***इतिहास लेखनाच्या धारणा व इतिहास***
"समोर होता एकच तारा
अन पायतळी अंगार ...
लढाया उभा ठाकला
जीव रक्तातून झुंजार!"
अशा धेयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला हौतात्म्य पत्करले.अशा सर्व ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यसेनानी,वीरांगनांना ही शब्दरूप आदरांजली.....
"स्वप्ने पडली उष:काळाची
हाती मात्र अंध:कार
देश सारा उजळला जरी
मराठवाड्याची काजळ रात...."
स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.स्वतंत्र भारतात हैद्राबाद संस्थान सामील करण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात आली.निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या कासीम रझवीने स्थापन केलेल्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्गाचाही अवलंब केला होता.तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला.भारताचा स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता,पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.हैद्राबाद संस्थानामध्ये महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रामुख्याने 8 जिल्हे, आंध्रप्रेदश,कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील काही भागाचा समावेश होता.हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने रझाकार संघटनेच्या माध्यमातून जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले.या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव,गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा,दिंगबरराव बिंदू,रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान,भाऊसाहेब वैशंपायन,बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता.सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठेवलेल्या प्रस्तावाकडे निजामाने आणि कासीम रझवी याने पूर्णपणे दुर्लक्ष केले.त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केले.याला उत्तर म्हणून भारतीय फौजांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार 13 सप्टेंबर 1947 रोजी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ला सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग पाडले.हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर,1948 रोजी शरणागती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे आंदोलन स्वातंत्र्यापासून सतत 13 महिने लढले गेले.
दिवस 15ऑगस्ट 1947 चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबाद संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नवते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता.स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच.परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा प्रयत्न हा कौतुकाचा खराच; पण स्वातंत्र्यानंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल?
हैद्राबाद हे भारतातील एक मोठे संस्थान होते.स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास होता.तेलगु, मराठी,कानड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता.जामाच्या जुलुमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते;म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले.त्यातच निजामाचे पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरु केले.
"रण पेटले पेटले रण
अग्निज्वाला सर्वदूर
अंगार मनामनात
झुगारु हा अंकुश...."
जनमताचा प्रक्षोभ उसळला.खेडी, शहर, निजामाविरुद्ध खदखदू लागली;आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिल,स्वामी रामानंद तीर्थ यांनी.१९३८ मध्ये स्थापन झालेल्या हैद्राबाद स्टेट कोग्रेसकडे याचे नेतृत्व आले.लढा घराघरात पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले. गोविंदभाई श्रॉफ,अनंत भालेराव,पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी,श्रीनिवासराव बोरीकर,किशोरभाऊ शहाणे यांनी हे स्फुलिंग चेतवले.या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या.आशाताई वाघमारे,करुनाबेन चौधरी, सुशीलाबेन दिवान यांची नावे आपल्याला घेता येतील. वेदप्रकाश श्यामलाल,गोविंद पानसरे,बहिर्जी शिंदे,श्रीधर वर्तक यासारख्या कित्येक र्थ्यांनी अंतर्गत निजाम सरकारविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.
"मुक्तीचा आक्रोश आमुचा
स्वातंत्र्य आम्हा पाहिजे
ध्यास एक श्वास एक
हेच आमुचे ध्येय असे...."
भारत सरकारमध्ये सामील होण्याची तेथील लोकांची तीव्र इच्छा,त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार या सगळ्याविरुद्ध 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने हैद्राबाद संस्थाना विरुद्ध कारवाई केली.इ.स.1294 मध्ये मराठवाडा इस्लामी राजवटीचा आरंभ झाला.17 सप्टेंबर 1948 ला या संस्थानाच्या विलीनीकरणाने त्या राजवटीचा अंत झाला.समान संस्कृती व समान भाषा बोलणाऱ्या आप्तांना लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात मराठवाडा विलीन झाला त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956 या दिवसाची वाट पहावी लागली.आणि मराठवाडा मुक्त झाला.पण पुढे अजून संघर्ष होता.
इथे मराठवाडा मुक्ती संग्राम हा लेख अतिशय बोलक्या भाषेने मांडला आहे.
तो इतिहास आहे.आणि एका जुलमी राजवटीच्या विरोधाचे ते जाज्वल्य असे प्रतीक आहे.
खरे इतिहास पाहता तो समूहाचा असतो.आणि तो अश्या संग्रामाच्या स्पस्टतेचा असेल तर त्यात प्रत्येक लढाऊ वृत्तीच्या आणि त्या रणसंग्रामात उतरलेल्या माणसाचा ठरतो.हेही तितकेच इतिहासाच्यादृष्टीने सापेक्षतेचे व समानत्वचे आहे.त्यामध्ये इतिहास लेखकाराने एका पठडीतून इतिहास लेखन करणे जरुरी आहे का?
संग्रामाच्या अंगाने विचार केला तर तो तळागाळातल्या लोकांपासून ते त्या संग्रामाच्या सर्वोसर्वा धुरीण नेत्या-वक्त्या व धोरणे ठरूवून ते अंमबजावणीच्या ध्येयाने कार्य करणाऱ्या प्रत्येकाचा आहे.हे ही लेखनात उधृत करावे वाटते.कारण जेव्हढी जबाबदारी नेतृत्व करणारी जोखमीची असते तेव्हढीच जोखीम त्या संग्रामात लढणाऱ्या जीवांची असते.ते असतात त्या संग्रामाच्या शिलेदार.
इतिहास लेखन करताना ह्या बाबीचे महत्व लक्षात घेणे गरजेचे आहे.कि,आपण इतिहास हा सकसपणे व तळागाळातल्या शेवटाच्या मानसापर्यंत सत्याशी निगडित असलेला आणि जशास तसा उघड्या डोळ्याने लिहिणे महत्वाचे ठरते.नव्हे कि,अमक्या-अमक्यास केंद्रबिंदू मानून त्याच्या कारकिर्दीतच ह्या इतिहास घडला.त्यास आपण कुठेतरी आपल्या व्यक्तिय, वर्गीय,आणि परंपरावादी धारणेला उराशी बाळगून इतिहासाचे एक्वटीकरण तर करत नाहीयेत ना...?असा प्रश्न इतिहास लेखकारास पडणे वास्तव इतिहासाची सत्य स्वरूप काळाची गरज आहे.कारण आपल्याकडील इतिहास आपण डोळे झाकून स्वीकारतो.आणि मग कुणीतरी त्या अंधाधुंदपणे स्वीकारलेल्या इतिहासाच्या विरोधात बोलायला लागतो.कदाचित त्याला त्या इतिगासाच्या मर्यादा सापडल्या असाव्यात.आणि मग ते विचार जनमानसात पोचले जातात.माणूस आपल्या धारणा जपून ठेवण्यासाठी रत्यास उतरतो.आणि मग होते मागणी-"हा इतिहास बदलला पाहिजे..!"
आज आपण असे इतिहासाचे विकृतीकरण झालेले उघड्या डोळ्याने बघतोच.त्या विकृतीकरनाच्या विरोधातही आंदोलने झालीत हेही आपण अनुभवून आहोत.आपल्या भारताची हि शोकांतिका आहे.हे दुर्दैवाने म्हणावे लागते.हि इतिहास लेखनाची दुर्दैवी गोष्ट आहे की आपल्याला खरे इतिहास लेखन करा हि प्रबोधनाची आरोळी ठोकवी लागते.

Comments

Popular posts from this blog