***लाल बावटा कला
पथक-त्रिकुटातला एक शाहीर***
द.ना गव्हाणकर,अमर
शेख,आणि अण्णाभाऊ साठे-
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सारा महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या व इतर वेळीही कामगार चळवळीची प्रेरणा ठरलेल्या या शाहिरी कलावंतांकडे दुर्लक्षच झाले.कारण समाजाच्या संस्कृतीची सूत्रे हातात असणाऱ्या,साहित्य,कला व इतर प्रासारमाध्यमांवर नियंत्रण असणाऱ्या मध्यम व अभिजन वर्गाने सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय असणाऱ्या या शाहिरी कलेला दुय्यम मानले.प्रस्थापित साहित्य,कला क्षेत्रातील कुणा कलाकाराला लाभली नसेल एवढी अफाट लोकप्रियता या कलाकारांना लाभली.लहान वयातच स्वातंत्र्य चळवळीतील प्रभात फेऱ्यांमधून गाणी म्हणणाऱ्या अमरशेखांच्या नसानसात देशभक्ती भिनलेली होती.मराठी मातीवर त्यांचे प्रेम होते.आणि विशेष म्हणजे माणसावर त्यांची निष्ठा होती.जातिभेद,धर्मभेद व आíथक विषमता यामुळे माणसांची होणारी पिळवणूक व अन्याय संपून एका शोषणविरहित समाजाचे स्वप्न ते पाहत होते. अमरशेख म्हणत,'‘कवी काय किंवा शाहीर काय,तो समकालीन युगप्रवृत्तीचा प्रवक्ता असतो.येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन त्या युगातील सत्य, म्हणजे युगधर्म त्याने सांगायचा असतो.आजचा युगधर्म आहे समाजवाद आहे म्हणून मी त्याचा वाहक आहे.’’
समाजवादाची बांधिलकी मानणारा साहित्यिक म्हणून साहित्य व कलेला स्वायत्त क्षेत्र मानणाऱ्यांनी त्यांच्या साहित्याला प्रचारकी ठरवून त्याकडे दुर्लक्ष केले.अमरगीत हा गीतसंग्रह,कलश व धरतीमाता हे काव्यसंग्रह आणि पहिला बळी हे नाटक - हे त्यांचे साहित्य प्रकाशित व प्रसिद्ध आहे.‘माझा देहचि धरतीमाता,हा कुराण ही माझी गीता’ याओळींतून त्यांच्यातील प्रगल्भ कवी आपल्यासमोर येतो.'जय महाराष्ट्र’ हा संयुक्त महाराष्ट्रावरील पोवाडा,छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकथन करणारा पोवाडा, मल्हारराव होळकरांवरील पोवाडा-असे त्यांचे पोवाडे सुप्रसिद्ध आहेत.संपूर्ण समाजाने एकत्र येऊन ‘शिवबा’ बनावे आणि सत्तेचा नांगर आपल्या जरबेत चालवावा, हे त्यांचे विचार आजही लागू पडतात.‘वक्त की आवाज’ हा क्रांतिगीत संग्रह त्यांनी संपादित केला.‘युगदीप’ या मासिकाचे संपादकपदही त्यांनी काही काळ सांभाळलेप.
शाहीर अमर शेख यांनी आपल्या आयुष्यात अनेक भूमिका बजावल्या.क्लीनर,पाणक्या व गिरणी मजूर म्हणून त्यांनी काही काळ काम केले.पुढे कामगार नेते म्हणूनही त्यांनी कार्य केले.स्वातंत्र्य चळवळ,गोवा मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळ या सर्व महत्त्वपूर्ण चळवळींत त्यांनी आपले शब्द,सूर अन् आपला पहाडी, सुरेल आवाज यांच्या साहाय्याने अनमोल योगदान दिले. त्यांनी निधीही उभा केला.ज्येष्ठ साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी त्यांचा ‘राष्ट्रीय शाहीर’ या शब्दांत यथार्थ गौरव केला.शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व शाहीर गव्हाणकर ह्या त्रिकूटाने त्या काळात महाराष्ट्र दणाणून सोडला होता. त्यांचे लाल बावटा पथक हे महाराष्ट्राच्या सामाजिक,राजकीय व सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.साम्यवादी पक्षाचे तर ते प्रचारकच होते. आपल्या लेखणी आणि आवाजाच्या माध्यमातून त्यांनी साम्यवादी विचारसरणीचा प्रचार केला.पक्ष-कार्यामुळे ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध झाले.त्यांच्या शाहीरी कलापथकाला मिळालेल्या मोबदल्यातून त्यांनी बहुजन समाजातील शैक्षणिक प्रसाराच्या कार्यासाठी लाखो रुपये देणगी म्हणून दिले.

Comments
Post a Comment