माझ्या वरिष्ठ व प्रिय जनो.....!  

                   हा "शब्दकल्लोळ "वैचारिक पातळीवरील  ठेवा आहे. आपल्या चौकस बुद्धी व ज्ञानाच्या जोरावर चालता बोलता वैचारिकतेच्या अंगाने उजाळा आणणे गरजेचे आहे. नव्हे तर  मिथके, भाकडे व केवळ कल्पनांच्या आधारावर पोस्ट करणे कितपत योग्य???? वास्तववाद हा कल्पनांच्याहीपेक्षा भयानक व विदीर्ण असतो.तो सहसा कल्पनांच्या दुनियेत आणता येत नसतो.भ्रामकविश्वात कल्पना हि अमृतवाहिनीच.ती वैचारिक व संवेदनशील विचारभूमीवर फार काळ टिकत नाही.ती आपण या तत्वावर कोणत्या उद्येंशाने स्वीकार करावी..??? कारण कल्पना ह्या शेवटपर्यंत मृत असतात.ती केवळ वास्तवाच्या प्रयत्नांवर जीवन जगत असते.वास्तवातील केलेल्या कल्पनेच्या जिवंत जाणिवेला जपून ठेवण्याचे कार्यामुळे ती पूर्णत्वास येऊ शकते .ती मृतवत मिथका-भाकडांना अंगिकारत राहते.मग मिथके -भाकडे हे सत्यास नाकारतात. आणि नाकारलेले सत्य हे भाकडांचे-मिथकांचे असत्य जन्म घालते.ते विचारी डोक्यांना अविचाराच्या अंधारातच ठेवतात.मग असे अविचारी अंधार प्राषन केलेल विचार आपण सूज्ञांनी कोणत्या तत्वावर अंगी बाणवून घ्यावेत??हा वास्तव प्रश्न आहे .!वैचारिक योग्यता हि सुज्ञ तत्वाची लाक्षणिक बाब आहे!असे मी तरी समजतो. अर्थकारण,राजकारण,धर्मकारण, या तिन्ही बाजूने विचार करता विचाराची बैठक नाही असेच काही प्रमाणात बऱ्याच चर्चेतून हल्ली अनुभवायला मिळते.हि विचारतत्वाला आळा घालणारी बाब आहे.ती विवेकवाद मारून टाकतेे.आणि वर्चस्ववादी भूमिका अंगिकारत असते.अर्थकारण हे राजकारण व राजकारण हे धर्मकारण आणि धर्मकारण हे अर्थकारण असे साखळीचा गोफ असणाऱ्या वर्चस्ववादाचे मगरजाळे. यातून निसटत असते ती फक्त आणि फक्त विवेकवादी विचारसरणी. विवेकवादाच्या पायाला मजबुती करणारी मीमांसा हि वैचारिकतेच्या पातळीवर ठरत असते प्रथमोपचारासारखी.ती पातळी वाढवीच्याचा स्वरूपात प्रखरपणे वर येण्यासाठी हे वैचारिकतेचे तत्व आहे.आणि ते ज्ञानी-शिकल्या सवरलेल्यांनी अनुसरायला पाहिजे.हीच अपेक्षा!कारण सुधारलेले विचार.उद्धार करतात वास्तवाच्या वैचारिक दारिद्र्यतेचे.मग पुढे सकळ विकास....!

टीप-
वैचारिकतेच्या पातळीवर कुठे चुकले असल्यास कळवावे!


Comments

Popular posts from this blog