कथा

★★★इथल्या धर्माला धम्माची गरज....★★★

                        "त्त त्या दिवशी प्रा.डॉ सिद्धार्थ आगळे सरांच्या तासाला सेमिनार चालू होता."सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीकोनातून कला -वाङमय क्षेत्रातील जीवनमूल्ये आणि कलामुल्ये "ह्या विषयावर सेमिनार दिला होता.त्यानंतर मुक्तवेळ होता. केवळ इतरांची मतं ऐकून घेण्यासाठी व विषयाचे काही भागावर मतप्रवाह जाणून घ्यासाठी थांबलो.सरांनी एक कापडी पिशवी माझ्याकडे सरकवली.अन म्हणाले,
"जरा यावर नजर टाकून घे....विश्वनाथ!"
पिशवी उकलत आतला कागदांचा बंच बाहेर काढत..
"हं हो सर.....लगेच..!" म्हणालो. अन सर इतर विद्यार्थ्यांचे सेमिनार निरीक्षण करत बसले.
पी.एच.डी. च्या प्रबंधाएव्हढा जाडजूड तो संशोधन संग्रह होता.
एम.फिलचा-संशोधन संग्रह होता.
"तथागत"या कादंबरीचा वाङमयीन अभ्यास-
अभ्यासक-सचिन पवार.
           तर वाचत वाचत इतकं वाचनात आलं की,बुद्ध आयुष्य,बुद्ध तत्वज्ञान, बुद्ध सारविवेक,जीवनक्रमा व अनुयायी उपदेश सिद्धांतन,या बऱ्याच समकल्पना वाचनात आल्या.पी.एच.डी.ला पूर्ण होईल अशी सखोल व संदर्भासहित एम.फीलचे संशोधन ते होते.
                     मधेच सेमिनार पण ऐकत होतो.एकाने "सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीकोनातून कला -वाङमय क्षेत्रातील कला आणि नीती" ह्या विषयावर सेमिनार दिला.सेमिनार झाला की सर त्याला जुळेल असे नवे,जुने चालू घडामोडीतील संदर्भ देतात.कला व नीती संदर्भात सॉक्रेटिस,प्लेटो सांगत सरांनी बुद्धांच्या जीवनातील एक प्रसंग सांगायला सुरुवात केली.
"बुद्धांवर असाच एके दिवशी खुनाचा आळ येतो.त्यांच्या विहारात रोज एक बाई धम्मसाधनेसाठी येत असे.हे इतर दुर्जन लोकांना कळले आणि तिला एके दिवशी जीवे मारून टाकतात.तिचे मेलेले शरीर त्या विहाराजवळ पुरून टाकतात.की जेणेकरून या अपहरण आणि खुनाचा आळ बुद्धांवर यावा आणि त्यांनी इथून निघून जावे.नगरात चर्चा सुरू होते.जिकडे तिकडे शोध मोहीम सुरू होते.भूमका उठविल्या जाते की, हा अपहरणाचा आणि खूनाचा थांग तथागतांकडे जातो आहे.अन प्रेतही तिथे विहाराजवळ पुरले आहे.नगर सैनिक ते जाऊन शहानिशा करतात.त्या चर्चेत आणि चौकशीत एक वेळ संभ्रमावस्थेत
सर्व बौद्ध भिुक्कुंची अशी धारणा बनते की हे काम.बुद्धांनी हे दुष्कृत्य केले आहे.कारण गेली कित्येक महिने ती स्त्री नित्यनेमाने विहारात धम्मसाधना करण्यासाठी येते हे भिक्कुंना माहिती होते तसे नगरातील सर्व जनतेला माहिती असते.परुंतु अहिंसेचा पुकार करणारे,शब्दांतूनही हिंसा न घडो म्हणणारे बुद्ध जिवंत स्त्रीला का मारतात यावर कित्येक जणांचा अजून विश्वास बसला नव्हता.कारण बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव तिथे होता. काही काळ लोटल्यावर म्हणजे महिना दोन महिन्यानंतर.परंतु पूर्णतः हे सत्य होते की ती स्त्री मेली आहे.आणि तिचा मृत्यूदेह विहाराजवळ सापडला आहे.मोठा नीती पेचप्रसंग होता मित्रांनो...."
आगळे सर म्हणाले.आम्ही ऐकणारे पार आतुर झालो पुढचं ऐकण्यासाठी...
कपिल म्हणला,पुढं सर.????
मागच्या बाकड्यावरून प्रतीक्षा बोलली सर सांगा....आतुरलोय...आम्ही सारे खरं ऐकायला...
अन आगळे सर टेबलावर हात ठेवत शांतपणे स्मित हसले.हसतांना त्यांनी डोळे लावण्याची सवय मोडली नव्हती.डोळे लावून त्यांनी काही पुढची वाक्य बोलली.म्या सरांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो.आगळे सर फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी शिकवायला.विद्यापीठात ते सौंदर्यशास्त्र शिकवायला येत असतात.फार अभ्यासू माणूस आणि दिलदार.
ते बोलले पुढं ...सारे जण ऐकूण घेत होतो.
"ठराव झाला.खुनाचा निकाल होईपर्यंत बुद्ध येथून जाणार नाही.विहाराजवळ सुरक्षा लागली.जणू नजर कैदेत असल्यासारखं....सारं... बुद्ध शांत ,निश्चल,स्तब्ध व विवेकाने दोन शब्द बोलले..ठीक आहे.
"काळ बोलेल..!"
आणि ते ध्यानमग्न झाले.विवेकागर्भात लिन झाले.आर्त खोल सारासार तत्वात रतले.
काही दिवस तसेच गेले.आणि नगरात अजून भूमका उठली की,
"खुणेकरी पकडले," "खुणेकरी पकडले."
जिकडे तिकडे वाऱ्यासारखा प्रसार झाला बातमीचा.
"महाराज्या ..अरे सत्याचा जय,अन पराजय झालानं अनितीचा....!"
आगळे सर धीरगंभीर स्वरात बोलले.सारा वर्ग निःशब्द शांत.प्रश्न होता की,
"हे सारं घडलं कसं.?
सर तोंडावर उजवा हात ठेवून मुखरीने हसत म्हणाले की,
"तुम्हें बहुत उत्कंठा लगी है....सुनो.."
"बुद्ध त्या विहाराच्या मध्यस्थी बसून प्रज्ञा देत होते.अनुयायी निश्चल ऐकत होते.
बुद्ध कोमल वाणीने शब्द उच्चारून गेले..."
"जे ख-याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुध्दिमुळे कधीहि सत्यापर्यंत पोहचु शकत नाहीत".
"जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणुन ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक द्दष्टी आहे.विवेक असतो.त्यांना सत्य लाभते.सतसार तिथे उन्मेशीत होतो."
डोळ्यांची उघडझाप करत आगळे सर बोलत होते.सर अधूनधून हिंदी अनुवाद मराठीतून सांगत होते.त्रिपटक,बुद्धतत्वसार,आणि जातक कथेतील बोधवाक्य सांगू लागले.काहींच्या डोक्यांउपर जाऊ लागलं.अन मंगला बसते त्या बाकड्यामागील बाकड्यावर बसलेला नागू चुळबुळ करू लागला.एकवार नीलम त्याला म्हणाली की,
"गब्बस न रे,कित्ती वानुगत वळवळ करा लाव्लाव..ऐक न जरा....!"
सर तो गोंधळ समजून नागू अन रोशनकडे मान फिरवत एकदाच पाहून बोलले,
"बरं का...नागू,,इकडे लक्ष दे...चित्रगुप्त त्यांना अशांती पसरविण्याचे अहवाल पाठवा...!" 
अन आम्ही सारे हसू लागलो.सर किंचितसे हासले अन पुढच्याच क्षणी ते डोळे लावून विचार करू लागले.म्या त्या बाकड्यावर नजर झुगारली.सारा वर्ग रोषणच्या आवताराला न्याहाळू लागला.हा चित्रगुप्त म्हणजे रोशन...आगळे सरांनी तिसऱ्या सेमिस्टरपासून त्याचं नामकरण केलं होतं.त्यो जामखेड महाविद्यालयातून आलेला.त्याने सरांकडून मस्टर घेऊन विद्यार्थ्यांच्या सह्या घ्याव्या,कुणी गैरहजर असले की,त्यावर काठ मारावी,कुठे सेमिनार असले की,वेळ नियंत्रक म्हणून काम बघावं,सारा कारकुनी स्वभाव रुजवला आहे त्याने स्वतःत.सोवळ्याओवळ्यात राहणारा, कपाळी अष्टगंध,कधी नसला की लाल कुंखु लावलेला.दुटप्पी उपरणं खांद्यावर.गळ्यात तुळशीच्या तीनचार लहानमोठ्या प्रकारच्या माळी.अन कमरेला निसट्ता बेल्ट....असा आधुनिक पुराणिक-"चित्रगुप्त."
आम्ही त्याला कधी "महाराज" कधी "चित्रविचित्रमुक्त" नाही तर कधी "ब्वॉबाजी" म्हणतो.सर चित्रगुप्त म्हणाले अन रोजच्यासारखं सारे हश्या पिकवू लागले.
"शांतता,शांतता,गोंधळ.."
"बुद्ध काय म्हणाले ऐका,, पुढं,ऐका....!"
आगळे सरांनी खिडकीतून कारुण्यमय नजर फेकत शब्द केले....
"सार विवेक ही प्रणाली सत्यनीतीला बळ देत अहंकाराचा त्याग करायला निर्भर होते.जन्माचे,त्या विश्वदुःखाचे मूळ अहं,अस्मी,हूं,मध्ये लोपले आहे.त्याला त्यागवृत्तीने लांच्छित केल्या जाते.म्हणून त्याग ही धम्माची मोठी ताकद आहे.जपली पाहिजे.आशा,ईच्छा,लोभ,काम,अर्थहव्व्यास,टाळला गेला पाहिजे...!" 
अनुयायी प्रश्न करीत होते.
"तथागत...पण आम्हांला अजून पूर्णपणे यावर विजय मिळवायला काय अनुग्रह करावे लागतील.?"
"का हे दुःख भारपीडा ठेवून जीवांना लांच्छन करीत राहील...समोपाय काय होईल...?
"शिका-अनुष्याशीत अनुसरण आणि परत्वे त्याज्यबोध सांभाळ....!"
"भवतु सब्ब मंगलम....!"
म्हणून बुद्ध शांत होतात तोच दोन पहारेकरी आत विहारात घुसले.बुद्धांच्या चरणी लिन झाले.अन हकीकत सांगू लागले.
बुद्ध डोळशांत मुद्रेने त्या पहारेकऱ्यांकडे पाहत होते.त्यांचं बोलणें आता खंडन झाले होते.पहारेकरी आल्यामुळे सर्वच अनुयायी व विहारवातावरण नव्या वळणाने अनुभव घेत होते.ते बोल अनुयायी ऐकू लागले.पहिला पहारेकरी म्हणाला,
"आम्हां राज्यकर्त्यांकडून क्षमायाचना करितो.या नगरात तथागत बुद्ध तुम्हांसारख्या विद्वान नि अहिंसात्मक विचारशैलीच्या तत्वज्ञानींवर खुनाचा आळ अविचारानेच लाविला.
याकरितो...राजा तथा सर्व गणप्रजा क्षमाशील संतोषयाचना मागितो आहोत.दयावृत्तीने ह्या अक्षम्यचुकीचे अपराध चरणी ठेवितो.तावदर माफी असो द्यावी...!"
दोन्ही पहारेकरी हात पसरत होते.आणि करुण भावकारीने ते लोलुप झाले होते.दुःखाची व अपराधाची कुमक ते चेहऱ्यावर लपेटून होते.
बुद्ध बोलले,
"हे आनंद....." 
दोघांनाही मनातला विखार गाळून विशुद्ध होऊ द्या...त्यांना जलपान करावयास लावा...."
त्या दोघांनी जलपान केले नि पुढची हकीकत ते वदू लागले.
"हे महामानवा....हे सत्य तुझे चरणी अर्पित करितो...."
दुसरा पहारेकरी बोलला.
"त्या दिवशी आम्हां दोघांची गस्त घालण्याची वेळ होती.आम्हीं निद्रानाश करून रात्रीच्या पहिल्या प्रहरी मद्यखान्याच्या जवळपासच होतो.मद्यशामियान्यात मद्याच्या धारा प्याल्यात उकळत होत्या.घडा भरल्याचा आवाज त्या शांत पण हुरळलेल्या रात्रीत चढत होता.आणि तसाच काही दोन मानवी आवाजाचाही.आम्हांला वाटले की,मद्य प्राशन करणारांनी इकडील तिकडील चर्चा सुरू केल्या असतील.आवाज वाढत होता.तसा तो मद्यखाना कैफात बुडत होता.रात्रीच्या प्रहरी लुटारू,गंजिफे,व्यसनी,गुत्तेखोर आणि दरोडेखोरांनी मद्यखाना तुडुंब भरलेला असतो.ते रोजचेच आहे.त्यातील कैकांना हमहाटात आम्हीं न्याहाळीत असतो.काहीं देशस्थ राज्यकर्मी असतात.तर काहीं व्यापारवाईशी... तर काहींचे राजकारभारांचे हिसोबकीतोंब चालतात.राजधर्मी नि काहीं धर्मशाशन कारभारी...."
बुद्ध एकाग्रचित्ते ऐकून घेत होते.सारी अनुयायी मंडळी कानात प्राण ओतू लागले.राज्याची अवस्था आज वेगळ्याच निवेदनाच्या अंगाने ते गुप्तहेरांकडून ऐकत होते.ते पहारेकरी नसून गुप्तहेर आहेत हेच मुळात आज त्यांना नवं कळत होतं.ते चकितभाव दृष्टीने त्या दोघांकडे पाहत होते.
दुसऱ्या पहारेकऱ्याने काय सांगितलं आहे का माहीत ...महाराज्यांनो...?"
आगळे सर बोलू लागले की,
"पहारेकरी तिथे मोठ्या गुप्तहेरी फिकीरीने म्हणतात,
"आम्हीं शीळभिंत ओलांडून मुख्य दरवाजाला न टोकरता पुढच्या सांदीत हळुवारपणे पाऊल टाकत गेलो.पाहतो तो काय.???"
"बुद्धांनी किंचितशी हासरी लकरे नजरेतून पहारेकऱ्यांच्या चेहऱ्यावर फेकली...."
किंचितशी हा शब्द म्हणतांना... आगळे सरांनी दोन बोटांची चिमटी धरून टेबलाच्या एका कोसावर टिचवत पुढचं वाक्य केलं. 
"मद्यशामियान्याच्या तोंडावरच राजधर्मी वस्त्र नसलेले दोन व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत एकमेकांशी वार्तालाप करू लागले होतें.दोघांच्याही हातात राजेसरी मुद्रे होतें.ते मंद दिव्यांच्या लालसर लखोटीत लकाकत होतें.ही मुद्रे केवळ धर्मशाशन करणारांना बहाल केल्या जाते हे आम्हां दोघांनाही ज्ञात होतें.दोघे मोठमोठ्याने आवाज चढावून बोलले,
"राजधर्म आम्हीं पाळीला आहें...मोहरा आम्हांस तीन हिस्से असाव्यात....!"
"आम्हीं ते प्रेत गोरींत दाबून सारा भ्रम नष्ट केला आहें तेव्हा मला हिस्से तीन राखू ठरवा.."
"किंतु...त्या स्त्रीचा खून आम्हीं घडवून आणला आहें..हे जिकरीचे काम तुम्हांकडून घडले नसते...तुमची दराज आम्हां ठावेंती...?"
"परंतु भूमका का वर्ज्यदर्जा होतें??
तुम्हां ते जमले नसते...अंगावर आळ बसिला असता.त्या तथागतांना गोवलें हेंचि मोठे कर्म समजून तीन हिस्से आम्हीं राखू ठेविला..नाही तर....!"
"आणि त्याने त्या दुसऱ्याची नरडी दाबण्याचा निष्फल यत्न केला."
"अनुयायी अवाक् झाले.सर्व बुद्धांच्या स्मितमुखाकडे पाहू लागले.बुद्ध एकही शब्दांची उच्चारणा करणार नव्हते.ते ऐकू लागले.निर्विकार नि विवेकशील नजरेने त्या गुप्तहेरांकडे ते पाहत होते."
आगळे सरांनी हात उलटा फिरवून टेबलावर ठेवत प्रश्न केला....
"मंग.. पुढं काय महाराज्यांनो...आहे का ठाऊक..?
इथे काय नीती आणि सत्याचा सहसंबंध..."
साहित्य आणि नितिनियमांची सांगड कशी घालणार?
सत्य आणि साहित्य काय सांगू पाहते आहे?
काय,,, काय...इथे समवाय काय साधला आहे?"
सरांनी दोन्ही हाताची कुडबुडी करत फिरवली.एक हाताची मूठ तर हनुवटीजवळ नेत विस्मयादी नजरेने सर्वांना न्याहाळले.अंजली काहीतरी लिहीत होती.सरांनी तिच्याकडे हात दाखवला...
"हे बघा...!"  
"लिहून घ्याच्या गोष्टी आहेत का ह्या.???
"आचरणाच्या बाबी आहेतनं...!"
आणि ती लिखाणातून सावरली.बाजूच्या बाकड्यावर बसलेला बाळू त्यो पण पेनाचं टोकन बंद करत पुढचं ऐकू लागला.
"दोघांची झटाझोंबी चालू लागली.हमरीतुमरी झाली.आणि दोघे एकमेकांची त्या दिवशी केलेल्या कृत्याची उजळणी करू लागले."
"इथे धर्म टिकवायचा असेल तर त्या तथागतांना हाकलून देणे हें जिकरीचे होते ते काम ह्या खुनाच्या
ळाने यथार्थ स्त्रीअंत केल्या आपल्या कर्माने झाले आहे."
"बुद्ध तत्वज्ञान पाय पसरत आहें हेंहीं ठावेंती आम्हां....म्हणून आम्हीं काय गोर भरण्यास कसूर ठेविली..???"
गुप्तहेर बोलला,
"हे...महाज्ञाता तथागता...त्यांची कुबुद्धि समजोनी आम्हीं त्यास कैद केले आहे.राजमोहरा हडप केल्या आहेत.खुणेकरी पकडले आहेत.आणि धम्माचे विडंबननाश रोखण्याचा मुंगींयत्न केला आहें.आम्हांला क्षमायाचना करून उद्बोधित करावे....!"
आणि सर बोलायचे क्षणभर थांबले...
आणि म्हणाले,
"काय बोलले असतील तथागत गौतम बुद्ध...?"
"आजच्या काळातला धर्म आणि धम्म काय सहसंबंध,विरोधसंघर्ष,समवायसंगर काय सांगू शकाल?"
"आजची राजकीय प्रणाली कोणत्या तत्वांवर हुकूमती करत आहे.?"
"गणराज्य संकल्पना अस्तित्वात आहे का?"
"बुद्धांना अभिप्रेत असणारा धम्म आज कोणत्या अवस्थेत आहे?"
"मानसिकता काय आहे समाजाची?"
"धर्म नीती,सत्य,आणि तत्व बाळगून आहे काय?"
"अधर्माने राजसत्ता कशी हस्तगत केली आहे?"
"मानवजनांचे शारीर,मानसिक,नैतिक,भावनिक,आर्थिक शोषण कधी थांबणार?"
"मानवमुक्तीला बहाल झालेला धम्म धर्माला केव्हा कळणार?"
"आजच्या काळात धर्माला धम्माची गरज आहे हे उमगणार की नाही?"
सारे विद्यार्थी विचारात बुडाले तसा म्या पण इचार करत होतो....
                     "वास्तविक धर्म आणि राजकीय परिप्रेक्ष यांची मीमांसा ही अध्ययन अध्यापन व मूल्याधिष्टीत समाजनिर्मितीच्या उद्दिष्टासाठीची सहसंबंध तत्त्वावर असावी.की जी आजतागायत दिसत नाही.भारतीय शिक्षण व्यवस्थेने स्वीकारलेली नाही.ती राजकीय अधिसत्ता किंवा अधिसत्ताक राजकीय प्रबल्यासाठी दूर नेऊन ठेवली आहे.
           अधर्माच्या आचरणाने आज सामाजिक मानसशास्त्र आज विकलांग होत आहे.सर्वसामान्य जनतेच्या ब्रेनवॉशिंग करणाऱ्या जणू बाजारपेठा उभ्या राहिल्या आहेत.या धर्तीवर सामाजिक मानशास्त्रांचा निधर्मीवृत्तीने अभ्यास करणारा वर्ग दिसत नाही.आज तोल गेलेला समाज असमतोलपनर जिणे जगत आहे.मात्र विचारांती सामाजिक परिस्थितीचे मीमांसक घडत नाहीत.व्यक्तीला एकट्याचे नियंत्रण असू शकते मात्र जमावाला नियंत्रण नाही.धर्मात आणि धम्मात गणजनांचा  भरणा असतो.समूह असतो.विवेक व सामाजिक सुव्यवस्था हरवत चाललेल्या मानवी समूहाचे विश्लेषक आज तोंड बांधून बसलेल्या अवस्थेत आहेत.समूहमनाचा,मानसशास्त्राचा विचार कुणीच करत नाही.कोणत्याही मीमांसकाला आजच्या वास्तवात समूहाला विवेकाची मानसशास्त्रीय बैठक देण्याचा आज अभ्यास होत नाही.हिंसक आणि रक्तपात घडवून आणणाऱ्या विचारसरणीला चोपविता येणारे मानसशास्त्र आज उपलब्ध नाही ही खेदजनक बाब आहे.चळवळींनी हे सत्य समजलं पाहिजे. धर्म,राजकारण,अर्थ,नीती,शिक्षण,आणि खास करून विकृत अधर्माने ग्रासल्या गेल्या चळवळींच्या मुशीतुन हे जहर ओतले जात असतांना सामाजिक मानवी मनाचा भपका होत आहे.आणि यातूनच दंगली,हिंसाचार,रक्तपात आणि संघर्ष पेटल्या जात राहतो आहे.धर्मांधवृत्तीने नि जातीपातीच्या खेळीने समाजाला चौकडात उभं केलं आहे.आणि अर्थ-विचार-शिक्षण-एकात्मतेच्या अभावाने माणूस पूर्णतः खंगून गेलेला आहे.वैचारिक गुलामीने नि बुद्धीने नग्न झालेला समाज वास्तवातल्या इखारी उन्हांनं भाजत आहे.मग स्वत:ला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दु:खी करा,अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वत:ला दु:खी करा.अथवा स्वत:ला आणि दुसऱ्यालाही दु:खी करा,अशा तऱ्हेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्हि विश्वास ठेवाल काय?
त्यावर श्रद्धा ठेवाल काय?
व्यक्तिला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येये आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते,त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते,ती जो समाज समुहात विभागलेला असतो,त्यात साधता येत नाही. समुहाप्रमाणे आदर्श आणि ध्येये भिन्न असली की,समाजातील व्यक्तिचे विचार भरकटतात, आणि समाजव्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची द्दष्टी सुसंगत राहु शकत नाही.ती विकृत होते.दुसरे असे की समुहव्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही.समुहव्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात.जे मालक असतात ते मालकच राहतात
णि जे दास्यात जन्मास येतात ते दासच राहतात.धनी ते धनीच राहतात.कामगार ते कामगारच राहतात.अधिकारसंपन्न ते अधिकारसंपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात.धर्माचे भक्त ते भक्तच राहतात.दास म्हणून जगतात.धम्मात असे नहीं.तिथे सकळ मानवमुक्तीला स्थानठराव आहे याचा अर्थ असा होईल की,अशा धर्मव्यवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांनाच होतो.बहुसंख्यकांना मात्र त्यापासुन वंचित रहावे लागते.यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडनारी शक्ति बनविणे.बंधुता.म्हणजे काय
बंधुता म्हणजे मानवामानवातील भ्रात्रुभाव...
म्हणजेच नीति.म्हणुनच तथागत बुद्धाने शिकविले,
"धम्म म्हणजे नीति आणि नीती म्हणजे धम्म.धम्म पवित्र आहे तशीच नीतीहि पवित्र.           
               सामाजिक स्थिरता टिकविण्यासाठी समता आणि जागृती निर्माण व्हायला पाहिजे.त्यासाठी जातीय राजकारण आणि धर्मांध नीतीला नेस्तनाबूत करून एक प्रवाह तयार करवा लागेल.ही प्रक्रिया थोर विचारवंतांनी दिलेल्या मार्गाने यशस्वी होईल.जेव्हा गटागटात विभागलेले बळ एकत्र येतील तेव्हाच या अमानुष व्यवस्थेचा डोलारा पाडल्या जाईल.येणाऱ्या पिढ्या सुरक्षीत राहतील.आज हे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे.समाज सजग राहिला पाहिजे
.प्रज्ञा-शील-करुणेचा अंगीकार करणे करणे आणि समता,स्वातंत्र्य,न्याय व बंधुतेचा पुरस्कार करणे हेच मुळात बेबंधशाहीला न पटणारे वास्तव समजले पाहिजे.नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तूत: धर्मात नीतीला स्थान नाही.ते हल्ली दिसूनही येत नाही.धर्माचे विषय म्हणजे देव,आत्मा,स्वर्ग,नर्क,होमहवन,प्रार्थना,पूजा-कर्मकांड,विधी,समारंभ आणि यज्ञ हे होत.एका माणसाचा दुस-या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो.इथे धर्माच्या अनुसरणातच मुळात मानवी अस्तित्वाला नकार दिला आहे.यातून दूर लोटलं आहे.माणसानेच माणसाचे हक्कअधिकार तोडले आहेत.शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात निधीचा समावेश होतो.धर्म हा एक त्रिकोण आहे.आपल्या शेजा-याशी चांगूलपणे वागा.कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात ही धर्माची विचारसरणी आहे.प्रत्येक धर्म नीती शिकवितो.परंतु निती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे.ती त्याला जोडलेला एक डबा आहे.वेळ पडेल त्या प्रमाणेच तो त्याला जोडतो किंवा त्यापासून सोडविता येतो.याज धर्मात नीती उरली आहे का? असाही सवाल फणा काढतो.धर्माच्या व व्यवहारात नितीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे.म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही.नीतीने चालणारा धर्म राजकीय अर्थाने आज कसा राजव्यवव्हार करत आहे
आपण चिकित्सा केली पाहिजे की,धम्मात नीतीचे स्थान कोणते
याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती.दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावले आहे.धम्मात प्रार्थना,तीर्थयात्रा कर्मकांड,विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही.नीती हे धम्माचे सार आहे.त्याशिवाय धम्म नाही.धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे.यातूनच नीतीचा उगम होतो.त्यासाठी देवाच्या आज्ञांची आवश्यकता नाही.मुर्तीपूजेची आवश्यकता नाही.देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही तर स्वहितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे
.कारण धम्म नितीचा सिध्दांत सांगतो जो विज्ञानाला आधार मानतो,पण धर्म हा या सर्वापासुन अलिप्त राहतो,म्हणुन त्याला कशाचा अधार नाही.यामुळेच बुद्धीप्रामाण्यवाद-विवेक नि तर्काचा स्वीकार करून अज्ञान,दारिद्र्य नि दुर्बलतेला नकार देणे ही स्वाभिमानकपणे वैचारिक चळवळींनी घेतलेली मानसिकता पुढे अस्पृश्यता,जातीभेद,चातुर्वर्ण्याला नकार देत राहिली पाहिजे.कारण आजही छुप्या रीतीने ही मानसिकता टिकून आहे.ज्यामुळे जातीय,हिंसात्मक वळण घेणाऱ्या घटना समाजात घडून येतांना दिसत असतात.धर्म याला कारणीभूत आहे.कारण भारतीय परिप्रेक्षात शिक्षण प्रसारपेक्षा धर्मप्रसार,प्रचार हा मानवी मानसिकतेला पोक्त भीतीयुक्त आदर बाळगायला लावत आहे.यामुळे सामाजिक परिवर्तनाची मेख उभी राहून भेदाभेदाच्या तत्वज्ञानाला हादरे बसू लागतील.या अधर्मविचारविरोध संघर्षाची बाजू उभी होईल.त्याचप्रमाणे या संघर्षाला धर्म,राजकारण,समाजकार,शैक्षणिक ध्येयधोरणे आणि मानसिकता आदी बाबी कारणीभूत होत्या आणि आहेत हे कुणीही नाकारू शकत नाही.म्हणून,
                             "आपण ज्या परिसरात जगतो,राहतो त्या ठिकाणची अस्थिरता, अस्वस्थता आपण लेखणीच्या माध्यमातून निर्भीड व वास्तवाच्या दृष्टीकोणातून मांडली पाहिजेत.मराठी साहित्याचा अभ्यास करणारे हे सत्य जाणून आहेत.सत्य ते कि ज्या लेखण्या केव्हाही जिवंत असतात....!"
(समाप्त)

Comments

Popular posts from this blog