*** नमस्कार ....! ***
मी विश्वनाथ अर्जुन साठे.गाव शारा ता,लोणार,जिल्हा बुलडाणा या खेडेगावातील मुलगा असून
गरिबी परिस्थितीतून पुढील शिक्षण शिकत असून गावामध्ये असलेल्या समस्यांची व
अडचणींच्या समस्या मी भोगल्या आहेत,जाणून आहे.त्या सविस्तर
स्वरूपात मांडाव्या असे वाटते.वास्तविक पाहता आजही आर्थिक अडचण व दारीद्र्यातील
कुटुंबे हि व्यथा सहन करत आहेत.गावाच्या परिप्रेक्षात भरमसाठ पाणीपुरवठा नाही.गरीब
कुटुंबाकडे उत्पन्नाचे कुठलेच साधन नाही.व तसे उपलब्धी असतांना प्रगती करण्याची
मानसिकता नाही. गावाच्या खालूनच लागून असलेली हागणदारी,गायराणांची
कमतरता आणि त्यातल्या त्यात स्त्रियांच्या बाबतीत असण्याचे प्रश्न हे गावाच्या
विकासाचे नाक कापणारे आहे. यात बदल झाला पाहिजे. प्रत्येक घरात,वाड्यावस्तीवर,झोपडपट्टीत संडास बांधण्यात यावेत असे
वाटते. मुबलक गायरान हे वृक्ष लागवड व पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी कामात आणले
पाहिजे.प्रत्येक घरात संडास बांधल्यावर जेणेकरून स्त्रियांच्या इभ्रतीला जोपासल्या
जाईल.विदर्भातील हे खेडं गाव असल्यानं सहाजिकच पिण्याच्या पाण्याची टंचाई हि
विदर्भाच्या अविकसिततेला लागलेली जाणूनबुजून ओढलेले काळी रेघच आहे.लहान ते वृद्ध
मंडळी,स्त्रिया,मुले,डोसक्यावर दोन-दोन,तीन किलोमीटर अंतर कापून पिण्याचे
पाणी आणतात.हि पायाची पायपीट रोज असते.गावात पाईपलाईन आहे पण पाण्याचा मुबलक साठा
नसल्याने ती हिवाळ्यापासून कोरडी पडत जाते. आणि भर उन्हाळ्यात अनवाणी पायाने
गरिबीत असणारे लोकं पाण्याचा हंडा डोस्क्यावर(ओझं घेऊन ) आणतात.गाड्याघोड्यावाले
ऐटीत हि प्रक्रिया पार करतात.मात्र जीव जातो तो दिन दलितांचाच,गोरगरिबांचाच.या पाणीटंचाईवर मात झाली पाहिजे असे वाटते.गावात उकिर्ड्याची
खूप घाण गावात पसरत आहे.त्यासाठी स्वच्छता मोहीम राबविता येईल.रोजगार हमीच्या
माध्यमातून तरुण व बेरोजगार युवा पिढीला,व्यक्तींना कामेही
मिळतील.ती पिढी व वर्ग विकासाच्या दिशेने वाटचाल करतील.आम्ही तरुणांच्या शक्तीने
हि पाईपलाईन बऱ्याचवेळा लिकीज झाली असल्यास ती खोदून दुरुस्त करण्याचा खारीसारखा
प्रयत्न केलेला आहे.गावातील सांडपाण्याची योग्य अशी नियोजनाची तयारीही नाही.नाल्या
मोर्याचं घाण पाणी गरीब लोकांच्या राहत्या घरात घालण्यास स्थानिक प्रस्थापित जनता
कमी करत नाही.आमचं कुटुंब हे त्यातील एक कि,ज्यांच्या घरात
ह्या घाणीचे पाणी जात असते.स्थानिक प्रशासनात तरुण मंडळीला मत देण्यापूरतेच स्थान आहे
असे मला वाटते.कारण निर्णय घेतेवेळी तरुण वर्गाचा हिस्सा दिसून येत नाही.तो तरुण
विचार दाबल्या जात आहे. तसे बघता स्थिरस्थावर झालेली राजकारणी मंडळी यात सहभागी
असते.यामुळे आम्हा तरुणांकडे असलेल्या नवनवीन कल्पना मांडता येत नाहीत.त्यांना
मोकळी वाट मिळावी म्हणून काम करण्याची संधी देण्यात प्रत्येकाला या कार्यात
सहभागीकरण्याचा संविधानिक अधिकार आहे.हक्क आहे.माझे 2013 ला
डीएडचे शिक्षण बोराडी, ता,शिरपूर,जिल्हा धुळे येथे झाले असून.त्यागावतील देखील प्रश्न हे डोळ्यात दिसत
होते.पाण्याची व साफसफाईची अडचणी मी अनुभवून आहे.ग्रामीण भागात मुलींच्या संदर्भात
असलेली भ्रामक विकृती व वैमस्यत वैचारिक-मानसिक भूमिका पाहता स्त्रीभ्रूण हत्या व
त्यावरील योग्य जनजागृती यासाठी आमच्या तरुण टीमने नाटकाच्या माध्यमातून जनजागृती
करण्याचा प्रयत्न केला होता.आमच्या टीमवर्क मध्ये काहीतरी काम चांगलं केलं पाहिजे
अशी विचारप्रणाली प्रत्येकात भरलेली आहे.यातून मिळालेली ग्राम व अगदी
वाड्यापाड्यावर काम करण्याचीही तयारी माझ्यात आहे.असे मी या अनुभवांती सांगू
शकतो..
आता पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात पुढील शिक्षण शिकत असून नेहरू युवा केंद्र हवेली तालुका युवा स्वयंसेवक म्हणून पूर्णवेळ काम करत आहे!तसेच इतर सामाजिक उपक्रम व विकासत्त्वातून होणाऱ्या प्रगतीचे कार्यक्रम करीत आहे.हाया विकास व उपक्रमाचे योजन गावाच्या तळागाळात गेले पाहिजे असे काळजातून सतत वाटते.पंतप्रधानांच्या निर्णयानुसार गावात विकास घडवून आण्यासाठी, गावकऱ्यांच्या वर्तवणुकीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे.शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या योजना आणि विकास कार्यांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचवणे.कॉर्पोरेट, शासन आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावणे.ग्रामीण भागात प्राथमिक सर्वेक्षण करणे.जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि युवा ,महिला,संस्था, मंडळे हे धर्मादाय कार्यालय यांमध्ये समन्वय साधणे.ग्रामीण विकास योजनेवर त्या गावातील ग्रामपंचायती सोबत काम करणे.गावात सामाजिक वआर्थिक विश्लेषण करून गावकऱ्यांच्या खऱ्या गरजांचा शोध घेणे.स्थानिक प्रशासनाला नियोजनामध्ये सहाय्य करणे.जिल्हा प्रशासनाकडून अधिक चांगल्या सेवा सुविधा कशा पद्धतीने पुरवल्या जाऊ शकतील यासाठी आवश्यक ते संशोधन करणे.एनजीओ,स्वयंसेवीतरुण मंडळे,स्वयं सहायता गट (एसएचजी) आणि पंचायत यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.मनरेगा, स्वच्छ भारत अभियान,आयसीडीएस यांसारख्या विविध शासकीययोजनांच्या अधिक चांगल्या अंमलबजावणीसाठी सहाय्य संस्थांना व मंडळांना कश्याप्रकारे मिळवून देता येईल असे कार्य करणे.नाविन्यपूर्ण योजनांचा आराखडा तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.ग्रामीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबतचा अभिप्राय कार्यकारी समिती आणि प्रशासकीय परिषद,नेहरू युवा केंद्र जिल्हा पातळीवरील समन्वयकांना देणे. आताच झालेलीअसलेली नोटबंदी व कॅशलेस प्रोग्रॅममध्ये वृद्ध-अपंग आणि अज्ञानी जनतेच्या खूप मोठ्या प्रमाणात अडचणी समोर आहेत.बँकेचे व्यवहार हे कसे करावे आणि नोटा कोठून कश्या व कोनामार्फत बदलून घ्याव्यात,नवीन चलन व त्याचा योग्य वापरातील संदर्भ,तसेच वृद्ध मंडळींना फॉर्म भरण्यापासून तर त्यांना रस्त्यापलीकडे सुखरूप पोचवीण्याची मी जबाबदारी 5 दिवशीय कॅम्प मध्ये केली आहे.स्वारगेट टिळक रस्ता sbi बँक याठिकाणी अपंगांना नेयूके काय मदत हवी आहे...?या उपक्रमात वृद्ध व अपंगांना रांगेत उभे न राहू देता त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रसंगी मी रांगेत उभे राहोलो .
याचदृष्टिकोणातून ग्रामीण भागात किती समस्या असतील याची गणती नाही.हि समस्या जटिल आहे.टीमवर्कने काम व्हायला हवी आहेत.तरुणाईच्या टीमवर्क माध्यमातून गाव गाव व तयारीला लागेल अश्या योजना दुर्गम भागातही नेण्यास मला सार्थ अभिमान वाटेल.
आणि काम करायलाही आवडेल. मला तर वाटतो कि ग्राम विकास व तरुण नेतृत्वातून सर्वांग ग्राम विकासाच्या मार्गावर नेणारा राजमार्ग आहे.यातून गावची स्थानिक कारभाराची धुरा काहीअंशी तरुण नेतृत्वाकडे येत आहे.नवीन तंत्रज्ञानाची वापरातून गावाचा व स्थनिकप्रश्नाचा उहापोह करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करता येतील.तरुण संकल्पनांना ग्राम विकासाचया नवसंकल्पनेत भर घालता येईल.मला वाटतं की नदीजोड व कालवे प्रकल्पातून गावाची पिण्याच्या पाण्याची व वापराच्या पाण्यातील पातळी वाढविता येईल.छोटा प्रकल्प म्हणून पैनगंगा नदीतुन कालवे व बंधारे,पाट करून नदीतील पाणी शेतकऱ्याच्या शेतात आणता येईल अशी एक योजना तरुणांकडे आहे.त्याची योग्य अमलबजावणी व्हावी हा हेतू पूर्ण करण्यासाठी एकटी आमच्या गावाची ग्रामपंचायत पुरेल असं राजकीय व आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या वाटनारे नाही.ती वैचारिकतेच्या व मानसिक बदलाच्या प्रशिक्षणरून व नवीन संकल्पनातून गावकर्यांची व पंचक्रोशीतील ग्रामविकास करणाऱ्या उमद्या पिढीकडून सहयोजन भावनेतून हि बदल घडवून आणता येईल असे मला वाटते.शिवाय या गरीब नेतृत्वहीन तरुण पिढीला योग्य नियोजनाचे व विकासाची वाट सापडेल अशी आशा वाटत आहे.

(
हे
वास्तव सत्य प्रत्येक गाव व गावातल्या तरुणांची खदखद हाय!विकासाच्या दृष्टीने उपाययोजना
हि त्त्यात.वाचा कृपया कळेलच.
माझं काहीही नाही त्यात. प्रयेक गाव खेड्यातील व वाड्यावस्तीतील हा संघर्ष आहे.. तुम्हा सर्वांनी वाचलं जाणलं प्रतिक्रिया दिली.अजुम कार्य करण्याची उमेद येतआहे...
हा परिवर्तनीय बदल जिकडे तिकडे झाला पाहिजे.म्हणजे सर्व प्रश्न मिटायला लागतील असे मला वाटते.फक्त सर्वजण लढ म्हणा..…..! )

Comments
Post a Comment