कथा
★★★विखार★★★
त्या दिवशी इसुबा वसतिगृहाच्या मागील बाजूला असलेल्या टेकाडावर जाऊन बसला होता.सारी हिर्वळ सुकली होती.ना फुलं ना फळं असे झाडं निष्टुरपणे जमिनीवर उभे होते.निसर्गाचा वांझपण झेलत ते जगत होते.डेऱ्यातलं पानी आटल्यासारखं मातीतली वलाई उधडली होती.फांद्यांच्या काड्या कडकडीत लटकत होत्या.खडखड वाजनारा पालापाचूळा पायाखाली चेंगरत त्यो झपाझप पावलं टाकत टेकाड चढत होता.पालझड झालेल्या गर्द वनराईतून वाट काढत त्यो टेकाडाकडं गेला.वाळलेल्या खुंटाचे हिसडे त्याच्या चपलेतून पायाला लागत होते.त्या वेदनेपेक्षा त्याचं मन मलूल झालं होतं.म्हणून त्यो पर्वा न करता पुढं चढण चढत होता.उंच टेकडाच्या माथ्यावर नजर टाकली त सारं शहर दिसत होतं.अश्या माथ्यावर त्यो नजर भिरकावत टेकाडावर गेला.भानूच्या धगेने खंगाळलेले कातळ पठारी दगडं निपचित पडलेले होते.सारी वनराजी त्या टेकडाच्या भवताल उभी होती.पिवळट ओकाऱ्या रंग त्या परिसराला भरला होता.जख्ख झालेल्या म्हताऱ्यासारखं त्यांचं जगणं निसर्गाला भग्नावशेष दाखवत होतं.बाभळी पांगळलेल्या अवस्थेत कोर्ड्या वाऱ्यावर निथळत होत्या.साग डुलत होते.कोराटी तिरडत निजळू झालेली.बोरी,अधहान,निरीज,निस्तेज टेकडाच्या कुशीत तग धरून होते.निलगिरीच्या पानांची बुडाजवळ चळतच्या चळत लागत होती. बाभळीच्या साली टराटर उललेल्या.मधेच सुबाभळी शेंगा खळखळ आ-वाजत.चिमनसाग,गुळ्येल,रुगडी,वरुंची,चिल्हारी उलु लागल्या.झाडाझुडुपात रचलेले पक्षांचे खोपे,घरटे निश्चल शांती तिथं नांदवीत होते.नानाविध पक्षी त्या टेकाडावर भराऱ्या मारत होते.त्यात कावळे जास्त संख्येनं होते.बगळे,व्हल्या,टिटव्या,साळुंख्या,पार्व्या,हार्नोळ,उलथ्यापालथ्या भिरारीत उड्या घेत. काळा कंठा,चिमण्या,खडूळी हुदडू लागल्या होत्या.बैलससाने,घारी,गिध अन मार्कोच घेघाटया घेत उच्ची आभाळात जात नि काळा ठिपका होऊन पुन्हा खाली येत.घारी घाऱ्या डोळ्यांत सावज हेरत तिरप्या झुकांडत खाली येऊन सावजाचा लचका तोडत पुन्हा उडत.
एक गिध उंच गेला.आभाळात त्याची आठ आकड्यासारखी चोच करकर वाजली.दुसऱ्याच क्षणी जमिनीच्या दिशेनं त्यो आला.अन त्यानं एक दगडाच्या आडुंगी जिवाच्या आकांताने लपलेली खडूळ दोन्ही पायाच्या झडपेत घालून कचकन उचलली.
नेमकाच टेकाडावर पोचलेल्या इसुबानं हे चइंतर न्याहाळले.त्याचा आधीच
काळजाचा दग्ध झालेला घोरविभोर कप्पा अजून त्या प्रसंगाने हेलकावला.त्यो डोळ्यातून
अश्रू कधी बाहेर पडतात.या आशेवर पुढं आभाळात पाहू लागला.सारं आभाळ निस्तेज निळं
पांढरंकोर्डं त्याच्या डोळ्यांलं हिसकून घेत होतं. त्याचा कंठ सोस पडला होता.काळजाची धरपड वाढली.काळजातून
एक होरपळणारी दाह निंघत होती. त्याची कळा अजून संवेदनशील हृदयाचा ठाव घेऊ
लागली.त्यानं आडव्या हातानं डोळे पुसण्याचा यत्न केला.पण पापण्यांची निमिषे
किंचितशी वलाई धरून होते.त्यो एक कातळ दगडावर उभा राहून अस्मान न्याहाळत राहिला.
त्याची नजर निश्चल अभाळवर खिळली.त्या निळ्या आभाळाच्या पाटीवर त्या पत्रातली
शेवटची ओळ न्याच्या तीक्ष्ण झालेल्या नजरेचा चुराडा करत होती.
"विश्वासाचं काय घेऊन बसलास इसुबा...
"इथं काहीच स्पपष्ट नाही....!"
"कोण लागते रे मी तुही....?
"जीवाभावाची की नात्यागोत्याची....?
"शत्रू की मैत्रीण.....?"
"कोण.....? कोण...? कोण...?" या प्रश्नाचे कावळे इसुबाच्या मस्तकाला टोचण्या मारू लागले.मस्तक रक्तबंबाळ झाल्यासारखी तिडीक मेंदूत रुतत होती.रानातल्या काळ्याभोर इंगळीनं डंख मारावा नि असंख्य वेदनांच्या लहरी सारं शरीरभर संचाराव्या.नसांनसात तो दाह पसरावा.तद्वत त्याची दुद्गती झाली.मेंदूतून काळजापर्यंत त्या तिडीका तडकत होत्या.नि त्यामुळंच त्याच्या हृदयाची धरपड वाढली होती.त्या भयानक अजगरप्रमाणे प्रश्नांच्या इळख्यात त्यो पार अडकला.जगण्यातल्या झुंजीचा मरणप्राय लढा त्याच्या मस्तकात थैमान घालू लागला.ते शब्द त्याला जहरापेक्षाही इखारी झाल्यासारखे वाटले.आरदाडाच्या आवकाळी पाण्यानं नांगरल्या जमिनीतलं ढेकूळ इरघळावं तसा त्यो आतून ढासळला.त्यानं दोन्ही हात आभाळकडं केले.
इसुबा इचाराच्या खोल समुद्रात बुडू लागला.एकेक इचार त्याला एकेक गर्तेहून सखोलयुक्त वाटू लागला.त्या इचारांचा थांगपत्ता गवसत नव्हता.एक इच्यार दुसऱ्या इचारात दोऱ्यासारखा गुंतत होता.त्या जंव्जाळात त्याचं मन त्यात बुचकाळत होतं.नवशिक्या पव्हणाराच्या नाकातोंडात पानी गेल्यावर जसे ठस्के लागतात तसे त्याला त्या विचारांचे ठस्के त्याला झोंबु लागले.मनाच्या तळात खोलवर जाऊन त्यो हुंदक्यांचा थाग घेऊन वर येत होता.त्यामुळं त्याचं मन दुःखाच्या गाळाने गढूळ होत होतं.त्याला वाटत होतं.....
"माय झं......!"
"आपुन जन्मात माय अन बा सोडून कोन्हावर इतका इस्वास ठेवला नाही.
"त्यो ईच्यावर दाखवला.अन आज हीच अशी म्हणतेय?????"
एखादी नागीण वळवळत मांघं फिरून फुत्कारावी तसा त्यो इचार त्याच्या डोस्क्यात फुस्कारला.
"जिवातला जीव तुला लावला अन तूच आसं उलटप्रश्नी पारख्यासारखं का करावं?"
कोर्ड्या अभाळकडं पाहत त्यो बरळू लागला.नाही सत्य वदू लागला.
"आभासी जरी आसलं तरी ते प्रेम या शूद्र गोष्टीपेक्षा कितीतरी हे नातं त्याही पुढच्या टोकाचं हाय..! प्रेमाच्या कब्जात हे नातं कवाडासारखं फिरणारं नव्हतंच कधी!
प्रेमाच्या दावणीलं त्या नात्यालं बांधून टाकू शकत नाही कोन्ही.....!"
"येकेळ केलेलं प्रेम शरीरासवे जळून जाईल.त्यात असलेल्या वासनेची राख होईल.आशा-अपेक्षा खाक होतील. राग-लोभ हाडकासारखा करपून काळाठिक्कर होईल...."
"पण......? पण...? आपल्या नात्यात यातल्या कुठल्या गोष्टी बसल्या? कोणती मनाची भावना चिटकून होती? कोणते विचार आसक्ती करत होते.प्रेमातीत होतं ते सारं...!"
"कैक मैलावर तू राहते.कैक मैलोनमैल दूरवर महं इकडे वसतिगृहात जगणं.यात शरिराला जवळचा मोहंगंध कुठं हाय? कोणती वासना या अंतराला कमी करते...."
"नाही ..नाही ... नाही...!"
"हा केल्या इसवसाचा घात म्हणावं का घाताचा इस्वास.????"
इसुबालं काही केल्या हे कोडील गणित उमगत नव्हतं.
"फक्त या पिवळ्या रंगाच्या पत्रांचा काय तो मेळ.विचारांची घेवाणदेवाण.मनाची एकरूपता.विचारांची एकसंध बनलेली सांगड. चळवळीची दिशा की,जी काही कालावधीपासूनची सोबत आहे.त्यातूनच गुंफले हे नाते.निरागस.निस्वार्थी.निर्मोही.निस्सीम.अन बरंच काही.........!"
त्या भयाण टेकाडावर इसुबा ह्यो जीवनसंघर्ष उलगडत होता.
विचारांचं काहूर त्याच्या डोस्क्यात माजत होतं. त्यामुळं त्याचं मन मलूल झालं होऊ लागलं.इसुबा विचाचाराने स्वाभिमानी असल्यानं त्याला हे जिव्हारी लागलं.या अगोदरच्या कैक पत्रातून तिचा विश्वास,मया,काळजी,स्नेहार्द्रता नि औदार्य उपजत होतं.
"ते आज असं अचानक कसं काय उबगलं?”
अचानक विश्वास कसा उडाला? त्याचे तुकडे तुकडे का झाले? का म्हणली तशी ती? तिची ती वल्ली मया अशी अचानक उन्हाळ का झाली असावी? वेळोवेळी "काळजी घे...!"म्हणणारी आज अशी बेफिक्र काहून बोलली? शब्दातून व्यक्त केलेला औदार्याचा कोंब असा का सुकू लागला आहे?"
इसुबा घोर चिंताग्र झाला.
आभाळाच्या दिशेने नेलेले त्याचेच हात त्याला अवजड वाटू लागले.इचारांच्या माऱ्याने त्यो कळवळू लागला.ते तडाखे त्याला उभं राह्यनं असह्य करत होते.काळजातून उतरलेलं बळ उभ्या शरीराला पेलू शकत नाही.भेदरलेल्या काळजाची एकता भंग पावते.ते सैल राहू शकत नाही.त्याचा थिरकाप उडतो.वेदनपीडित रुदन घायाळ होत जातं.त्या भेसूर शांततेत त्याचं सर्वांग चेंदल्यासारखं झालं.त्याचे पाय थरकाप धरून गेले.त्याचे दहा गेले नि पाच उरले.मोठ्या मुस्किलपणे त्यो त्या कातळ दगडावर बसला. त्याची हया गेली.त्या पत्रातली त्याला शेवटची ओळ आठवू लागली.तोच पुढं एक बाभळीवरचं दृश्य त्यालं दिसलं.
डोळ्यांत मावणार नाहीत इतके कावळे त्या बाभळी भोवताल जमले. बगळे,घारी, ससाणे,खडूळी, सैरवैर पळू लागले.तिथं फक्त काळेकुट्ट,करवतीसारख्या चोचीचे,खुराड पखाचे,क्रूर नि करारी डोळ्याचे, जंतर नखांचे,जाड्याभरड्या मानेचे, लदगद शरीरानं भरलेले ते कावळे तिथं घेघाट्या मारू लागले.नाना आवाज एकत्र आल्यानं विचित्र गोंधळ तिथं मजला होता.कावssss कावsssकाराररररर्व ssssकरररवववव वा कावsssया करावाणे ती बाभूळ भरली होती. वाळल्या फांद्या कडकड मोडू लागल्या.एकेक कावळा जथ्याने येऊन त्या लोंबकाळल्या घरट्याच्या दिशेने करारी चोचा घेऊन येऊ लागला.व्हल्या लांब जाऊन एका लिंबाच्या बुडावर बसला.त्यो एकटक त्या विध्वंसाकडे डोळे टकारून पाहत होता.
"जीव सलामत त्त सारं खुशाल..!
"आपून लांब है ब्वॉ...!"
"आपल्यावर्च गेलं न दुसऱ्यावर आलं..!"
आसं त्यो मनातल्या मनात चुळबुळ करत होता.
पार्व्याच्या घुत्कारण्याचा अन चिरडण्याचा त्यो आवाज इसुबानं ओळखला.त्या घरट्यात पार्व्याची दोन पिल्लं नेमकीचं कवळ्या पखावर आली होती.भीतीची लाट त्यांच्या वर स्वार झाली होती.जणू मरणकाळ डोस्क्यावर तलवार घेऊन फेऱ्या मारत आहे.ते दोन जीव काळजातून चरकले होते.घायाळ अवस्थेत ते चुळबुळ करू लागले.एक घरट्याच्या बाहेर पडू पाहत होतं.त एक पुन्हा आत घुसत होतं.आत बाहेर-बाहेर-आत असा जीवाकांताचा संघर्ष घुमत होता.इसुबानं काहीच हालचाल केली नाही.त्यो फक्त बाभळीजवळ गेला.अन कावळे भरारले.मिळल त्या दिशेनं ते सुसाट वेगावले. काही काळ तिथं भारदार पखाच्या फडफडटाशिवाय कोंताच आवाज ऐकू आला नाही.नुसतच खुदडखुदड,sssss फर्स्रर्डssss ररर्फssssss सडर्डरsss फर्रर्रर्रर्रर्रर्रर्sssss फररर्स ssss असे नाद घुमू लागले.लालतुंबर झालेले इसुबाचे डोळे त्या कावळ्यांनी निरखले अन ते पळते झाले.त्या डोळ्यातला रोक्शरोह प्रत्येक जीवानं पहिला.एक रोख त्यात होता.ते डोळे काहीतरी बेरुख जाणीव उत्पन्न करीत होते.त्या डोळ्यातली अंगार अन ते अबोल बोलकं स्तब्धपण त्या मुक्या पक्षांनी अनुभवलं. दाह त्या नजरेत उग्र रूप घेत होता.डोळे सर्वात जास्त बोलके नि जिवंत असतात.अन ते चैतन्यशील असतात.याची साक्ष तिथं येत होती.
प्रत्येक कावळ्यानं हेरलं अन ते,
"आता काही तरी इपरीत व्हनार गड्या म्हणून इथून धूम ठोकलेली बरी...!"
म्हणून ते सैरभैर फडफडू लागले.पण इसुबानं काहीच हालचाल केली नाही.निश्चल शांत स्वभावे त्यो तिथं उभा होता.तिथं फक्त एकटी त्या दूर फिरणारी पार्व्याची माय घुमू लागली.पिल्ल्या लहानशा पार्व्याची हृदयातून घाबरगुंडी उडाली.ते पाऊल घरट्यात ठैरु देत नव्हते.निऱ्हानाम वर्डत होते.पार्वी तिथं रेंगाळू लागली.तेव्हा इसुबा पुन्हा वापस दगडाजवळ आला नि खाली बसला.त्यालं दया नाही वाटली की मया,त्यालं ना समजलं क्रोध की शांतता, नाही उमगलं भूत;भविष्य.त्यो तटस्थपणे वागला.मुळात त्याच्या काळजात अलग प्रकारचा दाह भरला होता.एक संघर्ष उगत होता.विचारांच्या मुंग्या त्याचं सर्वांग चाळणी करू लागल्या होत्या.कैककाळ उलटल्यावर त्यानं खाली हात ठेवलेला दगड वल्लागच्च झाल्यासारखं त्याला जाणवलं.नि पाहतो तर काय.त्याच्याच डोळ्यातून ठिबकलेले अश्रू तिथून वघळत होते.जळीत आसवांनी त्यो दगड दग्ध झाला.जणू काळ्या पाषाणाला पाझर फुटावा.असं ते थळगं वल्लं होतं.पण ते त्याच्या काळजातले डोळ्यातून निपजलेले ते आसवं होते.त्यानं पुन्हा हसून पाहिले.पण आभाळाकडे त्याची नजर दूरवर जात नव्हती मधेच सारं आभाळ पाण्यानं काठोकाठ भरलं काय? असं त्याला वाटलं.सारं निळं आभाळ अंधुक वाटू लागलं.खोल नदीत आथरलेला थाग आणण्यासाठी बुडी घ्यावी नि खाली जाऊन वर पाह्यलं त सारं पानीव्याप्त विश्व व्हावं असं सारं ते त्याला दिसलं.पण ते डोळ्यातले अश्रू आहेत.डोळे भिजले की सारं जग वल्लं दिसतं.हे इसुबा इसरला होता.त्यानं आडवा हात करून ते पुसले.
पश्चिमेकडे अरुणाची मेख एका डोंगरकड्याला खोलवर रुतत होती.सारा असमांत लाल-शेंदऱ्या रंगानं उजळला होता. निसर्गराजीतली धग जरा मंदावली होती. दिवसभर तप्त झालेली धरा निढळ शांत नि गारवत त्या रंगात भिजू लागली.धनुष्याकृती, वेडेवाकडे,तिरपे-तारपे होत पक्षांचे थव्वे उडून परतीला लागले होते.मघाचे कावळे दिसेनासे झाले.व्हल्या अचानक गायब झाला.वातावरण हळूहळू कोमल होऊ लागलं.त्यातला आर्डावार्डा मावळू लागला होता.साळुंक्या दिडक्या भरातीत उडत होत्या.दिवसभर वरडलेल्या कोंघायां आवाज न करता कलांडत होत्या.त्या हवेत तरळू लागल्या.खडूळी झाडाची बुडं अन खोकाडं शोधत टुनूटूनू उड्या टाकत होत्या.टिटव्या सडपातळ देह हवेवर तरंगत मिरवू लागल्या.मार्कोच,गिध अन घारी एक मोठी निश्चल उडान घेऊन स्थिर झाले. हार्नोळ त्त लै उच्चीवर गेला होता.अन तिथून त्याने तिरपे अंग झुकवत पूर्वकडं पाठ फिरवली.बैलससाने भराऱ्या मारत नि पुनःपुन्हा एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून पुन्हा भराऱ्या घेत.चिमण्यांचा थव्वा त कधीच चिवचिवाट करतच फुरर्रेर निंघून गेला होता.
त्या पाखरांच्या उडणाऱ्या वळी इसुबाला मुक्त नभंगणात दिसू लागल्या.त्या अश्या होत्या-
"रागातच बोललेली ऐकलंस तू मला इसुबा....!"
"भावनिक झालेली नाही वाचलं मला कधी तू......!"
"आतापर्यंत कसं नि किती ओळखलं रे मला?"
"काय सांगू तुला माझं आयुष्य...????”
"गतायुष्याचा विखार काय ठाऊक तुला....?"
"त्यावेळी समाजात एक धुसफूस चालू होती.समाज अनेक इखारी विचारधगेने जळत होता.माणुसकी आता संपली असे वाटत होते.वाटत होतं मुके जनावरं सुखी जगत होते. कसली अन्यायाची भ्रांत नि चिंता त्यांना नव्हती.पण समाजातला प्रत्येक माणूस माणूस म्हणून घेण्यात भिऊ लागला.प्रत्येक मुलगी भिऊ लागली होती.लहान मुले मनातून चरकले होते.भीतीचा बागुलबुवा त्यांच्या काळजात चिरून घुसला होता.काचेसारखी तकलादू अब्रू जीवनात एकदाच फुटते अन ती पुन्हा जुळत नाही,पुन्हा मिळत नाही म्हणून स्त्रिया,वयात आलेल्या तरण्या ताठया मुली रस्त्यावर एकट्याने वावरायला मनाने कमजोर होत जगू लागल्या.क्रूर वासनेची लाट उभ्या महाराष्ट्रावर फिरली होती.लैगिकतेनं बोकाळलेली मानसिकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झिंगत होती.माणूस प्राणीच माणसाला घातक झाला.त्याचं जगणं इंगळीसारखं इखारी होऊ लागलं.वासनेचा अजगर इभ्रतीचं कवळं हरीण आपल्या अक्राळइक्राळ लपेटात घेत होता.नि गतप्राण करून सोडत होता.इकडं दक्षिणेत कुटुंबातील स्त्रिया व मुलीवर बलात्कार करून त्यांच्या घरच्यांना मारून टाकले होते याच वासनेने.पश्चिमेच्या थोडं अलीकडं दलितांवर अन्याय अत्याचाराचा अगोडोंब उसळला होता. मध्य महाराष्ट्रात एका स्त्रीवर घासलेट वतून जिवंत जाळलं होतं.नैरुत्तेत दोन लहान मुलीवर अत्याचार करणारा हैवान उजळ माथा घेऊन फिरत होता.वासनेने पेटलेल्या आगीत सारा मानव समाज होरपळत होता.गरीब असहाय स्त्रीवर्ग अन विशेष लहान वयातल्या मुली,अन तरुणी हतबल झाल्या होत्या.रोज काहींना काही कानावर पडत होतं.मानवी समाजाला घातक अशी मनोवृत्ती जगाच्या पटलावर महाराष्ट्रात पोसल्या जात होती.हे सत्य नाकारता येत नाही.हे फक्त इथेच घडत होतं असं नाही.संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाजवळ घडत होतं.यामुळं प्रत्येक घटक काळजातून अस्थिर झाला होता.सुरक्षायंत्रणा कुचकामी ठरत होत्या.लोकशाहीचा चौथा स्तंभ नुसत्या बातम्या छापून पानंच्यापानं काळे करत होता.माणुसकीला काळिमा फासणाऱ्या वृत्तीला धरबंध लागत नव्हताच.शहरातल्या पैसेवाल्यांच्या इभ्रती संभाळन्यासाठी कुंटनखाने उभे राहिले होते.वेश्याव्यवसाय करणारा एक स्त्रीचवर्गच पुरुषी वर्गाने उभा केला होता या वासनेच्या चौकडात.तिथंही दलाल टपलेले होतेच.खेड्यात वेगळी स्थितीगती आहे असं नाही.हे लोण सगळीकडं पसरलेलं आहे.हे वास्तव मी जाणून होते.मन चरफडतं होतं.मुख्यतः स्त्रीच स्त्रीची शत्रूही असू शकते हेही त्याचवेळी नव्यानं कळत होतं.शालेय शिक्षणाच्या चौकटीतुलनेने हे कळेल असं कधी समजले नाही.वेड्यासारखं वाचत होते.विचाराला पटलं ते नजरेखालून घालत होते.यातून समविचारांचे वारे जवळून वाहू लागले.मैत्रिणी जमू लागल्या.नवे विचार करणारे विचारानं एक असलेले तरुण तरुणी जमत होतो.स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय,आणि स्वाभिमान कळू लागला.आम्ही नवीन नवीन विषयावर खल करत होतो.या अन्यायात्याचारावर समाजप्रबोधन व्हावे म्हणून एकमेकांचे विचार जाणून घेऊन पुढं यावर काही करता येईल का म्हणून जमत होतो.मला समजत नाही पण एक चळवळच इथून उभी राहू लागल्याचे चित्र होते.मी पुरेपूर यात खेचले गेले.मन अभ्यासापेक्षा या समाजिकीकरणात गुंगून गेलं.पत्रव्यवहार वाढले.अनोळख्या भेटी व विचार कळू लागले.नव्या विचार करणारांची फळी उभी राहू लागली.पाण्यात पाणी मिळावे तसे विचारांचे एक असेलेले मनं मिळत जातात. स्त्रीप्रश्नाने दुःखी व त्या अवस्थेत असलेल्या तरुणी यात सहभागी होत होत्या.काही तरुण मंडळीही यात सामील झाली.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या कार्यात सहभाग वाढू लागला.मही हजार दोन हजारांच्या वर मित्रमैत्रिनींची संख्या वाढली.यात तुही मित्र झाला होता.आता त्याला एक-दीड वर्ष झालं असेल म्हणा.महाराष्ट्रातले त्याबाहेरचे मित्रमैत्रिण झाले.काही वरिष्ठ मंडळीही यात सहभागी होते.बऱ्याचवेळा वृत्तपत्रातून लिहिणारेही यातून विषय घेऊन लिहू लागले.बरं वाटत होतं.चळवळ कुठेतरी तग धरून होती.
या चळवळीच्या वाटेवर बरंच मित्रत्व आलं.तो महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून होता.दिसायला पाणीदार डोळ्याचा,गव्हाळ रंगानं अंगात मजबूत होता.नाकीडोळी तरतरीत होता.पहिल्या चर्चेतच तो या चळवळीत सामील झाला.बोलका स्वभाव असल्यानं सर्वांशी तो मनमोकळा वागत होता.बोल गोड होते.तसा दिसायलाही.त्याच्या पत्रलेखनाने त मी भुरळीतच पडले.त्याचे कैक पत्र मी तेव्हा जपून ठेवू लागले.नवकोरं मन आतून कागदासारखं भिजू लागलं.मनाची ओढ वाढू लागली.तसा तोही मनाने जवळ येत होता.तो शरीरानेही जरी दूरवर महाराष्ट्राच्या कोपऱ्यावर राहत असला तरी मनानं काळजात घर करू लागला.त्यालाही माझे विचार आवडू लागल्याचे जानवत होते. काहीच महिन्यांच्या आत तो नि मी विचाराने एकरूप झाले.धांड्याची पानं जशी दोन्ही दिशेला फडफडत राहतात मात्र एकाच सराला त्याची घट्ट नाती जुळलेली असतात.जणू तशीच आम्ही घट्ट.त्याची ओढ ओळखीत रूपांतर झाली.ओळखीची नंतर घट्ट मैत्रित बांधल्या गेली.एकमेकांच्या लागेबांध्याच्या गोष्टी झाल्या. पत्रव्यवहारासाठी घरच्या पत्यासाहित विचारपूस झाली.नि मी काळजाच्या ओढीत दिलाही.काहीही विचार न करता.नि त्याचं एक दिवस एक पत्र आलं.
पत्र असं होतं.......
सस्नेह......
"तुझें जेव्हा प्रथम विचार वाचले,तेव्हा मी मला विसरून गेलो.नि चळवळीमुळे आपण जुळत आहोत याचाही आनंद झाला.तुझ्या विचारांची सुंदरमूर्ती माझ्या काळजाच्या कप्प्यात कोरली गेली आहे.तिला हटविणे धोक्यात आले,शक्य नाहीच मुळात. मला क्षणभरही विसर पडत नाही.रोज रात्र रोज दिवस तुझ्या आठवणी मला सतावून टाकतात. बंदिस्त पिंजऱ्यात एखादा वाघ कोंडावा नि सुटण्यासाठी त्याची अतोनात धरपड व्हावी. तद्वत माझ्या हृदयाची अवस्था झाली आहे.मी फक्त तुझ्या आठवणुलीवर जगत आहे.भाकर तुटली आहे.कळत नाही हे प्रेम आहे की अजून काही??? पण माञ तुला पहायला माझे डोळे तरफडत असतात.तुझ्या विचारांची पुंजी मनात घर करून आहे.मी कसा हे पाहण्यासाठी सोबत माझं छायाचित्र पाठवीत आहे.तुझं मत कळव.मी तुझ्या पत्राची वाट न्याहाळत आहे. तुला वाटलंच तर तू तुझं छायाचित्र............
स्नेही.....
माझ्या पत्त्यावर आलेलं ते पहिलं पत्र होतं.नि मझ्यासाठी होतं.पोस्टमन आला तेव्हा घरी कोण्हीच नव्हतं मी ते घेतलं.वाचू लागले.तरूणसुलभ मनात नाना विचारांचे पक्षी घोंघावू लागले.काळीज म्हणत होतं,
"कित्ती कित्ती सुरेख शब्द ते की,जे आपल्यासाठी लिहिलेत.आतापर्यंत आपल्याला असं कोणी बोललं का?? लिहिलं का?? नाही न ?? बोललं का? चळवळीचं बोलणं नि मैत्रीचा भाव एव्हढंच सारं.पण या पत्रात कित्ती मया भरली आहे.कित्ती ओढ आहे त्याची.औदार्यता कित्ती खच्चून रिझली आहे.माझ्या विचाराने हा आकर्षित झाला आहे.मला न बघताच हा कित्ती प्रेमपूर्वक पत्र लिहितो आहे.याचं मन नि प्रेम कित्ती अपूर्व असेंल नाही...??"
मी स्वतः च स्वतःला प्रश्न विचारत होते.अन त्याचे उत्तर शोधत होते.
"अपल्यालाच कसं पत्र यावं.आणि आलं तरी त्याने प्रेमाने पाठवले आहेच न....त्याचं मन बसलं आहे.काळजाच्या आत घेरलं आहे काळजाला.शीतल छायेच्या डांखीवर बसल्या पाखरासारखं उडवून लावणं बरं आहे का?? त्याच मन बसलं आहे तरीच त्याने हे पत्र लिहून काढलंय.असो.काहीही.आपण उत्तर देऊ..."
आणि खालच्या पाकिटात काय आहे हे पाहताच त्याचा चेहरा दिसला.वर वर्णल्यासारखं त्याचं रुपडं मला भाळून गेलं.मी काळजाच्या मेणाने पघळले.अगदी चुर्रर्रर्र झाले. आयुष्यात प्रथमतः कोण्या तरुणाचा चेहरा मी इतक्या जवळून न्याहाळत होते.रुबाबदार, देखणा,सालस नि बरंच काही.छायाचित्र हातात घेतलं तेव्हा पहिल्या प्रीतीच्या कळा हृदयाच्या कप्प्याकप्प्यात संचार करू लागल्या.त्या शब्दाने मी मोहित तर झालेच पण त्या प्रेमाच्या पहिल्या सरीने अंतर्मनातून चिंब झाले.क्षणात विचार बदलले.मैत्रीची ओळख ती प्रेमात रुजली.पहिला मिरग येऊन जावा.माती गंधाने सारा निसर्ग नि वनराजी सुगंधित व्हावी.तशी मी मनात मोहरली.बावरली.गालाच्या हसऱ्या खळीत एक चंद्रकोर उगवली.मातीत बी रुजावं तसं ते पहिलं प्रेम निपजलं. काही काळ ते छायाचित्र नि पत्रातली शब्द डोळ्याचं बुबुळ सोडत नव्हते.निश्चल तशीच मी खिळली होती. मनाने पहिली प्रीत निश्चित केली.खिडकीतून वारा आला नि मी भानावर आले.आणि त्याला पाठवायच्या पत्राचा मजकुर मनात जुळवू लागले.
पत्रातल्या प्रत्येक शब्दानं मह्या काळजाचा घडच खाऊन घेतला.मी बिनाकाळजाची वावरू लागले.कोणीतरी महं काळज घेतलं या विचाराने मी तल्लीन झाले. नाही प्रीत त्याला चोरून घेऊन गेली.फुलांच्या गंधाने भुंगा भ्रमित व्हावा तद्वत मन भ्रमिष्ट होऊ लागलं.ते विचारांच्या वाह्यटूळीत हरपून गेलं.आणि मी पत्र हातात घेऊन मह्या खोलीत कधी गेले कळलंच नाही.लाकडी पलंगावर बसून पुन्हा ते शब्द वाचू लागले.अन विचार करू लागले.
"त्यो स्वतःला विसरून गेलाय.त्याच्या हृदयात फक्त मी कोरल्या गेली आहे नि ते केव्हाच मिटू शकत नाही.माझ्यामुळे तो क्षणभरही इतर विचार करीत नाही.प्रितीने किती वेडावलाय तो.आणि त्याने म्हणे जेवण पण जात नाही असं पत्रात म्हणलंय.खरंच त्याची इतकी प्रीती आहे का?? का उगा काहीही बोल केले त्याने? मला तर बाईssss काsहीsss समजेना झालंय हे सारं.पण मनात काहूर उठलंय.ते प्रेमात पडलंय काय? का त्याने त्या शब्दाने खेचून घेतली मला.त्याचे त्ये शर्करागुंठ्ठीत मर्मस्थ शब्द काळजाचा ठाव सोडत नाहीत.मलाही ही प्रीती हरवून नेते की काय बाईsss? पण आपण त्याच्या या पहिल्याच पत्रात असं मिसळून का घ्याचं मनानं.पण हेही खरं की त्याचा चेहरा इतका खोटी प्रीती करेल हे कशावरुन? नाही तर त्याने त्याची छायाचित्रिका का पाठवावी मला..??? सोज्वळ भाव तरळतात त्यावर तर.या पहिल्याच पत्राबरोबर नि त्याच्या शब्दांवर.
काहीही असो...!"
"त्याचा स्वभाव प्रेम नि प्रीतीला लायक असा आहे.मग कोणती मुलगी ही त्याने स्वतः म्हणून केलेली प्रीती नाकारेल?? हं सांग बरं तू?"
तिनं एक बोट तोंडावर ठेवत स्वतःलाच प्रश्नीत पाडलं.गोड विचारांच्या संवेदना थेट मस्तकात रुळू लागल्या.
"रामानं तरी सितेवर इतकी प्रीती केली का?"
मन प्रश्न विचारू लागलं.
"सीता आखरी जळून मिटली नं......!"
"त्यो थोडा असं जळू देईल.....मला....!"
"नाहीतर त्यानं इतकं प्रेम ओतलंच नसतं शब्दांत.व्यक्त झालाच नसता त्यो."
काही दिवसानंतर महं त्यालं पत्र गेलं.पत्रात होतं......
सस्नेह....
"तुहे इव्हन खूप पत्र आलेले पाहून मन भारवून गेलंय.ते त्या पत्राच्या प्रेमात गुर्फटलंय.किती प्रेम करतो रे तू?? असा प्रश्न कोमल्पने बहर आणतो अंतःकरणाला.मग मही अवस्था होते की,काय लिहू? नि कसं लिहू? किती लिहू ? नाना प्रकारच्या भावनांचा मेळ बसत नव्हता.म्हणून पत्र लवकर लिहू शकले नाही.तुझं दुसरं,तिसरं,चौथं पत्र वाचून म्हनलं आता याला उत्तर देणं गरजेचं आहे.म्हणून हे शब्द लिहिते आहे.खरं सांगू??? तुझ्या पहिल्या पत्रातच मी घायाळ हरिणीसारखी झाले होते.ते मन प्रीतीच्या मागे नि पुढे सारखं सैराट भिरभिरु लागलं.मी पूर्णपणे हरखून गेले. सीतेलाही मिळाली नाही ती प्रीती तू करत आहे हेच महं नशीब.अमोल भाग्य.तू मही पहिली प्रीत आहेस.ती काळजात रुतली आहे.तू जरीही किती दूरवर असला तरी मनाने मी तुझी होऊन बसले आहे.ते मन तुझ्या विचारांची पाठ सोडत नाही.काळजाचा प्रत्येक कप्पानकप्पा त्यात तू नि तुझ्या शब्दांच्या गोड आठवणी भरल्या आहेत.तू केव्हाच ही औदार्याची लय तोडू नये असे वाटते.प्रणार्पणे मी तुझीच आहे. उगवत्या सुर्यापुढं नव्या कळ्या छातीवर घेऊन बहरून आलेली वेल जशी त्या कळीलाखुळीत लपून जाते अगदी तस्सीच मी काळजाच्या या अमरप्रीत फुलांनी झाकाळून गेले.इतकंच सांगते.आता याक्षणी तुझीच.....
विसरू नको.
स्नेही.....
ते पत्र मी घरच्यांच्या मुकाट पोस्टात नेऊन टाकलं नि मी मुक्त झाले.घराकडं येतावेळी मी विचार करत चालले.सारं जग मी त्यावेळी विसरले.विचारांचा पिच्छा पुरता सुटला.आता अमोघ प्रीतीचा आनंद लुटायचा. विश्वातल्या प्रीतीचं रूपंच आपल्याला दिसलं आहे.नव्हे तिचा खजिनाच गवसला आहे. तनमनधनाने तो अबाधित ठेवायचा.बस्स!"
घरी आले तेव्हा अण्णा घरी होते.ते पेपर वाचत अरामखुर्चीत बसलेले होते. आई स्वयंपाक करीत होती.मी मांजराच्या पावलाने आपल्या खोलीत गेले.नि पलंगावर आडवी झाले.
नवीन पुस्तकं वाचन,त्याचे पत्र वाचन करणं,आल्या पत्राचं उत्तर देणं, तासंतास खोलीत स्वतःला कोंडून घेणं,विचार करणं,गालातल्या गालात हसणं, मानेला मुरड घालणं,अण्णा वाचत असतांना अगदी पत्रातली ओळ आठवून एकदम हसणं,जेवतांना त्याची आठवण करून पहिलाच घास खातांना थोडं थांबणं.....सारं सारं सारंच बदललं.महं जीवनच बदलून गेलं.मी बदलले,जगणं बदललं,विश्व बदललं,हसणं खिदळणं,मनमोकळं राहणं सारं सारं म्हणजे सारंच......
तीन चार दिवसात पत्र येऊ लागले तसे जाऊही लागले.दोघांचे हात झिजू लागले प्रीतीसाठी.आणि त्याच्या त्या एके दिवशीच्या पत्राने तर मी सावध झाले.
ते पत्र मी वाचू लागले......
".......नाही!" आता माझ्याकडून थांबणे नाही!मला आता जीवानिशी जीवन कंठणे शक्य नाही.तुझी आठवण मला घायाळ करून टाकते.ती धारदार इखारी सूरी माझ्या कलीजा कापून जातेय.मन अधीर झालं आहे.ते म्हणतं कोणावर प्रीती करतो रे तू? की जी मैलोंमैल दूर कुठंतरी आहे. तू इकडं टोकावर कुढत जगतो आहे.इच्छांच्या रोपाला कुस्करत.अनावर झाल्या आहेत त्या सर्व मनातल्या इच्छा.एक युद्धच सुरू झालंय आठवणी,प्रीती,इच्छा,अन हे जमिनीचं अंतर .....अन मी लढतो आहे.यातच घायाळ पक्षासारखं.एकटं जगणं मी कित्ती दिवस जगू? सांग तू...??? सांग....दे उत्तर...आहे उत्तर तुझ्याकडे??? अन तुही कित्ती मन मारून जगत आहे हे कळतं मला तुझ्या पत्रातून.तुझ्या मनातून उतरल्या कागदावरच्या शब्दांत.मला वाटतं यावर एकच उपाय.लग्न..........
मी जे विचार करत होते.तेच विचार त्यानं लिहिले.पत्रातून तो बोलला की, “लग्न....लग्न...लग्न....”
प्रीतीच्या काही महिन्यातच त्यानं लग्नाची इच्छा व्यक्त केली होती.त्यानं आता सस्नेह हा शब्दही लिहायचा विसरला होता.आमची दोघांच्या मनाची घालमेल सारखी झालेली.पण माझं शिक्षण चालू होतं.अजून शिकायचं.चळवळ चालू ठेवायची. इतक्या लवकर लग्नात बांधून बसने मला पचत नव्हतं.म्हया घरच्यांना ही बाब अजून तरी समजली नव्हती.ह्या पत्राची प्रीती मी लपवून होते.महं बदलतं वागणं,बोलणं, राहणं,असणं घरचे नातेवाईक न्याहाळत होते. अश्यात मित्र मैत्रिणी मिळून नवीन ध्येयधोरणे ठरत होती.विचारांची अदानप्रदान होत होती. चळवळीची दिशा बनू लागली होती.मी जितकी प्रेमात बुडत होते तितकी चळवळीत खोल शिरत होते.तत्ववेत्त्यांचे विचार चर्चा,बैठकीतून समाजात,तरुण मनाईच्या मस्तकात पेरत होते.......
"जगण्यासाठी जर भाकरीचीच गरज असेल तर त्या भाकरीपेक्षाही कधीही इभ्रत मोठी आहे.महान अशी आहे.मोलाची आहे. स्वाभिमानाची तलवार अशी भाकरी अन लाचरीच्या दगडावर मारून झिजवू नका. स्त्रियांची इभ्रत ही हातातल्या बांगड्यासारखी. कचकन तडकणारी.तिला सावरावं.तितकं मनगटाला पीळ येतो.समाजाने स्त्रीची आब्रू जपली पाहिजे.त्यांना मानाचं जीवन जगणं देण्यासाठी कटुन मेलं तरी मरण स्वीकारलं पाहिजे.धर्मांधवृत्तीने नि जातीपातीच्या खेळीने समाजाला चौकडात उभं केलं आहे.आणि अर्थ-विचार-शिक्षण-एकात्मतेच्या अभावाने माणूस पूर्णतः खंगून गेलेला आहे.वैचारिक गुलामीने नि बुद्धीने नग्न झालेला समाज वास्तवातल्या इखारी उन्हांनं भाजत आहे. पुरुषार्थाने आत्तापर्यंत स्त्रीला भाक्री कोर्ड्याशापुरतं चौंकटीत खुटवून ठेवलं आहे. त्यांना दिशाहीन विश्व दिलं आहे.कामवासनेची भूक भागविणारी वस्तू म्हणून तिला व्यवहारात स्थान दिल्या गेलं आहे नि ते आजपातूर कायम तस्सचं आहे.वास्तवात समाजात चाललेल्या घटनांवरून हे सत्य नाकारता येत नाही की, आज स्त्री ही सुरक्षित जिणं जगत आहे. "माणूस्की निवांत नि सुखांत आहे का?" असा सवाल इथे येतो..मनुष्य प्राणी जाचाच्या जळात उभा आहे.त्यातल्या त्यात स्त्री तर बाप-भाऊ-पती-दीर-सासरा-समाज या रुढीने ब्रूसटलेल्या परिघाच्या केंद्रक्त ती मल्लूल होऊन बसली आहे.फक्त स्त्री नाही तर एक मानवजातीच तीत अडकली आहे.स्त्री ही त्यातील तळातली बाब.हे परिवर्तन आज मह्यापासून-तुमच्यापासून झालं तरच सत्य वास्तव.नाही तरी व्यवस्थेशाहीच्या टोळम्हशी आपली नाकं रगडून जात आहेच पुढं.त्यांना स्वाभिमानाच्या अब्रूदार वाधीनं चोपून काढणे एकून आपल्या हातात आहे.ती वाधी अशी गहाण ठेवून चालणार नाही!"
चर्चा,कार्यक्रमं जसे होतहोते तसे विचारही पेरत होते नि मस्तकात उगवत होते.काही दिवसांनी मी त्यालं एक पत्र लिहिलं ते असं-
सस्नेह........
"मह्या राज्या....सख्या तुझ्या काळजांच्या युद्धात महीपण धडगत नाही रे.तुह्या हृदयात घुसणारी सुरी म्हया काळजाचा ठाव घेत जाते.रक्तबंबाळ झालेय मी आठवणींच्या थारोळ्यात.अन काय सांगू तुला. मही द्विधा मनःस्थिती झालीय.तुहं मन म्हणतं की,कोन्हावर प्रीती करतो रे??? हे खूप बोचलं मनाला.या प्रीतीचा थांग लागत नाही. जीवानिशी मीही प्रीती केलीय.ती आयुष्यभर कायम सोबत रहावी हेच मन म्हणतं.तिच्यात तूट येऊ नये.का तिच्यात क्षणाचीही-पळाचीही सूट उरू नये.आपलं प्रेम कवडीनेही कमी होऊ नये.मी अर्पिल्या प्रेमार्पणे स्नेहार्द अमरप्रीतीच्या खुणा आपल्या मढयाबरोबरच खाक व्हाव्यात नि त्यां राखेचा भुरकुंडा मऊ-मातीने,नितळ-जळाने,तेजःपुंज-अंशुंनि,हळुवार-वायूने,नि तप्ताग्निने हुसळून जावा.आणि या विश्वाच्या सृष्टीत ती प्रीत विरल व्हावी.असेच सैदैव वाटत राहते.पण वास्तवाला नाकारता येत नाही प्रिया.....अरे ते कल्पनेला चिरणारं धारधार शस्त्र आहे रे शॉन्या.वास्तव सत्याला धरून जगतं नि मी वास्तवाच्या सत्याची पाठ न सोडणारी मुलगी.बाsss ईsss एकवेळ वाटते ह्या मनाला कुठं फसून तर जात नाही न तू??? कुठं अडकून तर बसत नाही न तू ......?? वास्तवाला विसरून.आणि मग ते धीर घेणारं मन सावरता सावरता नाकी नऊ येतात.
असो.ते महं मन आहे.त्यानं तुह्या मनाला जसे पकडले आहे तसेच ते तुझ्याच मनात वसले आहे.ही पकड काही काळ अशीच मगर्मीठीसारखी राहू देत.कारण काळ ठैरत नसतो.मोघ्यावर चळणाऱ्या बीजांच्या भरल्या मुठीसारखा असतो तो.औत पुढं सरलं की मुठीतील बी चाड्यातून खाली घरंगळत जाते.मोघ्यावर मूठ जशी चळती तसा काळ चळत जातो.काही काळ थांब......तुझीच मी.......
स्नेही.....
त्ये पत्र मी पोस्टात टाकायला गेली नि लगेच परत आली.अण्णांनी मह्याकडं पाह्यलं अन मी आत गेले.हल्ली घरात बोलणं कमी झालं होतं.आईशीही मी कमीच नि कामाचं मोजकं बोलू लागले.पार बदल झाला होता मह्या जगण्यात.चेहऱ्यावर एक नवं तेज पसरलं होतं.मनात बेतल्या होत्या त्या प्रीतीची चाहूल आनंदाचा बहर आणत होती.मन चंचल नि काहूर लागल्यागत झालं होतं.गप्पकन हसत होती.तर कधी घोर विचारात पडत होती.ते विचार खोल दरीत लोटून दिल्यावानी वाटायचे. वाटायचं मी डोंगरकड्यावर एकटीच उभी आहे नि मी इथे एकटी फक्त माझ्याच निर्णयाने आली आहे.दुसऱ्या कुणाचा इथं थारा नाही. किजबीजणाऱ्या प्राण्यापक्षांचाही वारा नाही. घनघोर निश्चल शांतता.अतीव एकाटपण.पुढे खोल विचारांची दरी तयार झाली आहे.नि कोणीतरी मागून येऊन हात धरला आहे.मला सोबत काही काळ पुढं नेलं आहे त्या शेवटच्या टोकावर.आणि पुढं काय? त्त पुढं घात.जीवाचा कडेलोट.मनाची दुर्भिक्ष कलाटणी.काळजाचा थरकाप.त्याची उगीच त्या विचारांच्या गर्तेत धगधग.आत्म्याचा आर्त चित्कार.पुन्हा जगण्याची धरपड.तेव्हाच हा घात.अन हातचा हात हिस्कावून त्या दरीत खोलवर ढकललेलं.असो मनाचे खेळ ते सारे.
हल्ली अण्णांची सारखी बदली होत होती.ते पतपेढीत मोठ्या पदस्थ रुजू होते.नि आम्हांला गाव,खेडी-शहरं बदलावी लागत होती.ती बदलली की सारंच बदलायचं. पत्रातला पत्ता, पोस्टमन, टपाल, रस्ते, माणसं, बोलणं,मानसिकता,घरातल्या वस्तूंच्या जागा, अगदी मनही.पण ते काळासारखं प्रीतीला घेऊन चळलं नाही कधीच.ते अजूनही एकनिष्ठ होतं.त्याच्यात विश्वास-आपुलकी-मया-प्रेम-काळजी होती.आणि मी ते जीवापाड जपत होते.
"मया जिव्हाळ असते.ती तुटता तुटत नाही.ती खांडली की नवे धुम्मारे उगवतात.एखादं मोठ्ठं वल्लं झाडं कुऱ्हाडीच्या धारदारतेने कत्तल करावं नि पुन्हा काही काळाने त्याला नवी धुम्मारे फुटावे.तशी मया असते!"
त्या दिवशी आम्ही घरातले जेवायला बसलो.मी ताटं लावून त्यात चपात्या टाकल्या.आई,अण्णा मी असे सर्व होतो.अण्णांनी एक घास घेतला नि मह्याकडं एक दृष्टी फेकत ते म्हणाले........,
"पिल्ल्या...आभासू जगात जगू नाही बरं!"
"धोका असतोय.माणसानं कसं मोकळं नि वास्तवात जगावं.बिनधास्त....!"
अन मह्याच्यांनं घास गिटवेना.मी कशीतरी दीड चपाती पोटात कोंबली नि हात धुवून ताटावरून उठले.तोच आई पाण्याचा घोट घेत बोलली,
"समजलं नं...पोरी....!"
"आभासी जगात खरे काहीही नसते.त्यातली माणसं,भावना,विचार,शब्द,इच्छा,कल्पना, वागणं,बोलणं,राहणं,असणं,नसणं,सारं सारं सारंच...आभासी असतं.त्यात तू रुतून जाऊ नकोस.पस्तावा येईल.तू आता लहान नाहीस.बघ तुला कित्पत पट्टयं ते....!"
अन मी भांडीकुंडी आवरून खोलीत गेले.आडवी झाले थोडीसी.बाहेर ते दोघं पानसुपारी खात बसले.हवेच्या झुळुकेसवे अण्णां नि आईचं बोलणं थोडं फार ऐकायला येत होतं..,
"हल्लीच्या जमन्यातल्या पोरांना बोलावं त्त लागतं ना बोलावं त्त.........."
"असू द्यात फोडणी दिलीच पाहिजे...
"नाही तर कच्ची दाळ तेव्हढ्यावर शिजत नाही.अन पोट दुखतंय म...."
"हो तुझंही बरोबर हे सारं...."
"पण;मनाचा पण इचार केला पाहिजे.त्याच्या विरुद्ध बंड करता येतं का???
"पण करावं....भल्यासाठी आरोधात घ्यावं...."
"असो.....झोपा लैय रात होतीय....."
अन ते दोघांचे बोल कधी अस्पष्ट झाले कळलं नाही.मह्या कानात ते खोलवर गुंजू लागले.वेदनेचे नि स्वाभिमानाचे कंपनं निर्माण करू लागले.त्या कंपणाने महे हृदय हेलावून जात होते.ती रात्र बराच वेळ मी जागीच होते.म्हणत होते,
"अण्णांनं नि आईनं आपल्याला इतकं स्वातंत्र्य दिलंय की,पंख आहेत पण भरारी मारतांना घायची काळजी पण त्यात उगवते.कठोरता निपजते.नाही तर चळवळीत अशी बेदरकार जगणं म्हणजे सुळावरची पोळी उचलण्यासारखचं....पण हे त्यांचं आभासी जगबद्दल असलेलं तत्वज्ञान वास्तवात कितीपत बसतं..???? आभासी जगातली माणसं काय खोटी प्रीत करतात काय?? आणि खोटं जगून काय फायदा?? मी नाही का पत्र पाठवत त्याला. मनोभावे.खरं समजून.आणि तोही कित्ती प्रीत करतो जसा काही काळजाचाच.......
असो.....!"
"आयुष्य हे अमूल्य असतं.... पंख येतोवर बंधन असतात ते मानावे.नंतर उडान घ्यायला ते अधीर असतात मात्र पंखावर विश्वास असावा,हिंमत असावी,नभाची ओळख असावी,परंतु घरट्याच्या संस्कारांना विसरू नये,ते जीवन देतात,जगायला देतात,उडायला शिकवितात नही तर पंखाचा उपयोग काय प्रत्येकाला??? आयुष्य हे केव्हाही आपलं असतं.मी तेव्हा नाही का.... माय च्या कुशीतून बाहेर आले तेव्हाच पहिला स्वतःचा स्वास घेतला.नाही तर मेले असते.अन तिनंच पितेतोवर पाजलं.आता जगवलं.जगते न विसरता.अण्णा हिंमत देतात,लढण्याची,पण हे सारं पक्षासारखं असतं मना......"

"ही झाली
पहिली बाजू...”
मी मनातच बोलत होते.
"हे बघ दुसरी बाजुं निश्चित स्वाभिमानी आहे.मान्य करावी लागेल.पिल्यांनी स्वाभिमानी उडाने छोटी छोटी का होईना भरावी,पंखांना पार्जुन घ्यावं.सावली खूप काळ नसते,अन उन्हही,मग भरारी मोठी होतेच हे निसर्गनियमत्व." नि मी विचारांच्या तलवारीने सपासप कापली जाऊ लागले.एक विचार घाव करत होता. त्याला ताडताच दुसरा वार करीत होता.भयंकर युद्ध सुरु झाल होतं.मनाचा नि विचारांचा घाव सहन हो नव्हता.अन म नवं जगण्याचं तत्वज्ञान जन्म घेत होतं.
"जगाची भीती केव्हा वाटते माहितीय??? जेव्हा स्वतःचे पंख मजबूत नसतात,पडायची भीती जास्त,लादणाऱ्या बाबी उलथूनही लावल्या जातात.मात्र त्या कोणत्या अंगाने लादल्या आहेत..?? त्याची बंदिस्ती काय म्हणू पाहते.??? हे समजले पाहिजे.उमगलं पाहिजे.नि अडसर येणाऱ्या गोष्टीला सारले पाहिजे.. हे सदविवेक नीतीने पुढं जाण्याचं तंत्र..नाही तरी अवाढव्यत्वाचे उदाहरणं याच सृष्टीवरून नष्टप्राय झालेले आहेतच.
"मग पक्षी जीवन असंच न....?"
मी मनालाच प्रश्न करत म्हणाले...
"मग त्या पक्षांनी किती दिवस असं पंखाखालीं जपून ठेवावं???"
"पिल्ल्यांना म उडता येईल का??? पिल्ल्यांनी जग कधी न्याहाळायचं..???"
मग मनच उत्तर देत होतं........
"निसर्गनियमाणे ....नाही!"
"उडूच शकणार नाही तो..पण त्या घरट्यात राहूनही ते शिकू शकतो.माश्याला पाण्यात राहून पोहणं शिकावं लागतं."
"आणि मग मिनमेख तीच असते की,जी पुरात उलट्या दिशेने प्रवास करते.जगण्यासाठी...नाही तर सर्व मासळी ही सागरात वाहून गेली असती.नदीत तिचं अस्तित्वच उरलं नसतं....!"
"प्रवाहात मृतप्राय झाली असती,त्या धबधब्यात उलट्या जातात..मोठं निरीक्षण आहे हे तू बघितलं नसेल कदाचित.....!"
वास्तवविश्वाच्या पुस्तकातलं हे सुंदर वाक्य मह्या मेंदूत घुसळत गेलं.नव्या जगण्यातले नवे विचार नवं तत्वज्ञान जन्माला घालत होते.नि मी त्या तत्वज्ञाच्या शब्दाला शब्दचित्रकारी समजत होते.
काळोखी रात्र उजेडानं चिरली होती.तो उद्दीपित जाहलेला आसमंत कठोरपणे आपले अस्तित्व उघड करीत होता.पाखरं निर्भिडपणे भराऱ्या मारत होते.नवे पखं फुटलेले पक्षी उडण्याचा प्रयत्न करत होते.पण मोजता न येणारं नि पंखात न बसणारं आभाळ त्यांच्या कवेत येत नव्हतं.ते थिटे पडत होते. धरपडत होते.सृष्टीनं जणू नवा जन्म घेतला होता.पण अजून दुपारचं उन्ह कढणार होतं...........!"
बोटावर हुंगायला घेतल्या अत्तरासारखे दिवस उडून जात होते.दिवस सरला की रात्र फिरत होती नि रात्रीची निशा दिवस उतरवत होता.क्षण तुटत होता.घटिका मोडून जात होत्या.सूर्य दिवसं डुबवत रात्री अंधाऱ्या करू लागला.पुन्हा काळोख चिरत दिवस उगवू लागला.काळाला कळा लगल्यासारखं झालं.रात्रंदिवसाच्या गोधडीवर तो गडबडा लोळू लागला.विरु लागला.झुरू लागला.तसं काळजालाही भोकं पाडून जात होता.भावनेच्या वेदनेने रक्तबंबाळ करीत होता.
टेकाडावर हमसून रडलेला इसुबा वसतिगृहाकडे आला.येतांना काळाकुट्ट अंधार पडला होता.पाय नेतील तिकडं तो पाऊल टाकत होता.टेकाड उतरून तो विचारांच्या झोकात कधी वसतिगृहात येऊन दाखल झाला त्यालाच कळलं नाही.म त्यानं डोळे न पुसता लाल संदुक उघडत मागची सर्व तिची पहिली प्रीत तुटल्यांतरचे आलेले पत्र चाळले.नव्हे त्त शब्दन शब्द वाचले.पत्रात दिलेल्या उत्तराला त्यानं आठवून पाहिलं.त्यात निरपेक्षताच जन्म घेत होती.निरागस नातंच वाढत होतं.शरीरासवे जळून खाक होणाऱ्या शूद्र प्रेमाच्या कल्पना त्यात दिसत नव्हत्या.ना राग लोभ.ना आसक्ती.सारं काही निर्भेळ,निस्सीम,आणि निरहेतुक.....
तिचे पत्रातील बोल असे होते....
सस्नेह,
इसुबा......
तू कसा आहेस?? मी ठीक आहे आता.नि तुझ्या मागच्या पत्रात खूप मोठे प्रश्न आहेत.कित्ती उत्तरं देऊ.कित्ती लहानसहान गोष्टी सांगू..?? त्याने पत्र पाठवणे केव्हांच बंद केलंय.हळूहळू संवाद कमी झाले.तो मला टाळू लागला.रागवू लागला.लग्नाच्याबाबतीत बोलून झालेलं ते तो सारं सारं विसरून गेला.मी पाग्लासारखं रडायची.मन मारून जगायची.आठवडी एक दोन येणारी पत्राची उत्तरं महिन्याकाठी नि नंतर चक्कच बंद.सारं असं झालं.पुन्हा त्याच्या पत्राने घराचा उंबरठा ओलांडला नाही.लग्नापर्यंत बोलून झालं होतं आमचं.म्हणून मी गंभीर झाले होते.त्याच्या बाबतीत.मी पत्रही पाठवून पाहिले पण त्याचं एकही उत्तर आलं नाही.म्हणजे मी आठवड्यातून दोन चार पत्र पाठवीत होते.तेव्हा मोजली पण नाहीत इतकी पत्र त्याला गेली.मन हवालदिल झालं होतं.मला असं कळलं की,तो इतर चळवळीतल्या मुलींशी बोलतो आहे.त्या मुलींची पत्र मला येत होती.चर्चा करू लागला.इव्हन तो त्यांच्या निकट जाण्याचा प्रयत्न करू लागला.जवळीक साधू लागला.पत्रातून विचारलं त्त एखाद महिन्याकाठी आल्या पत्रात उत्तर द्यायचा.."मित्र आहोत आम्ही.चर्चेत मैत्री व्हायची ती जशी तुझी झाली तशी झाली. काय होते तूट काय??" म मी या त्याच्या प्रश्नाने चरकले. काळजातून मला मिळालेलं प्रितीचं सुख दूर जात होतं.या विचारांच्या डागण्या मनाला डागत होत्या.
आता इसुबा तूच सांग की,मैत्रिणीला जवळून मधुर काळजाचे,प्रिये,स्नेहीसोने,इतकं प्रेयशीसारखं म्हणू शकतं का?? मैत्रीण नि प्रीती हे समजून घ्याईपत मला अक्कल होती.नंतर समजलं की त्याचं फक्त आकर्षण होतं मह्यावर.अन खूप काही मैत्रिणी होत्या त्याच्या की,ज्या चळवळीत बदनाम झालेल्या.असो तो भाग वेगळा आहे.म काय मी झाली दगडासारखी.पुन्हा नाही बोलली त्याच्याशी कधीच.एका मुलीशी नाही तर खूप मुलींशी नातं होतं त्याचं.पत्रव्यवहार होते.जीव तोडून बोलणं,वागणं,असणं होतं ते त्याचं.हे चळवळीतल्या मैत्रिणीकडून आल्या पत्रातून कळत होतं.नि त्याच्या ओसर्त्या प्रीतीतूनही.ज्यावेळी मी लग्नाची काळ सोस म्हणलं,थांब म्हणलं तेव्हापासून त्याचा जीव उठला.अन मी अशी जिवातून.तेव्हाच समजलं पाहिजे होतं मला की,प्रेमब्रिम काय नव्हतं त्याचं.मग हुकीप्रमानं तो पत्र पाठवीत होता.मी नव्हती पत्र पाठविण्याची इच्छा ठेवली मागे.पुढं जात होते.चळवळ चालवत होते.विचार पेरत होते.नाहीच पाठविलं पत्र.एकमेकांच्या मनातून पार उतरलो म्हणण्यापेक्षा तोच उतरला मनातून.पत्रव्यवहार बंद.विसरायचं ठरवलं.अन विसरलेही मी.कालौघात.आम्ही मध्यंतरी घरही बदललं आहे. तुला सांगायचं राहूनच गेलं.पहिल्या पत्त्यावर राहत नाही आता आम्ही.म्हणजे हे त्याला कारण धरू नकोस,म्हणजे झालं.अण्णांच्या नोकरीमुळे आम्ही आजपातूर चार-पाच ठिकाणे बदलली आहेत.हे त्याला वास्तव चिटकलं असं समज.योग्यच झालं म्हणा सारं.आता मी पहिल्यासारखी नाही राहिली.पार बदलले.इव्हन दगडासारखी झालीय.
कधी आमची भेटगाठ झाली नाही. पत्राच्या प्रीतीतील धाग्याचे मी जाळे गुंफीत गेले.पण नाते त्याच्या मनाच्या विकृतीने तुटले.असो काळजी घे.पुढे अजून पत्र पाठवीन नि उर्वरित कळवींन....
स्नेहीसखी......
तिचं हे पत्र वाचल्यावर इसुबला रहावलं नाही.त्यानं ते दुसरं पत्र वाचायला हाती घेतलं. त्याचा नर्डं कोर्डंफट्ट झालं होतं.खोलीत असलेल्या माठातलं तांब्याभर पाणी त्यानं घटाघट पिलं नि तो त्या पत्रातल्या वळीवर निश्चल झाला...
सस्नेह.....
"तुहं ते पत्र हाती आलं.तेव्हा पत्ता बदलला होता.हे मला पोस्टमन ने आणून दिलंय.तोही बिचारा चांगला माणूस म्हणून न विसरता पत्र,पुस्तकं नि चळवळीची मुखपत्र आणून देतो.बरं दुसरा पत्ता आहे तो टिपून घे. तुझ्या त्यानंतरच्या पत्राने काळजाला चर्रर्रर्रर्रर्र डागणी बसली आहे.हुळहुळ झालंय मन.पण बरंच जिण्याचं तत्वज्ञान उमगून गेलंय.असो. जेव्हा मी तिकडं आली की,येईन ना तेव्हा आधी तुह्याकडे येऊन पाय धरीन बघ तुहे.कारे मह्या त्या पत्रातील बोलणं टोचलं का तुला? त्यासाठी काळजातून माफ कर म्हणेन.तुहं पत्रही या आठवडी आलं नाही.गप्प झालेला इसुबा नाही आवडत.तुहे पत्र आले,हाती पडले की,केव्हा वाचू नि ते शब्द काळजात भरू असं होतं.तुह्या पत्रांची वाट बघत असते.तू काळजी करू नकोस.आता दुबळी राहिली नाही मी.सगळं इख पचवेल अशी झालेय.
त्या दिवशी मही व्यथा वाचून जेवण पण केला नाहीस म्हणे.....मी जर तिकडं असली असती तर मह्या हातानं खाऊ घातलं असतं इसुबा.तुहं तुलाच हातानं खावं लागेल.मी लैय दूर हाय.तू न जेवलेला,रडलेला,दुःखी झालेला मला नाही आवडणार.मी दुःख नाही लावणार केव्हाच.कारण तू मला दुःख कसं इसरायचं ते शिकून स्वतः दुःखात का शिरला??
तू रडशील तर मीही इकडे रडेन.तू हसशील तर मीही हसेन.पण तू हसत राह न मग.मी आग्रह पण करणार नाही.आग्रह हा ढगासारखा असतो.खूप वेळ थांबला की ढग जसा बरसतो तसा आग्रह केला की,मन रिझवून जातं.वल्लं होतं.तू वेळेवर जेवत जा.काळजी घे रे ब्वॉ......!"
स्नेहसखी....
इसुबानं कपाळावर आडवा हात केला.अन तो होठातल्या होठात पुटपुटला,
"कित्ती काळजी करशील रे लड्डू....."
"एकदा म्हणती की,तुहं तुलाच हातानं खावं लागेल.अन एकदा म्हणते काळजी घे.अन पुन्हा काय???"
त्यानं त्याच्याच भुवया थोड्या गोळा करत विचारलं...
"हं इकडं आली त्त म्हणे पाया पडणार...!"
"अगं येडे सखीची जागा काय पायाजवळ असती का?" तू इकडं आली की समजेल ती जागा......"
जसे काही ती त्याच्या समोर होती.इसुबा गालात हसला,
"तुही व्यथा ऐकून कोण पोटभर जेवण करेल?? दोनखेप खायला म्या खादाड नाही काय."
अन त्यानं तांब्यातलं पाणी घेऊन तोंडावर हबके मारले.त्याला नवं तरतरीत सारं दिसू लागलं.पुन्हा त्याला पत्र दिसू लागलं.परत फिरून त्यानं पत्र हाती घेतलं.नवा पत्ता टिपून घेतला.अन एका पत्राकडं त्याची नजर गेली.
इसुबानं कैक पत्र पाठविले होते.तिपटीने तिचेही पत्र इसुबाला आले होते.समुद्राला जशी भरतीओहोटी लागून खाडीच्या तोंडात खारं पाणी येतं नि पुनःपुन्हा सागरात मिसळून पुन्हा खाडीत शिरत जातं.त्याचं फेसकूट होतं.त्याचं मीठ होतं नि मिठाची चव अन्नाला पक्वान्नात भर टाकते.तसे पत्र येत प्रश्नाला धरून जात होते.तसे वापस उत्तरानिशी येत होते.पत्राची नमकीनता वाढत होती.नवं विश्व नि बेनामी नातं तिथं निपजत होतं.त्यात नव्हती आशाइष्या,ना राग लोभ,ना वासना ना भोग,नव्हते त्यात मानवी मनाचे लाचारीने बरबटलेल्या दारुण पराभवाचे शब्द.त्यात विश्वास होता.काळजी होती एकमेकांबद्दलची.आपुलकी होती कोटीची.त्त सहृदयता भरपेट भरली होती.जीव लटकत होता प्रत्येक शब्दांत नि स्नेह हा मधासारखा लाळूस बनत होता.
सस्नेह-
"इसुबा जेव्हा प्रीती होती तेव्हा माणूस वाईट होता.प्रेमाची भावना किंवा प्रेमच्याही काही पलीकडची नाती काळजातून जपायची होती.तेव्हा समजुतदार्पणच नव्हतं त्याच्याजवळ.आता वेळ वाईट वाईट लागली आहे मला.त्याही पलीकडे जीव,काळजी,स्नेह,विश्वास,आपुलकी,सहृदयता आणि मया लावणारा इसुबा तुझ्यासारखा सखा लाभला आहे.हे जगतांना सख्यसुख मिळणं कठीण असतं रे ब्वॉ..... वेळ म्हणजे परिस्थिती म्हणायचीय मला इथे.असो...!"
"तू मागच्या पत्रात म्हणला होतास की,कुठल्याही साहित्यिकाच्या वाचनातून नाही सांगत मी,मह्या अनुभवातून तुला हे लिहितो की,प्रीती ही जिव्हाळ असते. मायाळ असते......!"
"मला खरं तर प्रश्न पडतो.कोणता अनुभव? तुझी पण प्रीती होती का? मग पहिल्या काही पत्रातून तू प्रेमभंग झाल्यासारखा का व्यक्त झाला होता.मला वाचनातून कळत होतं.त्यावेळी आपण खूप कमी पत्रव्यवहार करायचो.काहीच संवाद व्हायचा नाही.महिन्याकाठी तुझ्या पत्रातले शब्द ते विरहासारखे भास उत्पन्न करायचे.तू त्या आगगाडीच्या रुळावर्ती तिकडचा अनुभव पत्रात लिहून पाठविला होता.त्या पत्राच्या लिखानावेळी नक्की तू दुभंगून गेल्या काळजाच्या वेदनेतून व्यक्त होत असावा; असा माझा दावा आहे.भंग पावलेल्या मनासारखा.ती प्रीती होती का? का प्रेमभंग आल्यासारखं अनुभवाचं रहस्य?? सांग.. सांग ?? काय होतं ते? खरं आहे का ते? कळवशील."
“तू म्हणशील की कित्ती शंका करते हो पोर्गी...! पण कधी कधी शंकेची धार सत्याला पार्जुन जाते बरं का...!" जाऊदे तुझ्या पत्राची जबर चाहती आहे मी.कित्ती पल्हाळीक शब्द कवळ्या हृदयाचा ठाव घेतात तुझे.नि वाचनाऱ्याचेदेखील.आणि हो कुणामुळे कुणी उपाशी राहू नये.माझ्या व्यथेने म्हणे भूक मेली तुझी.बाबा इसुबा मह्यामुळं उपाशीतापशी राहू नको रे ब्वॉ.रागावतील तुझे अत्पेष्ट की,कोन्ह्या पोरीमुळं ह्यो इसुबा भाकर खात नाही.महं ऐकत जा कधीतरी.महं ऐकलं नाहीस तर,तुझ्या जिवाखातर तरी जेवत जा रे पोरा.ऐकणार नसशील तर पुन्हा पत्र लिहिणार नही मी तुला एका शब्दांचं.आणि मनातलं पाझरणार पन नाही कधी.मला वाटतं मह्यामुळं कोण्ही उदास राहू नये.आणि तू तर कधीच राहू नये.मला पण काळजी वाटते म्हणून हा आग्रह धरतेय.पण तू रोज वेळेवर जेवत जा.मह्या गतायुष्यातील विखराचं मला काहीही वाटत नाही.तू का त्याचं दुःख वाटून घेतोस.मला काहीही वाटत नाही आता.पण मनातून पार काळवंडले मी.अगदी बोळक्याच्या चुलीसारखी.दुःखाची वल सुकून गेली.मी कैक सोसलं त्याकाळी.आता रनखंबीर झालेय.तू काळजी करू नकोस खरं म्हणजे. येडपट सोडून दे हे सगळं.बंद कर बरं हे सगळंच.विखराचे विचार नि दुःखाचा डोंगर.हे मी तुला सांगावं की तू मला.कित्ती गुंतून गेला तू यातच.सूट यातून लवकर नि हो विश्वात मोकळा.आणि मोठा स्वास घेऊन कामाला लाग जोमानं.जीवन नवं जगायला लाग पुन्हा.
काळजी करू नको.पुढं शब्द फुटेना.
स्नेहसखी...
इसुबा शेवटच्या शब्दावर नजरेसह थोडा काळ रेंगाळला.त्याला आपुलकीचे काही तरी वाटत होतं.पण नेमकं काय....? कोण...? नि कित्ती??
ती पाखरासारखी त्याच्या पत्राची नि पाठविल्या प्रश्नांची उत्तरवाट पाहत होती.हसणं ती विसरून गेली होती.वीज कोसळलेल्या झाडासारखं तीन जगणं पसंत केलं होतं.पण अश्यात ना पत्र येत होतं ना पत्राचं उत्तर.पहिल्या प्रीतीच्या नकारी व जहरी वियोगाने ती काळजात काळवंडली.तिचा जीव टांगला जात होता टपालाच्या दिशेत.अनुभवाचा विखार ती सोसून होती.काळजाच्या जखमेत दुःखाचा पु घेऊन वेदना सहन करत होती.तिचं काळीज ठसठसा फुटत होतं.पत्राच्या ओळखी,शब्दांची मैत्री,नि अंतराच्या प्रीतीने ती द्रोहीत झाली होती.काळासंगे ती झगडत जगत होती.नि काळ दुःखाला झिजवत होता.तर आठवणी त्याला अरतून परतून फोडणी घालत होत्या.किंतु ती मनानं धीर सोडत नव्हती.जगण्यावर तिची नितांत प्रीती होती.
तिच्या मनाच्या गाठी पडल्या.त्या गाठीला अनुभवाचा विखार बांधलेला होता. म्हणूनच तिनं काळजाला लागलेल्या दुःखाच्या ज्वलंत डागण्या विवेकी निर्णयाने विसरायच्या ठरविल्या नि सुखात जगत रहायचं ठरवलं.
तिनं हिय्या केला,
"की प्रीती पुन्हा नाही.प्रीती ही मह्या काळजात पुन्हा जन्म घेणार नाही...!"
तिनं स्वतःला कडक शिस्तीत ठेवलं.आपल्या काळजाचा दगड व्हावा असं तिला वाटत होतं.असं ती पत्रातून बोलून दाखवत होती.इसुबा तिला बिनधास्त नि हळुवार मोकळं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य बहाल करत होता.तो मिस्कीलपणे पण मार्मिक म्हणत होता...
"मी कुठं बांधून ठेवलं तुला...तू स्वतंत्र आहेस या विश्वात...जग मनमोकळी.....कारण हे जगणं पुन्हा नाही.....!"
नि ती जणू जमिनीच्या खाचा फोडून टर्रारून कोंब फुटवा तस्सी सखोल नि उरफोड व्यक्त होत होती.
दबलेल्या विचारांचा स्फोट झाला.म्हणजे माणूस अतातायी होतो.पण काही तथ्य नि सत्य ही त्यात निपजते हे चुकीचे नाही.
पण खोल रुतलेला काटा तापल्या तेलाच्या थेंबानं सुटतो.तशी ती सारी हकीगत इसुबाला पत्रातून कळवत होती.व्यक्त होत होती.निर्भय होऊन.
मन जिवंत असतं.त्याला तहान लागते.जुन्या अनुभवांच्या कोरडेपणावर नवा अनुभव तजेला धरून येतो नि त्याला आपुलकीचं जळ पोषक असतं.पण याचवेळी जुन्या कडवट,विखारी अनुभवांची चरचर ही नव्या अनुभवांचा मनात हादरा घेऊन असते.ती आता पहिल्या प्रीतीतील ती राहिली नव्हती.ती बेभान झाली होती.ठेस जाणून होती.विखार पचवित होती.विरह गिळत जगत होती.
स्वप्नात सगळं दिसतं पण स्वतःचा चेहरा दिसत नाही.म ते स्वप्नच का पहावे.चूर करून टाकावे.खंबीर व्हावं मनानं..स्वतःबद्दल.ती विचारांच्या घावाने नवं गुज उकलत होती.
"म का तुझा हट्ट करावा?? जगण्याला तू पुरा नाहीस.तुझं एक दिवस मरण निश्चित.नि मी कुठं जगायला आलेय???
"तुझा लोभ मला असह्य होतो आहे.तुला ठाऊक आहे,की माझ्या वगण्यात शेवट होता? मी राखला होता.सत्याला शेवट नसतो.आता तू महा नाहीस नि मी तुही नाहीच.म हा लोभ उरतोच कुठं?? हा हट्ट धरून काय मिळणार आहे तुला सांग बरं? रामाला तरी काय मिळालं? अत्यं सीतेला कोणती खरी प्रीती मिळाली? काय मिळणार?? काय??"
भावनांच्या स्वप्नांचे निखारे इझुन आता कोळसे आणि राख उरली आहे.ती निष्ठुर जगत होती.आपल्या नजरेतून पुरुषार्थासाठी अग्नीचा वर्षाव व्हावा तो पुरुषार्थ जळून भस्मसात व्हावा.म्हणून तिचा असाही साधा कटाक्ष तीक्ष्ण होत चालला होता.परंतु ते अशक्य निसर्गनियमत्वात बसत होतं.हे तिला कळत नव्हतं.कारण ती स्वभावाने सुंदर स्त्री होती.नव्हे त्त असणं हे तिचं स्वाभाविक सौंदर्य,मनमिळावू स्वभाव,जगणं स्वाभिमानी नि हिम्मतीपटीचं एक जगावेगळं सत्य पुढं मांडत होतं.इसुबाला ते जिंकून घेत होतं.नि इसुबा न हारता बेहिसोबी जगत होता.त्याला हार ना जित मान्य नव्हती.तो म्हणत होता,
"घ्या फायदा कोण्हीही महा.. म्या जगायलं आलो नाही...!"
यात तो कुठं स्वाभिमान हरवत असेल बरं???
दुःखाचे इखारी अनुभव मात्र कधी कधी तिला जाळत होते नि ती अश्रुंचे घोट घेत जगत होती.
मरणाने एकदाच मृत्यू होतो.पण प्रीती वियोगाच्या यातना हजारो मरण बहाल करतात.हजारो इच्चू-इंगळ्याच्या डंखापेक्षा ही वेदनेची तिडीक जहरी नि ठणकदार असते.काळजाचे रंध्रे ती हिस्काडते.
प्रीतीचा मुका मार तिच्या मनात ठणकत होता.लिंबाच्या पाल्यासारखा कडूडक विरह सहन होत नव्हता.ती तस्सेच जगणे पित जगत होती.
काळाच्या निश्याण्यावर मोठ्ठाली दुःखेही झिजून जातात.
"बाss ईss जे हवे असते ते ते कधीच मिळत नाही.मिळतं का?? पण तरीही माणसाला हाव असते.पण नको आता ती हाव तुटली.इसुबा... तुझ्या या बेनामी नात्याच्या स्वीकाराने माझ्या साठलेल्या गढूळ जीवनसंघर्षाला आशेची आरक्तता आली आहे."
"खरं सांगू ....प्रीतीच्या खेळात जी सुखासीनता गाठते,ओलांडते तेव्हढा शेवट मला नको होता.मह्या जीवनाची लांब सडक काळोखी रात्र झाली होती."
चिंतेने काळवंडलेले तिचे शब्द म्हणत की,
"तुला माहितीय...तुझ्या येण्याने हे क्षण तेव्हढेच त्यात प्रकाशाच्या तिरपेसारखे आहेत; जेव्हढे काळोखात स्पष्ट असतात."
कैकाळ तिनं रडून बेतवला होता.डोळ्यातले अश्रूपण कोरडे होऊ लागले.दुःख दडत नसतं.पाण्यात पडल्या तेलाच्या थेंबासारखं ते तवंगतं.ते उफाळून येतं.एकेळ सूर्य रात्री दडतो,चंद्र ग्रहणाला दडतो,ढग डोंगराड दडेल पण दुःख नाही.ते भावनेच्या भरात ओकल्या जातं.दुःखाला वाचा फुटते. फक्त वाचा फोडणारा कसबदार असायला पाहिजे.माणूस माणसालाच बोलतं.जनावराला नाही.कारण त्याला वाचा नाही.या शब्दानं ती पत्रातून बोलत होती.निःसंकोचपणे सारं दुःख ती सांडत होती शब्दांत.नि ते शब्द शरासारखे इसुबाच्या काळजाचा दाह निक्षून जात होते.इसुबासारखा मेरूप्रमाणे तिला व्यक्त होणारा नि मनमोकळं लिहिणारा आधार गवसला होता.तिच्या अंतरीच्या वेदनेची कल्पना इसुबाला आली.कधी तरी एकदा तो तिला पत्रात म्हनला,
"अगं वेडे,तरुणपण म्हणजे कंबळणीच्या पात्रावरचं पाणी.कधी ढळेल काही सांगता येत नाही.उथळवट.पण विवेकाने ते ठैरवता येते हं..!"
कधी कधी ती अधीर होऊन प्रीतीच्या जहरी वेदनेने घेतलेले ठाव व्यक्त करीत होती.
म व्याकुळ झालेले तिचे पत्रातले शब्द इसुबाच्या मनास दंश करीत होते.काळज फोडत होते.दंशानंतर सर्पालाही ग्लानी येते.हा तर काळजाला झालेला दंश होता.तिर लागलेलं पाडस जीवाकांताने पळतं तद्वत ईसुबाच्या मनाची गती होत होती.या जगाचा वारा पण त्याला सोसवत नव्हता.त्याचं आधीचंच एकटं जगणं.त्यात हे द्रोहयुक्त नातं सारं इसुबाचं विश्व पालटत होतं.
तिच्या कैक पत्रातून मनाची अस्वस्थता इसुबाला उमगत होती.गाठी बांधलेलं गठूडं सोडावं तद्वत तिची घालमेल उकलत होती.तिची अवस्था अशी झाली की,खरं म्हणजे...
"आता आपलं कोण्ही म्हणजे कोण्हीच नाही.!" याची तिला जाणीव प्रकर्षाने होऊ लागली.लालबुंद निखाऱ्यावर पोलादाचे पाणी व्हावे नि काळाच्या ओघात अजूनच ते पोलाद भक्कम मजबुती व्हावे तसे तिचे काळीज जळीत परिस्थितीने कणखर होत होते.ती तोंडी हसू ठेवून अंतरी रडू आवरत होती.कधी कधी अंधारात स्वतःच डोळे निरपित होती.हुंदके आवरत होती.स्वतःला सावरत होती.चळवळीत असं रडणं चालत नाही लढलं पाहिजे हे सत्य ती खरं करत होती.वास्तवात त्त मात्र तिच्या हृदयाला विसरलेल्या नि हरवलेल्या प्रीतीच्या दुखःघावाने चिरा पडल्या होत्या.त्या अजिंठा लेण्यासारख्या भासू लागल्या.
“बाका वकत माणसावर येतो.हिम्मत हारायची नाही.” इसुबा तिला धीर देत होता.म ती पत्र पाठवून सांगत होती,
"विचारांचं जहर मेंदूला सडून,नासून,झिजून टाकतं.जुन्या गोड आठवणीला पंख फुटतात.नि मन उडून जातं तिकडं.वेगळ्या दुनियेत.मी त्याला एका दिवशी पत्राद्वारे कळविले आहे की,
"तू मला विष समज,जहर समज,ते विष तुला ठार मारील.अशी कल्पना कर.नि मह्यापासून पत्राची आशा सोड.तुहा अंत मी पाहिला आहे कैक्काळचा.आता वाट पुसली मी डोळ्यातली.मी तुला मह्या जीवननौकेचा सुकाणू समजलं होतं.आपलं समजलं होतं.तू त्त हिमनग निंघालास.आतून घात केला.प्रीतीला असं तू चरुगाळुन गेला की तू केव्हा प्रीत समजली नाहीच मुळात...महं मन तुटलं.काळीज फाटलं आहे.मनाविरुद्ध जगणं नि विचारांची तडजोड करणं मला जमत नाही.विवेकाने मी मनाविरुद्ध बंड पुकारला आहे.वास्तवात ते चळवळीसाठी नि जगण्यासाठी नेकीच्या,सत्याच्या आधारावर टिकून आहे.त्याचा सारासार म्हणजेच,
"मी माझी प्रीत,देह नि काळीज जबरीनं कुणाला देणार नाही.ते सर्व महं आहे...!"
"आता मला पत्र पाठवू नको.बोलू वा बोलण्याचे,झुरविणारे पत्र पाठवू नकोस.नको,नको,नकोस तू आता....संपलं सारं.....!"
ती बिनदिक्कत इसुबाला सारं कथन करीत होती.इसुबा तिच्याच चिंतेत व्याकुळ होत भाकर खानं पण इसरत होता.काळज हे दारूच्या कोठारासारखं असतं.भावनेच्या निशेने जळीला सुरुवात केली की,ते भपके मारू लागतं.चर्रर्रर्र करत होरपळत राहतं.धगधगत राहतं.
तिच्या आत्म्याला धग लागली होती.ती आतून जळत होती.काळजातून कुढत होती.धगधगत होती.वरतून ती हसू दाखवत पण आतून होरपळून गेली होती.
तिनं आता भयंकर मानसिक जाचातून सुटका करून घेतली होती.दगडही बदलतो.फक्त उत्तम शिल्पकाराच्या स्पर्शाने.त्याच्या कौशल्याच्या जोरावर.कारण पाझर त्त दगडातच फुटतो हे इसुबा जाणून होता.तिचं हृदय दग्ध झालं होतं.शिकस्त करून ती दुभंगलेल्या हृदयाला बांध घालीत होती.चळवळीत बिनधास्त जगण्याचं नि मानवतेच्या कल्याणाचं मत व्यक्त करीत होती.नव्या नि बिनदिक्कत स्वविचाराने चळवळीचं जु ती पेलत होती.नव्या बेनामी नात्यावर ती आता जगत होती.परंतु ऐन वनात तस्करांनी गळा कापावा तसे हे तिच्या पहिल्या प्रीतीचे झाले होते.तरीही ती जगण्यास झुंज देत होती.संघर्षत होती.
ती आता जोमानं चळवळीत शिरली होती.विचारांची कत्तल विचारांनी करीत होती.एक सकळ उद्धाराचा विचार ती प्रबोधनासारख्या बी रुपानं पेरत होती.मानव सुखांत नि कल्याणार्थ ती झटत होती.काही दिवसांतच इसुबासारखा स्वातंत्र्य,समता,बंधुता,एकता नि,स्वाभिमाने जगणारा सखा मिळाला होता.तो स्वभावे निर्भेळ सखा तिला नवं विश्व नि नवं जगण्याचं तत्वज्ञान पत्रातून कळवत होता.तर त्याला ती आपुलकीचे मानत होती.काळजीचा माणूस मानत होती.ती म्हणत होती,
"इसुबा आपली जिथं कुठं भेट होईल बाप्पा तिथं येऊन तुहे पाय धरील.चरणी मस्तक ठेवील.प्रीतीपेक्षाही मोलाचा तू मिळाला आहेस.खरंच तू म्हणतो ते की,प्रेम शूद्र असतं.शरीरासवे ते जळून खाक होते.त्यातले राग लोभ नष्ट होतात.राख होते त्यांची काळ्याठिक्कर झाल्या जळत्या मढयातल्या हाडकासारखी.मी खुप नशीबवान समजते स्वतःला की,तू पडत्या पावसात डोळ्यातले अश्रू ओळखणारा जादूगार आहे.शब्दांचा किमयागार आहेस.कारण ह्या पत्रांच्या शब्दाची किमया नि भुरळ आणि जहरी दुःखदायी वेदनपीडाही मला ठाऊक आहेत.तुला पत्राने बोलणे केव्हाच बंद करणार नाही.तू विश्वापेक्षा वेगळा.नामानिराळा.मी निमाले....!"
शंका दुधारी तलवारीसारखी असते.एकीकडे ती असत्याची बाजू साळत असतांना सत्याची कांब ती बाहेर टाकत असते.त्त दुसरीकडे सत्याला सोलून उपसत बाहेर आणत असते.यामुळं ती कधी कधी इसुबाला जुन्या चिरलेल्या विश्वासाच्या अनुभवावर घासून घेत होती.दुधाने तोंड पोळलं म्हणजे ताक फुंकून प्यावं असं तिचं मानसिक पातळीवरचं वागणं इसुबा नाही तसं सहन करत होता.पाण्यात खडा टाकून अंत नि खोली घ्यावी तसं ती इसुबाच्या स्वभावाला जोखत होती.तो कोमल भावनांच्या चटक्याने भाजून जायचा.इसुबाचं अस्तित्व माणूसपणाचं म्हणून म तो कधी कधी तर पत्रात दीडच ओळ लिहायचा नि तिला ते पत्र पाठवायचा.त्या दीड ओळी म्हणजेच........,
"विचारांची तडजोड म्हणजे वैचारिक गुलामगिरीच.....!"
-लेखक-
विश्वनाथ अर्जुन साठे
-9921056462 [समाप्त] दि.06/06/2017

Comments
Post a Comment