***प्रासंगिक***
रावण-राजा राक्षसांचा(कादंबरी)
-शरद तांदळे
---------------------------------
"तथागत गौतम बुद्धांच्या धम्म इतिहासांपासून तर आत्ताक्षा या क्षणापर्यंतच्या इतिहासाच्या संज्ञा-संकल्पना-नियम-तत्वे आणि संबोध हे कालानुक्रमे बदलत आहे.बदलवले गेले आहे.सांस्कृतिक वर्चस्ववादी गट आपली हितसत्ता टिकवून गुलामांना बौद्धिक भावनिक मनाईक आणि सांस्कृतिक वर्चस्व कदापि होऊ न देण्याचा यत्न करतांना दिसत असल्याच्या काळात रावण-राजा राक्षसांचा ही कादंबरी इतिहासाची नवी बाजू प्रकर्षाने वाचकांच्या बौद्धिक तत्वाला आव्हान करत आहे.
आज मानसिक पार्श्‍वभूमी ही जातीय समीकरणात अडकलेली दिसून येते. केवळ आपले प्रस्थ शाबूत राहण्यासाठी, आपली दुकानदारी चालण्यासाठीच. तुमचे आचार, विचार कसेही असो, तुम्ही केवळ जातीने श्रेष्ठ असले म्हणजे, तुम्ही पवित्र झालात, ही वास्तविकताच, मानवतेच्या समाजाला पंगू करणारी आहे.या देशात कायद्याने समानता प्राप्त झाली असली, तरी येथील प्रस्थापित समाजाच्या मनांतून जातींचे किल्मिषे अजूनही काही उतरलेली नाही.ही किल्मिषे जोपासण्यात राजकारणातील काही पक्षांचा आपसुकच हातभार लागत आला आहे.म्हणूनच इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची गरज आज आहे.विशिष्ट पक्ष-धर्म-तत्व विचारसरणी आपले विखारी विचार,जनमाणंसावर लादू धर्मभावना चेतवण्याचे काम करतांना दिसून येतात. जातभिमांनाचा हा व्हायरस पुन्हा पसरत चालला आहे. याचे सर्व मूळ सांस्कृतिक दहशतवादातून राजकीय दहशतवाद मुख्यता जोपासत आहे.तरीही सांकृतिक दहशतवादी अवस्थेला मुसक्या आवळण्याची हिंमत निधर्मी राहणाऱ्या कोणतेच प्रशासन आणि सरकार दाखवू शकले नाही.यार्थी आजचे प्रशासन निधर्मी नाही हे सत्य.
काळ बदलतो.परिवर्तन होत जाते.तसे काळाला व जनसामान्यांना हिताचे अस्तित्व बहाल करणारा नायक हा प्रिय ठरतो.जीवणूकर्मे नायक बदलत जातात.परंपरा तोडून नायक स्वीकारला पाहिजे.
व्यवस्थेने शिकवलेले रामायण आम्ही ऐकले आहे.म्हणून नव्हे तर रावण समजला नाही.रावणाला खलनायक केल्या गेलं.सत्याच्या विरोधात असत्य असा भास निर्माण करून असत्याचा पाईक तो रावण असा विरोधाभास चित्रपट,कथा,मिथ्य,नाटके,रामलीला,प्रहसने,साहित्य वा गीत-कवितांतून बहुजन समाज मनावर लादला गेला.
दुःखात माणूस भावुक होतो.दुःख काळावर घासल्या जाते.ते कमी कमी होते आणि मानसिक रोध प्रतिरोध दुःख समजू लागतो.यार्थी भावनिक दुःखिते आणि मानसिक आघातांच्या व्यापाराने सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करता येते ते कट्टरपंथी करत आहेत.हा काळ बहु संघर्षिक व तत्वांच्या मूल्यात्त्मक धरणांचा आहे.
व्यक्तिला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येये आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता असते.त्या समाजात जी मानसिक सुसंगती साधता येते. ती जो समाज समुहात विभागलेला असतो,त्यात साधता येत नाही.समुहाप्रमाणे आदर्श आणि ध्येये भिन्न असली की,समाजातील व्यक्तिचे विचार भरकटतात,आणि समाजव्यवहाराकडे साकल्याने पाहण्याची द्दष्टी सुसंगत राहु शकत नाही.ती विकृत होते. दुसरे असे की समुहव्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही.
समुहव्यवस्थेमुळे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात.जे मालक असतात ते मालकच राहतात अाणि जे दास्यात जन्मास येतात ते दासच राहतात.धनी ते धनीच राहतात. कामगार ते कामगारच राहतात. अधिकारसंपन्न ते अधिकारसंपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात.धर्माचे भक्त ते भक्तच राहतात.दास म्हणून जगतात.वैचारिकतेने स्वतंत्र स्थितीत असे नहीं.तिथे सकळ मानवमुक्तीला स्थानठराव आहे याचा अर्थ असा होईल की,अशा धर्मव्यवस्थेत स्वातंत्र्यााचा लाभ काही थोड्यांनाच होतो.बहुसंख्यकांना मात्र त्यापासुन वंचित रहावे लागते.यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडनारि शक्ति बनविणे.बंधुता. म्हणजे काय?
बंधुता म्हणजे मानवामानवातील भ्रात्रुभाव होय.ही भावना रावणमध्ये डोकावते.
संकल्पना समजून घेतल्या पाहिजे. त्यांचा विवेकशील विचार करता येईल असे अनेक वेळा निर्गमित ठाव घेतल्या जावेत.सोन्याची लंका,बुद्धिबळाचा शोध,रावण पलायन आणि शिकार अर्थत्वाचा शोधक बुद्धीने शोध लावतो.विचार चळवळीत असणाऱ्या विचारांनामुळे रावण नवा प्रकल्प नव्या तत्वाने बहुजन, सामाजिक व मुल्यात्मक विवेकाने घेत जातो.तो काळ एकीकडे विलोभ व टोकाच्या आदर्शवाद असणाऱ्या एका विचारसरणीच्या सामाजिक सुस्थापित धर्माच्या गोटातील आहे.आणि त्याचवेळी दाक्षिणी भूगोलात रावण नवा आयाम उभा करू पाहतो आहे.आदर्शवादाला वास्तवाची टक्कर आहे.यामुळे तत्कालीन नैतिक-धार्मिक-सामाजिक -भौगोलिक-मानसिक परिस्थितीच्या विविध पैलूंचे मार्मिकपणे विवेचन कादंबरीत यायला लागते.
काळ जसा संज्ञा-संबोधाच्या परिघाने चळतो तसा अशयानेही बदलत असतो.आशयाला घेऊन लिहिलं पाहिजे.वैचारिक नागर हाती घेतला पाहिजे. नामशेषी अस्वस्थता येत आहे.लिहिलं वाचलं पाहिजे. दाक्षिणी माणसांचा नायक हा रावण त्यांच्या लोकगीते, बालगीते,भूल्या व काव्यातून मांडला गेला इथे अपभ्रंशाचे वैचारिक प्रलोभने समजली पाहिजे.म्हणूनच सोप्या सरळ भाषेचा वापर रावण मध्ये आहे.प्रस्थापित व पेठीय भाषासंस्कृतीच्या पायऱ्या ही कादंबरी चढत वा उतरत नाही तर नव्या रस्त्यावर नवे वळणं घेत जाते.
गण-राक्षस-ही एकेकाळची समाज अवस्था होती.आजच्या परिस्थितीत रावण उभा राहणे म्हणजे क्रांतीला प्रतिक्रांतीची हाक आहे.धार्मिक दहशत, शैक्षणिक धोरणे बदलत चाली आहेत.या काळात प्रतिनायक उभा राहणे ही काळाची गरज आहे यार्थी समीक्षेतून रावण नवा विचार पुढे ठेवते.आता नक्षलवादी, दहशवादी चर्चाच्यां काळात रावण खलनायकाचा नायक म्हणून आला आहे.इतिहासातून प्रतिकोहिप्त केलेले खलनायक काढले पाहिजे.हा नवा तत्व प्रणालीचा सार कादंबरीत आढळतो.घटनेच्या बहाल केलेल्या स्वातंत्र्य-समता-बंधुता आणि न्याय बाजूला संहितेत आणत रावण म्हणतो बोललं,लिहिलं,अभिव्यक्त झालं पाहिजे. कारखानदारीवर ऊस,व बैलगाडी चालविणारे,मोलमजुरी आणि श्रमसंस्कृतीचे पाईक आज बोलू लागेल आहेत. रावणातून ते व्यक्त होतांना या काळाच्या पटलावर आज दृष्टीत येते.
भारतातील कोणत्याही ठिकाणचे आदिवासी,इंडोनेशियामध्ये रावण वेगवेगळ्या अंगाने आला आहे.आणि दूरदर्शनवर रामानंद सागर यांनी वेगळा रावण सांगितला आहे.प्रत्येकाची वेगळी वाट असते. रावणाची वाट वेगळी होती,ती स्वातंत्र्य समता बंधुता व सममजीक न्याय मानणारा होता हेच तत्व कादंबरीच्या रुपात लेखक शरदजी सांगू पाहतात.आपलं साधर्म्य, नायक-खलनायकाचा विचार काय किती कसा,कोण आहे.हे समजले पाहिजे.जुनीक द्विधक व समाजमन व पुरणातून आपलं साधर्म्य काळजात उभं राहतं.हा वांशिक इतिहासाच्या मानसशास्त्राचा आधारनिय संशोधनाचा अभ्यास आहे.
प्रस्थापित सौंदर्यशास्त्र हे शास्त्रदर्जा असलेले असतांना पडलेल्या बाजूचा ते विचार कधीच करतांना दिसत नाही.उलट त्याची बाजू बुजवून टाकण्यात शिवत्व ते मानत आहे.केवळ गोऱ्या कातडीचा शिवात्म दृष्टीने विश्लेषण आणि नीती सांगणाऱ्या शास्त्राला एकलखुऱ्या शास्त्राचा दर्जा द्यावा लागेल. आधाराच्या घराला जसे मोडायचे त्यासाठीआधारच काढून घेतला जातो.तसे हे प्रस्थापित सौंदर्यशास्त्र रंगाधर्माच्या कमीपणावरून मानवी घटकाला न्यून समजत जाते.आणि जगण्याचा जणू हक्कच हिसकावून आपली अस्तित्वता टिकवत राहते.वास्तविक पाहता रंग हे तर निसर्गतःच मिळतात.त्यात गोरेपान असणे हे सौंदर्यनिकष कसे ठरू शकेल??तसेच काळेपणा हादेखील सौंदऱ्याचा विषय कसा ठरेल??हे समजून आहे.तुम्ही मांडलेला संवाद जो आहे त्याला आंबेडकरवादी सौंदर्य शास्त्र म्हणणे उपयुक्त ठरते.कारण आंबेडकरवाद हा समता,बंधुत्व, न्याय व मूल्यजाणिवा निर्माण करणारा विचार आहे.त्यात हुकूमशाहीचे विरोध करणारे आणि समतेचा जागर घालणारे तत्त्व आहे. बाजारू मानसिकता निर्माण करून गुलामी व्यवस्थेचे पाईकत्व लादणाऱ्या सौंदर्याला जनतेने चुकीच्या भ्रमाने डोक्यावर घेतले आहे.हा भ्रम असा की,जे सौंदर्य मुळात अव्याख्येय आहे.अविश्लेष्य असे आहे.त्याची व्याख्या करता येत नाही.हे प्रस्थापित्व निर्माण करणाऱ्या शास्त्राला शास्त्र म्हणून अभ्यासकांनी का अंगीकारावे.?अभ्यासक या नात्याने प्रस्थापित आणि विस्थापित्व निर्माण करणाऱ्या बाजू उचलून का धराव्यात .??असा सवाल उभा राहतो.या संवाद-वाद-विरोध तत्वाला समतोलता आली पाहिजे.
आपले पूर्वज धूसर होत जातात. व्यक्तिमत्त्वाची विविधता एक आणि विचार करतांना दहा वेळा करायचा असा दश विचारमस्तिकी रावण वैचारिकतेने प्रगल्भ असा आहे.आयुष्याचे स्त्रीचा अपमान न करणाऱ्या रावणाला आपल्यासमोर खलनायक म्हणून व्यवस्थेने करून ठेवले आहे.ह्याची बुध्दीला घासून समीक्षा झाली पाहिजे.इथे सांस्कृतिक वर्चस्वाला तडा नेणारा विचार निश्चितपणे येतो.
नायकाचा पेघा व संकुचितीकरणं समजलं पाहिजे. रावणाला नेहमी काळया बाजूने उभं केलेले आहे. चिकित्सेने समजलं पाहिजे.निसर्गाच्या व प्रेरनेच्या विरोधात सांस्कृतिक लुच्चेगिरी आज नव्याने लादली जात आहे.यार्थी मिथ्य व सत्य चिकित्सा केली पाहिजे. विद्रुप विकृत काळंबेरं आणि फेकलेल्या बाबीला समजून घेतलं पाहिजे.सौंदर्य शास्त्र तपासलं पाहिजे.कसोटी लावली पाहिजे.
नूनगंडाच्या शेतीत सौंदर्य व्यापराची शेती पिकवणाऱ्या वास्तवात खूप काही दडलं आहे. खलायकाला वेगळ्या कोनातून बघणं म्हणजे रावण होय. खोट्याच्या लढाईत वैचारक विवेक घालवू नये.वास्तवावर लक्ष ठेवून सत्याच्या जवळ जाता आले पाहिजे. अश्यावेळी जास्त फसल्या जाणं टाळता आलं पाहिजे. प्रतीक प्रतिमांचा तत्वांचा हा संघर्ष विवेकाने सत्य माध्यमातून जाणता यायला हवा.यार्थी सत्यातून असत्य निवडून बाहेर फेकले पाहिजे.रामायण हे मानवी जीवनाचा इतिहास नसून नाटक आहे.ते साहित्य आहे. हवंच मुळात पटलं पाहिजे.
सामाजिक स्थिरता टिकविण्यासाठी समता आणि जागृती निर्माण व्हायला पाहिजे.त्यासाठी जातीय राजकारण आणि धर्मांध नीतीला नेस्तनाबूत करून एक प्रवाह तयार करवा लागेल.ही प्रक्रिया थोर विचारवंतांनी दिलेल्या मार्गाने यशस्वी होईल.जेव्हा गटागटात विभागलेले बळ एकत्र येतील तेव्हाच या अमानुष व्यवस्थेचा डोलारा पाडल्या जाईल.येणाऱ्या पिढ्या सुरक्षीत राहतील.आज हे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले पाहिजे.समाज सजग राहिला पाहिजे.
आपण प्रतिक्रियावादी नसता क्रियावादी असलं पाहिजे. लिहिलं पाहिजे.क्रियाशीलता असायलाच हवी.कारण प्रगतीच्या दिशा ह्या भविष्याकडे नसून वास्तवात असतात.दैवभोळे झालेल्या युगात नव्याने रावण समजून घेतला पाहिजे.जितकं धार्मिक तितकं फसवेगिरी होत असते.होते आहे.हा फसवेगिरीचा व झुंडशाहीचा काळ मानसिकतेत ढिसाळुंन गेला आहे.त्याला विवेक-सत्य-तत्व आणि न्याय बाजू दिल्या जाव्यात.
वास्तविकता ही आहे की एका ढोंगाची दुसरं ढोंग हे उत्तरं नाही.रावणाची व रामाची टीका करता आली पाहिजे.वनवास-पावित्र्य आणि तत्कालीन धरणांच्या बाबतीत सखोल व वस्तुनिष्ठ समीक्षा झाली पाहिजेत.कारण खोट्या भावना तोडल्या पाहिजे.भावना नको तर बुद्धी जपली पाहिजे. फसविणाऱ्या भाषा माणसाच्या असत नाहीत.हिंसेचा आधार मानवतेला कदापि स्थैर्य प्राप्त करून देणारा नाही.लंका रावणाचीच असते.कारण तिथे निर्माणित्व करण्यासाठी घाम-रक्त-ध्येय व सत्याची आस ओतली होती.फसवेगिरी करून विजय नव्हता ते राज्य मिळविण्याचा...म्हणून रावण : राक्षसांचा राजा होता... !"

Comments

Popular posts from this blog