कथा
***ढोरक्या***
निंदनाच्या घाती माय्च्यासंगं निंदाय्लं सुरेबिना म्या पळाव. हब्रेटाच्या सुगीत नुस्त धांडे पाडाय्लं जाव.हाब्रेट खुडायलं हात पुरत नव्हता. कंसं मायच्या डोस्क्याउपर मंग महा हात कसा पुरल. म्हून म्या धांडे पाडायाचंच काम कराव. उडदा-मूंगाच्या शेंगा तोडायलं. तूर बंडवाय्लं.स्वायंबिंच सोंगय्लं.माय, मह्याहून मोठा भाऊ पंडित,त्याच्याहून मोठा भाऊ दत्तानं आन म्या तस्यां कमालं धजाव.आम्ही तिघं भाऊ.घर धकव्न्यासाठी मायच्या पदराआड पळत व्हतो.माय बिचारी घरदार,संसार,तीन लेकी ,याची आब्रू संभाळत त्या काळासंगं पैजा जिकत व्हती.अन् त्यो लव्हार जसा कुऱ्हाडी निशान्यावर घासून चकमकीत धारवत्यो तस्सा काळ तीलं दारींद्रयाच्या जंतर कसुटीवर खसंखसा घासत व्हता.गव्हांब्रुबरं किडे रर्गडाव तस्से आम्ही सारे रर्गडत व्हतो. बालं तर दोन दोन-तीन दिवसं घरी पाउल टाक्ता येत नव्हतं.ब्यांडात त्ये वाज्वायलं जात व्हते.पट्टीचे कलाट वाजवन्यात कोन्ही त्याहीचा हात थांब्वत नव्हतं.त्ये पहाटव्याची भुपाळीपसून त भैरवीच्या खोल खर्गात जाऊन उलटय्च्ये. म्या त्यो देरे कान्हाचा मीस्र सूर त्ये वाजवत तस्सं कुठंच आइकला नाही. घरी लग्न वाजून आले कि रियाज करत घटकाभर त्ये कलाट फुकत बसय्च्ये.ज्यालं लोक येडा रम्या म्हनाय्चे त्यो कलाट वाजली कि लगेच दाराची कोराटीची ताटी लोटून घरात येऊन बसत व्हता.कैक लोकं ताटीच्या आत यालं दुजाभाव कराय्च्ये.पन सूर त्याहीलं मुकाट बसू देत नव्हता.लाग्लीच कोन्हीतरी ताटी भायरूनच म्हनायचचं मास्टर त्येच लावानं येकदा. आर्जुना देरे कान्हा वाजव रे पुन्हा.लैय भारी वाजवतु गड्या तू काळी पुंगी.लग्नाच्या तिथी लाग्ल्या कि,तिकडंच आंघूळ, तिकडंच खानं. घरी आल्ये कि त्ये ज्यास्त बोलत नव्हते.रातरात जाग्रनानं त्ये कळवंडत गोधडीत पडत.कैकदा त्याहीच्या तोंडातल्ये फोडं आल्यावर त्ये गप्पगार आसत. मातर त्ये घरी याईची आम्ही सारे वाटंच न्याहाळत व्हतो.कारन त्ये घरी येतानं काही न् काही तरी लेक्रासाठी खांद्याच्या रुमालात दीड दोन गाठी बांधून आनाय्च्ये.कधी त्या रुमालात आंगुर, त्त कधी कडकड उन्हाळ्यात टर्बुज,त्त कधी पार,वाटा.कधी कधी पैसे ब्यांड मासतरनं देलेच नाही म्हून नुस्ते हात हालवत लोनाराहुन पांय्दळी रस्ता तुडवत याय्च्ये.आम्चा हिर्मोश्या तव्हा व्हतं व्हता.पन माय सारं सांभाळत व्हती.तिचा सभाव बोल्का अन् परूप्कारी,दुसर्याचं दुख वाटून घेणारा व्हता.म्हून गावात तिचे कैक चांगल्या आपुल्किच्या म्हराटनीन बाया बरुब्बर समजीचं,जिव्हाळ्याचं नातं व्हतं.आश्यायेळी ती मटकन गावात जाची आन लेक्राच्या आस्यामोडीसाठी पापडं, धाप्ड, खारुड्या,आंब्यालिंब्याच्या खारांनं अन कुर्डया सांडया नं भर्लेला पदर घेऊन घरी पर्ताय्ची.खरं पाह्यलं त्त त्ये मलं समजूत घालन्यासाठी व्हतं व्हतं.कारन म्या लैय ह्टखोर व्हतो.जे पाह्यजे म्हंजे त्ये मिळालंच पाह्यजे.नाहीत्तर मंग घटका घटका रडत बसत व्हतोम्या.माय कद्राय्ची पन तिची जित्ती मया कधीच तुटत नव्हती.ती वल्ली व्हती.त्या गरिबीतही. झिऱ्याच्या उग्मावानी. कधीच न् आटनारी.ती मलं लाडानं इसू म्हनाय्ची. त्या हांकत मयादया व्हती.तळमळ व्हती.गरिबीच्या इंगळावर जळर्नारी दुखी आर्त वव व्हती ती.म्या रंडनं सोडून मंग गालावरच्ये वघळं पुसत मायच्या तोंडाकडं एकटक पाही.ती फक्त बोलत ऱ्हाय्ची,"इसुबा!ह्य घे पापड कवीच्या माय्च्या घरून आन्लेत,कुर्रडया तुलं भाजून देते पन मह्या मांघ घरात रड लाऊ नक्को बाप्पा!"माय झंजाळाय्ची लैय वाढूळ वाढूळ काळजातून बोलाय्ची.त्या बोलण्यात काळजालं डव्चाळनारे परिस्तितीच्या कठूर हालाक्या आगतिकतेचे जंतर जंबे खूपस्लेले व्हते.
ती मोरी गाय दमदाटी येऊन मुकाट चरू लाग्ली.वारं शीळ घातल्यासारखं वाजू लाग्ल.त्ये माळरांच्या आवंढ्यालं गिळत पळत व्हतं.पिठूऱ्या त्या वाऱ्यावर झोकांड्या खात नाचू लागल्या .बिब्बे आल्पे ताठर पानं अन् काळे कुळकुळीत,हिर्वे बिब्बे अंगावर लोम्बकाळत उभे व्हते.हिर्वेगदाड लिंबं, वडं,चिच्चा वाऱ्यावर झुलत लाग्ल्या.उंब्र दोड्यावर आले व्हते.कोराट्या आराट्या हिरवल्या. येँखळन टांखळ खुटच्या खुट काटे अंगावर घेत पानांन मढली व्हती.माडीएव्हढाले गवतं टोंगळ्यावर झाले व्हत्ये.त्याची दरप येक येग्ळाच वास वाऱ्यात घुसळत व्हती.कुठंमूठं आंब्ये नया नवरीवानी मव्हराचा पदर डोसक्यावर घेत वाऱ्यालं बुजत व्हते.धामुकडे धरलेल्या सेंगा बाभळीवर खळखळ घुंगरासारख्या ताल धरू लाग्ल्या.आभाळ कोर्डया राखाडी रंगानं भीजलेलं. कइक पाखरं त्या मोकळ्या आभाळाच्या गावात मन्वाट्टलं तिकडं भरर्र हुंदडत व्हते.त्ये जगाईचं ग्यान जमिनीव्हरल्यालं जणू सांगु लाग्ले.व्हल्या पखं मारून मारून येका लिंबाच्या डांखीलं चिटकला.महार्काच्या घनघोर आंधार्या ढोलीतून राघूदा गोड कंठ फोडून फोडून मैनची वाट न्याहाळत व्हता.येका सूबाभळीवर त्त लैय कोंघाया आर्डू लाग्ल्या बाप्पा.ढोरं आता निवांत चरत व्हती."रातभरच्या उपासपोटानं भुकेजल्येलं जनावर मिळंल त्ये भुकच्या आकांतानं खातंय". आसी माय म्हनाय्ची.त्ये तव्हा मलं ध्यानात आलं. दोन गाई त्त चराचर गवतं कवळत घास घेत पोटात कोंबू लाग्ल्या.त्याहीच्या पाठीवर बस्लेल्या साळुंख्या पन त्याहीलं जड वाट्त नव्हत्या.लैय उच्चीवर येक बईलससाना आभाळात खाली मुंडकं घालून घेगाट्या घालत व्हता.अन् त्यानं येकदाच खाली सूर लावला.खाली येतानं त्यो काळा ठिपका वाटत व्हता.पन माळाजवळच्या खदानीतून त्यानं काहीतरी पायात धरूनच पुन्हा आभळाकडं झेप मार्ली. कवटाच्या झाडाखालून ह्ये सारं म्या न्याहाळत व्हतो.कवटाच्या शेंड्यात बस्लेल्या पारव्या चेकळल्या. चिमण्या,खबूत्तरं खुदखुडत भराऱ्या घालत व्हत्या.
लैय वाढोळ म्या त्ये वाव्वरातलं चईंतर पाह्यलं."कोन्तपन लैय येळ मनालं भावत नाही;खरं कारन म्हंजे मन येकजाग्यावर बसतच नाहीनं"आसा इचार मनाच्या पान्यात इरळला.जरा ढोराय्ल पुढं हणाव म्हून म्या कोराटीचा फोक उपस्ला.त्यालं दगडावर घासून गुळगुळीत केलं.अन् ताम्बड्त बईलाच्या पाठीवर येक फोकाचा झप्का मार्ला. तस्सं त्यो बईल धर्पडतच माळांनं बोंगाळला.सारे ढोरं त्याच्या मांघ मांघ उधळत गेले.मलं वाटलं,"बस्स आत्ता काय खरं नाही गड्या;ढोरं हाती लागत नाही कान्नु!"म्या पन त्या कवटाखालून धूम ठोकली.माळाच्या उतरंडीमुळं पायात पाय गुतत व्हते.पुढचा पाय टाक्ला कि मांघचा पाय त्यालं गुताडत व्हता.सारं आंग झोकून देल्यावानी व्हत व्हतं.पुढं येकगोल दगड पायाखाली आला अन् व्हत्याचं नव्हतं झालं.चांगल्या दोन कलांड्या खात बेस्रमीच्या तगारात जाऊन पडलो.जीव घायबर्ला .पह्यल्यांदा आप्ल्यांलं कोन्ही पाह्यलं नाहीनं. हे निरखलं. अन्त्या तगरातून भहीर आलो.पाठीत चमक भर्ल्यांवानी झालं.उजव्या हाताच्या कोपऱ्याची लैय आग होऊ लाग्ली. पाह्यतो त्त रक्ताचा वघळ मन्गटावर आलेला.त्या जख्मची तिडक डोस्क्यात झिंग्ली.तस्साच हात झटक्ला.अन त्या पाल्याचं ध्यान आलं.
शंकरलाल्या नुस्ताच टक्मक पाहू लाग्ला. त्याची ढवळी दाढी अन् पिळदार मिस्या आइटदार दिसत व्हत्या. त्यो एक सबुद बोल्ला नाही.आवचित त्यो कधी तरी एखादं दोन सबुद बोल्ला. पन व्हटातल्या व्हटात.मंग म्या त्या बाईलगाडीलं आर्ध चक्कर मारून माळाच्या बर्गर्डीलं चढू लाग्लो.
पूर्वकडून सूर्य कास्राभर आभाळात सरक्ला व्हता.माळालं कैक झाडंझुडुपं तग धरून व्हती.त्यात खुटच्या खुट काटेरी बाभळी हिर्वा पाला गाळू लाग्ल्याI व्हत्या.नेम्कीचं लोनीची जत्रा उलटली व्हती.थंडीत उन्हाच्या झळा घोळू लाग्ल्या व्हत्या.पिठूरीनं आंग तंगाडलं व्हतं.ती लाल पीवळ्या रंगानं भिजली व्हती.चार चारुळीवर आलेले.बोरीखाली त्त बाप्पा बोराचा सडाच पड्ला व्हता.एका बोरीखाली जाऊन म्या दोन मुठी बोरं चड्डीच्या खिस्यात कोंब्ले. ढोरं माळाच्या उतरनिलं चरत व्हती.मोऱ्या गाईनं सारा माळ तुड्वला. अन् पुन्हा ढोरांत ती घुस्ली.
त्या दिवसी म्या हाडयाच्या माळावर ढोरं चारायलं व्हतॊ. आइतवार व्हता म्हून सुट्टी शाळलं."घरी ऱ्हाव्हस्तोऱ लक्षीमन हाडयाच्या ढोरं वळायलं जाय. तेव्हढेच वह्या-पुस्तकालं पैसे व्हतील."बा म्हणले.
"बरं जातो; पन ती मजुरी महीचं !"म्या बोललो. बानं काहीच म्हणलं नाही.अन् त्ये गाडवटनं लोणारलं कस्यासाठी तरी लगबगीनं गेले.माय सुरेबिना जेवारी च्या भाक्रीच्या पिठासाठी दळायलं गेली व्हतीं. ती आम्च्या पोटात भाक्री पडावं,अन् लेकराईनं कामधंद्यालं पळाव.या संसारहीसेबानं ती धावत व्हती.
तिच्या मनीठाई सुख लागत नव्हतं.कसं लाग्नार. जल्माची दरिंद्रि घरात आ वासून चौकट कुर्तर्डत बसलेली.
आज ढोरं का व्हईन वळू.पन उद्या एक-पुस्तक घेता येईल.या इसेनं म्या हाडयाच्या इमल्याकडं गर्रबर्डीत गेलो.जाता जाता मिनिलं साग्न झालं कि,"म्या जातॊ तसाच,माईलं म्हनं भूक नाही. वावरातच काही खाईन.तिकडं टर्बुजाचा मळा हाये."मह्या वाटयाची एक भाकर शिल्लक थापु नको म्हना. बर का.मिनी मही लाहयनी भहीन.म्या तिलं निरोप सांगून तसाच म्हराट गल्लीत गेलो.तिथं पाटलाची,सावकाराची इमले उभी व्हती."हाडयाच्या इमल्याच्या दारातूनच हाक मार्ली,"बाप्पू,ओ बाप्पू,आज ढोरायलं चाराय म्या जाईन म्हंतो. संध्याकाळी मजुरी तेव्हडी द्या!" प्रशस्त इमल्यातून आवाज आला कोन हाये तिकडं?"म्या म्हनलो,"म्या अर्जुनाचं पोरगं."बरं बरं ती किल्ली हाये आडकवलेली फर्दाल्यालं.घेऊन जय अन् ढोरं पान्यावर न्ये. मोऱ्या गाईचं लोढनं नीट बांध. ती ज्र बेजार कर्ती."मह्या जवळ ती किल्ली देत हाडे म्हणला. अ न् आल्यासरसी मांघ निंघुन गेला.जाताजाता काहीतरी त्यो पुटपुटला.मलं आयकू आलं नाही. ,म्या तसंच ढोरं सोडायल गोठ्याकडं गेलो. दावनीचे ढोरं सोड्ले.अन् म्या हाडयाच्या ढोरालं चराईलं पांदीनं घेऊन निंघालो.खाली
पाय फुपुट्यानं तळून निंघत व्हते.भुर्क तुगुट पोटर्याचं लेंग झालं व्हतं पांढऱ्या मातीनं.
ढोरं पांदीपांदीनं उधळत माळाच्या बाजूनं जाऊ लाग्ली.मोऱ्या गाईन त्त बाप्पा हुसंड्या मारतंच कळप सोडला.तिचे सिंगं तल्वारीनं धारदार टोकं साळल्यावानी दिसू लाग्ले.तांबडत राखड्या रंगाचा बैल त्त लय मस्ताडला व्हता.ढवळ्या काळ्या कर्डया ,ढष्टपुस्त आंगाच्या दोन जोडगोळी वासरानं सारं वारं पिलं व्हतं.

Comments
Post a Comment