***प्रेस व्हिजिट+ऐतिहासिक भेट+तत्ववारसा***
★ ऐतिहासिक पार्श्वभूमी-
आज पोळा.बैलपोळा.बैलपोळा अन गायीलापण ओवाळा.असाच एकदा दिवस उतरणीला असतांना गावातल्या कोरीव शिल्पावर नजर टाकली आणि पुढं न्याहाळत गेलो.त्याअनुषंगाने-
आपला सांस्कृतिक इतिहास व सण उत्सवाचा आर्थिक,धार्मिक,राजनैतिक वा सामाजिक इतिहास बघितला तर प्रतीके आणि प्रतिमा,संज्ञा, संकल्पना,विधी,आणि,भाषा,संस्कृती,लिप्या,तत्वज्ञानात अडकलेला आहे.भारतात आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने दक्षिणी भारतात कला संस्कृतीला मोठा इतिहासाचा कालपट आहे.इथे कोरीव काम आहे.लिप्या आहेत.(लिप्या व मुद्रण यासंबंधी लिखाण सुरू आहे)प्राणी,पक्षी,निसर्ग व मानव, स्त्री,अद्भुतरम्य देखाव्याने नक्षीकाम,शिल्प,कलाकुसर आणि स्थापत्यशास्त्र निर्माण झाले आहे.
दगडावरील कोरीव काम ही भारतीय खंडातली खास कला आहे.याची तोड जगात कुठेही नाही.दक्षिण अमेरिकेतही कोरीवकामे आहेत परंतु कोरीव कामे करणारी कारागीर मंडळी मात्र नाहीत.
मुख्यत्वे अजिंठा लेणी ही भारतीय कलाविष्काराचे संचित मानली जातात.भारतीय चित्रकलेची व शिल्प परंपरा या लेण्यांपासून सुरू होते.यातील चित्र आणि शिल्प त्यांना जागतिक वारसा लाभला आहे. इ.सनपूर्व १५० ते इ.सनपूर्व १०० या कालखंडात हीनयान पंथाच्या कालखंडात या गुंफांची निर्मिती झाली. त्यानंतर तब्बल ५०० वर्षांनंतर येथील उर्वरित गुंफा आकारास आल्या. भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग तसेच काही जातक कथा येथे चितारण्यात आल्या आहेत.काळाच्या ओघात हा परिसर निर्मनुष्य झाल्याने तेथे रान माजले आणि हे स्थान अज्ञात राहिले.

★संस्कृती आणि आंग्लकालातील ध्येयधोरणे-
१८१९ साली एका जॉन
स्मिथ नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यास अजिंठ्यातील लेण्यांचा शोध लागला. इ.स. १८४४
मध्ये ब्रिटिश सरकारने कॅप्टन रॉबर्ट गिल यांना मेजर पदावर पदोन्नती देऊन लेण्यांची चित्रे काढण्यासाठी
अजिंठ्यात पाठवले. १५ वर्षांत त्यांनी लेण्यांतील १०५ कलाकृती साकारल्या. त्या वेळी
अजिंठ्यात लेणींच्या उत्खननाचे कामही जोरात सुरू होते.अजिंठ्याच्या पूर्वे दख्खनला
विदर्भाचं अस्तित्व उभं राहतं.म्हणून विदर्भ व शिल्पकला हे कोडं समजावं लागेल.
विदर्भाची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका
असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानतात. त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्गशक्तीस महत्त्वाचे स्थान आहे.सूर्य, जल, अग्नी, वृक्ष या निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती,नाग,वृषभ म्हणजे बैल यांचीही ते आदरातिथ्य मनात ठेवतात.पोळा जुना सण इथे साजरा होतोय. वैदर्भीय कृषिवल सांस्कृतिकतेचा संदर्भ थेट हडप्पा-सिंधू संस्कृतीशी लागतो.नाग संस्कृतीशी जुळून येतो.

★परिसरातील मंदिर रचना व शिल्प-
बव्हंशी मंदिर
हेमाडपंथी पध्दतीने बांधलेले आहे. नागर शैलीतील एकूण आठ घटक येथील मंदिरांतून
स्पष्टपणे दिसतात; ते म्हणजे मूळ अधिष्ठान (रूट टेरेस), मसूरक (सॉक्ल), जंघा (वॉल), कंगणी
(कॉर्निस), शिखर (टॉवर), ग्रीवा (नेक),
आमलसारक (सर्क्यूलर टॉप) आणि कुंभाकार कळस. ह्यांशिवाय, अर्धमंडप,मंडप,महामंडप,अंतराल आणि गर्भगृह ह्यांत आकारमानांनुसार मंदिर विभागलेले असून मोठ्या
मंदिरास प्रदक्षिणापथ आहे. बहुतेक मंदिरे चुनखडकाश्मांनी बांधलेली आहेत. क्वचित
ग्रॅनाइट दगडाचाही उपयोग केलेला आहे. चुनकाश्माचा रंग पिंगट व धुरकट पांढरा
आहे.खोची भरलेली आहेत.
शिवकाळात इथे स्वराज्य व भूगोल खूप मोलाचे योगदान दिसते.महाराजांच्या काळात येथून जवळपास घोड्याच्या पागा वगैरे होत्या तसेच येथून जवळच सिंदखेडला जिजाऊंच्या माहेराला जाण्याऱ्या गुफा व भुयारी मार्ग निर्माण केल्या गेल्याचे आढळते. घोड्यावरून,बैलाच्या वा गायीच्या पाठीवरून,पायी जाण्याचा रस्ता होता.पुढे तो बंद,गाळीव आणि पर्यावरणीय अडचणीच्या अवस्थेने नष्ट झाला.

★लोणार परिसर व स्थापत्यशास्त्र कला-
दैत्यसूदन मंदिरही
लोणारमध्ये आहे.लोणार हे काही काळ सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली होते.(लोणारचा
ऐतिहासिक वारसा संदर्भात नवे लिखाण करीत आहे.)त्यानंतर लोणार हे सातवाहन,चालुक्य
आणि राष्ट्रकूट साम्राज्यात होते. येथील 'दैत्यसूदन’ मंदिर आणि आसपासची अनेक मंदिरे ही खास हेमाडपंथी शैलीतील वास्तुकलेने
नटलेली आहेत.लोणारचा उल्लेख ऐने अकबरीतही दिसून येतो. यादवांच्या काळात लोणार मोठे
सांस्कृतिक केंद्र होते. यादवकालीन वास्तुशिल्पी हेमाद्रीपंताने तेथे मोठय़ा
प्रमाणावर शिवमंदिरशिल्पे निर्माण केली आहेत. यावरून हे सरोवर यादवकालीन शिवतीर्थ
असल्याचे सिद्ध होते.
लोणार विवरातील सरोवराच्या काठावर सुमारे १२०० वषार्ंपूर्वी बांधलेली, पैकी काही यादवकाळात जीर्णोद्धार झालेली,तर आज बरीचशी अत्यंत भग्नावस्थेतीलं स्थापत्यशास्त्र रचना आहेत.
इतिहासाने निजामाच्या काळाचा संदर्भही लागतो.रझाकारच्या काळात वा धार्मिक उन्मतिच्या काळात ही शिल्पे फोड-तोड केल्याचे दिसून येतात.परंतु हेच सत्य कितपत मानायचे?इतिहास मुस्लिमविरोधीही असू शकतो.कारण तत्वज्ञान रुजविण्यासाठी भारतीय धार्मिक इतिहास चोखाळला तर लक्षात येईल,वास्तू,शिल्प,कला,व अजोड नमुन्यांची नष्ट करण्यात आलेली आहे.मग तो काळ मुघल,हिंदू,जैन वा पारशी असो हे तोडफोडीचं राजकारण धर्म व अधिसत्तेच्या प्रबलतेने घडलेलं आहे.असो.
वैशिष्ट्य हे की,दगडी मंदिर शिल्पांकित आहेत. शिल्पे मुख्यत्वे मंदिराच्या पृष्ठभागांवरील विभागांत, भिंतीवर, कधी दोन तर कधी तीन पटांमध्ये खोदलेली आहेत. ह्यांशिवाय मंदिराचे तोरण व प्रवेशद्वार, गर्भगृहाचे द्वार, गणपट्टी, द्वारशाखा, प्रदक्षिणापथाच्या भिंती व आतील इतर भिंती यांवर मूर्तिकाम आढळते. कामशिल्पे विशेषत: बाहेरच्याच भिंतींवर आढळतात. शिल्पे व्युत्थित, अपोत्थित, उत्थित आदी विविध प्रकारांत खोदलेली असून प्रतिमांची प्रमाणबद्धता, उठावदारपणा आणि भाव उल्लेखनीय आहेत.
मंदिराचे काम संपूर्ण काळया दगडात होते.कोरीव काम अतिशय सुबक असून मंदिर प्रवेशद्वाराशी नगारा घर आहे. मंदिराच्या चहुबाजूंनी मोठी तटवजा शिल्पयुक्त दगडी कोरीव काम केलेले खांब तर ओटा परिसर दगडांनी बांधलेला आहे.द्वाराच्या दोन्ही बाजूंना स्त्रीपुरुषांच्या आकृत्या दिसतात; क्वचित शार्दूल आणि अन्य प्राणी आढळतात. वास्तुशास्त्रदृष्ट्या इतर सुसूत्र बांधकामाबरोबर ह्या सर्व मंदिरांत प्रकाशाची योजना गवाक्षांद्वारे फार कवचात आहे.म्हणून घुमट भागअंधारमय आहे.

★धार्मिक,सांस्कृतिक उठाव व
शिल्पे-
तत्कालीन देवदेवता व
धार्मिक संप्रदाय ह्यांचे चित्रण ह्या ठिकाणी पहावयास सापडते. युद्ध,मिरवणुका,
शिकार, नृत्य ह्यांबरोबरच तत्कालीन राजकीय व
शैक्षणिक पद्धती यांचेही दर्शन येथील शिल्पांतून घडते.येथील कामशिल्पे आणि
त्यांतील विविध आसने हा तर एक विशेष चर्चाविषय आहे. खजुराहोच्या शिल्पांतून
तत्कालीन अलंकार, वाद्ये, पोशाख,
प्रसाधने, मनोरंजनाची साधने, केशभूषा वगैरेंचे तर दर्शन होतेच. शिवाय तत्कालीन प्राणी आणि वनस्पती हे
विषयही शिल्पकारांनी हाताळलेले आहेत.
प्राणिजीवन व मानवी अस्तित्वाने सिंह,हत्ती, बैल, डुक्कर, विंचू, साप,पठारी नाग आणि विविध पक्षी तसेच अनेक प्रकारचे वृक्ष आणि वेली ह्यांमधून वास्तवता प्रतीत होते. हे सर्व वास्तव जग शिल्पांकित करूनही शिल्पकारांनी वास्तव जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांतील अवकाशगामी अप्सरा, सुरसुंदरी,पऱ्या ह्यांच्या शिल्पांकनातून हे प्रत्ययास येते. तत्कालीन वस्तुस्थितीचे चित्रण करण्याचा प्रयत्न येथील शिल्पकारांनी केला आहे.समोर चौकोनी बारव स्नान करायला व पाय धुवायला कुंड आहे. मंदिराचा गाभारा अंधार व पूर्वदा आहे.या मंदिरास त्या काळी सुमारे ३० लाख रूपये खर्च आला.पण हा आकडी हिशोब ताळमेळ खात नाही.कारण धर्माच्या नावावर लूट व अर्थव्यवस्था बघता हा खर्च झाला की नाही किंवा झालाच तर पुरेपूर की तोलामोलाचा हे प्रश्न समोर येतात.

★ऐटबाज व भव्य नंदी-आणि कलासौंदर्य-
शाऱ्यातील महादेव
मंदिरासमोरील नंदीबैल काळया कभिन्न खडकात कोरलेला आहे.(फोटो)
त्याच्या पक्तहीवर,मानेवर,पायाच्या खुरीत,पाळेवर नक्षी कोरलेली आहेत.कमळ पान,दगड स्तंभ कडा,चौरसच्या जागी, रेखीय ओळ,लहान आकाराच्या प्रवाळ आणि मोठ्या प्रमाणात कोरल खडक,पाठीवर सुबक दोरखंड, नक्षीकाम, साखळ्या,सापाची गुंफणयुक्त वेसण,आखीव पट्टे व बटीक घंटाचे वेल त्यावर आहेत.प्रसंगावधान व समय सूचकता त्यात आहे.
पानाफुलांचे शृंखला कृत नक्षीकाम, दर्जेदार आहे. दगडात कोरलेली दिप माळनी ही
अजिंठा कालीन शिल्प कलेची प्रभा ह्या ठिकाणी पाहावयास मिळते.प्राचीन साहित्य,कोरीव लेख तसेच परकीय प्रवाशांची वर्णने ह्यांमधून बौद्ध,जैन,नाथ, महानुभाव,हिंदू,तत्वज्ञान व आचारविचारांचा ठसा या शिल्पावर व त्या शिल्पकारांवर उमटलेला दिसून येतो. कारण अशोकाने बौद्ध धर्मास प्रतिष्ठा दिली,पण त्रिरत्न चिन्ह अशोकस्तंभावर नाही. बैल मात्र इतर सिंह,हत्ती या प्राण्यांबरोबर आहे. याचा अर्थ अशोकाच्या काळी त्रिरत्न चिन्ह बौद्ध धर्माचे प्रतिक नसावे. ते असलेच तर इतर कसले तरी (वायव्येतील राजांचे/ नंदांनी वापरलेले) प्रतिक असावे. म्हणून माझ्या मते हे त्रिरत्नाचे चिन्ह आधी राजाचे चिन्ह म्हणून आले असावे.म्हणून तिथे राजनंदीची कोरीव शिल्पही येतो.
अनेक शतकांचा काळ लोटला असता तरी ह्या दक्षिणेचा स्थापत्य शास्त्राचा अभ्यास त्यात उगवतो आहे.कोरीव असणाऱ्या मूर्तीची कलाकृती आज टिकून आहे. हे मंदिरामोर पुर्वेला कोरलेला नंदी श्रमसांस्कृतिक वारसा सांगून जातो.
एखाद्या कलाकाराच्या सर्जनशीलतेला जोडल्याने परिणामस्वरुप सुधार होऊ शकतो.दगडी कोरीव काम यात वेळ व श्रम खूप खर्च होतात.दुहेरी काफाने दगडमार केला जाऊ शकतो.ही नवी युक्ती दिसून येते म्हणून दोन घुंगरू सारख्याच शैलीने कोरलेले आढळतात.तसेच भूमितीय रचना व जमिनीच्या आकाराने स्थित केलेल्या पॅनेलस कलात्मक रूपाने सुशोभित केले गेले आहे.यामुळे तत्कालीन विकास उत्क्रांतीची स्पष्ट ओळख होऊ शकते.तत्कालीन मानसिकता व कलासौंदर्याची अप्रतिम जाणीव दिसून येत.हाताची व अंगठ्याचुई,कराल दंती,मणुरा,खोस,भर, चिर,उधड,आदी कला शिल्पात आढळतात.

★स्थानिक बोली,बोलीभाषा
आणि लोकजागृती-
झाडबोली,घाटमाथी
व वऱ्हाडी बोलीतून एक्का,गाडा,खटारा,खाचर,चापेची खासर, छकडा(सेंकडा)टांगा(तांगा),दमणी(धमणी),पडद्याची खासर,बग्गी,बंडी,बैलगाडा,बैलगाडी,बोडकी खासर,रथ रेंगी,सारवट,सेंकडा (छकडा),स्लेज,बंडी,
खासर इ.नावे वाहनांची येतात.या वाहनांना बैल,नंदी,
कठाळ्या बांधून दळणवळण केल्या जात होते.कुरुड ता. देसाईगंज जिल्हा
गडचिरोली येथे नंदी व बैल उत्सव फार जुन्या काळापासून होत आहे.विदर्भातील हा पूर्व
भाग भूगोलाच्या दिशेने पडतो.
नागपूर येथे प्रागैतिहासिक शाखा आणि अरबी व फार्सी पुराभिलेखांचा विभाग आहे.पुणे व धुळे येथील पुरातत्व विभागाला भेट देऊन नवी माहिती व जुनी माहिती पडताळणी सोपी झाली.मध्यवर्ती कार्यालयात महानिदेशक, सहमहानिदेशक असून समन्वेषण व उत्खनन, प्रकाशन, परदेशातील समन्वेषण, स्मारके व अवशेष, प्रशासन व विद्यालय यांसाठी निदेशक आहेत. भारत सरकारने १९७२ चा कायदा करून पुरातत्वीय खात्यास वाजवी अधिकार दिले आहेत.येथील माहितीही उपयुक्त ठरली आहे.

★संदर्भ :-
* Roy, S. The Story of Indian Archaeology, New Delhi,( 1961.)
*Lal, B. B. Indian Archaeology Since Independence, Delhi, (1964.)
*एपिग्राफीया इंडिका (१८८८)
*योहान गेओर्ख ब्यूलर, फ्रांट्स कीलहोर्न,अर्न्स्ट हूल्ट्श-(पुराभिलेख)
*आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया,
*न्यू इम्पीअरिअल सीअरीज
(पुरातत्वीय सामग्रीप्रकाशन-बर्जेस)
*नागपूर पुरातत्व विभाग-व्हिजिट
*पुणे -भांडारकर संस्था व्हिजिट
*बेळगाव ऐतिहासिक संदर्भी-व्हिजिट
*भारतीय पुरातत्व विभाग-डेक्कन इनस्टिट्युट,पुणे *राजवाडे व महात्मा फुले वस्तू संग्रहालय(धुळे-पुणे)

★टीप-
विषयाचा आवाका मोठा आहे.लेखात त्रुटी सापडल्या तर कळवा.संदर्भ,इतिहास् व टिप्पणीत त्रुटी राहिल्या असतील....कळवावे.

Comments
Post a Comment