***अण्णाची बहीण गेली***
"अण्णा भाऊ साठे
बारा वर्षाचे असतील.पोटापाण्यासाठी पायपीट करत करत ते मुंबईच्या म्हंजेच पोटाला
भाकर व हाताला रोजगार मिळवून देणाऱ्या सावकारी मुंबईकडे चालू लागले होते.साल १९३२
साली महाराट्र राज्यात सर्वत्र भयाण दुष्काळ पडलेला होता.विदर्भ मराठवाडा या
परगण्यातील जिल्ह्यासोबतच दुष्कळाची धग पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा,सांगली,सोलापूर जिल्यातील जनतेला बसू लागलीहोती.याच
कालावधीत भाऊ ज्या मुंबईत माळी काम करायचे तिकडे पोट भरायला कुटुंब न्यायला गावी
आले.आणि साठे कुटुंबांनी मुंबईला जाण्यासाठी बिकट वाट धरली.इच्चुचे बिऱ्हाड पाठीवर
असते या प्रमाणे आपले बिर्हाड साठे कुटुंबाने सोबत घेऊन मुंबई कडे निगाले.भुकेने
इतभर पोटाची खळगी पडलेल्या अवस्थेत दररोज दहा बारा गावं वाटचाल करत करत.पोटाला
मांघून खात प्रवास चालू होता.जवळ खर्चासाठी दमडीही नव्हती.बेरात्री कुठल्याही
झाडाखाली किंवा धर्मशाळेत थांबत थांबत पुढच्या उजेडाचा प्रवास.नाही तर कधी अर्ध्या
रात्री भाऊ साठे आणि वालुबाई हळूच झोपेतून उठून तुकाराम [अण्णा ] व भागुबाई यांना
जागे करून म्हणत, लेकरांनू हाम्ही फुढं निघतोय..
पोरं उठली की तुम्ही रस्त्याचे कडाकडाने या पुढं; जिथं काम मिळेल तिथं आम्ही काम करू.आणि तुम्ही येई पर्येंत रोजंदारीच्या पैशातून सामान आणून भाकरी करून ठेवतो .मग आपण भाकरी खाऊ .भाऊ साठे आणि माई वालुबाई यांना आपल्या तुकाराम म्हणजेच अण्णा हे बारा वर्षाचे,चौदा वर्षाची मुलगी भागु,सात वर्षाचा शंकर आणि पाच वर्षाची जाईबाई यांच्या बद्दल खूप तळमळ.पण मुंबईची वाट आणि पोटाची खळगी या दोन्ही गोष्टी त्यांना पुढे ओढून नेत असत.कारण गावात भाकरीपुरतं काम उरलं नव्हतं.जनावरं पटापट मरू लागली होती.
मंग पहाटे सूर्योदय झाल्या नंतर भागू आणि तुकाराम यांनी शंकर आणि जाई यांना जागे करून त्यांना पाठीवर घेऊन आई वडिलाने सांगितल्या मार्गाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपले आई बाबा दिसतात का हे बघून चालत असत.दहा चौदा मैलाच्या अंतरावर कुठेतरी माय-बा दिसल्या वर अण्णा आणि भागू,शंकर आणि जाई यांना पाठी कडेवरून उतरून मायेला बिलगत .आणि आई मोठ्या ममतेने गालावरून हात फिरवून आपल्या कुशीत घेत असे.
एके दिवशी अण्णा असेच मागे पडले आणि माय-बा पुढं गेलेले.पोरांचं पोट भुकेनं कुरतडू लागलं.साऱ्या जगाची भूक त्या चार जीवावर तुटून पडली.चालत चालत पुढं गेल्यावर जाईला अन शंकर ला आंब्याचं झाड दिसलं. अण्णानं दगडांच्या फटकाऱ्यांनं चार पाच आंबे पाडले.अन कडाकडा फोडून त्या चार जीवानं खाल्ले.काही काळ भूक मिटली.पण अजून आयुष्य होतं ते आयुष्य पुढे मुंबईत वादळ करून गेलं.जगण्याची फरपट झाली.कोळसा झालं जीवन कोळश्याच्या खाणीत.कधी मोलकरणीचं जिणं झालं.तर कधी हमाली.कष्टकरी जगणं आलं.कधी मंजुरीनं पोटाला घास दिला.अन्नाची जाई ही बहीण त्यांना जीवापाड प्रेम करायची.आंबे खाल्ले तेव्हा जाई म्हणे,
"अण्णा भूक व्हती म्हणून इथवर आलूया....सारे जीव कसे तरफडत जगतात हिथं मुंबैत....!"
अण्णा म्हणाले,
"बाई,इतभर पोटाला भूकेचं मरान गं..ते अट्टल अटाळ हाय....!"
आज दि १५/५/२०१८ रात्री अण्णांच्या लाडक्या जाई म्हणजेच जाईबाई भगत [साठे ] यांचे वयाच्या ९३ वर्षी दुःखद निधन चिराग नगर ,घाटकोपर मुंबई येथे रात्री १ वाजून १९ मिनीटांनी झाले. साठे कुटुंबातील महान परंपरा असलेल्या एक तारा निखळून पडला आहे .....महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासात अण्णांच्या पोटाला भाकर अन छातीत हिंमत देणाऱ्या आणि शोषितांचे जीवन जगून मोठ्या कष्टाने आपल्या आई,वडील,बंधू,बहीण सांभाळणाऱ्या जाईबाईंनी जगाचा निरोप घेतला....!"

त्यांच्या पावन स्मृतीत अभिवादन..💐💐💐
टीप-त्यांची अंत्ययात्रा चिराग नगर येथून सायंकाळी 4 वाजता निघेल आणि अंतिम क्रिया भटवाडी घाटकोपर येथे होईल.
शोकाकुल साठे परिवार-

Comments
Post a Comment