यो आवाज लहऱ्या मारत होता.
खदानीपसून समोरच मोकळ्या पटांगनात चार पाच लहान पोरं बसली होती.त्याहीनं मातीवर च्यादर आथर्लेली. एक दोघं मातीतच फत्कल मांडून बसले. काहीतरी ते खेळत होते.रस्ता वलांडून दोघं तिकडं गेलो.तिथं एक दीड वर्षाचं गुबगुबीत लेकरू एका पोरीच्या मांडीवर खेळत होतं. वाऱ्यावर भिरभिर्नारे कोर्डे केसं ती सावरत त्या लेकरालं आवरत होती.त्या केसाय्ची तिनं येनी घातलेली.अंगात कळकटलेला त्यो झगा गरिबीचं वास्तव पुढ्यात फेकत होता.त्या तिच्या दिसन्यानं दारिद्र्य लाजत होतं. दारिद्र्यानं त्या कवळ्या चेहऱ्यावर अगतिकतेचे वर्खडे मारले होते.इतक्या पोरांत ती मोठी होती.तिच्या बाजूलंच दोघं अजून पलीकडून मातीवर होते.खडकातून पाझराचा खळाळ फुटवा तसे ते हासत खिदळत होते.अन समोरच्या एकाकडे बोट दाखवत काहीतरी बोलत होते.त्यातल्या एकाच्या डोळ्यात आखर पडलेला.त्यामुळं त्यो आम्हांलं न्याहाळता खेपी मान तिरपाडत पाहू लागला.त्या समोरातच हिरव्या आंगडख्याच्या पोराचा पाय पोटरीत खंव्दाळलेला.त्यामुळं त्यो अंगात जखडून बसल्यासारखा वाटू लागला.ते तिघं अर्ध्या चड्डीत होते.ते बोलता बोलता गचकन थबकले.
अन अजान नजरेनं ते आम्च्याकडं पाहू लागले. तसे ते एकमेकांकडं खुर्मुंडी करत होते.त्याहिलं आम्ही नि ते आम्हांलं परके वाटत होतो.अजान होतो.चेहऱ्यानं नवीन होतो.अनोळख्या जगातले होतो.
"कोन हाय ब्वॉ हे लोकं...?"
"इकडं कशालं आलेत ह्ये बरं ????"
आसा सवाल त्याहिच्या भेदक नजरेत गवसत होता.ते लहानगं पन एकटक पाहत होतं. विस्मयादानं ते गुर्फटलं होतं.
त्यातल्या एकाची नजर बोलकी होती.ती चतरी होती.काहीतरी ती अंदाज बांधत होती.
"आजपर्यंत ह्ये लोकं दिस्लेच नाही इकडं...."
"अन आज अचानक कसंक्काय आलेत??"
"कोनेत ह्ये.....?आं????"
त्यो ईचाराच्या खोल गर्तेत बुडून जात होता. तळातलं हुडकावं तसं त्यो आंम्च्याकडं न्याहळत होता.पाहत होता.त्याच्या मनाची अस्वस्थता उलथापालथ करत होती.ती पोर्गी टकंटकं पाहू लागली.ते दोघंपन आंम्च्या परवेशाकडं पाहू लागले.दुसऱ्या बाजूनं बसलेल्यानं आम्हांलं पाहून घेतलं.
म्या आप्लं साध्या परिवेशात होतो.लालाचा पायजमा.अंगात पांढरागढूळ सदरा.त्याच्या बाह्या गुंढाळून ठेवलेल्या.त्याची कोपरापातूर मुडप देलेली.पायात चपला.उभा भांग.सारं साधं.त्या साध्या,गरीब पोरासारखं जुळून आलं होतं सारं.
मित्रानं आंगावर रेघाळं डब्याडब्याचं आंगडखं घातलं होतं.मोठं अक्षर दिसावं म्हणून डोळ्याचा चसमा.अन लालाचीच इजार.
एकेळ सूर्य रात्री दडतो,चंद्र ग्रहणाला दडतो,ढग डोंगराड दडेल पन दुःख नाही.दारिद्र्य लपवता येत नाही.रेशमी मलमल चिंधीत चेहरा लपवता येईल.पन चेहऱ्यावरचे दारिद्र्याचे भाव लपवता येत नस्तात.
मात्र ते सारं लपवून आम्हीं पुढं गेलो.अन त्यो बोलू लागला......
"अरेरे.....!"
"बघा हो ....कशी गोंडस लेकरं आहेत??"
त्याच्या तोंडावर करुणेची एक लकेर दिसली.
बरंच काही बोलला त्यो.केविलवाण्या सुरात.त्याचं मन हेलावून गेलं.त्याच्या चिंतेत कदर जाणवत होती.त्याच्या बोलण्याचा सूर कापत होता.
"कुठल्ले हाय रे पोऱ्हंहो तुम्ही?"
"आं???"
पलीकडून काहीच उत्तर नव्हतं.ते नुसत्या टकमक डोळ्यांनं न्याहाळू लागले.
"कोंतं गाव हाय.. तुम्चं ....?"
पुन्हा विचारलं.गाव म्हनल्यावर समजल्यासरखं वाटलं.
"क्या.....?"
"अरी बाबूजी हमार गाव युपेमा.....हयी!"
"हे त्त राज्याभाहेरचे हायेत मित्रा.....!"
त्याच्याकडं पाहत बोललो.
"उत्तर परदेश-बारबंकीं.....जिलाह..!
इतक्यात मोठी पोर्गी बोलली.
लगेच आम्ही तोडक्या मोडक्या हिंदीत बोलायलं सुरू केलं.
"येहां कैसे आये फिर तुम ???"
"इस्कुल मी नाही जाते का???"
"नही तो..."
"तुम्हारे मां बाप क्या करते है..??"
"हौर ये बच्च्या इस्की मां..?
त्या लहानग्याकडं नजर फेकत प्रश्न केला.
"हमार पिताजी-माँ ईधर आये हुये...."
"उनके साथ हंsssभी....!"
"इ भाई नन्ना सुकलाल....उ...उधर... माँ ....हमार...!"
तिनं एकाचवेळी त्या मांडीवर बसल्या पोराकडं ओझरता कटाक्ष टाकत तिच्या मायकडं बोट दाखवलं.
"तुम्हांरा नाम क्या है....?"
"हमार..."
तिनं आंव्ढा गिळला.
"इसका नाम ..निहा...!"
"ये चूप बे...मत बता हारिया...!"
हिरवं अंगडखं घातलेल्या पोरानं डोळे वटारून त्यालं गप केलं.तो मुकाट तोंडाकडं पाहू लागला.
"क्या हुवा नाम बताइं तो......!"
"देखो..... ये इसका नाम हयी....."
"जो साम्में बैठ गया-उ"
"हाऱ्या.....!वह हमार युपेका नाही...वह तो बिहार का हयी."
"ये धर्मींदर...!लखनवु से हयी...!"
"उसकी आखों को लगा....उ"
"और वह.....सोंडू....!"
"हौर ये प्यारासा बच्च्या ......?"
त्याच्या गालावर बोटं लावत विचारलं.....
"उ...उ तो..सुकलाल...."
त्या पोरीनं नावं सांगत्ले.गावं,राज्य सांगत्ले.
त्यो बोलला,
"यहा काम करने के लिए आये - तुम्हारे मां बाप.?"
"हां जी..ssss...!"
"कब से ऱ्हते है इधर..हौर घर काह है तुम्हांरा?"
हाऱ्या च्या तोंडाकडं पाहत विचारलं..
"तीन चार बरस....."
अन त्यो घराकडं पाहू लागला....
त्याच्या भेदक नजरेच्या मांघं नजर झुगारली.
काळ्या वावरात एक वस्ती उभी होती.दहा बारा घरं.घरं कोंते???पतराची डोग्री.पतरालं लोखंडी खिळे ठोकून पक्की पकड केलेली.पतराचाच दर्वाजा.तारानं गुंढाळून घेतलेला.चंदरजोतीच्या लाकडावर ते पतरं आडवेतिडवे ठोकले होते.त्याच्याच भित्ती. त्याचीच नहानी.बर्सादीत पानी घरात घुसू नाही म्हणून चौकून कूड ठोकून घट्ट मातीनं लेपून घेतलेलं.प्रत्येक पतऱ्या घरापुढं चार पाच दग्डाची चूल.ते दग्डं धुप्टानं ठिक्कर्लेले.अन पिप्पे आडवे कापुन दोन भाग केलेले.तेही काळवंडलेले.पुढं मांघं लिंबावडाची झाडं.त्या सावलीत कोरीव भाजलेले लाल काळे डेरे.
एक मोठी दोरनी त्यावर नाना रंगांची कापडं. च्याद्री,गोधड्या,शाली,चंबू चवाळे वाळू घालून त्याहिच्या गाठी बांधलेल्या.एक दोन भंगार मोडतोडीवर विकायला आलेल्या जुनाट सायकली.काळया रबरी ग्यॉलेंनी.कुठं चुलीवर पानी भगुन्यात.संनसंनीवर आलेलं.उकळ्या फुटनारं.तिथंच एक घान पाण्यानं अन वासानं वाहनारी नाली.प्रत्येक घराच्या तोंडावरूनच जाऊन पुढं एका मोठ्या खदानीत उतरत होती. त्या नालीवर फक्त घरासमोर लाकडी पाट्या, दग्डी फर्षा,दग्डं आथर्लेले.तिथं मोकळ्या अंग्नातून हिंडनारे कुत्रे खरूज खाजवत पळू लागले.तिथं वसाऱ्या मळभट वास घुमत होता. अन दोरनीवर एक कावळा मोठ्या कर्कश आवाजात कोकरत होता.त्याचं लक्ष नालीतल्या वळवळनाऱ्या शेपटीच्या आळ्यां,सिदोडावर होतं.एकच डोळा त्यो गर्कन फिरवून खाली तिर्पी मान करून पाहत होता.चाळीच्या पाठीमांघं टोंगळाटोंगळाभर गांजरगवत वाढून वाळलेलं.त्याच्यात मोठ्ठं वारूळ.पलीकडून लिंबावर कोंघाया.आर्डुन आर्डुन त्याहिची दमछ्याक उडत होती.पन त्या थांबत नव्हत्या. निर्हेनाम भराऱ्या मारून पुन्हा डांखीवर बसून आर्डू लागल्या.
घानेऱ्या वास उभळट वकाऱ्या आनत होता.तिकडून किर्कटी इतक्या टपुऱ्या मोठ्या माश्या उडून येत होत्या.त्यामुळं तिथून गुंनगुंन उठत होती."डुरुक ssss ड्रीकssss दुरृक....डुरूक" असा आवाज करत संन्कन चार पाच डुकरं पळून गेली.तिथंच ह्यो घंम्कारा उठू लागला.
तिथंच खानं,तिथंच हाग्नं, तिथंच झुरत काम करुन झटनं.तिथंच सुखाचे दोन दिवस.उरात हुसळनाऱ्या राती कंठनं चालू होतं.ते कामगार जित्ये जीव भेसूर जिणं जगत होते.
झ्यक मारून जीवनाचा संघर्ष करणारे हातं नवं जग उभारत होते.नाही त्त काय गरज पडली मुलुख पारखा करायची.ते रक्त सांडवत इमारती उभ्या करत होते.नि स्वतः उन्हाच्या भप्का मारनाऱ्या पतराच्या डोग्री चाळीत सुख मानत होते.
जिवाभावाचा मुलुख पारखा करून ते मानसं,त्या बाया,ते कवळे पोऱ्हं,ते जीव इथं महाराष्ट्रात कैक मैल,कोसोदूर आले होते.संसार करत होते.लहान पोरांची शाळा तुटली होती.आपल्या लहान भावंडांलं संभाळन्यासाठीच जणू ते जगत होते.मोठंमोठे होत होते.अज्ञानपन त्याहिच्या डोस्क्यावर गुलामीची कांडी फिरवत सिमीटाच्या मालाचं घमेलं लादत होतं.
सडक्या घंम्काऱ्यात रोजचं खानंपिनं,सुखाच्या घटिका मोजून पुढचं नुस्तं डोळ्यांनं न्याहाळत बसनं.... हेच तिथं सुरू होतं.
सारं आल्लबेल् चालू होतं.अमेरिकेनं नेमकचं उद्योगी व्यापारी शक्तीलं जणू जगाचाच राजा केलं होतं.त्याचे महासत्तेच्या भोवती घोळनारे स्वप्न जगभर हुंदडत होते.त्याची फासे जागतिक राजकारनावर,अर्थ,धर्मकारनावर,विकासावर पडली होती.साऱ्या जगाचाच चेहरामोहरा बदलत होता.सभ्यतेचा मुलामा घेऊन जग विक्रांत होत होतं.उक्रांतीकडं पळत होतं.गळ्यात लोहडनं घातल्या म्हसीसारखं. पायातपाय गुताडत.औद्योगिक उलाढाली पालथ्या पडू लागल्या होत्या.समुद्रमार्गस्थ कैक मालाची वाहतूक होत होती.तसी आयात पण होत होती.सुखसोईच्या चीजवस्तू पाठवल्या तस्या मागविल्या जात होत्या.मानवी शरीराची तस्करी त्यात होती.स्त्री देहाला विकनारी मनोवृत्ती कैक काळखंडापसून होती.तिचं स्वरूप बदलत होतं.काळ बदलत होता. बुवाबाजीनं सामान्य जनता कुस्करल्या जात होती.पैस्याच्या हव्यासापायी मानवी जीवन संघर्षवत लढत होतं.आपला विकास व्हावा म्हणून सारे पळत होते.पदव्या पैस्यानं मिळू लागल्या होत्या.अन साच्यातून मातीच्या पुतळ्या तयार व्हाव्या तसे ज्ञानार्थी उपजत होते.
देशहितासाठी शस्त्रसाठा गोळा करनं सुरू होतं.कोन्ही जुनं विकून नवीन तयारीत होतं.अन आपल्याला नवं शस्त्र मिळालं म्हून काही आनंदी होते.इकडं सीरिया धुम्सत होता.तिथं जीव मानवतेच्या पोटात उठलेल्या क्रूर हिंस्रत्येनं गुदमरत होते. तस्यातच पाकिस्तानच्या कारवाया सितयुद्धासारख्या सुरूच होत्या.भारत त्यात गुर्फटत होता.पार्ध्यानं वार सोडून जनावर जखमी करावं नि ते जनावर धाडकन कोसळून उठावं.अन त्यालंच घेऊन पळनाऱ्या वाघासारखं ते वातावरन होतं.चीन पुढं पुढं सरकून धुरा कोरत होता.
धनिक वर्ग सिर्मंतीसुख भोगत हसत होता.मध्यम लोकं हौस पूरवण्यात गर्क झालेला.अन एकीकडं भूक,महागाई,श्रम, विराम,अज्ञान,दारिद्र्य,भ्रष्टाचार,लाचारी,बेरोजगारी,अविकसित प्रदेश,अन राजकीय हेकेखोरी हुस्कावनीत गरीब मानूस कुत्र्यासारखं जिणं जगत होता.
"ते वास्तव हाय.या जगातलं."
"पेटलं पाह्यजे बरं इझन्याधी....नाही त्त मंग..."
"जसं हाय तसं ऱ्हाव....!"
असं समजून मुकाट मरत होता.
दामदुपट्टीनं पिळवटून काढनारे मालक,दलाल,कारखानी ठेकेदार,अन पैस्यानं गर्भार झालेला समूह परप्रांतीय,विस्थापित, कामगार,शोषित, मजूर,पिढीत,भुकेल्या समूहाला चिरडत होता.
तिथं,
"कस्यासाठी?
भुकेसाठी....
इतभर पोटासाठी....
जित्त्या स्वाभिमानापोटी....
हक्कासाठी,जगन्यासाठी......!"
एक घनघोर तळागळातला जीव तुंबळ संघर्षवत होता.वेदनेनं जित्ता जळत होता.आतल्या आत कुढत होता.विक्षोभत होता.जणू जमिनीखालच्या ज्वालेसारखा....!
त्त त्याच धर्तीवर कामगार चळवळी मेंढरु गिळून बसल्या अजगरारख्या झाल्या होत्या.मानवी हक्क नि त्याची कार्यालयं पार्ट्यात बुडत होती.पक्ष सत्तास्थानं काबीज करण्यात दंग झाली होती.शिकाऱ्यानं ससं हुसस्कावून लावावं तसं परप्रांतीयांना आपापल्या आल्या ठिकानाकडं धुडकावून लावण्यात राजकारण करू लागली होती.हे फक्त आजकालच्या काळातलं नव्हतं तर गेली कैक कालखंड ह्या गोष्टींत खर्ची पडला होता.
इथं भारतात त्त कोटीत विस्थापित कुटुंब संघर्षच करत होती.आंध्रातील काही लोकं गुजरातेत आली होती.तिथं कापडी मिलात ते राबत होते. त्याहिच्या सोबतीला महाराष्ट्रातील काही कामगार मंडळी होती.झारखंडी आदिवासी जमात डोळे फोडून घेत फाटकांफाटकांपुढं जागत होती.तस्सीच परदेशीय नेपाळी जनतापन.इकडं उत्तरेतील कैक राज्यातील गरिबी जिणं जगनारी जिवं दक्षिणेत स्थलांतर होत होती.पोटभर मिळावं म्हणून कारखानदारी जगात रगडून मरत होती. पतरात रात ढकलत होते. लोटगाड्यावरच्या पाववड्यावर भूक भागवून ठरलेल्या वेळच्या आता औद्योगिक कोंडवड्यात शिरत होती.ते रात्र रात्र यंत्राबरोबर झगडून रक्त ओकत होती. घाम टाकत होते.
जे येत होते त्याहिच्याबरोबर तिथली संस्कृती येत होती.विचार येत होते. बदल येत होता.धर्म, धर्माचरण येत होतं.नवं तत्वज्ञान येत होतं.देवदैवतीकरण येत होतं. परंपरा येत होत्या.जागरहाटी येत होती.सारीच मिसळ होत होती.एक ध्रुवावर ते योग्यच नि एका टोकावर ते सारं चुकीचं माननारी मतप्रवाही विचारप्रणालीही इथं तयार झाली होती.त्यात संप्रदाय उभे राहत होते.भिन्नता जन्म घेत होती.यातून अनेकानेक टोकं उगत होती. विचारवैचारांचे खटके उडत होते.त्यातून दंगली घडून यात होत्या.कुठं मानुसकीपोटी सत्कर्म घडत होते.दोन्ही पारडे काळाच्या काट्यावर हलत होते.
या मराठी मातीत हा घनघोर संगर होत होता.भाकरीसाठी जिणं जगनारी लोकं या काचेच्या तकलादू ऐहिक जगापसून दूर भेटत होती.राहत होती. स्वास घेत होती.पन काचातलं जिणं जणू त्यांना नाकारलं होतं.त्या सुखाचा जणू अधिकार कोन्ही हिस्कत होतं.त्ये हक्कच काढून घेतले होते जणू.
"नाही त्त मंग हे ढोपरंफोडये कामं कोन करावं?????"
असा जित्ता सवाल नागसारखा फना उगारत होता.जे हातं सुंदर कोरीव घरं तयार करत होते त्या हातालं भाकऱ्या गुलामीच्या बेड्या आडकत होत्या.
त्त एकीकडं धर्मसत्ता,राजसत्ता, अर्थसत्ता,ज्ञानसत्ता,अधिराज्य करत होती.त्त त्यात भरडल्या जानारा मुक्यांधबहिरोचं रूप घेत ह्या विश्वाचा गाडा वढत होता.
ह्या डोळदीख्या वास्तवतापसून हे निरागस पोऱ्हं लैय लांब होते.अनभिज्ञ होते.अन्योन्य जिणं कंठत होते.कवळ्या बकऱ्यासारखे...!"
त्यानं खिस्यात हात घातला. अन मह्याकडं पाह्यलं.म्या पन खिसे चाचपले. काहीच सापडलं नाही.चाकलेटी गोळ्या खाऊन झाल्या.किराना दुकानातून चिल्हर काही रुपये होते.त्यालं म्हंन्लो,
"रुपया रुपया देऊ....सग्ळ्यांलं......."
"मग आता उपाय नाही....!"
त्यो बोलला.
"हं.....!"
त्याच्या खिस्यात दोन रुपये होते.
पाच मह्यायकडं गवसले.
ते कल्दार रुपये...घ्यासाठी ते लहानगं हात पुढं सर्कवत होतं.....
झंन्कन स्याट बसावा तसा मेंदूत एक विचार येऊन हजार प्रश्नांच्या लहरी सोडून गेला.
"का हो ब्वॉ????"
"मार्क्स कधीच इथं पोचत नव्हता...?"
"का पोचू दिला जात नसेल..... कदाचित???"
"आं???"
"ते चकाकी शहरं दिसत नाही का?"
"ती भपकेबाज फलकं या लोकांना भुरळ पाडत नाही का?"
"जग कुठं हाय अन ह्ये लोकं ???"
"यांना सुखाची भाकर अन हक्काची जागा कव्हा ?"
"श्रमशक्तीचा विजय नाहीच का ???"
"जी आपल्या घामावर सारं जग पेलते तिला कोन पेलनार ???"
"कव्हाह्या रहाटगाडग्यातून हे जीव सुटनार आहेत ??"
"इव्हन ह्यो संगचा सोबतीपन ???"
"ह्या पोऱ्हांना कव्हाशाळेचा फळा दिसल ????"
"श्रमसंजीवणी हीच विश्वाची कर्ताशक्ती असते.......?"

Comments
Post a Comment