मार्चचा महिना लागला होता.उन्हानं आंग कडक करणं चालु केलं
होतं.जमीन कर्पत होती.फुफाटा वायटूळीत उडत होता.सकाळचे कोमट ऊन पिऊन पिवळाईवर
आलेली गवतगुळी रस्त्याच्या कडेला निपचित लवंडली होती.झाडं सुकून जात होती.जमिनीतली
ओल खोलवर रुतत होती.वल्ली मया आटत होती.हिवाल्यातलं हिव पळालं होतं.दुपारच्या
पाहरी अंगावर थंडगार पानी घेऊन अंघोळ कराव असं वाटत होतं.
नामदेव सभागृहातील कार्यक्रम ऐकून म्या वस्तीगृहाकडे आलो.तव्हा किमान सूर्याची टोंगळमोड झाली होती.पारंब्यात सूर्य लुप्त होत होता.त्याची जर्जर कमी झाली होती.पाखरं भराऱ्या मारत उलट्या दिशेनं सुटू लागली.ती घायघाय म्या कैक्काळ न्याहाळत होतो.त्या पाखरातील मया आठवण करून देत होती.माय घरी आसंल,ती जेवली आसंल का नाही?बा लोणारहून घरी आले आस्तील का नही?त्या दोघांची तबियत कशी आसंल?
आज लैय दिवस झाले भेट नाही.काय करू.कोणत्या तोंडानं घरी जाऊ.एक त शिश्यवृत्ती हातात नव्हती.ना नेहरू युवा केंद्राची पगार झालेली.कमवा आणि शिका योजनेचा दोन हजार एक्विस रुपये पगार तेव्हढा हातात पडला होता.त्यातला एक हजार लगेच पोस्टाने बा ल घरी खर्चायलं पाठविले.आता होता महिन्यातील खर्च जेवणाचा.भागेल कसातरी म्हणून दिवस ढकलत होता.नाना इच्यार डोक्यात थैमान घालत होते.म्या तसाच हातपाय धूऊन आल्यासरशी मांघं वळलो.वाटेनं झाडं बोलत होती.उन्हाळा लागलाय.सावलीनं चला.झाडीतून कुठंमुठं पाखरं खर्दूडत होती. चिलचीलाट्ट करत होती.पायीच चालत विभागापर्यंत गेलो.मराठी विभाग निवांत इंग्रजी विभागाच्या वर बसला होता.समोरची बगीच्यातली फुलझाडं पाकुळत होती.संध्याकाळ निरवत होती. विभागात जाऊन विभाग प्रमुख डॉ .अविनाश सांगोलेकर सरांशी बोललो.
"सरजी सारी तयारी झाली.तुम्ही चला फक्त..!"
"अरे विद्याधर झाली तयारी?
"हो सर सर्व!"
"मग चल उशीर कश्याला?चांगल्या कामासाठी!"
"हं....." अन म्या मान डोलवली.
"म् असं कर तू माझ्या गाडीवर मागे बस लवकर जाऊ अजून वेळ होईल..!"सर म्हणाले.
नाही माझ्यासोबत तत्वज्ञान विभागाचा माझा मित्र आहे आम्ही सोबत येतो. तुम्ही व्हा पुढं.!"म्या म्हणलो.
सर बोलले,
"अरे उशीर होईल.बघ"
"नाही.आम्ही तरुण आहोत....!"जातो पाय उचलून.तुम्ही या लवकर तिकडं."म्या म्हणलो.
"हा हा हा हं..... ssssss ...
सर हसले नि म्या पाठमोरा झालो.तडकीत नामदेव सभागृहापासून शाहू पुतळा ते मुख्य इमारतीला वळसा घालून पिपळाखालून खालून शारीरिक शिक्षणशास्र विभागाजवळ गेलो.तिथं राजकुमार पालकर हे आंमच्यापेक्षा एका वर्गाने पुढं असलेले मित्र उभेच होते.ते बोलले,
"बसण्याची वैगरे व्यवस्था केली आहे
तुम्ही वर जा.बघा. आवाज तपासून घ्या.ध्वनिनियंत्रित करा!"
"ठीक!" म्या म्हणलो."सर येतील त्यांना घ्या.अन तुम्हीही वर या लवकर.!"
विभातील अशोक शेकडे,पवन,सुप्रिया,स्वाती पूनम आणि तेथील कार्यालयीन व्यवस्थापक सर्व तयारीनिशी होते.0

*****************************************************************
Comments
Post a Comment