कथा
***दगड, टाकी अन घाव***
"आर बाबू इथं गेली सात वर्सं दग्डं फोडतोय आम्ही........!"
"अन कोंत्या स्वातंत्र्याचा आर्थ सांगू तुलं...?"
"घर्दार,गाव्कुळ सोडनं पडलं अन पर्देसी होऊन बस्लो.....!"
"इतभर पोटासाठी हयात झिज्ली.झिजत चाल्ली.अन कोंतं सुख मानू...?"
"कोंती मोकळीक हाय आम्हांलं....?"
"गाव्कुळानं काय देलं म्हनाव; जित्ती कुत्तरवढ झाली होती साऱ्या जित्त्या जीवाची...!"
"गाव बदल्लं,जिल्हा बदल्ला,परांतं बदलून पाह्यला....पन मानूस नाही बदल्ला.....!"
"मलं येकेळ वाटतयं की,आजून्पन आपुन गुलामच हाये.......!"
"पन काळ बदल घेतो हं लक्षात ठेव..."
"नाही त्त ह्यो टाकीचा घाव ह्या दग्डालं ठासाव लाग्ला नस्ता........!"
इतक्या पहाटव्याखाली तोंडावरचा निथळनारा घाम आडव्या हातानं पुसत त्यो माणूस बोलत होता.नुसता बोलत नव्हता त साऱ्या वेदनांचं पोखरलेलं उरातलं वारूळ फोडत होता.अन त्यातून डसऱ्या मुंग्या बाहेर पडाव्या तश्या जहरी भावना गरळून पडत होत्या.
काळ्यासावळ्या रंगाच्या तोंडाचा,सडपातळ कदकाठीचा,डोस्क्यावरच्या
पांढऱ्याभुर्क्या केसांनं लगडलेला त्यो माणूस तिथं काळ्या पाषाणाच्या कोरघडीव फाडी तयार करत होता.त्याच्या डाव्या हातात टाकी होती.अन उजव्या हातानं तो हातुड्याचा टाकीवर घाव टाकत पाषाणावर आकार साकारत होता.पलीकडून इसपंचीस कोरघडीव फाडी आभाळकडं तोंड करून पडल्या होत्या.अन त्यानं लांबवलेल्या उजव्या पायाच्या संबोरात टाल्यादोनटाल्या काळ्याकुळकुळीत पाषाणाचा ढीग उभा होता.त्याचे घाव उगारनं सुरूच होतं.एक घाव पडला की,दुसरा.लगेच तिसरा नि दगड सरकवून चौथा.असे कैक घाव त्यो टाकून लगेच मोठ्ठा सुस्कारा सोडून उजव्या हातातला हातुडा खाली टेकवत होता.अन पुन्हा छंन्नी घेऊन त्या दगडाची पोटसी साळत होता. घणाघाती संघर्ष तिथं उपजत होता.छन्नींनं दग्डं साळतांनी त्याच्या डाव्या हाताला लकवा जाणवायचा पन ताबडतोब त्यो दुसरा मोठा सुतकी हातुडा हातात घेऊन दन्कन शीर फोडायचा.दग्डालं टेरधार येत होती.त्याचा चौकोनी आकार कोरीव बनत होता.जुन्या पाषाणातून नवी घडीव फाड जन्म घेत होती.पन हजारो चिवऱ्या धमन्यांचं येक्वटीकरन होऊन बेंबीच्या देठातून आलेली धग निर्जीव दगडावर आदळत होती.येक घाव दोन तुकडून पुन्हा निव्हत होती.शांत होत होती.ती सुस्कारत होती.जणू दग्डालंच धाप लाग्ली.भक्कम पोलादासारखा हात काही क्षण झांज्रत होता.नसा कळ सोसत पुन्हा घाव उगार्न्यासाठी बळांनं हुसंडी मारत होत्या.कारन येक घाव चुकला की सारं वाया जात होतं.अन दगडावर मोजलेली किंमत ख्वोळ खल्लास करत होती. हरेक दगडात सक्काळसंध्याकाळचं जिणं बांधलेलं होतं.त्यात भाकरतुकड्याची वसुली गाठली होती.त्यात पैका होता.दिव्साचं का होईना सुख लपलेलं होतं.स्वाभिमान दडलेला होता.इभ्रत जपादलेली होती.
खुंट खुंट वाढलेली दाढी अन करारी चेहेऱ्यानं त्या इद्रुप भासत होता.सुंदरतेनं त्यालाच बाटवलं होतं.दगडाच्या काचाखोचानं अन दगडधुळीनं त्याचा पायजमा कळकळ मळून गेला होता.आंगडखं घामानं वल्लंगच.ते काढून येका फाडीवर वाळायलं टाकलं होतं.त्या फाडीजवळच तीन चार आजून धार्दार छंन्या आडव्यातीडव्या पडून होत्या.सुतकी निपचित पहुडला होता.येक त्याच्या जवळ पिन्याच्या पान्याची गुंडी भरलेली.
"काय खरं नाही बाबू... स्वतः लढल्यासिवा रक्त दिसत नाही."
कुठं बी जाय रक्त येकच हाय म्हननारा बी लाल रक्ताचाच सापडंल."
अन त्यानं दुसरी फाड कोरघडीव ढिगाकडं फेकून देली.फेकतांनी त्याच्या तोंडातून अं ssss हंन ssss असा कुथल्यासारख्या आवाज बाहेर पडला.त्या भयाण पाषाणी दगडाच्या आवाजात त्यो आवाज स्पष्ट आय्कू आला.अन क्षणार्धात मिसळून गेला.
लाग्लीच बोलता बोलता त्यानं अजून येक बेढब दगड कधी हातुड्याखाली घेतला कळलंच नाही.त्यो घाव टाकू लागला.अन येकेक शब्द बोलू लागला. येकेक अर्थ उकलून ओळीत घोळत होता.टाकी वाकडी लावून दगडालं शीर आनत होता.तिथं खंन्नन्नन sss छंन्ननन्ननsss असा गोड नांद आसमंत दुमदुमून सोडत होता.येक घावावर दुसरा पडत होता.दगडाचा टवका उडत होता. चिप्लंगी उडू लागल्या.कपच्याचा ढीग लागत होता.जमिनीवर दगडधूळ थराथरांनं वर येत होती.त्यो दमत नव्हता.घावापाठोपाठ घाव दगडाच्या शिरा फोडत होता.घाव,छंन्नी,उरातली धग,अन मोठ्ठा सुस्कारा असा येक संघर्षच तिथं चालू झाला होता.त्या घनघोर संघर्षात त्यो कळकळीनं बोलत होता.....,
"आर बाबू इथं गेली सात वर्सं दगडं फोडतोय आम्ही........!"
"पन कोंन्हीं नाही बदल्लं.....!"

येक नवं तत्वज्ञान त्यो त्या घावासोबत टाकत होता.अन जणू मह्या मस्तकावर प्रहार करत होता.छंन्नींनं केलेला आवाज घुमावा तसा त्यो बोल मस्तकाच्या नसा झांज्रवत होता.
"पोरा स्वातंत्र्याची सत्तरी येकाहात्तरी गेली गर्व्हार बाईवानी....!"
"इकासाची गती लोळत होती जमिनीवरच...."
"अन आता हुक्मि सत्तेच्या कळा गरिबीच्या पोटात फुटू लाग्ल्यात......"
"ह्या डोळदीख्या वास्तवाच्या कळा डस्तात रे स्वाभिमानालं......!"
"म्हून येकेक घाव घालून तुकडेतुकडे कराव वाटतंय सगळंच....
"पन काय करू.....दिसाड मंग होतात ह्याच फाडी तयार कोरघडीव....गुण्यातल्या....
मोपिव..!"
त्या थंड पहाटव्याखालच्या गारव्यातही त्याच्या डोळ्यात चीड चवताळत होती.ज्वलंत उद्रेक दिसत होता.जन्माच्या गरीबीनं घात केला म्हून उरातून निंघनारा दाह होता.शब्दांत बंडखोरी होती.येक दाह उगवत होता.दगडाचा कोपरा तासत त्यो बोलू लाग्ला,
"कातीव दग्डं कर्नारा बाप स्वातंत्र्याच्या चळव्ळींचा हिस्सा झाला.मह्या बापानं गांधींजीच्या चळवळीत भाग घेत्ला. स्वातंत्र्य द्या आसा दिंडोरा पुकार्ला. सुतकी, हातुडा फेकून गावोगावी फिर्ला.परांतं मुकला. चार पोरं उघडी पडली.कुठं उत्तरेतच त्याच्या छातीत गोळी लाग्ली.ती पर्देसी इंग्रजांची होती म्हंतात.पन इथं भारतातच डाग्ली नं.भारतातच भारतातल्या मांन्सालं लाग्ली.आम्ही चारी भहीन भाऊ काळजातून फुटलो.जन्मात गरिबी होती ती पदरात पडली.चारी दिसेलं फुटून गेलो.म्या इकडं आलो. बाकीचे मेले का जग्ले ठावठिम्मा नाही. "स्वातंत्र्य क्काय अस्तंय?"
ह्ये मह्या बापाचं मढं जसं आम्ही लेकाईनं पाह्यलं नाही.तस्सं कधी स्वातंत्र्य डोळ्यांलं दिस्लंच नाही पोरा.
ह्यो बापाचा हातुडा संग हाय फक्त.
उन्हाळ्याच्या दगडसुगीत तिच्यासंग लगन झालं.ती जीवाची झाली.तीचं नाव मना.वनवन फिर्नारा सावलीत झोपू लाग्ला....."
शेवटचा टवका फोडून त्यानं येक मोठ्ठा सुस्कारा सोडला.
"....काय सांगू बाबू ...!"
"सावलीत दोन पोरं खेळू लाग्ली.चार हाताचे आठ बनले.भूक वाढू लाग्ली.अन दुर्डीत्ली कोर्कोर भाकर कमी होऊन उपाशी पोटं पानी पिऊ लाग्ली.गावगाड्यात चार चारपाच पाच दिस तोंडाचं पानी गिळत होतो आम्ही सारेच. वर्तल्लं गाव भीक घालत नव्हतं.ना कुटका फेकत होतं.ईच्या इभ्रतीचे आवयव सावकार पैश्यात मोज म्हनी.....
मह्या काळजात धस्स झालं. आवंढा गिळत बोललो,
"मंग....?"
"मंग क्काय...???"
"राच्च्याच सावकाराच्या डोस्क्यानं सुतकीचा घाव खाल्ला.गावात वाऱ्यावर बोंबाबोंब उठली.....,
"वड्रानं नाक तोडलं ....गावाचा मान मार्ला... सावकार फोडला...!"
धर्नी पोटात घेत नव्हती.पळवत होती.पळालो. गाव सोडलं.घर्दार,गाव्कुळ सोडनं पडलं अन पर्देसी होऊन बस्लो.पन तिनं साथ सोडली नाही.आजून ती म्हंती,
"पाऱ्यावानी इभ्रतीलं जप्नारा मव्वा देव ह्यो मानूस हाय.दगडी नाही.बाभळीच्या सालीसारखा पाठपोठ साथ देतोय त्यो मलं..."
"सात वर्सं काळाच्या पडद्याच्यात गडप झाली.नवं शाहर आप्लं हाय.इथं जात बुडाली.पन अज्ञानानं घात घेत्ला.कामानं पुन्हा शाहरालं जात दाव्ली..."
अन त्याच्या डोळ्याच्या कडा वल्ल्या झाल्या.टाकी थांबली.काही काळ आवाज बंद झाला.अन पुन्हा नांद घुमू लागला.दगड ठासीव कोर घेत होता.
"जाव्द्या आजून तुम्ही जिवंत हाय नं......!"
"मंग काय फिकीर कराय्ची."
"तुम्ही इभ्रतीपाई नेकींनं जग्लेत."
"इभ्रतीलं संभाळन्याचा त्यो गुन्हा कसा होईल?
"गाव टाक्लं तसंच करा."
"जसी सर्पाड कात टाक्तोय तसी जात सोलून निंघा भाहेर."
"पा....नितळ मानूस दिसल."
"मलं जास्त येत नाही तुम्हीच सांगा....?"
अन त्यानं घामासंग डोळे निरपले.अन दगडाची पोटसी टोकरत बोलू लाग्ला,
"ह्या कार्नानं का होईना शाहरात आलो. पोऱ्हाईलं साळत घात्लंय.सिकत्यात....
त्येच मोठ्ठं हाये दुसरं क्काय??"
"आर ह्यो दग्डं फोडर्नारा जीव हाय......डरत नाही.पाषानात्लं पानी फोडतो ब्वॉ आम्ही......पन काळ जरा इंगीत दाखव्तोय...पाहू......!"
"ह्यो पा ह्यो दगड.....
ह्यालं तासून सोलूनच नवी फाड कर्नार हाय नं तुम्ही....तस्संच स्वातंत्र्याचं हाय.जुनं इर्लेलं फाडून नवा टाका द्या बस्स.तुंम्च्याजवळ टाकी अन हातुडा त्त हायेच.जरा नेमानं शीर फोडा..!"
"आर बास ...बास... महं ग्यान सिप्डू नक्को.इथं बसून मह्या पोटावर पाय देऊ नक्को.म्हंजे झालं.......!"
"ह्ये पा म्या चाल्लो....!"
"जासील बस जरा....गंम्मद केली....."
"नाही आता पुढं पन जायाचं हाय...तुम्ही चालू द्या फोडनं..... पुन्हा कधी तर येईन.......!"
"येज्जा रे पोरा......!"
"निदान भेटाय्चं तर कळवत तरी जा..."

Comments
Post a Comment