----*एक चित्रपट परीक्षण*----

               ***लढा नामांतराचा***
-निर्माते
-डॉ.देवदत्त म्हात्रे,घनश्याम पाठक

              "याविषयी सांगायचं झालं तर मी सीडी हाती लागे पर्यंत विचार करत होतो.कि काय असेल त्यात.मी नामांतराच्या चळ्वळीविषयी फक्त नामदेव ढसाळाखेरीज काहीच वाचलं ऐकलं वा लिहिलं नाही.हे परखडपणे मांडतो.
नामांतर चळवळ हि एक व्यापक चळवळ आहे ह्ये मला ढसाळ वाचून कळलं.तसच्च काही व्याख्यानं, अन कविसम्मेलनांतून त्ये ऐकत गेलो.मात्र हि चळवळ पूर्णपणे कधीच कळली नव्हती.ह्ये अर्थपूर्ण खरे.एव्हढंच नाही तर मी पुण्यात आल्यापासून जे जे होईल त्ये त्ये वाचलं ऐकलं लिहिलं.ते काही अंशी या तत्वावरच अवलंबून असावं अस मला वाटतं. साप्ताहिक चाहूल चे संपादक डॉ.सुरेश बेरी याकडे मी सप्ताहीकाचे ऑफिसिअल काम करत होतो.नामांतर चळवळीसाठी काम करणारे ढसाळ यांची पहिली श्रध्दाजंली.त्यासाठी कामगार भवन आकुर्डी बजाज कम्पनिसमोरील सभागृहात त्यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम ठरविला होता.कविता निवडून देण्यासाठी बेरींनी काही कविता मला दिल्या.त्यात मी एक निवडली. कार्यक्रम झाला मी एक कविता वाचन केलं.पण मनात सलत गेलं.जया माणसांन आख्ख्या जिंदग्नीवर लढा कोरला.याचा अर्थ काय?हि नामांतर चळवळ काय?याविषयी संधिग्ध होतो.  त्ये भरपूर समाज,राज, कारण अनुभवलं.मी जे विचार करायचो,मग त्ये लिखानातून असो व कवितेच्या मांडणीतून त्याला काही लोकाचा विरोध हळूहळू जाणवू लागला.आणि व्यक्त होत गेलो.मात्र खर त्ये सापडलं तुमच्या एका अनोळख्या भेटीमुळं. आत्ता अनोळखी म्हणणार नाही. ती  वेळ होती.असो.
आणि काय आपली फेसबुक वरील मैत्री काही काळाची.वल्ली.ती घट्ट होईलच.या पर्वावर जे तुम्ही कार्य करत आहात वा याची चुणूक लागली या सीडीच्या पाहण्यावरून.
"लढा नामांतराचा" हा जो चित्रपट तयार केला तो एक या चळवळीचा मैलाचा दगड वाटतो.डॉ.बाबासाहेबानी जी चळवळ उभी केली शिक्षणासाठी त्या चळवळीची पताका या शतकात उंच निळ्या आभाळरूपी आसमांत फडफडत आहे.ती शौर्यल्य रक्ताचं जगणं-अन मरणं चित्रांकित करणारे म्हात्रे सर तुम्ही एकमेव उभ्या महाराष्ट्रात मला दिपस्तंभासारखे वाटत आहात.या चित्रफितीतून नामांतराचा लढा काय होता?तो का?व कश्यासाठी लढला गेला?पोचिराम कांबळे कोण? गौतम का आत्मदहन घेतो?या साऱ्या चखंदळ किचकट प्रश्नांची वा संभ्रमाचे तुम्ही योग्य असे निरसन या चित्रपटाच्या माफहैमातून केले असे माझ्या बुद्धीला पटणारे आहे.
निर्मळ मनानं मी चित्रपट बघितला.अगदी तश्याच निर्मळ मनानं ह्ये सारं गुज तळमळीने सांगतो.ज्यावेळी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह आंबेडकरांनी केला.आणि आम्हांला मुक्त जगण्याचं शिवार मिळत गेलं.तिथून आपण चळवळी सिध्ध करू शकलो असं दिसतं उदाहरण आहे.तोच दलित मुक्तीदिन आहे.आणि महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद या ठिकाणी उभारलेल्या मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर करावे अशी चळवळ उभी राहते.याची समर्पकपणे तुम्ही मांडणी करणारी दृश्य प्रस्ताविकता रसिकांना दिलेली आहे.माझ्यासारखा न कळता रसिकही पुढे काय?हा प्रश्न मनात चाटत बसतो.
                       खरे तर घनघोर संघर्ष पुढेच आहे. आंबेडकरांनी घटनेत दिलेले हक्क लोकांना कळू लागतात.त्यावेळी गावकुसावर तरफडणारी जमात गावात मानसंन्मानानं जगण्यासाठी धरपड्तात.मात्र व्यवस्थेतील हि जातीविद्रोहाची आग त्याहीच्या विचार संघटनेला,कुटुंब संस्थेस,वा कुळालादेखील नष्ट करण्यास माग पुढं बघत नाही.ह्ये समाजचं भीषण तत्कालिक वास्तव निर्भिडपणे जनार्धनाच्या समाजसंघर्षातून आल्हादपणे प्रकट केलेलं जाणवत राहतं. हा तुमच्या विचारांचा परिपाक या प्रसंगातून ओसांडतांना दिसतो.पात्राचा विचार करता सर्व पात्रं हि एकजुटीने छायाचित्रीकर्णास सामोरे येतात.जनार्धन कट्टर भीमक्रांत आहे.तो कुंकवाचा टिळा पुसतो त्यावेळी एक विरता अंगात संचारल्यावानी मन दाटून येतं. ह्ये तुमच्या दीग्दर्शनाचे गमक काही माझ्या "ढोरक्या"ला लवकर कळत नाही.काही मात्र पात्रं त्वरित फैरींवर येतात.हा समतोल साधने गरजेचे असावे होते असे मला तर वाटते.
                    तसेच या नामांतराच्या चळ्वळीसाठीच नव्हे तर जीवनभर भीमविचार नखशिखांत  घेऊन धर्मांध व्यवस्थेला डागळण्यासाठी मांग जातीललं पोचिराम कांबळे नावाचं ठिणगीरूपी विद्रोही आग्वादळ शेवटच्या स्वासापर्यंत लढत मरण घेतं जातं. ह्ये धडधडीत वास्तव डोळ्यास पाणी वलावतं.तया पोचीसाठी ढसाढसा रडणार प्रसंगी आपल्या घरात जागा देणारा अब्दुल हा जातीपातीच्या तिर लावतो.हा संघशर तरुण मनात घुसतो.व जातीपाती नष्ट हो असं त्या तरुणाला वाटतं. कि जो हा "लढा नामांतराचा"बघतो.
               म्हणजेच, "डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार-शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिस वाघ होऊन शत्रूला फाडून मरण आलेलं बरं"या विचारणं प्रेरित झालेला तरुण ,उमद्या,धडाडीचा गौतम वाघमारे हा सारं आयुष्य भींमचळ्वळीस अर्पित करतो.
          त्या शौर्य वीरांच जगणं मरणं, ती अगतिकता,ती तळमळ अतिशय साध्या-सोप्या प्रसंगातून तुम्ही दाखविले आहेत.बाकी रंगयोजन,प्रकाशकिरण,वा स्थिरचित्रण अगदी नीटसं आहे. ती पाटलाची भूमिका साकारणारे कलाकार चांगलं कलांग पहायला लावतात.पत्राच्या चेहऱ्यावरचे हावभाव नेमकेपणे टिपून कैद केले आहेत.ते मात्र अद्वितीय बरं म्हात्रे गुरुजी....!
                   एकूणच गावपातळीवरील बहुजनाविषयीची विदीर्णता वास्तविक उत्कृष्टपणे दाखविल्या गेली आहे.बा महाराष्ट्रा ह्या अगतिकतेस जनमानसात जागा दे असं कळकळीच इनवनं आहे..!"


Comments

Popular posts from this blog