★★★नाट्य-समीक्षा★★★
"फिडलर ऑन दि रुफ"- "बिकट वाट वहिवाट" एक-सांगितिक नाटक
सत्तरीच्या दशकातील हे नाटक अनुवादित करून व्यकंटेश माडगूळकर यांनी मराठी साहित्यात आणलं आहे. याचवेळी त्यांनी पॅरिसला असतांना फिडलरचा फ्रेंच भाषेतील प्रयोग
पहिला होता.आणि भारतातील मोगलाईचा काळ हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरण
प्रक्रियेतील सामाजिक घुटमळ मनात उभी राहिली.त्यावर लिहावं आणि या पद्धतीत बसवावे
असे त्यांनी ठरविले. आणि नंतर "बिकट वाट वहिवाट" लिहायला घेतले.
संस्थानच्या सरहद्दीवरील गावे खेडी उठवून त्याजागी पठाण,अरबांची वस्ती करावी असा एक डाव होता.
ह्या नाटकाचा पहिला प्रयोग इंडियन नॅशनल थिएटर ने 19 ऑक्टॉबर 1976 ला रवींद्र नाट्य
मंदिर मुंबई येथे केलेला होता.
"बिकट वाट वहिवाट"
प्रास्ताविक-
समाजाची परंपरा आणि चालीरीती,नातेसंबंध
व विचारधारणेचा हा काळ मोगलाईच्या अस्तनीत जगणाऱ्या जनतेचा काळ आहे.अजून एकोणीसशे
अठ्ठेचाळीस साल सुरू आहे.
वडिलोपार्जित धन व सम्पती,आणि लालसा,
सर्वसामान्य धारणा घेऊन जगणारा हा समाज आहे.जगात बदल घडत आहेत.पण
त्याच्या या जनतेच्या जगण्यावर परिणाम होत नाहीत.परंतु खोलात जाऊन पाहिलं की जगणंच
बदलत आहे.नव्या धारणा मूळ धरून हळूहळू वाढत आहेत.आणि याचा परिणाम समाजधारणा आणि
सांकृतिक बदल होतांना दिसतो आहे.
नातेसंबंध,कुटुंबबसंस्था,समाज-
गावसंस्था कशा उध्वस्त होऊ पाहताहेत याचे चित्रण प्रत्ययकारी शब्दांनी आणि
तत्कालीन परिस्थिच्या रेखाटनाने लेखक करतो आहे.
हैद्राबाद मधून आलेला चळवळीचा प्रभाकर मास्टर शिक्षणदार आहे.तो गावात येतो
तेव्हा त्याची नानाची ओळख होते.आणि तो नानाच्याच घरी वस्तीला राहतो. बदल्यात
मुलींना शिकवितो.बदल पेरत राहतो तेथील माणसांच्या मनात,जगण्यात आणि असण्यात.परंतु तो नानाच्या मुलीच्या म्हणजे
पुतळीच्या प्रेमात पडून जातो. एकीकडे चळवळ्या स्वभाव आणि एकीकडे प्रेम असा टोकाचा
विचार इथे नव्या जाणिवांनी ठेवला आहे. भामाला घेऊन तोही निघून जातो.पुढे त्याला
अटक होते. हा पुढचा काळ आहे.
रझाकार आणि संस्थानं असा हा स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवरचा काळ जनतेच्या
लाचारीचा आणि आपापसांतील नात्यागोत्यांच्या वहिवाटीचा काळ.इथे रूढी आहेत.परंपरा
आहेत.अंधश्रद्धा आहे.भूतप्रेत आहेत.जगणं मरणं यातील जगण्याचा आसव्याने भाषित होऊन
नवे आयाम निर्माण करू पाहणारा संग्राम आहे.
लग्न,रीतीभाती, समाजपद्धती
आणि माणसांच्या गरजा, अडचणी,नवे बदलते
राजकीय ध्येयधोरणे व धर्मवाद यांची चिकित्सोत्सव नाटकातून उठून उजळतो आहे.
शिलाईकाम करणारा आणि लहानपणापासून अनाथ असलेला माधव नाना,सोनाकाकूकडे पालितपोशीत झालेला आहे.लहानाचा मोठा होतो
आहे.तो भोळा, भाबडा प्रेमळ आणि कष्टावर निस्सीम विश्वास
जपणारा असा आहे.त्याचं अन नानाच्या राधा नावाच्या मुलीवर प्रेम आहे.
वचनाचं स्वप्न ते सत्यात उतरवतात तेव्हा ही बाब नानाला समजते पण समाधारणात
बुडालेला गाव अन बायको यांना बदलता परिप्रेक्ष समजून देण्यासाठी रुढीचा, भीतीचा बागुलबुवा करून नवं नाटक उभं करतो तेव्हा नाना अन
त्यांचा स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि
न्याय,प्रेम, सदाचारी स्वभाव इथून उमटू
लागतो.हा बदल नाना कसा अनुभवतात? तर ते देवाशी बोलतात
म्हणजेच आपल्या स्वतःच्या विवेकाशी बोलतात.मुलीच्या डोळ्यातील सुख दुःख बघतात.हीच
मुलगी केशवराव कांबळे-मटनवाला यालाही आवडते.पण मुलीचे स्वातंत्र्य जपण्यासाठी सपान
घडलं अन रीतीने रितेपन मोडलं असं नवं धोरण नाना आखातात.माधव अन राधा यांचं लग्न
होतं.
हैद्राबाद मुक्तीसंग्राम आणि मोगलाई चळवळीतील वास्तव या संहितेवर
प्रेमारसाचा शिडकावा करत नाटक अंकाअंकाने पुढे सरकते.
प्रेम व मानवी मनाच्या जाणीव नेणिवांच्या पातळीवरील धारणा यांची हुसळण
काळाच्या पडदयावर चालवत लेखक पूर्वकालीन राधा कृष्ण,भगवतगीता आणि धर्मग्रंथातील उक्तीचा वापर करत युक्तीने नव्या समाजरचनेची
निर्माणबंध चपळाईने तयार करतो आहे.
हा काळ म्हणजे एकीकडे सत्तरीच्या दशकाचा काळ. जगण्यात परंपरावाद नाकारून
माणूस मूल्यदृष्टिकोन साकारतो आहे.आणि रुढीप्रियतेच्या कल्पनांना चिरतो आहे.या काळाच्या
पासंगात नवे जग निर्माण होते आहे. परंतु एकीकडे रझाकाराने हाच समाज जाचाच्या
बंधनात जखडून ठेवला आहे.हा रझाकार हजारो वर्षापासून एकठायी असलेली संस्कृती,जगणं,मरणं,रूढी,रीती, भाषा,जाणिवा आणि
मूल्यांची बीजे गावासकट उलथवतो आहे.
रझाकारात जशी मुघलसांस्कृतिक वारसा जपणारी वृत्ती आहे तशीच हिंदूपदपातशाहित
बापसंस्कृती-पितृसत्ताक वृत्ती टिकून आहे.एकीकडे हुकूमशाही आणि त्याच वलयात
पुरुषीशाही असलेला हा काळ शोषणाचा बंध उलगडतो आहे.
वाहिवाटी बदलवणारे विचार आणि प्रेम या संहितेच्या गर्भाचा गाभा
आहे.बुरसटलेल्या रूढी ह्या समाज जाणीवजागृती रूढी निर्माण करूनच घालवता येतील. असा
सांगणारा मूल्यवाद संहितेचा मुख्य आशय असतांना समाजरचनेची,धर्मवृतीची आणि राजकीय परिप्रेक्षाची तत्कालीन मीमांसा
नाटकाची रणभूमी आहे.
समानता आणि मानवी भावभावनेचा नवा विचार करून हे लग्न लागते आहे.मराठवाड्यात
असा विचार असणे म्हणजे रझाकारी काळाचा मोठा संगत दर्शक मर्मग्राह्यकाळ आहे.
रझाकार काळाच्या समिकेक्षेची नवे धुमारे 1945 ते 1970 पर्यंत माडगूळकर मराठी साहित्याला नवा आशय
देत पुढे ठेवतात.म्हणूनच ग्रामीणत्वाचा शोधबोध दर्शविणारे तत्वचिंतक,वास्तवदर्श विचार करणारे नाटककार ते ठरतात.हा रझाकारी काळ आणि
स्वातंत्र्यप्राप्ती, पंचवार्षिक योजनेच्या काळातील
महत्वपूर्ण टप्पे ते अनुभवत लिहीत आहेत.
चलेजावच्या नंतर आणि साठीपासष्टीच्या दशकातील संस्थान विलीनीकरण चळवळ ते
जवळून पाहत आहेत. याचा सखोल परिणाम जनतेच्या जगण्यावर असण्यावर होतांना ते
काळाच्या या टप्प्यावर नोंदणीकृत करत आहेत.तत्कालीन धर्मजाणीवा, राजकीय तात्विक मांडणी आणि संस्कृतीचा आयाम ते संहितेच्या
तटस्थ भूमिका घेत रेखाटत आहेत.
गावात ह्या प्रथा परंपरा आणि रूढी आहेत.कुठेतरी बदलाची प्रक्रिया
अंगिकारणारा विचारही उमटत आहे. सोबत रझाकारचा काळ ही उभा आहे.मानवी संकृतील आणि
विचारसरणीला राजसत्ता आणि धर्मसत्ता असा हा संघर्ष काळ या नाटकातून मांडला आहे.
भारत एकीकडे स्वातंत्र्याच्या बाबतीत किती उतावीळ आहे आणि मराठवाडा मुघल
राजवटीच्या काळात ह्या रूढी परंपरा आणि त्यासंदर्भात ही नवी चळवळ उभी राहत आहे.हे
समाज वैचारिक,वैविध्यपूर्ण चित्रण यात सापडते.
रझाकाळ आणि चळवळ अशी ही पार्श्वभूमी लेखक चितारत असतांना समाज,अर्थ,राज,धर्म,सांस्कृतिक, नैतिक,भावनिक,मानसिक,सौन्दर्यशास्त्रीयकारणातील बारकावे
प्रसंगानुरूप चितारतो आहे.
मुस्लिम,शिंपी,कसाई,हिंदू,ख्रिचन,महार,मांग,आणि तत्सम जमातीतील जन असा हा नवा संघर्ष लेखक
नव्या विचारशैलीनी सांगतो आहे.हा काळ सत्तरीतला आहे आणि या दशकात हा विचार खूप कमी
तिव्रतेने मांडल्या जात आहे.त्यात एक माडगूळकर आहेत.
जागतिकीकरण आणि मानवी गरजा,सांस्कृतिक
संघर्ष असा तळ लेखक सांगतो आहे.पुराणविचार,भगवतगीता आणि
तत्सम धर्मपुस्तकं आणि त्याविषयीच्या समाज धरणांच्या बाबतीत लेखक नवा विवेकसार
नव्या काळात सांगतो आहे
हैद्राबाद,गोवा,दिव,दमन रझाकार सत्ता आहे.त्यासोबत तिथे हातात हात घालून इंग्रज सत्ता पण उभी
आहे.
नव्या काळाची नवी प्रेमकथा ते सांगतात.बेशलाक सांगतात जग प्रेम कर.वहिवाट
सोड.चांगल्या मानवतावादी मूल्यांचा स्वीकार कर.आणि दुःखाचा अंत करत जगण्याचा शोध
घे.जाणिवांचा ठाव करत उणिवांचा उच्छाद नष्ट करत नेणिवांना नवा आयाम दे.असा आशयकाल
माडगूळकर उत्पन्न करतांना दिसतात.त्यार्थी अशी शैली खूप कमी नाटककारांनी घेतलेली
आहे.म्हणून ग्राम्यसांस्कृतिक शिलेदार नाटकी वारसा केवळ माडगूळकरी लेखणीत सापडतो.
असं प्रत्ययी आणि वावस्त लिखाणाची कारणं पण आहेत.जग दुसरं महायुद्धात गिळत
जगत आहे. अस्तित्वात असलेली सजीवसृष्टी या विज्ञानाच्या शोधात काही मूल्य गमावते
आहे.आणि माणूसच माणसाचा गतप्राण शोषण करत आहे.मृत्यूमार्ग दाखवित आहे.हे जरी खरं
असलं तरीही विज्ञानाने नवी पिढी घडवित विकास आणि मानवी धारणांनी बनलेले शोषणाचे
जुने रहाटगाडगे फोडले आहे.शोषणाची नवी भु निर्माण झाली आहे.म्हणून नव्या भूमीवरून
नवा राजकीय कारकीर्द असलेला विचार इथे उगवतो आहे.नव्या जाणिवा ह्या जुन्या विचार
घेऊन चाललेल्या विचारसमाजाला सपान वाटत असतात.ते तोडले पाहिजे वास्तव जग पाहिले
पाहिजे.असाही एक सूर यात उमटतो आहे.
स्वातंत्र्यसंग्रामात आणि प्रेमात पडलेल्या नव्या मुली ह्यासुद्धा कशा
नवऱ्यापाठी खेचल्या गेल्याचं उदाहरण म्हणजे भामा.सांकृतिक पार्श्वभूमी आणि लग्न
परंपरा ह्यांचा संघर्ष भामाच्या जगण्यात आहे.
फकिरा मुस्लिम आणि नानाची मुलगी पुतळा हा हिंदू मुस्लिम जातीयवादाचा प्रश्न
आहे."घोड्याच्या पायाचं दुखणं" ही रूपकउक्ती माडगूळकर इथे उध्वर्त
करतांना जाणवते.ती भामा घरदार,आईबाप सोडून
फकिरापाठी निघून जाते म्हणजे अगदी नवा विचार.
हाच प्रश्न बापाला पडला आहे की असं का घडत आहे. रुढीला धरून समाज का वागत
नाही? हे प्रश्न म्हणजे इथल्या रूढी
पाळलेल्या समाजाला प्रश्न आहेत.धर्म बदलले म्हणजे मानसं बदलतात का? असा सर्वसामान्यांना विचारलेला प्रश्न ते चोखंदळपणे विचारतात.वहिवाट आणि
रीती रुढीला पाळणारा समाज मोडून जाईल.वहिवाट विसरली पाहिजे.नवा विचार झाला
पाहिजे.नाना हा विचार करतो.परिवर्तनाचं प्रतीक आहे.
खेडे उठवून रझाकारची छावणी बसविण्याचा ठराव, फुलगाव आणि तर खेडी समीवरची सर्व गावं हिंदू आणि मुस्लिम फाळणी यासंदर्भात
ही चळवळ हाताळतांना लेखक महात्मा,आणि तत्सम काळावरचे राजकीय
परिप्रेक्ष वर्गीकृत विलग करत सांगतो आहे.जरी ही चळवळ राजकीय असली तरी समाज परिणाम
भोगतो आहे.त्याचं असणं बदलते आहे.आणि याचा थेट सखोल मेळ ते सांकृतिक,आर्थिक,नैतिक,भावनिक,मानसिक पातळीवर लावतात.म्हणजे कुटुंबातील एकमेकांच्या मानसिक,भावनिक संतुलनाचे आणि विघटिकरणाचे दृष्ये नाटकात पळत राहतात.
हैद्राबाद मुक्तीसंग्राम झाल्यानंतर आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
मराठवाड्यातील सर्व जनता मग मुंबई,पुणे,नाशिक अशा औदयोगिक पट्ट्यात स्थलांतरित झालेले आहेत.हा काळ पुढे एकोणीसशे
पंचावन्न ते सत्तरदशकचा आहे.यामागे "खेडे सोडून शहरं धरा" असा
डॉ.आंबेडकरांचा विचारही गवसु लागतो आहे.ह्यामुळे जीवनजाणिवा बदलतांना दिसत आहेत.
गाव सोडायचा हुकुम आणि पुढे स्थलांतरित जगणं
गावागावातील मानसामाणसांची ताटातूट आणि नातेसंबंधातली धग इथे दाखविली आहे.
मुस्लिम झालेली पुतळा आणि फकिरा यांची नव्याने भेट म्हणजेच पूर्वीचा
हैदराबाद मुक्तीसंग्राम (हिंदू-मुस्लिम लढा) आणि स्वातंत्र्योत्तर औद्योगिकिकरणाने
शहराकडे वळलेल्या विविधांगी समाजाचे दर्शन ते या घटनेच्या माध्यमातून घडवितात.याच
पार्श्वभूमीवर "शाही फर्मान" आहे म्हणून गाव सोडणारा समाज तर काही
"घरचं फर्मान" म्हणून जावं लागतं यात अडकलेला मुस्लिम समाज पण आहे.हा
राजकीय सत्तेचा विरोधाभास माडगूळकर सांगताहेत.
रझाकाराने गावसंस्था कुटुंबसंस्था आणि नातेसंस्था खिळखिळी केली त्याचेव्हे
उदाहरणब्यातून दिलेले आहे.
"नशीब टाकूया वाऱ्यावर डोळ्यांपुढंच बघूय्या...!"
"हे वाक्य प्रस्थापित विचारांनी घडविलेल्या नशीब शब्दाच्या संज्ञेवर टाक
बसवित नवं जग पाहण्याच्या इरेचा आहे...हे मोलाचं वाटलं...!"
या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी प्रत्येक पात्र आपली लकब,भाषा,बोली तसेच ग्रामीण संस्कृतीचे
वर्णन,दर्शन आणि कृतीयुक्त हालचालींनी हुबेहूब वास्तव उभे
केले आहे.त्या काळातला तो वास्तवाचा खजिना प्रेक्षकांना दाखवला गेला. आणि म्हणूनच
प्रत्येक पात्र त्या प्रसंगाला केवळ बोलत नाही , केवळ हावभाव
करत नाही तर एक नेणिवेच्या पातळीवर असलेली सजीव सृष्टी निर्माण करत आहे.हैदराबाद
संग्राम उभा करत आहे.रझाकारीचा काळ उभा करत आहे. त्याचबरोबर तत्कालीन सामाजिक,
आर्थिक,नैतिक ,राजकीय ,धार्मिक, सांस्कृतिक वास्तवी जगच जणू आजच्या काळात
नाटकाच्या माध्यमातून व्यक्त होताना प्रत्येक कलाकार आपल्यासमोर ठेवतो
आहे.त्याच्यासाठी लागणारी व्यवस्थापकीय भूमिका, गीतांचे
पुनर्लेखन झालेलं आणि त्यामुळे या नाटकाला जी रंगीत अशी भूमिका आली ही खूप
आनंददायी ठरते आहे.गीताला लागून आलेल्या जे संगीत आहे. हे संगीत मानवी मनाचा
आनंदाचा तळ आहे. विविध भाव निर्माण करत आहे.नऊ रसांची निर्मिती करत आहे.संगीत
वाद्य आणि गीतांचा जो काही एक अनोखा संगम याठिकाणी या नाटकाच्या माध्यमातून आलेला
आहे व्यंकटेश माडगूळकरांना अपेक्षित असणारे उभे केले आहे. नाटक लिलया कलाकारांनी
मंचावर प्रेक्षकांसमोर ठेवलेले आहे. भूमिका असेल, ते
मार्गदर्शन असेल, किंवा म्हणजे वस्तूचं ठिकाण असेल, वेशभूषा असेल, आणि रंगभूषा असेल या सर्वांच्यावर
प्रकाश टाकणारे ही प्रकाश योजनाही आहे. तीही तितकीच महत्त्वाची होती आणि सर्वांना
सहाय्य करणारे तत्त्व होतं हे पण खूप महत्वाचं होतं त्याला ललित केंद्रातील या
नाटक कलाकार मंडळींनी हे नाटक प्रेक्षकांसमोर ठेवले.त्यावेळेस व्यंकटेश
माडगूळकरांचा विचार आपण प्रेक्षकांसमोर ठेवत आहेत या भूमिकेची पार्श्वभूमी त्या
कलाकारांच्या दृष्टिपटलावर- मनःपटलावर- आणि भूमिकेच्या पार्श्वपातळीवर होती. ती
आहे तशी प्रेक्षकांनी आपल्या डोळ्यांमध्ये भरलेली आहे. आणि म्हणूनच "बिकट वाट
वहिवाट" हे व्यंकटेश माडगूळकर यांचे लिखित नाटक ललित कला केंद्र कलाकारांच्या
माध्यमातून पाहायला मिळालं यासाठी खूप धन्यवाद.
या नाटकाची या वर्षीच्या प्रयोगाची सामग्री आणि साग्रसंगीत तयारी जयांनी
केली-करवली असे....
संगीत-मार्गदर्शक रोहित नागभिडे
अजित साबळे-दिग्दर्शक
प्रवीण भोळे -नाटक सेट आणि नेपथ्य मार्गदर्शन
व्यवस्थापक-अश्लेशा रोकडे
गीत पुनर्लेखन - प्रभाकर मठपती आणि अजित साबळे
प्रकाशयोजना-श्रवण
नृत्य -मानसी शिंदे
वाद्यवृंद-धीरज खोत , ज्ञानेश्वर
खरात , लंबु कासले , केतन देशपांडे
नेपथ्य- शुभम साठे , मणिराज पवार , वर्धन
देशपांडे , संकेत खेडकर , महेश खंदारे
गंधर्व वालावकर, तेजस कुलकर्णी ,ललित
मदाले
संगीत-प्रभाकर मठपती, श्रवण फोंडेकर
,शाब्लो गावकर, जानवी मराठे
मंचवस्तू-धनश्री साठे, प्रणव टेंगसे ,अशिष तिखे
वेशभूषा-वैष्णवी घोडके, मधुरा पानसे ,
कांचन तूपसौंदर्य रंगभूषा-भाग्यश्री पवार, श्रद्धा
गायकवाड, राजुली वाव्हळ
सहाय्यक-विक्रांत देवरे, वैभव लांडगे,
बिपिन गोपाळे
वेशभाषा-वर्षा नालवडकर
आणि
1, 2 शैक्षणिक वर्षातील ललित कला केंद्र- विद्यार्थी नाटक कलालकर.
-विश्वनाथ
साठे[9921056462]
संज्ञापन वृत्तपत्रविद्या-पदविका विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
Comments
Post a Comment